तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही नैनिताल ला केसरी बरोबर गेलो होतो . तेव्हा सगळ्यात शेवटी हॉटेल सोडताना सांगितलं गेल कि तुम्हाला हॉटेल च्या स्टाफनी इतकी चांगली सर्विस दिली आहे त्याची आपण परतफेड केली पाहिजे म्हणून प्रत्येकांनी ( प्रत्येक फ्यामिलीने ) कमीत कमी काही ठराविक रुपये कोंट्रीबुशन काढून त्यांना सुपूर्त करूया. ५०-६० % प्रवासी अतिशय नाखूष होते या बद्दल. लोकांनी आपापसात सूर लावलाच. त्याचं ते कामच आहे चांगली सर्विस द्यायची आणि केसरी वाले म्हणतात ना एक पैसा सुद्धा तुम्ही नेऊ नका प्रवासात कारण सगळे पैसे आधीच ते वसूल करतात. मग आता या वेळी आम्हाला कोंट्रीबुशन चा भुर्दंड का ? इत्यादी इत्यादी. पण शेवटी प्रवासाचा आनंद बिघडू नये या उद्देशांनी सगळ्यांनी कुरकुरत दिलेच आणि केसरीने स्वताचे पैसे न देता आयत्यावेळी लोकांच्या खिशात हात घालून हॉटेल वाल्यासमोर स्वताची चांगली इमेज करून घेतली असेही शेरे मारले. हेच पैसे तुम्ही कॉस्ट मधेच लावले असते तर लोकांना समजलंही नसत. कारण लोकांना माहितीच आहे त्यांच्या ट्रीप इतरांपेक्षा महाग असतात हे Happy असो.
"अनुभवचा" पण लोकांना चांगला अनुभव आहे. अस ऐकून आहे . पण अजून एकदाही अनुभव घेतला नाही Happy

माझ्या एका परिचिताने अनुभवची कोस्टल कर्नाटका सहल केली होती
त्यांचाही अनुभव ऊत्तम होता
ही टूर एकदा करावीच अशीही शिफारस केली होती
त्यामुले ही टूर यादीत आहे

आणखी एक गोष्ट
मी सध्याचे केसरीचे भाव तपासले. १८( वीणा) ते २५ प्रति व्यक्ती अशी रेंज आहे- राजस्थान साठी. ५६ कुणीतरी उल्लेखिलेले वाचले. कसे ते कळले नाही.
मी केसरीचा एजंट नाही - डिस्क्लेमर

आम्हाला केसरीचा चांगला अनुभव आला...... म्हणजे द बेस्ट वगैरे म्हणणार नाही पण डोक्याला ताप नको असेल तर केसरी उत्तम पर्याय!
शिवाय माझ्या ओळखीतले जे जे लोक केसरी तर्फे ग्रुप टूर्सला गेलेत त्यांचे ग्रूप्स टूरनंतर पण टिकलेत (अर्थात हे इतर ग्रूप टूर्सबाबतीत पण होत असेल)... आम्हाला पण खुप चांगली सोफिस्टीकेटेड कंपनी मिळाली होती.
खाण्या-पिण्याची चंगळ असते... हॉटेल्स मात्र तुमच्या टूरच्या श्रेणीनुसार बदलतात!
मुख्य म्हणजे मॅनेजमेंट छान असते.... कोणी आजारी असेल/कोणाला काही लागले असेल तर त्यांची स्वतंत्र आणि चांगली सोय करतात.... आमच्या ट्रीपमध्ये एक मुलगी रोहतांग पासला घोड्यावरुन पडली तेंव्हा खुप व्यवस्थित काळजी घेतली केसरीवाल्यांनी!

आई-बाबांना स्वतंत्र पाठवणार असाल/फारसे माहीतीचे ठिकाण नसेल तर केसरी हा एक उत्तम पर्याय आहे Happy

>>बसेस धड बघून घेत नाहीत. एसी चालत नाही, बसड्रायव्हर या टूर गाइड्/ऑरगनायझरचं ऐकत नाही,
>>> या गोष्टी अमेरिकेतही आहेत हे पाहून मौज वाटली

हुडा, राहण्याची-खाण्यापिण्याची हॉटेलं, बसकंपन्या सगळ्याचेच मालक देशी. आपआपसात देतही असतील स्वस्तात सेवा. म्हणून काही कमीजास्त झालं तरी टूरकंपनी बोंबलत नाही. बसवाले, 'देशी पॅशींजरं आहेत. एसी बिघडलाय. दुरुस्तीचं काय नंतर बघता येईल. अगदीच गुदमरू नयेत म्हणून टपावरचं एमरजन्सी एक्झिट उघडू. सनरूफ्-मूनरूफचा लाभ दिलाय सांगू' असा विचार करत निवांत असावे. दोन्ही कंपन्यांचं फावलं. मधल्यामधे कावकाव करून मंडळी जरा वेळात चूप झाली.

