पावसाळा आला, लोको.
आपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक/ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.
बर्याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या (फोन वरून
), माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी हा लेखनाचा धागा सुरु करत आहे.
तुम्हाला माहीत असलेली ठिकाणे (water parks, resorts, धबधबे, किल्ले, बीचेस्, प्रायव्हेट बंगले/फार्म हाऊसेस् इ.इ.) जी एक दिवसीय किंवा दोन दिवसीय (over night stay) सहली (पिकनिक/ट्रेक किंवा ववि) साठी साठी उपयुक्त असतील ती इथे सांगा. जर राहण्याची सोय असेल तर सोबत बुकिंग साठी आवश्यक तपशीलही द्या. जसे की:
contact numbers
email addresses
पत्ता
जाण्या-येण्याचा सोपा मार्ग
transport ची व्यवस्था
इ.इ.
(आपल्याला बर्याचदा विपत्रांमधून ही माहीती मिळत असते. ती इथे share करा. ही माहिती असलेली PDF किंवा word doc फाईल तुमच्याकडे असेल तर तसे लिहा. म्हणजे मग इच्छुक लोक तुम्हाला संपर्कातून लिहू शकतील.)
एकमेकां सहाय्य करू, अवघे जाऊ पिकनिकला!!!!!! 
[जवळच्या (चार तासांचे आत) व लांबच्या प्रवासाच्या वेळी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, प्रवासाचा मार्ग कसा निश्चित करावा, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी माहितीचे एकत्रित संकलन खालील धाग्यावर पाहता येईलः
प्रवासी भाडोत्री गाडीने जवळच्या/ लांबच्या प्रवासासाठी टीपा
]
+++++++++++++++++++++++++++++
आत्ता पर्यंत या धाग्यावर पडलेल्या पोस्ट्स मधून पिकनिकसाठी जे ऑप्शन्स मिळाले आहेत ते एकत्र करून एरियावाइज इथे देत आहे:
मुंबईजवळः
१) शहापूरजवळ (जिल्हा. ठाणे) एक HARSHGIRI Lake Resort आहे.
खूप अगदी खास नाहिये. पण जेवण बरे होते इथले. आणि रेट्स ही फॅमिलीसाठी परवडेबल आहेत.
राहण्याची सोय आहे अथवा नाही मला idea नाही. नेट वर सर्च केल्यास या Resort ची लिंक आणि बुकिंग चे तपशील मिळू शकतील.
२)
कर्जत मधील काही रिसॉर्ट
रीव्हरटच ** http://www.rivertouchresort.com/index.html
मोदी रिसॉर्ट** http://www.drmodisresort.com/contact/default.htm
सदा आनंद** http://sadaanandresort.com/tariff.html
प्रकृती *** http://www.prakrutifarm.net/ - फॅमिलीसाठी हा छान ऑप्शन आहे.
पिकॅडीली*** http://www.piccadillyworld.com/farm.html
सत्या *** http://www.satyaresort.com/
रीव्हरगेट **** www.rivergateresort.com
कर्जत फार्म हाऊसेसची माहिती ह्या साईटवर पण मिळेल :
http://way2nature.com/index.asp
http://mumbai.click.in/classified/travels/hotels-resorts/karjat-farmhous...
३)
कल्याण -
विश्वासराव फार्म हाउस** http://vishwasraofarmhouse.com/
रिव्हर वाईन्डस*** http://riverwindresorts.com/About.html
विसावा रिसॉर्ट - www.visawaresort.com
४)
अंबरनाथ - शांती सागर**
At Vasat, Near M.I.D.C. Pump House, Ulhas River Bank, P.O. Jambhul,
Ambernath(W). Maharashtra, INDIA.
For General Enquiries and call on Telephone No : (0251) - 2681999 / 2683210 / 3200728
(0251) 2682792 / 2685631 / 3200727 Mobile: 93204 09818 ( call timings 8.a.m. to 8p.m.)
