केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...
आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.
पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..
त्याचा मला निश्चितच फायदा होईल..
.............................
मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर
केसरी उगाचच काहिच्या काही
केसरी उगाचच काहिच्या काही महाग आहे.
मला राजस्थान ची जी आटनरी हवी होती त्याची किंमत ५५ हजार प्रत्येकी होती. मी तीच ट्रिप नेट वरुन शोधाशोध बुकिंग करुन ३३००० प्रत्येकी मधे केली.
आई बाबा युरोप ट्रिपला थॉमस कूक सोबत गेले होते अतिशय उत्तम अनुभव.
जर अगदीच महिती नाही अशी ठिकाणे असतील किंवा जर जाणारे वयस्कर असतील तर तूर ऑपरेटर सोबत जाणे ठिक अथवा सरळ नेट वर शोधाशोध करुन बुकिंग करावे आणि फिरावे, पैसे पण वाचतात, स्वताला पहिजे तसे फिरता येते, पहिजे त्या हॉटेल मधे राहता येतं खाता येतं, असे अनेक फायदे आहेत.....
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काहीतरी नीट पाहिल्याचे समाधान मिळते, उगाच भोज्जाला शिऊन आल्या सारखे वाटत नाही
ट्युलिप्स च्या साईटवर चक्क
ट्युलिप्स च्या साईटवर चक्क २०१० च्या ट्रिप्सची जाहिरात आहे.
हीच कम्पनी आहे ना?
http://www.tulipstravel.com/packaged/independentprice.asp?tourid=572&to=...
मला वाटतं ही असावी ट्युलिप
मला वाटतं ही असावी ट्युलिप हॉलिडेजची लिंक >>>> http://tulipholidays.in/aboutus.html
होय शर्मिला , मोकिमी च्या
होय शर्मिला , मोकिमी च्या पोस्टमध्येही ट्युलिप हॉलिडेज असाच शब्द दिसतोय . धन्यच्वाद
ह्म्म्म...फारच उपयुक्त माहिती
ह्म्म्म...फारच उपयुक्त माहिती मिळतीये इकडे... अजून अनुभव लिहा ...
@ रिया...,'केरळच नीट दाखवतात वाट्ट्ं '

बघ हां ,जास्त नावंठेऊ नकोस नाहीतर तिकडचाच कुणी मिळेल..

मी कधीच कुठल्या प्रवासी
मी कधीच कुठल्या प्रवासी कंपनीबरोबर हिंडलेले नाही. लहान होते तेव्हा वडील गिरिकंद कडून (तेव्हा तेही स्मॉल प्लेयरच होते) प्री-बुक्ड कस्टमाईज्ड टूर्स आखून घ्यायचे. अतिशय सुखद अनुभव. आता जाते कुठेही तेव्हा बहुतेक वेळा त्या राज्यात कुणीनाकुणी ओळखीचं असतंच तेव्हा फार अडचण येत नाही.\
पण कलकत्त्यात राहून मी सिक्कीम-दार्जिलिंगच्या टूर्सबद्दल माझी मतं मांडू इच्छिते -
एकतर सिक्कीम-दार्जिलिंग ही दोन्ही ठिकाणं एकदम करणं मूर्खपणाचं आहे. सिलिगुडी वरून दोन दिशांना दार्जिलिंग आणि सिक्कीम पडतात. सिक्कीममधली ठिकाणं दिवसादिवसाच्या प्रवासाची असतात. या सगळ्याचा अतिशय स्ट्रेस होतो.
सिक्कीम जेवढं स्वच्छ, सुंदर आहे तेवढंच दार्जिलिंग आता घाण झालं आहे. तेव्हा जर सिक्कीमवरून तुम्ही दार्जिलिंगला गेलात तर पेशन्स संपलेला असतो आणि अतिशय वाईट इम्प्रेशन होतं. अजिबात छान वगैरे वाटत नाही.
शिवाय आता दार्जिलिंगला गोरखालॅण्डचा प्रॉब्लेम झाल्यापासून फार झपाट्याने सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती खालावली आहे. दार्जिलिंगची काही महागडी हॉटेल्स आणि wbtdc चा लॉज सोडला तर इतर फार शॅबी झालंय सगळं. कधीही बंद पुकारला जाऊ शकतो.
