तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बब्बो! बरं झालं मी ती युनाईटेड वाली विंचूची बातमी आधी नव्हती वाचली...

त्यातुनच आले मी येताना Proud

सही सलामत पोहचलेय.. इतकंच काय तर शेजारच्या सिटवर कोणीच नसल्यामुळे मस्त झोपुन आले Proud

आजकाल IRCTC च्या बरयाच जाहिराती येतात. कोणी त्यांच्याबरोबर प्रवास केला असल्यास, अनुभव शेअर करावा. तसेच India Dekho Travel बद्दल कोणी माहिती देऊ शकेल का.

IRCTC तून कोणी गेलं नसावं @चंपा.
बाकी त्यांच्या टुअर्समध्ये धार्मिक स्थानांच्या बय्राच दिसतात. नियम अटी वाचल्या तर - आपणच टुअर रद्द केली तर खासगी ओपरेटर्स ( काही) पैसे दुसय्रा टुअरमध्ये वापरु देतात परंतू IRCTC वाले एक छदाम रिफंड देत नाहीत. ज्येष्ठ ना साठी उत्तम असावी कारण सोबत पोलिस आणि डॅाक्टर असतो असं लिहिलं आहे.

आजकाल IRCTC च्या बरयाच जाहिराती येतात. कोणी त्यांच्याबरोबर प्रवास केला असल्यास, अनुभव शेअर करावा.
>>>
माझ्या मामा मामी वगैरेंनी irctc बरोबर भरपूर प्रवास केला आहे. वर srd नी म्हटल्याप्रमाणे त्या सर्व ट्रिपा धार्मिक स्थानाच्या होत्या. त्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे. बहुतेक वेळा ट्रेन छोट्या स्थानकांवर थांबतात तेव्हा खाणे पिणे वगैरे स्टेशनवरून घेता येत नाही. बाकी irctc ने केलेली जेवणाची व्यवस्था स्वच्छ व खण्याजोगे या सदरात मोडते असे ऐकले आहे. राहण्याची व्यवस्था त्यांच्या डोर्मितरीमध्ये किंवा मग देवस्थानाच्या धर्मशाळेतून वगैरे असते. थोडक्यात मी जे अनुभव ऐकले आहेत ते परवडणारी, फार लक्झरी नसलेली पण बरी सेवा देणारी ट्रिप असे एकूण दिसते

मी गेल्या वर्षी irctc मधून मसुरी नैनिताल टूर करून आले. माझा अनुभव ठीकठाक होता पण हे व्यक्तीनुसार बदलत असणार असे वाटते.

चांगल्या गोष्टी - मला ट्रेनने दिल्लीला जायचे नव्हते, दिवस वाचवण्यासाठी स्वतः तिकीट काढून प्लेनने जायचे होते, तर त्यांनी प्लॅन तसा बदलून दिला. मला जास्तीची काही ठिकाणे हवी होती ती मात्र दिली नाहीत.

त्यांनी दिल्ली ते दिल्ली गाडी दिलेली, जी फक्त आम्हीच वापरणार, म्हणजे दुसरा ग्रुप वगैरे सोबत नाही. ड्रायवर चांगला होता, मला जिथे जायचंय तिथे नेताना कधी कधी कुरकुर करत होता, पण शेवटी ऐकत होता. स्वतःहून जास्तीच्या जागा दाखवल्या. उगीच उशीर होतोय वगैरे ओरडत नव्हता. काळजीपूर्वक गाडी चालवत होता. Irctc ने टूर किमतीच्या मानाने भरपूर ठिकाणे समाविष्ट केलेली. ती सगळी त्याने दाखवली. न कुरकुरता सकाळी लवकर , संध्याकाळी उशिरा वगैरे फिरवत होता. तिन्ही बायकाच होतो त्यामुळे मला सुरवातीला थोडीशी काळजी होती पण ती काळजी लगेच दूर झाली.

चांगले नसलेले - मसुरीला चांगले हॉटेल दिले, आम्ही तिघे एका रूम मध्ये शेअरिंग करणार हे सांगितल्याने रूम साईज त्याप्रमाणे दिली. कॉर्बेटला रूम लहान होती, मी लगेच फोन करून तक्रार केल्यावर रूम बदलून दिली. नैनितालला मात्र रूम चांगली नव्हती, तीन माणसांसाठी खूप लहान, कार्पेट नाही, थंडीत गार लादिवर चालणे नकोसे वाटले. हॉटेल मालकिणीने माझ्या सोबत ज्ये ना आहे हे बघून जास्त चढउतार न करावी लागणारी रूम देते म्हटले पण दिली नाही. मीही तक्रार केली नाही. केली असती तर कदाचित रूम बदलली असती. पण त्यांच्या लिस्तीतली बाकीची हॉटेले तलावापासून खूप लांब व उंचावर होती त्यामुळे मी दुर्लक्ष केले.

एकूण मला माझा अनुभव संमिश्र वाटला. फोन वर तक्रारीची दखल त्वरित घेतली जाते ही खूप चांगली गोष्ट वाटली.