५)
बदलापूर - रेनी रिसॉर्ट** http://rainyresort.com/
६)
ठाणे - टिकूजी-नी-वाडी ** http://www.tikuji-ni-wadi.com/
७)
वसई- पालघर - भाईंदर
http://www.silenthillsresort.com/2a.html
रोशिनी कृषी पर्यटन केंद्र
Post Karanjon,
Shiravali-Vajreshwari Road,
Vasai(E)
6808406, 9890376323,
केशवसृष्टी
Keshav Srishti Office
Uttan village, (on way to Essel World by road),
Bhayander (West), Thane: 401 106
Tele: +91 22 28450247/2855
Email: jagdish_rp@rediffmail.com
http://www.keshavsrushti.com/picnic/index.php
८)
नेरळचे सगूणा बाग फार्म हाऊस: - http://www.sagunabaug.com/
नेरळला भडसावळे यांचा हा फार्म आहे. जवळ नदी पण आहे. घरगुती स्वरूपाची व्यवस्था आहे. पिलांना न्यायला मस्त आहे. खूप मजा करतात बच्चे कंपनी तिथे. बफेलो राइड मूळे तर अजुनच मजा येते त्यांना.
पण मोठ्यासाठी एंजॉयेबल पिकनिकची गॅरंटी नाही. एका माबोकराच्या अनुभ्वाप्रमाणे व्यवस्था काही खास नव्हती. नदीत नुसता चिखलगाळ होता. जागेचा नीट न ठेवलेला मेंटेनन्स, जेवणाची नीट न झालेली सोय यामुळे खूप मजा नाही आली . शिवाय जेवणाची चवही इतकी खास नव्हती.
९) खोपोली -
uncle's kitchen resort
खोपोली पासून केवळ काही मिनिटांच्या अंतरवर हे ठिकाण आहे. 2010 चा माबो ववि इथे झाला होता. फॅमिली व ग्रूप पिकनिकसाठी छान जागा.
पेण-खोपोली रस्त्यावरील SP Farmhouse - http://spfarmhouse.com/
१०) माथेरान:
http://matheranhotels.com/index.html छान हॉटेल आहे हे. स्टेशन पासुन साधारण १ कि.मी. असेल.
टॉय ट्रेनने जाणार असाल तर त्याचे बुकिंग मात्र आधीच करा. तिथे भली मोठी लाईन असते.
११) रोहा:
कोलाड - सुतारवाडी डॅम जवळील Hans Adventure Resort
http://hansadventure.com/index_sw.asp
Hans Adventure Resort धम्माल आहे
फक्त भरपूर पाऊस झाल्यानंतर जावे. कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टिंग क्लास अनुभव आहे.
पुणे:
Picnic Spots Near Pune:
http://www.aroundpune.com/picnic.htm
१)
गिरिवन रिसॉर्ट: http://www.girivanpicnic.net
२)
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर , हाडशी (पौड पुणे )
(सुंदर अन शांत निसर्ग अध्यात्माच्या सानिध्यात पाहायचा असेल तर इथे जरूर भेट द्यावी.)
जाण्याचा मार्ग -:-
पुणे-नळस्टॉप-पौड रोड - चांदनी चौक - पिरंगूट - पौड - उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण ६० किमी.
३)
मावळसृष्टी - http://www.mavalsrushti.com/
इथे २००९ चा ववि झाला होता. या स्पॉटविषयी माबोकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हे ठिकाण विशेष खास नाही असे kabhayk या माबोकराचे म्हणणे आहे.
४)
सूर्य शिबीर - पुण्यावरून ४५ किमी असेल.. तिथे जाण्यासाठी त्यांची बस आहे पुढे बोटीतून .पिकनिक साठी मस्त जागा.
http://suryashibir.org/
५)
पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर जाधव गड आहे. आधी बुकींग केले तर बरे. जरा पीळ ड्राइव आहे पण मस्त जागा आहे. कॉफी शॉप मध्ये उत्तम बिर्यानी मिळाली. मुलांसाठी स्विमिन्ग पूल व तिथेच स्पा आहे आयांसाठी. एक रात्र तरी राहिले तर जास्त छान. बर्यापैकी महाग असेल बहुतेक.
कोकणः
१) अलिबाग-नागाव:
वैद्य यांचे फार्म हाऊस
पत्ता: नागाव-हाटाळे बाजारा जवळ
पांढरा मारुती समोर
कवळे पाडा
फोनः ९५२१ ४९४५०१७ (आता change झाला असल्यास idea नाही )
बुकिंग साठी मुंबईचा पत्ता:
पोपटलाल बिल्डिंग, रानडे रोड, दादर (प.)