यापेक्षा सिक्कीम आणि दार्जिलिंग अशा वेगवेगळ्या सहली कराव्यात
सिक्कीममधे आताशा पेलिंग वगैरे पण इन्क्लूड करतात असं ऐकून आहे. पण सिक्कीम हा खूप मोठा भूभाग असल्याने शांतपणे सिक्कीम एके सिक्कीमच करावं. म्हणजे पेलिंगला गेलं की योकसम नावाचं आणखी एक छोटं गाव तीनेक तासांच्या अंतरावर आहे ते पहावं, वाटेत खेचिपेरी नामक पवित्र तळं पहावं, पेलिंगला पेम्यांग्त्से मोनॅस्टरी पहावी. ट्रेकिंगची हौस असेल तर जवळच असलेले सिक्कीमच्या राजधानीचे अवशेष पहावेत. आणि मग दोन तीन दिवसांनी गान्तोकला यावं. लाचुंग-युमथांग हा दोन दिवस खाणारा प्रवास आहे. परत त्सांगो-नथुला याला एक पूर्ण दिवस. जर हवं असेल तर कालिम्पॉन्ग. हे परत आणखी चौथ्या दिशेला..सिक्कीमच्या नागरिकांना त्यांची इकॉनॉमी टूरिझमवर चालते हे माहित आहे. त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित सहकार्य मिळतं
दार्जिलिंगला जायचंच असेल तर आसपासची कर्शिऑन्ग, जलपोखरी आणखी काही स्थानिक ठिकाणं करावीत.
या सगळ्या ठिकाणी व्यवस्थित तिथलं शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळतं ते खावं. सिक्कीमला जाऊन मोमो, थुक्पा न खाता रोज आमटीभात खाऊन काय मिळणार?
शिवाय या कंपन्या या सहलींमधे कलकत्ता दर्शनही घुसडतात. नुसती धावाधाव. अतिशय वैट्ट हॉटेलात व्यवस्था असते. केसरीने एकदा आमच्या नातेवाईकांची हावड्यातच एका अतिशय दमट-कुबट ठिकाणच्या हॉटेलमधे व्यवस्था केली होती. पोरांनी रडून गोंधळ घातले वगैरे किस्से झाले.
दरवर्षी मला कुणीतरी ओळखीचं या टूर्सवर जायचा प्लॅन कळवतंच. आणि इतरांचे सणसणीत अनुभव पाहून मी त्यांना परावृत्त करते/वस्तुस्थिती सांगते. त्यापेक्षा आशुतोषने लिहिलं आहे तसं नेटवर विसंबा आणि आपले आपण जा.
वरचे सगळे प्रतिसाद वाचले
वरचे सगळे प्रतिसाद वाचले नाहीत. पण कुणाला आपल्या आई बाबांना ट्रीपला पाठवायचे असल्यास केसरी ला पर्याय नाही. माझे आई बाबा केसरी च्या दोन टूर्स करून आले आहेत शिवाय आईने केसरीच्या "माय फेअर लेडी" तर्फे यूएस ट्रिप केली आहे. भरपूर काळजी घेतात ते लोक. सिनिअर लोकांसाठी खूप छान ऑप्शन. त्यांच्या "सेकन्ड इन्नीन्ग्झ " च्या टूर्स पण चांगल्या आहेत. किंमत जास्त आहे पण इतर ट्रॅवल कंपनी सोबत पाठ्वून त्यांची गैरसोय होणार नाही याची गॅरेंटी नाही.माझ्या मते केसरी ला पर्याय नाही.
विणा वर्ल्ड पण चांगले असेल असे वाटतय.
केसरीचे अनुभव काहीजणांना
केसरीचे अनुभव काहीजणांना उत्तम, चांगले आले असतीलही. पण 'केसरीला पर्याय नाही' - असं अजिबातच नाहीये.
बघ हां ,जास्त नावंठेऊ नकोस
बघ हां ,जास्त नावंठेऊ नकोस नाहीतर तिकडचाच कुणी मिळेल
>>>
'रोबो '' मधला चेन्नईच्या किनार्यावरचा अण्णा आणि ऐश्वरया आठवले
वरदा आम्हीही
वरदा आम्हीही सिक्कीम्-दार्जिलिंग-भूतान असाच अचाट प्लॅन केला होता युथ हॉस्टेलसोबत
मात्र मी दार्जिलिंग स्वतंत्रपणे दहा वर्षांपूर्वी पाहिलं होतं, तेव्हा ते खरंच सुंदर होतं.