मी पण आत्ताच केसरीचे भाव वाचले . राजस्थान ट्रीप चे दर ४४९७५ चे कापून ४० ९७५ केले आहेत
7/10/2013
44975
40975 10+
30/10/2013
44975
40975 10+
7/11/2013
44975
42475 4
9/11/2013
44975
41475 10+
21/12/2013
44975
40975 10+
25/12/2013
44975
40975 10+
11/1/2014
44975
42975 10+
8/2/2014
44975
42975 10+
8/3/2014
44975
42975 10+
केसरीच्या ट्रीप महागच असतात . कारण सरळ आहे . दर रविवारी एक अख्खा पान भर ( मटा आणि लोकसत्तात ) त्यांची जाहिरात असायची. ते पैसे ते कोणाकडून वसूल करणार ? . आपल्याकडूनच ना ? ती माहिती लिहून काढायला पेड रायटर ठेवले होते त्यांनी . आज मितीला मटा मध्ये जाहिरात द्यायची असेल तर एका शब्दाला सातशे रुपये रेट आहे आणि लोकसत्तात एका शब्दाला हजार रुपये . त्यांची पान भरून जाहिरात असायची दर रविवारी. . जाहिरातीचा किती खर्च येत असेल ३-४ लाख दर रविवारी ? ते सगळे पैसे ते प्रवाशांकडूनच वसूल करणार ना? एवढे जर ते दुप्पट पैसे घेत असतील तर त्यांना चांगली सर्विस दिलीच पाहिजे . .तुम्ही केसरी एके केसरीच धरून बसलात आणि इतर कंपन्या ट्रायच केल्या नाहीत तर तुम्हाला इतरांचे अनुभव कसे येणार ? आम्ही दोघ राजस्थान ट्रीप ला २००७ साली गेलो होतो. आमचे पर हेड १७,०००/- घेतले. ट्रीप उत्तमच झाली. नेहमीप्रमाणे केसरी वाले आमच्या बरोबरच जेवणाला ( आम्ही ज्या ठिकाणी जेवत होतो तिथेच ) हजर. म्हणजे बाबा वेगळ अस काही नाही आणि आणि इतका बरोबरीने प्रवास करून परत येताना जोधपुर वरून ते आणि आम्ही एकाच गाडीत होतो तेह्व्हा नेहमीप्रमाणे चौकशी झाली तर त्यांच्या कडून पर हेड ३२,०००/ घेतले . आणि आम्ही पर हेड १७,०००/- दिले. आर्थिक काही फरक आहे कि नाही ? थोडक्यात काय इतर कंपन्या पण ट्राय केल्या तर तुमचीहि ट्रीप उत्तम होऊ शकते. पण ट्रायच केल नाहीत तर इतर कंपन्यांचा अनुभव कसा मिळणार? असो इथेच थांबते आणि मी पण केसरीची शत्रू नाहीये हे प्रामुख्याने नमूद करते Happy शेवटी प्रत्येक जण आपापला डिसिजन घेतच असतो . तेव्हा अंजली तुझ्या गाठीला भरपूर माहिती जमा झालेली आहे .प्रवास केलास कि तुझेही अनुभव लिहिशीलच Happy

<आज मितीला मटा मध्ये जाहिरात द्यायची असेल तर एका शब्दाला सातशे रुपये रेट आहे आणि लोकसत्तात एका शब्दाला हजार रुपये . >

विषयाशी संबंध नाही, पण एवढा दर नक्की नाही. Happy
असो.

अगदी अगदी सुजा! थँक्स..!
पण तुमच्या सार्‍यांच्या अनुभवानंतर मला....