फोनः ४३०९३७१
फार्म हाऊस खूप स्वच्छ नाहिये. पण ठिक आहे. २ मजली आहे. खाली हॉल + किचन + एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम. वरती एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम + टेरेस
जानेवारी २००९ मध्ये २५० रु. per head charge होता. किचन मध्ये तुम्हाला स्वत: स्वयंपाक करायचा असल्यास allowed आहे. फार्म हाऊस वर एक नोकर असतो. बाहेरून जेवण वगैरे मागवायचे असल्यास तो मदत करू शकेल. अर्थात मुंबई चा फोन नं. दिला आहे. त्यावर चौकशी केल्यास पूर्ण माहिती मिळेलच. अलिबाग-नागाव ला जाण्यासाठी कल्याण/ठाणे येथून बसेस मिळतात. किंवा gate way of india वरून फेरी बोट/लाँच ही मिळू शकेल.
२)
मुरुडला गोल्डन स्वान नावाचे बीच रिसॉर्ट आहे:
प्रत्येक कॉटेजच्या बाहेर मस्त व्हरांडा आहे... आणि तिथुन समुद्राचा व्ह्यु!
तिथला बीच प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.. तरीही मुरुडच्या मेन बीचपासुन चालत जाण्याच्या अंतरावर... अगदी किनार्यावर मस्त झोपाळे आणि बीच चेअर्स आहेत! शिवाय गोल्डन स्वानने रेंट वर सायकल्सही ठेवल्या आहेत... आणि बीचवर घोडा आणि घोडागाडी राईड्सही आहेत. जेवण थोडे महाग पण क्वांटिटी चांगली! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अतिशय नम्र आणि तत्पर स्टाफ. कॉटेजेस काही फार लॅव्हिश वगैरे नाहियेत आतुन पण फार वाईटही नाहीत! पुण्यापासुन ताम्हिणी घाटातुन १५६ किमीवर आहे. कपल्स साठी तर बेस्ट आहेच पण मुलांना खेळायला आणि फॅमिली गेट्-टुगेदर्सनाही चांगले आहे...
http://www.goldenswan.com/beachresort/html/index.html
मुरुड्ला जाणार्या लोकांसाठी एक टीप - एकदा तरी पाटील खाणावळीत जेवा. veg अथवा non veg. खेकडा खा, मासे खा, prawns खा किंवा चिकन fry खा. या जन्मात विसरणार नाही. बिलपण फार नाही, कि जेवण्याची मजा अजुन वाढते. अप्रतिम जेवण मिळतं. आणि हे एका मस्तं नारळाच्या वाडीत बसुन हां ! छान जागा आहे एकदम.
३)
अलिबागजवळ आवास म्हणुन एक बीच आहे. कुटुंबासाठी जायला छान जागा आहे...
तिथे जोगळेकर कोटेज मध्ये राहाण्याची चांगली सोय होते... मुलांसाठी खुप छान जागा आहे. शांत आणि निवांत...
जोगळेकर कोटेजची माहिति इथे मिळेलः
www.jogalekarcottage.com
४)
हरिहरेश्वरला रहायची सोय आहे बोड्सांच्या 'तपोवन' मधे. छान नविन स्वछ्छ आणि AC रुम्स आहेत. सावधान - ईथे खूप सारे बोडस आहेत. आपण योग्य ठिकाणी गेला आहेत ना चेक करा. दिलीप बोड्स यांचे तपोवन छान आहे. पण त्यांच्या घरी राहण्याचा एका माबोकराचा अनुभव फारसा चांगला नाही. service व Rooms खास नाही.
www.tapovangardenresort.com
Dilip G. Bodas
9272943106
जर तंबुमधे रहायचं असेल तर सरळ MTDC गाठा. समुद्र पण जवळ आहे इथून. खाण्यापिण्याची पण सोय आहे.
घरगुती राहाण्याची सोय बर्याच ठिकाणी आहे, पण मग त्यात सुद्धा शेटे एकदम बेश्ट ! चांगला माणूस आहे. राहिलात कुठेही तरी शेटेंकडे एकदा जेवाच. अगत्याने चवदार जेवण मिळण्याची खत्रिशीर जागा आहे ही.
बोड्स आणि मोघे मंडळींचा सुळसुळाट आहे. त्यामुळे योग्य माणूस शोधा
हरिहरेश्वरला कुटुम्बे यान्च्याकडे ही मस्त व्यवस्था अस्ते. पण त्यांच्या कडे केवळ शाकाहारी जेवण असते.
४) दापोली:
http://mangalati.com
ज्याना कोणाला सी.ए. (Complete आराम) अथवा एम.बी.ए.(मस्त बसुन आराम) करायचाअ असेल तर हे ठिकाण फॅमिलीसाठी उत्तमच. पावसाळ्यात तर जाम धमाल असते... गेल्यावर्षी पावसाळ्यात गेलो होतो.. व्हेज आणि नॉनव्हेज ची उत्तम सोय असते..