मागे अश्विनीमामींनी उल्लेख केला आहे ते उदयन इंदूरकर प्राचीन देवळे, शिल्पे बघायला जी टूर करतात ती मला खरं तर त्यांच्यासोबत जाऊन करायची आहे. पण त्यांच्याकडून काही माहिती, शेड्यूलच मिळत नाहीये. ते इतके बिझी असतात, मेल, मेसेज पाठवूनही फार काही फिडबॅक मिळाला नाही. ओरिसाची टेम्पल टूर त्यांच्याकरता खरं तर राखून ठेवली आहे.
मलाही स्वतः प्लॅन करुनच प्रवास करायला आवडतो. अपवाद फोलिएज आणि यूथ हॉस्टेल्स. वसईला एक रत्नदीप ट्रॅव्ह्लस म्हणून आहेत तेही लहान ग्रूप्स घेऊन नेचर्/वाइल्डलाइफ टूर्स खूप छान प्लान करुन काढतात. त्यांच्यासोबत एक्स्पर्टही असतात, पक्ष्यांची, झाडांची, वाइलडलाइफची माहिती द्यायला.
मला स्वतःला खूप दिवसांचे पण एक-दोन ठिकाणेच एक्स्प्लोर करणारे प्रवास खूप आवडतात. अजून पॅकेज्ड टूर्सचा अनुभव घेतला नाही. ओरिसा आणि जैसलमेर्-मारवाड यादीत आहे, ही टूर कुणाकडून प्लॅन करुन घेता येते का बघते, कोणी असेल तर सांगा. खूप वेळ वाचेल माहिती जमवायचा. ती जमवायला वेळ नाही त्यामुळे प्लॅनिंगही लांबणीवर पडतेय बर्याच ठिकाणांचे.
सोयींपेक्षा केसरीच्या काही
सोयींपेक्षा केसरीच्या काही विशिष्ट टूरची वैशिष्ट्ये वाटतात खरी. उदा. मला स्वतःला जायचे नाही पण बायकोस एकटीला विदेश वारीला पाठवायचे आहे तर सुरक्षित म्हणून माय फेअर लेडीला पर्याय दिसत नाही. ज्याना परदेशाचे काहीच माहीत नाही त्याना दुसरा पर्याय काय. स्वतःने प्रवास आखायला तेवढा अनुभव आणि आत्मविश्वासही लागेल ना? या वैशिष्ट्यांचीच जादा किम्मत केसरीवाले वसूल करीत असावेत...
वीणा वर्ल्ड नवीन आहे. त्याचा काय अनुभव. ?
सचिन वाले टीव्हीच्या कार्यक्रमात फार बढाया मारत असतात एकूण पोकळच दिस्तय सगळं...
शर्मिला, विपू बघ
शर्मिला, विपू बघ
हो आम्ही भीमबेटका,
हो आम्ही भीमबेटका, मध्यप्रदेशला जायच्या आधी आर्किऑलॉजिकल इंडियाच्या मुंबई ऑफिसातून खूप सविस्तर माहिती घेऊन हा प्रवास केला होता. खूप उपयोग झाला. आणि फार छानही झाली ती टूर.
इंदूरकरांबद्दलची ही माहिती सांगीतलीस त्याबद्दल आभार. पण बाकी वास्तुशिल्पांची माहिती व्यवस्थित मिळते का?
बर्यापैकी. पण मग त्यापेक्षा
बर्यापैकी. पण मग त्यापेक्षा हातात एएसायचं पुस्तक घेऊन तिथला एएसायचा गाईड घेतला तरी चालतं
अर्थात त्यांची टेम्पल टूर्सची संकल्पना मस्तच आहे हे नि:संशय!
जैसलमेर्-मारवाड यादीत आहे, ही
जैसलमेर्-मारवाड यादीत आहे, ही टूर कुणाकडून प्लॅन करुन घेता येते का बघते, कोणी असेल तर सांगा. खूप वेळ वाचेल माहिती जमवायचा. ती जमवायला वेळ नाही त्यामुळे प्लॅनिंगही लांबणीवर पडतेय बर्याच ठिकाणांचे.>> शर्मिला, मी याची माहिती देउ शकेन. माझी मीच प्लॅन करून गेले होते. जाताना राजस्थान टुरीजमची माहिती काढून, मग त्यांच्या बरोबर गेले. स्वतंत्र कार आणि राजस्थान टुरीजमची गेस्ट हाउसेस. मस्त ट्रीप झाली. गंमत म्हणजे फक्त स्त्री टुरीस्ट प्रवास करत असतील तर राजस्थान टूरीजम २५% की काहीतरी डिस्काउंट देते.
बायदवे, युथ हॉस्टेलचा जैसलमेर ट्रेक डीसेंबर मध्ये आहे. भारी आहे.