ग्रुप असेल तर शक्यतो आपलं आपण प्लॅन करुनच जावं.. जसं आजवर करत आलोय तसं..
पॅकेज टूर्स हा ऑप्शन आवडलाय.. त्यावर विचार करण्यात येईल Happy

वयस्कर मंडळी सोबत असतील तर या कंपन्यातर्फे जावे.. त्यांना दगदग नको म्हणून..
इतपत तरी माहिती गोळा झालीये.. वर तुम्हां सगळ्यांचे अनुभव कळालेत...

पुढची टूर ठरवताना याचा नक्की फायदा होईल! Happy

सुजा तुम्ही राजस्थान टूर कोणत्या कंपनीकडून केलीत कारण नक्कीच तुमची स्वस्त आणि मस्त झाली. धन्यवाद हा अनुभव शेअर केल्याबद्दल.

www.yhaindia.org
ही वेबसाईट पहा . भारतात तसच परदेशीही अत्यंत वाजवी किमतीत रहायची सोय होते. साधी , स्वच्छ , अन सुरक्षित माझा अनुभव आहे. बर्याचदा युथ होस्टेल मध्यवर्ती ठिकाणी असतात. हा अजून एक फायदा. मात्र बेड अ‍ॅन्ड ब्रेफा ह्यावतिरिक्त इतर झालरी इथे नाहीत. Happy

सुजा, अगदी! (आपण जिथे जेवायला जाऊ, तिथेच केसरी-सचिनवालेही येतात - हा अनुभव आम्हाला परदेशवारीतही आला.)

त्यामुळे,
पण ट्रायच केल नाहीत तर इतर कंपन्यांचा अनुभव कसा मिळणार? >>> याला जोरदार अनुमोदन!

आमच्या घरचे ज्ये.ना. विहार ट्रॅव्हल्सच्या आजी-आजोबा सहलींना ३-४वेळा जाऊन आलेले आहेत. त्यांचा अनुभव अगदी उत्तम आहे.
केरळ-कन्याकुमारी टूरच्या वेळी तर आमच्या सा.बा.नी त्यांना सुचवलं, की कन्याकुमारीचा मुक्काम पौर्णिमेला धरून ठेवा, त्यामुळे समुद्रावर सूर्यास्त आणि चंद्रोदय एकाच वेळी पाहता येतो. तर त्यांनी ती सूचना मान्य केली होती. (तपशीलांत माझं पुढेमागे झालं असेल, पण साधारण अशीच काहीतरी सिच्युएशन होती.)

केसरी मधे पुर्वी खुप मजा येत असे. १९९९ माझा पहिला परदेश प्रवास थायलंड +सिंगापूर आम्ही केसरी बरो बर केलं... त्या वेळेस हिमांशु पाटिल स्वतः आला होता. त्या ट्रिप मधे फक्त २७ जण होते. खुप मजा आली होती. धावाधाव नाही, निवांत ७.३० - ८ वाजता उठत होतो. खाणं पिणं भरपूर.... नंतर सासु बाई २००० मधे युरोप ला जाउन आल्या त्यांच्या बरोबर त्यांना फार धावडवलं.... मग मात्र आम्ही दोघे वैयक्तिक रित्या खुप देशो देशी फिरलो. मुलगी ला न्यायच्या वेळेस परत केसरी बरोबर थायलंड+सिंगापूर+ हाँगकाँग+ मलेशिया ला गेलो. तेंव्हा परत कंटाळा आला... खुप धावाधाव... तेच तेच खाणं, जेवणाला लयनी... निराशा... एकच चांगलं की टुर लिडर मात्र अगदी मित्र झाला... घरगुती संबंध निर्माण झाले... त्या वेळेस ५० चा गॄप होता...

एकंदर माझी ऑब्झेरव्हेशन्स म्हणजे
१. ग्रुप खुप मोठा असेल तर मग नीट मॅनेज होत नाही
२. तीच ती आणि ती ठिकाणं दाखवत रहातात.
३. हे लोक स्वतः परदेशात तिकडच्या लोकल एजंटच्या हातचे बाहुले असतात. त्या मुळे स्थळ दर्शनात नाविन्य नसते
४. यांच्या एकंदर धावडण्या साठी आपल्या सारखे काही लोकही करणीभूत असतात. त्यांना एखाद्या ठिकाणी "जाउन आलो" , "बघितलं" "जास्तित जास्त बघितलं" जेवढं शक्य होइल तेवढं बघुन घ्यायच्या हव्यासा पोटी मग धावाधाव होते.