सातारा:
१)
गुरसळे रिसोर्ट @ कोयना नगर. रहाण्याची उत्तम सोय (१२०० - १५०० रु. एका खोलीचे भाडे) .
२-३ दिवस निवांत राहुन आसपाचा रमणिय परिसर पहाण्यास खुप छान आहे. विकेंड ट्रिपसाठि चांगले ठिकाण. रिसोर्ट डोंगरावर आहे...... तिकडुन धरणाचा व्ह्यु दिसतो. धरणातले ताजे मासे..... अप्रतिम!!!! (सकाळीच मास्याची order दिली तर रिसोर्ट चा माणुस ताजे मासे घेउन येतो )
http://www.gursaleresort.com/
२)
सातार्यामधे महाराजा म्हणून एक हॉटेल पवई नाक्यावर आहे. त्या व्यतिरिक्त राजतारा आणि हॉटेल ग्रिन फिल्ड सांगु शकतो दोन्ही ठिकाणी जेवण आणि रहायची चांगली सोय आणि माफक दर आहे.
३)
ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला.....
तरी आता जागोजागी रेलिंग घातली आहेत त्यामुळे धबधब्याखाली जाता येत नाही... पण तरीही बेस्ट जागा आहे! अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या!.... भन्नाट वारे असते तिकडे
ट्रेकिंग ग्रूप्सः
१) Jungle Lore:
Trek Organizers
Mr.Kaustubh Upadhye. Mob – 9819756684
Mr.Tejas Abhyankar. Mob – 9821906046
उत्तम नियोजन, वेळेचे भान ठेवून ठरवलेला कार्यक्रम आणि निसर्ग आणि गडसंवर्धन याबद्दलची कळकळ व ती सर्वांपर्यंत पोचवण्याची धडपड हे या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे.
Travel solutions provider websites:
1) http://www.nivalink.com/



मागच्या वर्षी आम्ही अलिबाग-नागावला एका फार्म हाऊस मध्ये over night stay केला. तिथले details इथे देत आहे:
वैद्य यांचे फार्म हाऊस
)
पत्ता: नागाव-हाटाळे बाजारा जवळ
पांढरा मारुती समोर
कवळे पाडा
फोनः ९५२१ ४९४५०१७ (आता change झाला असल्यास idea नाही
बुकिंग साठी मुंबईचा पत्ता:
पोपटलाल बिल्डिंग, रानडे रोड, दादर (प.)
फोनः ४३०९३७१
फार्म हाऊस खूप स्वच्छ नाहिये. पण ठिक आहे. २ मजली आहे.
खाली हॉल + किचन + एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम
वरती एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम + टेरेस
१ वर्षांपूर्वी २५० रु. per head charge होता.
किचन मध्ये तुम्हाला स्वतळ स्वयंपाक करायचा असल्यास allowed आहे. (आम्ही रात्री १२ वा. मॅगी आणि ऑमलेट्स बनवले होते
).
फार्म हाऊस वर एक नोकर असतो. बाहेरून जेवण वगैरे मागवायचे असल्यास तो मदत करू शकेल.
अर्थात मुंबई चा फोन नं. दिला आहे. त्यावर चौकशी केल्यास पूर्ण माहिती मिळेलच.
अलिबाग-नागाव ला जाण्यासाठी कल्याण/ठाणे येथून बसेस मिळतात. किंवा gate way of india वरून फेरी बोट/लाँच ही मिळू शकेल.
चांगला बीबी, सगळ्यांनी द्यायला हवी माहीती इथे.
निंबुडा धागा चांगला आहे आता इथेच शोधायला बरे झाले.
माझ्याकडे खालील info आहे:
१) Jungle Lore या नावाचा एक ट्रेकिंग ग्रुप आहे:
Trek Organizers
Mr.Kaustubh Upadhye. Mob – 9819756684
Mr.Tejas Abhyankar. Mob – 9821906046
आम्ही ३ वर्षांपूर्वी गोरखगड चे ट्रेकिंग या ग्रुप बरोबर केले होते. उत्तम नियोजन, वेळेचे भान ठेवून ठरवलेला कार्यक्रम आणि निसर्ग आणि गडसंवर्धन याबद्दलची कळकळ व ती सर्वांपर्यंत पोचवण्याची धडपड हे या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे.