मी आजपर्ञंत केसरी च्या
मी आजपर्ञंत केसरी च्या राजस्थान आणि केरळ या ट्रिप्स केल्या आहेत. गेल्या २ वर्षात. अत्यंत उत्तम हॉटेल्स, जेवण आपले व तेथील असे आलटून पालटून, उत्तम बसेस, आदरातिथ्य, राजस्थान मध्ये आम्ही दिवाळीत असल्याने आपल्यासारखी दिवाळी ( अभ्यंग स्नानास उटणे, फटाके, फराळ इ. सर्व+ रांगोळी स्पर्धा ), साम्स्कृतिक कार्यक्रम वगैरे- आम्ही पूर्णपणे आनंदात होतो. इतर कोणताही खर्च लागला नाही. डोक्याला कोणताही मनस्ताप नको असेल तर केसरी अत्त्युत्तम. हाच अनुभव केरळचा.
कोणी काही म्हणोत आय अॅम ए केसरी फॅन!!
आम्ही जैसल्मेर्,जोधपूर आणि
आम्ही जैसल्मेर्,जोधपूर आणि बिकानेर एकदा आणि जैपूर्,उदय्पूर एकदा अशी ट्रिप केली होती.
वॉव स्वाती. मस्तच. राजस्थान
वॉव स्वाती. मस्तच. राजस्थान टूरिझमचं ऑफिस मुंबईत आहे का? शोधते. किती दिवसांची झाली तुमची टूर?
आम्ही १० - १२ दिवसांसाठी गेलो
आम्ही १० - १२ दिवसांसाठी गेलो होतो. मी ऑनलाइन सगळे शोधले होते. त्यामुळे ऑफिस बद्दल माहित नाही. २००९ मध्ये गेले होते. एक दोन दिवसात माहिती शोधून देते.
मी अन माझी मैत्रीण दोघीच
मी अन माझी मैत्रीण दोघीच बॅक्पॅक ट्रीप करून आलो युरोपात. १५ दिवस दोन देश . युथ होस्टेल मधे राहिलो. स्वस्त, मस्त. साय्कलींची ही सोय होते तिथे राहिल्यावर. जायची यायची विमानाची तिकिट सोडल्यास बाकी प्रवास , जब और जैसे मन करें . लोनली प्लॅनेट नावाची वेब्साईट, पुस्तके पण फार उपयोगी आहेत. आणि तिथे प्रत्येक गावात ,रेल्वे स्तेशन वरच इन्फॉर्मेशन डेस्क (लाल i ) असतो, त्या त्या ठिकाणाची माहिती लोकल माणसापेक्षा जास्त चांगली कोण देणार. पर्यटकाचा वयोगट, हाताशी असलेला वेळ, आवड ,त्यावेळच हवामान ह्या सगळ्या बाबींचा विचार करूनच सल्ला दिला जातो .
मी कधीच प्रवासी कंपनी बरोबर प्रवास केला नाहीये. ( कधी करीन अस वाटत नै) कारण मला कस ,काय , कधी बघायचय? काय खायचय, अनुभवायचय ते माझ्याशिवाय कोणी प्लॅन करू शकेल अस वाटत नाही.
घरात्ल्या जे.ना नी मात्र विविध कंपन्यांबरोबर प्रवास केलेत. भाग्यश्री, गुरुनाथ, केसरी. प्रत्येक वेळी कॅटलॉग आणून तुलना करून कोणाबरोबर जायच ते ठरवल.
शर्मिला, तुला ओरिसाची काय
शर्मिला, तुला ओरिसाची काय माहिती हवी आहे? आम्ही भुवनेश्वर-कोणार्क-पुरी हा पट्टा केला होता २००९मधे. ट्रिप आमची आम्हीच नेटवरून आणि मित्रांकडून माहिती घेऊन आखली होती. बूकिंग वगैरे मेकमाय्ट्रिप, क्लीअरट्रीपकडून. हॉटेलचं बूकिंग फ़क्र्त भुवनेश्वरसाठी केलं होतं. केरळ आणि इतर ट्रिप्स पण अशाच आमच्या आम्हीच ठरवून करतो.
कुणाला कोकण ट्रिप आखायला मदत हवी असेल तर तीपण आम्ही करतो.
हायला मी लैच कंफ्युज होतेय
हायला
मी लैच कंफ्युज होतेय
राजस्थान साठी काय निवडू ते सांगा लोक्स!