मी आमची युरोपची ट्रिप ठरवायला ट्युलिप मधे गेले होते. माझ्या ६५ वर्षांच्या सासू आणि आई माझ्या बरोबर असणार होत्या. त्या वेळेस एक माहाभाग तिकडे केसरी, सचिन आणि गुरुनाथ अशी तीन पत्रकं घेवुन उघड उघड पणे ट्युलिप च्या पत्रकाशी कंपेअर करत होता. शेवटी "तुम्ही किती कमी दाखव्ताय!! ह्यांचं बघा.." असं सरळ सरळ बार्गेन करायला लागला. ते ट्युलिप वाले बिचारे आदबीने ऐकुन घेत होते. आणि सांगत होते "सर, हे ठिकाण मुद्दम घेत्लं नाहिये कारण इकडे लायनीत नुसतं उभं राहुन वेळ जातो, त्या ऐवजी हे ठिकाण आहे इकडे जरा अनवट निसर्ग आहे... इ.इ." शेवटी त्याने सचिन मधे बुकिंग करतो सांगुन तो निघाला...

कंपॅरिझन जरुर करावी, मी ही प्रत्येक वेळे करतेच... पण जर एखाद्या कडे त्या त्या गोष्टीचं जस्टिफिकेशन असेल तर आपण ऐकुन तर घ्यायला हवं....केसरी वाल्यांची हॉटेलं दूर असतात, पण त्यांचा दर्जा चांगला असतो. त्यांचा सगळा भर खायला प्यायला घालण्यावर असतो. परत मोठ्ठे ग्रुप!!! त्या मुळे जेवण, नाश्ता इ ला वेळ लागतोच..... ट्युलिप वाले मुद्दाम लहान ग्रुपच नेतात. दर्जा रहावा म्हणुन!!

सचिन वाल्यांचा प्रचंड गोंधळ ऑर्गनायझेशन मधे असतो. ( आम्ही एकदा स्वतंत्र पणे इंग्लंड्+फ्रान्स्+ हॉलंड ला गेलो होतो. तिकडे आयफेल टॉवरला ही ... गर्दी होती. त्यात सचिन चा एक सिनियर सिटिझन्स्चा ग्रुप होता. त्यांना तिसरी लेव्हल दाखवु असं सांगुन दुसर्‍याच लेव्हल पर्यंतची तिकिट देवुन त्यांचा टुर लिडर गायब झाला. ते लोक तिकडे भांभावले... कोणी गेट्मन शी हुज्जत घालु लागले...भाषेचा प्रॉब्लेम... खुप गोंगाट... शेवटी इतर सगळ्या लोकांना थांबवुन ह्या ग्रुपला त्या आयफेल च्या सेक्युरिटीनी एका लिफ्ट मधे कोंबुन खाली आणुन टाकले... आणि बाहेर हाकलून दिले... आम्ही यथावकाश वरुन खाली आलो, तर हे बिचारे वयस्कर लोक तिकडच्या फूट्पाथ वर त्यांच्या ग्रुप लिडर व बस ची वाट पहात बसलेले होते. खुप दया आली...करण्या सारखे काहीच नव्हते... )

अत्ता एका स्नेह्यांना आलेला सचिन चा अनुभव....
ते लोक कुलु मनाली सिमला गेले होते, सचिन बरोबर. त्यांना मनालिच्या हॉटेल वाल्याने चेक आउट करु दिले नाही. टुर लिडर पळून गेला. कारण सचिन ने पैसेच भरले नव्हते. सचिन वाल्यांशी मुंबईत बोलले तर आताच चेक पाठवतोय, आर.टि.जी.एस. करतोय अशी टोलवाटोलवीची उत्तर मिळाली. पुढच्या ट्रेन्स/फ्लाइट बुक असल्याने सगळ्यांना मुंबईला जायची घाई होती. त्या मुळे शेवटी दोघा तिघा पॅसेंजर नी क्रेडिट कार्डाने पैसे भरले. शेवटचा थांबा व भरपूर खरेदी केल्याने बहुतेकांकडे हार्ड कॅश पैसे उरले नव्हते. क्रेडिट कार्ड वापरलेल्या मधे आमचे स्नेही होते. यथावकाश ते मुंबईला पोहोचले व लगेच दूसर्‍या दिवशी ते सगळे सचिन मधे दाखल झाले. तिकडे फारच उर्मट उत्तरं मिळाली, आश्वासनं मिळली. ह्यांचा त्या वर विश्वास बसला नाही. पण पैसे काही देईनात. शेवटी ३-४ तासांनी पोलिसांची व वकिलाची धमकी दिल्यावर आर्धे पैसे मिळाले. बाकीचे वसूल करायला प्रत्येक वेळी हाच तमाशा आणि एक महिना लागला. त्याच वेळी दुसर्‍या ग्रुप ची लोकं भांडायला आली होती, की त्यांचे हॉटेल बुकिंग असुनही सचिन ने पैसे भरले नाहीत म्हणुन हॉटेल वाल्यने हाकलून दिलं आणि मग ह्या ७० जणांनी बाकीची रात्र स्टेशन वर व आजुबाजुच्या भिकार हॉटेलात काढली....