२) एक BedandBreakfast.pdf नावाची PDF फाईल आहे. त्यात बरेचसे 1 day picnic spots आहेत. यात खालील माहिती आहे:
Houses registered under Bed & Breakfast Scheme through MTDC
in the State of Maharashtra
३) दोन PDF फाईल्स् आहेत maharashtratil kille ani itihas ! .pdf & forts.pdf. त्यात गडांची माहिती आहे.
४) शहापूरजवळ (जिल्हा. ठाणे) एक HARSHGIRI Lake Resort आहे.
खूप अगदी खास नाहिये. पण जेवण बरे होते इथले. आणि रेट्स ही फॅमिलीसाठी परवडेबल आहेत.
राहण्याची सोय आहे अथवा नाही मला idea नाही. नेट वर सर्च केल्यास या Resort ची लिंक आणि बुकिंग चे तपशील मिळू शकतील.
५) एक PICNIC_SPOTS.XLS म्हणून पण फाईल आहे.
पुणे मुंबई पासून जास्त दुर नसलेलं अन पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटायला गेल्यावर, एक यादगार मुक्काम करण्यासाठी उत्तम रिसॉर्ट म्हणजे .. गिरिवन रिसॉर्ट.
आधिक माहीतीसाठी इथे क्लीक करा.
http://www.girivanpicnic.net/index.html
गुरसळे रिसोर्ट @ कोयना नगर. रहाण्याची उत्तम सोय (१२०० - १५०० रु. एका खोलीचे भाडे) .
)
२-३ दिवस निवांत राहुन आसपाचा रमणिय परिसर पहाण्यास खुप छान आहे. विकेंड ट्रिपसाठि चांगले ठिकाण. रिसोर्ट डोंगरावर आहे...... तिकडुन धरणाचा व्ह्यु दिसतो. धरणातले ताजे मासे..... अप्रतिम!!!! (सकाळीच मास्याची order दिली तर रिसोर्ट चा माणुस ताजे मासे घेउन येतो
http://www.gursaleresort.com/
जवळची ठिकाणे -
Koyna Wildlife Century
Ozarde Waterfall
Nehru Udyan
Shivsagar Lake
Vasota Fort
Ghatmatha
Dharmeshwar Temple
Windmill projects
http://www.mavalsrushti.com/
कुणाला अलिबाग, मुरुड-जंजिरा जवळची चांगली बीच रिझॉर्टस माहिती आहेत का?
तशी नेटवर सर्च करुन गोल्डन स्वान आणि काशिद बीच रिझोर्टस अशी २-३ पाहुन ठेवली आहेत... पण अजुन कुणाला चांगले ऑप्शन माहिती असतील तर इथे लिहा...
वा बहिनाबाई खूपच छान मस्त
Maval Srusthi आजीबात जावु नका. एकदम बोगस.
कोणी ठोसेघरला गेलंय का? त्याच्या आसपास राह्ण्याची काही सोय आहे का?
मावळसृष्टीला २००९ चा ववि झाला होता. छान होतं की !
ठोसेघरला गेलंय का? <<
ठोसेघर ला रहायची सोय अध्यापी नसावी. सज्जनगडावर आसरा मिळुशकतो, सातारा हे जवळचे चांगले ठिकाण तिथे काही चांगली सोय निस्चितच होऊ शकते.
ठोसेघर ला रहायची सोय अध्यापी नसावी. सज्जनगडावर आसरा मिळुशकतो, सातारा हे जवळचे चांगले ठिकाण तिथे काही चांगली सोय निस्चितच होऊ शकते.
>> सातार्यामधे महाराजा म्हणून एक हॉटेल पवई नाक्यावर आहे - मी ६ वर्षापूर्वी तिथे राहिलेले - मस्त होतं तेव्हा!
धन्यबाद निंबुडा...
वेळ मिळाल्यावर माहिती टाकतो...
महाराजा आजुनही मस्तच आहे, त्या व्यतिरिक्त राजतारा आणि हॉटेल ग्रिन फिल्ड सांगु शकतो दोन्ही ठिकाणी जेवण आणि रहायची चांगली सोय आणि माफक दर आहे.
www.nivalink.com
www.visawaresort.com
मला मुम्बै आसपासचे चांगले रेफ द्या ना.. आम्हा भावंडांना पोरासोरांना घेऊन जायचयं. त्यामुळे १ रात्र रहाण्यासारखे किंवा एका दिवसात खूप धावपळ न करता होईल असे, हिलस्टेशन अथवा रिसॉर्ट्स.