कमी बजेटात स्वतः जबाबदारी न घेता आरामात फिरायचे असेल तर irctc खूप चांगला पर्याय आहे. आणि त्यांच्या विदेशी सफरीही आहेत. फक्त देव देव नाही करत ते. आपण जिथे जातो तिथल्या स्थानिक टूर ऑपरेटरला ते आपले कॉन्ट्रॅक्ट देतात. काही त्रास असेल तर आपण irctc च्या कॉन्टॅक्ट पर्सन ला फोन केला तरी तो त्वरित दखल घेतो. आमचा ऑपरेटर दिल्लीचा होता. मी irctc ला तक्रार केल्यावर त्यानेही 2 3 दा फोन करून माझ्या तक्रारीची तड लागली का ते चेक केले. ही सर्विस चांगली वाटली. सरकारी पातळीवर तातडीने काही केले गेल्याची सवय नसते न आपल्याला, त्यामुळे खूप बरे वाटले. Happy Happy

एक आठवण सांगतो- राजस्थानला( आमचे आम्ही) गेलेलो तेव्हा कोटा स्टेशनला बरेच लोक जमलेले दिसले. ते सर्व आइवडिल काकामामांना सोडायला आलेले. irctc ची रामेश्वर दक्षिण भारत जाणाय्रा सहलीसाठी. आपण राजस्थानात जातो मग ते लोक कुठे जात असतील या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आणि त्यांचा irctc वरचा विश्वास

दिवाळी नंतर केसरी ने सिंगापूर, मलेशिया, थायलंड जात आहे केसरी ने पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट ठेवून घेतले आहेत व सांगितले की जाताना एयरपोर्टवरच मिळतील पण मला फोरेक्स कार्ड व काही डाॅलर( थायलंड च्या नियमानुसार सोबत फॅमिली असेल तर 1400$/20000 थाई बाथ) घ्याचे आहेत त्यासाठी पासपोर्ट व विसा लागतो का? जर लागत असेल तर मग केसरी स्वत का ठेवुन घेत आहेत. .?

Kesari la vicharun bagha!, kadChit tumhi chukun tumacha pp harvu naye mhAnun sambhalun thevnar astil

@ महेश कुमार -पण मला फोरेक्स कार्ड व काही डाॅलर( थायलंड च्या नियमानुसार सोबत फॅमिली असेल तर 1400$/20000 थाई बाथ) घ्याचे आहेत त्यासाठी पासपोर्ट व विसा लागतो का? >> नाही . तुमच्या पासपोर्टची झेरॉक्स आणि केसरी बरोबर तुम्ही टूर बुक केलीत त्यावेळी काही ऍडव्हान्स भरला असेलच त्याची रिसीट घेऊन जा . त्या त्या देशाचं चलन खरेदी करण्यासाठी वरील सांगितलेल्या दोनच गोष्टी लागतात. ओरिजिनल पासपोर्ट ची जरुरी नाही . त्यातून तुम्हाला पासपोर्ट हवा असेल तर व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही तो मागू शकता पण आजकाल केसरी सगळ्यांचे पासपोर्ट स्वतःकडेच ठेवते कारण काही वेळा काही पर्यटक एअरपोर्ट ला येताना घरी पासपोर्ट विसरूनच येतात आणि त्यांची पूर्ण ट्रिप वाया जाते . सगळे भरलेले पैसे फुकट जातात . हा आता पर्यंतचा त्यांचा अनुभव असल्याने ते पासपोर्ट स्वतःजवळ ठेऊन घेतात आणि एयरपोर्ट ला देतात. त्यातून तुम्हाला जर स्वतःजवळ हवाच असेल तर तुम्ही तो मागू पण शकता . त्यांचा ट्रीपच्या आधी जेव्हा फोन येतो तेव्हा ते तुमचा पासपोर्ट तुमच्या जवळच आहे तेव्हा तुम्ही तो एयरपोर्ट वर येताना घेऊन यायचा आहे अशी फोनवरून आठवण करून देतात Happy

मी सुद्धा नोव्हेम्बर end ला सिंगापूर, मलेशिया, थायलंड ला जाणार आहे वीणा वर्ल्ड बरोबर. इथे फार छान माहिती मिळतेय. इथे कोणी विव बरोबर ह्या तीन देशात गेलेत का? आणि तिकडे काय काळजी घ्यावी ह्याविषयी वाचायला आवडेल.

विणाची जंम्बो मेगा डिस्काउंट आॅफर चालू आहे. मला आईसाठी युरोप टूर बुक करायची आहे वीमेन स्पेशल मध्ये. ट्युलिपचा सीझन मेमध्येच असतो का. तुमचे अनुभव कसे आहेत वीणाबरोबर परदेश प्रवासाचे.