आधीच पर्यटन क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे... राज ट्रॅव्हल्स च्या मुख्या ने सध्याच आत्माहत्या केली. आर्थिक डबघाई व कर्ज हे त्याचं करण होतं. राज ही भारतातली खुप नावजलेली संस्था आहे. बाहेरच्या देशात व भारतातल्या श्रीमंत वर्गात त्यांचं नाव फारच फेमस होतं. तरीही त्यांच्यावर ही वेळ यावी... मग सचिन कीस झाड की पत्ती!!!!

सचिन ट्रॅव्हलसवाले सध्या बुडित खात्यात आहेत.

आम्ही ट्रिपला जातो तेव्हा आम्हाला डोक्याला ताप नकोसा वाटतं. शिवाय अनोळखी प्रदेशात जातोय तर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवासी कंपनीबरोबर जाणे बरे असे वाटत राहते.

केदार ट्रॅव्हल्स, आशुतोष ट्रॅव्हल्स इत्यादिंनी आपल्या आपण ट्रिपा कश्या आखाव्यात, कश्या पार पाडाव्यात याचे मार्गदर्शन मायबोलीकरांना करावे अशी नम्र विनंती!

गेल्याच वर्षी आम्ही अनुभव ट्रॅव्हलची 'डिस्कव्हर कर्नाटक' ट्रिप केली. रास्त (खरंतर स्वस्तच म्हणायला हवं) दरात राहण्याची आणि जेवण्याचीही अगदी उत्तम सोय होती. फिरायच्या बस इतक्या उत्तम दर्जाच्या नव्हत्या, पण सगळे दिवस आम्ही एकाच ठिकाणी राहणार होतो, बसने फिरण्याचा वेळ एकावेळी जास्तीत जास्त दोन तास असल्या कारणाने जास्त गैरसोय झाली नाही.

केसरी महाग वाटलं तरी त्यांच्या सोई उत्तम दर्जाच्या असतात असा आमचा अनुभव.

वर व्हाया.कॉम चा उल्लेख आलाय म्हणून लिहीतोय.

माझ्या नातेवाईकाने व्हाया.कॉम वरुन हैद्राबादची ३ रात्र - ४ दिवसांची टूर बुक केली होती.
हॉटेल बुक केले लिओनिया, जे हैद्राबादच्या बाहेर आहे. तिथून स्थलदर्शनासाठी हैद्राबादमध्ये येण्या-जाण्यासाठी २-२ तास वाया जायचे.

शुक्रवारी सलरजंग म्युझिअम बंद असते. हे त्या टूर ऑपरेटरला माहिती असायला हवे होते, पण त्याने गुरुवारी या लोकांना हुसेनसागर, गोलकोंडा इ. स्थळे दाखवली. शुक्रवारी हे लोक तयार होऊन नाश्ता करायला गेल्यावर सांगतोय की "शुक्रवारी सलरजंग म्युझिअम बंद असते". मग म्हटले "निदान आज रामोजी दाखव. उद्या म्युझिअम" तर उत्तर "त्याचे बुकिंग शनिवारचे आहे. ते कॅन्सल केल्यावर लगेच बुकिंग नाही मिळणार". जाम वादावादी झाली. मग काय शुक्रवारचा अख्खा दिवस लिओनियाचा रिसोर्ट मध्ये काढला.

रविवारी परत जाताना ट्रेनचे बुकिंग हैद्राबाद - पुणे जनशताब्दीचे. पुणे स्टेशनला टूर ओपरेटर गायब. फोन बंद. तिथून मुंबईला स्वखर्चाने शिवनेरीने प्रवास केला.