समुद्रकिनारा नको शक्यतोवर .. पिल्लाना वारा सोसत नाही.
>>कोणी ठोसेघरला गेलंय का? त्याच्या आसपास राह्ण्याची काही सोय आहे का?
ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला.....
तरी आता जागोजागी रेलिंग घातली आहेत त्यामुळे धबधब्याखाली जाता येत नाही... पण तरीही बेस्ट जागा आहे!
अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या!.... भन्नाट वारे असते तिकडे
रहायचे असेल तर सातार्यात खुप सारे पर्याय आहेत!
सूर्य शिबीर - पुण्यावरून ४५ किमी असेल.. तिथे जाण्यासाठी त्यांची बस आहे पुढे बोटीतून .पिकनिक साठी मस्त जागा.
http://suryashibir.org/
ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला>>>>अगदी अगदी
हे घ्या सातारा दर्शन माझ्या कॅमेर्यातुन (ठोसेघरचा धबधबा, चाळकेवाडीच्या पवनचक्क्या, अजिंक्यतारा, सज्जनगड, यवतेश्वर, कास तलाव आणि कासपठार) त्यासोबतच कासच्या फुलांची देखील लिंक आहे.
http://www.maayboli.com/node/11063
अरे योगेश, मी तीच लिंक द्यायला इथे आलो होतो!
नेरळला भडसावळे यांचा अतिशय सुरेख फार्म आहे. जवळ नदी पण आहे. चांगली पण घरगुती स्वरूपाची व्यवस्था आहे. http://www.sagunabaug.com/
अरे योगेश, मी तीच लिंक द्यायला इथे आलो होतो!>>>>
काकांचे स्वयंपाकघर
खोपोली पासून केवळ काही मिनिटांच्या अंतरवर हे ठिकाण आहे
त्या बद्दल अधिक माहीती ईथे मिळेल
http://maayboli.com/node/16976
मला मुम्बै आसपासचे चांगले रेफ द्या ना.. आम्हा भावंडांना पोरासोरांना घेऊन जायचयं. त्यामुळे १ रात्र रहाण्यासारखे किंवा एका दिवसात खूप धावपळ न करता होईल असे, हिलस्टेशन अथवा रिसॉर्ट्स.
>>
जाजु, कर्जत चे प्रकृती फार्म हाऊस छान आहे असे ऐकले आहे. internet वर माहिती मिळू शकेल. फॅमिलीसाठी छान ऑप्शन आहे.
एक सूचना:
जसे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय नाट्यमहोत्सव अमेरिकेत केले तसेच ह्या सहली (ज्याला तुम्ही मराठीत पिकनिक म्हणता) ते अमेरिकेत का करत नाही?
येताना महारष्ट्र सरकारकडून २५ लाख रु. आणायला विसरू नका!
झक्की
कर्जत मधील काही रिसॉर्ट
रीव्हरटच ** http://www.rivertouchresort.com/index.html
मोदी रिसॉर्ट** http://www.drmodisresort.com/contact/default.htm
सदा आनंद** http://sadaanandresort.com/tariff.html
प्रकृती *** http://www.prakrutifarm.net/
पिकॅडीली*** http://www.piccadillyworld.com/farm.html
सत्या *** http://www.satyaresort.com/
रीव्हरगेट **** www.rivergateresort.com
कल्याण -
विश्वासराव फार्म हाउस** http://vishwasraofarmhouse.com/
रिव्हर वाईन्डस*** http://riverwindresorts.com/About.html
अंबरनाथ - शांती सागर**
At Vasat, Near M.I.D.C. Pump House, Ulhas River Bank, P.O. Jambhul,
Ambernath(W). Maharashtra, INDIA.
For General Enquiries and call on Telephone No : (0251) - 2681999 / 2683210 / 3200728
(0251) 2682792 / 2685631 / 3200727 Mobile: 93204 09818 ( call timings 8.a.m. to 8p.m.)
बदलापूर - रेनी रिसॉर्ट** http://rainyresort.com/
ठाणे - टिकूजी-नी-वाडी ** http://www.tikuji-ni-wadi.com/
पालघर - http://www.silenthillsresort.com/2a.html
कर्जत फार्म हाऊसेसची माहिती ह्या साईटवर पण मिळेल : http://way2nature.com/index.asp
http://mumbai.click.in/classified/travels/hotels-resorts/karjat-farmhous...