मी सुद्धा नोव्हेम्बर end ला सिंगापूर, मलेशिया, थायलंड ला जाणार आहे वीणा वर्ल्ड बरोबर>>>>>>
मी नुकतीच ही टुर करून आलो सगळे देश छान आहेत मस्त मजा आली.... काळजी म्हणजे सोबत एखादी छत्री असू द्या कधीही पाऊस पडतो पण विणावाल्यांना एकदा विचारू घ्या कारण केसरींनी अम्हाला रेनकोट दिले होते...
बाकी शाॅपिंग वगैरे आपल्या कडेच स्वस्त आहे... शुभेच्छा

मी गेलेय वीणाबरोबर लेडीज स्पेशल . खूप दाखवायची ठिकाण गाळतात . काही वेळा दुपारचा चहाच देत नाहीत आणि आताच्या यूएस च्या टूर ला खूपच वाईट अनुभव आले . त्यामुळे आम्ही बऱ्याच जणींनी या पुढे जायचं नाही असं ठरवलं . मी स्वतः त्यांच्या फेसबुक पेज वर जाऊन कम्प्लेंट नोंदवून आलेय . मला खूप काही लिहायचं होत पण त्यांनी तशी जागाच ठेवली नाहीये. म्हणून मेसेज केला तर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं अस कस तुम्ही म्हणता म्हणून . मी त्यांना सांगितलं कोणी कम्प्लेंट करत नाही याचा अर्थ असा होत नाही कि सगळेच तुमच्यावर खुश आहेत . जाऊदेत म्हणून इग्नोर करणारे जास्तीत जास्त असतात मग गप्प बसली .

त्याव्यतिरिक्त मला व्यक्तिशः लेडीज ट्रिप मधल्या त्या फ़ॅशन शो मध्ये काडीचा इंटरेस्ट नसतो . मी कधीच भाग घेत नाही .फार तोच तोच पणा असतो त्यामुळे मला स्वतःला खूप बोअर होत पण काही जणींना बराच इंटरेस्ट असतो त्यामुळे बऱ्याच जणी त्या फ़ॅशन शो मध्ये पण खूप पॉलिटिक्स केलं म्हणून रागावल्या होत्या. आता एकदम जोरदार मुसंडी मारून वीणा वरती आलेय खरी पण त्यांच्या टूर्स ढिसाळ व्हायला लागल्यात . यु एस टूर तर आमची खूपच वाईट गेली असो Happy

काय वाईट अनुभव आले तेही सांगा ना सुजा. बाकी माहितीसाठी धन्यवाद. वीणाचं पहिलंच वर्ष होतं तेव्हा माझ्या घरचे थायलंड टूरला गेले होते, बत्तीस हजार प्रत्येकी आणि फार छान झाली होती ती टूर. नंतर किंमती वाढल्या, बॅगा वगैरे देणं बंद केलं आणि आतातर फारच नकारात्मक अनुभव येताहेत लोकांन्ना. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात ह्या टूर एकदाच होतात आणि काही लाख एकत्र भरायचे म्हणजे नीट विचार करायलाच हवा. असो. परत एकदा धन्स Happy

ट्युलिपचा सीझन मेमध्येच असतो का. तुमचे अनुभव कसे आहेत वीणाबरोबर परदेश प्रवासाचे.
>>
तुम्हाला जर नेदरलँडमधील ट्युलिप गार्डन बघायची असेल तर यावर्षीचे टायमिंग खालील प्रमाणे आहे. अधिक माहिती इथे मिळेल. https://keukenhof.nl/en/#plan-your-visit

साधारण एप्रिलचा शेवटचा आठवडा एकदम सेफ असेल. कधी कधी अप्रिल दुसर्‍या आठवड्यातसुद्धा हिवाळा कडक असेल तर फुले नीट उमललेली नसतात.

Opening times
The park Keukenhof is open from 22 March 2018 - 13 May 2018 from 08:00 – 19:30. The ticket office is open from 08:00 – 18:00.

Cox and kings कसे आहे

कुणाला अनुभव आहे का त्यांच्या सहलीचा ?

वर शिवनेरी बसचा उल्लेख वाचला. आता तशाच शिवशाही बस खूप ठिकाणी सुरू केल्यात MSRTC ने. नविन भारी बसेस. तिकिट दर जास्त नाहीत. पुणे पणजी बसने कराड पर्यंत प्रवास केला. खूप आरामात...

Cox and kings चा अनुभव चांगला नाही. +१११
I had bad experience on my (customised) honeymoon tour from Cox and Kings to Kashmir. The driver used to come very late (even 2-3 hours) and when we complained, local office gave their H O person no. that person gave yet another no and still driver behavior was the same. When I complained about it after a few months; the lady in local office told that north indians behave the like way !!!

ओह बरे झाले सांगितलेत ते मी त्यांच्या बरोबर टूर करणार होतो

सध्या ritual holidays मधून ऊटी कुर्ग म्हैसूर करणार आहे. सध्या फक्त आगाऊ रक्कम भरली आहे

कुणाला अनुभव आहे का ह्या प्रवासी कंपनी चा

Pages