यावरुन एक धडा म्हणजे टूर कंपनी काय काय दाखवणार आणि कधी कधी दाखवणार हे स्वतः तपासून घ्यावे. परतीच्या प्रवासाची तिकीटे कन्फर्म आहेत का? प्लॅन मध्ये लवचिकता आहे का? हे देखील पडताळून पहावे.

इंटरनेट वगैरे जोरात चालु होण्यच्या आधीच्या जमान्यात १९९२ साली आम्ही २१ दिवसाची पुणे-भुवनेश्वर-कोलकता-दार्जिलिंग-गंगटोक-कानपूर-मुंबई-पुणे अशी लांबलचक ट्रीप आखली होती.. सगळी बुकींग ट्रॅव्हल कंपनीकडून करुन घेतली होती पण बाकी सगळे स्वतःच मॅनेज केले होते..

केदार, आशुतोष म्हणताहेत त्याला प्रचंडच अनुमोदन.. स्वतःच प्लॅन करुन ट्रीप आखायची त्यात खूप मजा येते..

चार वर्षापूर्वी अशीच मध्यप्रदेशची पण ट्रीप केली होती... थोडे आधी प्लॅनिंग करावे लागते पण त्यातून शेवटी जे समाधान मिळते ते सुरेख असते..

पुण्यात गो होलिडेज म्हणून आहे.. ते तुम्हाला ह्या प्लॅनिंग मध्ये चांगली मदत करतात... त्यांच्या स्वत:च्या पण टूर्स असतातच...

एकदाही ट्रॅव्हल कंपनीतर्फे गेले नाही. हनिमून ट्रिपही नवर्‍याने स्वतःच प्लान केली होती. त्यात फक्त सिमल्याचं माझ्या ऑफिसचं हॉलिडे होम मी बूक केलं होतं (२ दिवस). बाकी मनालीला तब्बल ७ दिवस राहिलो होतो. नवर्‍याने जायची यायची आणि चंदिगढ, मनालीतलं हॉटेल बुकिंग मुंबईतूनच केलं होतं. दिल्लीत नवर्‍याच्या मित्राचा आग्रहाचा पाहुणचार होता त्यामुळे ते १ दिवसाचं बुकिंग लग्न ठरताच झालं होतं Wink . सिमला-मनाली, मनाली-चंदिगढ, चंदिगढ-दिल्ली बूकींग्ज तिथे तिथे पोहोचल्यावरच केली होती. इंटरनेट तेव्हा नव्हतं बहुतेक. ट्रॅव्हल कंपनीतर्फे नसल्यामुळे हवं तेव्हा मनालीतल्या रस्त्यांवर पायी भटकायची मोकळीक मिळायची. तेव्हा माल रोड फार गजबजला नव्हता. ७ दिवसांत २ वेळाच तिथे गेलो, त्यात एकदा कुलकर्ण्यांच्या हॉटेलात आमटी भात भाजी पोळी खायला Proud रोटी, कुलचा, नान, छोले, भटुरे, पनीर, बटाटा वगैरेचा वीट आला होता. बाकीचे दिवस मनालीतले फक्त लोकल लोक्स वापरत असतील अश्या पाऊलवाटा, शेतातले रस्ते वगैरे फिरायचो. हे सगळं कुठलं ट्रॅव्हल कंपनीतर्फे गेल्यावर मिळायला!

मनालीला आहे गं माल रोडवर. बरं आहे. गार भाताची डिखळं वाढली होती पानात, पण साधं जेवण हवं होतं ते मिळालं. माझी फळांवर रहायची वेळ आली होती. त्यांचं लॉजिंग बोर्डिंग पण आहे.

एकदा माल रोडवर भटकत असताना अचानक पाऊस पडल्यावर टेंपरेचर खूप ड्रॉप झाल्यावर समोर दिसेल ती टॅक्सी पकडून हॉटेलवर यावं लागलं हुडहुडी भरल्यामुळे. तो टॅक्सीवालाही मूळचा मराठी निघाला होता. हुडहुडीमुळे टॅक्सीत शिरताही येत नव्हतं मला तेव्हा नवरा व ह्या टॅक्सीवाल्याने कसंबसं आत ढकललं होतं मला. तेव्हा आमचं बोलणं ऐकून (माझं दात वाजत बोलणं) त्यानेही मराठी सुरु केलं होतं.