वर्षुतै
बाप्रे मृण्मयी कसला हा
बाप्रे मृण्मयी कसला हा अनुभव....!
केसरी काहींना आवडतय तर काहींना नाही..
तुमच्या अनुभवानंतर सचिन एकदम बाद..
मोकिमी मस्त पोस्ट..
आषुतोश.. केसरीची लबाडी
पण खरं सांगू, स्वतः प्लॅन केलेल्या टूरसारखी मजा नाही आणि तेवढी बचतही अन्य पर्यायांमधून होत नाही.+१
आत्तापर्यंत हा अनुभव चांगलाच घेतलाय
वरदा छान माहिती..
इन्ना.. मी अन माझी मैत्रीण दोघीच बॅक्पॅक ट्रीप करून आलो युरोपात. १५ दिवस दोन देश>> मस्त!!
बघ हां ,जास्त नावंठेऊ नकोस नाहीतर तिकडचाच कुणी मिळेल..
वर्षू.... रियाने एव्हढा धसका घेतलाय की तू असं म्हटल्यावर झोपेतून दचकून उठेल ती रात्री.. !! 
बाकी धन्यवाद मंडळी.. खूप छान माहिती मिळतेय.. थँक्स!
अनुभव ट्रॅव्हल्स एक वेगळी
अनुभव ट्रॅव्हल्स एक वेगळी कंपनी आहे. http://www.anubhavholidays.net/index.php/-1/-1. श्री. अरुण भट म्हणुन संचालक आहेत. ते स्वतः ट्रिप मधे असतात. छोटे ग्रूप नेतात.
त्यांची कोस्टल कर्नाटका आणि युरोप मधले अनवट देश अशी टुर फारच झकास असते म्हणतात... ट्युलिप चा डायरेक्टर स्वतः दिलिप यादव ने आम्हाला ही माहिती दिली. तो म्हणाला की या दोन ट्रिप्स तुम्ही फक्त यांच्या बरोबर कराच....
बघु कधी योग येतोय ते.....
आता नोव्हेंबर मधे आग्रा करायचं मनात आहे.... अर्थात आपलं आपण...
मोकिमी मी सुद्धा ऐकलय अनुभव
मोकिमी मी सुद्धा ऐकलय अनुभव ट्रॅव्हल्सविषयी. आमच्या ओळखीचा एक जण जाऊन आला त्यांच्याबरोबर केरळ सहलीकरता. त्याचा अनुभव चांगला होता.
ज्या लोकांना रोजच्या जेवणार
ज्या लोकांना रोजच्या जेवणार काही बदल चालत नाहीत त्यांना केसरी खूप आवडते असे काही आहे का? माझ्या ओळखीचे काही केसरी ने कोठे कोठे गेले होते आणि त्यातील एक दोघांकडून चांगले ऐकायला मिळाले होते. पण का चांगले आहे यात कोठेही गेलात तरी टीपिकल मराठी खाणे हा एक मुख्य भाग होता :). मात्र खूप पळवतात हे खूप ऐकले आहे.
फारएण्ड.. बाहेर खाल्याने
फारएण्ड.. बाहेर खाल्याने बरेचदा ऐन प्रवासात पोटं बोघडण्याचा अनुभव येतो. त्यापेक्षा नेहेमीचं खाणं खाऊन प्रवास आनंदाचा करावा हाही एक भाग आहेच त्यामागे..
पण स्थानिक व्यंजन टेस्ट करणे हीसुद्धा एक गंमत असते.
पळवतात हे मात्र मीही ऐकलयं!
बाहेर खाल्याने बरेचदा ऐन
बाहेर खाल्याने बरेचदा ऐन प्रवासात पोटं बोघडण्याचा अनुभव येतो.
<<
हे खरे असले,
तरी केसरीवाले देखिल त्याच ढाब्याचे किचन वापरून तिथेच स्वयंपाक करून आपल्याला खाऊ घालत असतात. घरचे जेवण नसते ते देखिल.
अनुभवची कोस्टल कर्नाटका खूप
अनुभवची कोस्टल कर्नाटका खूप छान आहे, माझ्या चुलतबहिणेने आणि एका नातेवाईकांनी केली त्यांना आवडली.
रिया झोपेत दचकून उठत असेल",,,
रिया झोपेत दचकून उठत असेल",,, अंजली,,,
केसरी,अनुभव्,इ.चे अजून अनुभव शेअर करा प्लीज!!
इन्नासार्खं हिंडायला मलाही खूप आवडेल...तशी सोबत मिळाली तर!!!
Pages