माल रोडवर दोन तिबेटी लोकांमध्ये सुर्‍याने मारामारी झालेलीही पाहिली होती ३-४ फुटांवर.

असले काही प्रकार झाले तर मात्र आपले आपल्यालाच निस्तरायला लागतात आपले आपण गेलो असू तर Happy

चिनुक्स मी दोन महिन्याभरापूर्वीच चौकशी केली आहे तेव्हा मला सगळ्यांनी मटा आणि लोकसत्ताचा हाच दर सांगितला . त्यामुळे मी नवाकाळ मध्ये माझी छोटी जाहिरात दिली . एका शब्दाला दोनशे रुपये या रेट नी. हा दोन- तीन महिन्याभारापुर्वीचा रेट आहे. त्यामुळे मी आज मितीला अस लिहू शकले Happy मोकीमीला अनुमोदन .
नैनिताल ला आम्ही दोनदा गेलो . एकदा केसरी बरोबर . एकदा स्वताचे स्वता. तिकडे गेल्या वरतीच हॉटेल शोधल आणि मस्त राहिलो ६ दिवस . जाता येता दिल्ली वरून विमान प्रवास. तसच हरिद्वार /ऋषिकेश आणि मसुरी पण स्वताच स्वता. अर्थात ऑफ सिझन गेलो त्यामुळे हॉटेल खूप म्हणजे खूपच स्वस्तात मिळाली. स्वता प्लानिंग करून गेलो जाता येता दिल्लीवरून विमानाने . साधारण २००४ ते २००९ पर्यत दर वर्षी आम्ही ट्रिप्स केल्या अस म्हटलं तरी चालेल आणि सगळ्या दिल्ली वरून . एकदा दिल्ली/ आग्रा/ फतेपूर सिक्री. पुढच्या वर्षी दिल्ली वरून नैनिताल आणि परत त्याच्या पुढच्या वर्षी दिल्ली /हरिद्वार/ ऋषिकेश /मसुरी . या सगळ्या स्वताच्या स्वता. प्रवासी कंपनीबरोबर नाही . त्याच्या पुढच्या वर्षी राजस्थान . त्याच्या पुढच्या वर्षी फक्त थायलंड . प्याकेज . आणि त्याच्या पुढच्या वर्षी दुबई प्याकेज. थोडक्यात फक्त राजस्थान ट्रिप आम्ही प्रवासी कंपनीबरोबर केली. बोरिवलीची होती " साई दर्शन " का असच काही तरी नाव Happy चार वर्षात कुठेच गेले नाही तर मला अगदी कससच होतंय. या पुढे परदेश ट्रिप चे वेध आहेत.:) पण भारतातल केरळ आणि मध्यप्रदेश पण राहिलेत Sad

या वर्षी युरोप ला जायचं जवळ जवळ ठरल होत "मेक माय ट्रिप " बरोबर. १४ रात्री १५ दिवसांचे साधारण २.१० पर्यत सांगितले होते . पण काही कारणामुळे क्यान्सल झाल. माझ्या मैत्रिणीने " थोमस कुक" मधल्या एका टुर म्यानेजर चा कोन्टक नंबर पण देऊन ठेवला होता. आणि तू बिनधास्त त्याला फोन कर अस सांगितलं होत. का तर तो कसलेही आढेवेढे न घेता तुला उत्तम टिप्स देईल म्हणून . काय काय तयारी करावी कशी कशी इत्यादी इत्यादी . पण सगळच फिस्कटल Sad

देशातल्या देशात तर नक्कीच आपले आपण प्लॅन करून जाऊ शकतो. ट्रिपअ‍ॅडव्हायझर सारख्या साईटवर हॉटेलविषयी अनेक रिव्ह्यूज असतात, प्रत्येक ठिकाणची माहिती असते. अगदी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये काय खावे सारखे डिटेल्सही मिळू शकतात.

परदेशात भाषेचा, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तरीही ज्या देशांत खूप छान पब्लिक ट्रान्सपोर्ट अव्हेलेबल आहे तेथे अगदी सहज प्रवास करता येऊ शकतो. फारतर एखाद दिवस समजून घेण्यात जाईल पण नंतर आपले आपण राजे! सिंगापोर, स्वित्झर्लंड, मॉरिशस (कार रेंट करून).

आम्ही सगळ्या ट्रीप्स आपल्याआपण नेटवरून डायरेक्ट हॉटेल, फ्लाईट बुकिंग करून केल्या आहेत.

मेक माय ट्रीप चा माझा अनुभव खूप छान आहे. आम्ही केरळ चा प्याकेज टूर घेतला होता.
खूप छन अनुभव. आणि रास्त किम्मत.

साबासाबु नुकतेच केसरीतर्फे अमेरिका ईस्ट कोस्ट करून आले. केसरीबरोबर ही त्यांची बहुतेक ४ थी सहल होती . आधीच्या ३ भारतातच होत्या. त्या प्रत्येक ट्रिपनंतर अतिशय उत्तम, धमाल, आरामात झाली अशीच प्रतिक्रिया होती त्यांची. Happy ही ट्रिप भारताबाहेरची होती त्यामुळे जरा साशंक होते की जेवण कसं असेल, किती पळवतील, भाषेचा प्रश्न इ. इ. पण ही सहल देखील खूप छान झाली.

आम्ही अजूनतरी एकही ट्रिप कोणत्याही कंपनी तर्फे न करता स्वतःच प्लॅन करून केल्या आहेत.
फक्त २ क्रुझेस प्रिन्सेस कडून केल्या त्या उत्तम झाल्या.

आता माझे २ पैसे.
वयस्कर लोकांचा विचार असेल (६५+ आणि फार फिट हेल्थ नाही असं असेल) आणि पैशाचा विचार करून किस पाडायचा नसेल तर केसरी उत्तम. नाहीतर इतर जरा स्वस्त कंपन्या देखील चालू शकतात.
पण त्या गटासाठी तरी स्वतःच ठरवून जाणे जरा अवघड आहे. केसरी चांगली, स्वच्छ हॉटेल्स, मराठी जेवण, काही वेळा लोकल जेवण, त्या त्या ठिकाणच्या अ‍ॅक्टिव्हिटिज अशी चांगल्या प्रकारे सेवा देतात. आमच्या केसमधे माझे साबु ६५+ आणि एकदा सीव्हिअर स्ट्रोक येऊन त्यातून बरे झालेले. साबा देखील ६२. त्यामुळे अ‍ॅक्टीव असल्या तरी साबुंमुळे फार पळपळ शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या पेसने, त्यांच्या तंत्रात केसरी मुळेच शक्य होतेय. सेम एजग्रुपबरोबर त्यांना मजा पण येते. आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय होते.
आता जास्त रेट हा विषय जरा बाजूला ठेऊन काही त्रुटी पण सांगते.
काश्मीर ट्रिपमधे दिल्ली-पुणे हा विमानप्रवास होता. परतीच्या वेळी त्यांची पुण्याची फ्लाईट संध्या ७ ची होती. पण हॉटेलरूमचे पैसे वाचवायचे म्हणून प्रवाशांना सकाळी १० लाच एअरपोर्टवर आणून सोडणार म्हणून सांगितले. मग स १० ते सं ७ लोकांनी काय एअरपोर्टवर बसायचे? मग भांडाभांडी होऊन शेवटी प्रवासी जिंकले आणि पुणे केसरी ऑफिसने अधिक एक दिवसाचे रुमचे भाडे लगेच वायर ट्रान्सफर केले. मग सं ५ पर्यन्त लोकांनी विश्रांती घेतली.
इथे न्युयोर्कला त्या टुर गाईडचा कोणीतरी मित्र लिमोराईड्स चा व्यवसाय करत होता. तेव्हा कार्यक्रम पत्रिकेत बदल करून टाईम स्क्वेअरची रात्रभेट वगळून लिमोराईड्स चा बेत ठरला. पुन्हा प्रवाशांनी गोंधळ करून २ गट केले. ज्यांची पहिलीच NY भेट होती त्यांना टाईम स्क्वेअर ला नेले आणि ज्यांना लिमो बघायची होती ते तिकडे गेले पण प्रवाशांच्या जागरूकतेमुळे शक्य झाले नाहीतर मॅनेजरने हवे तसे बदल गळी उतरवले असते.

पण बाकीच्या चांगल्या गोष्टींचा विचार करता केसरी पर्याय उत्तमच आहे.

आम्ही केसरीतर्फे युरोप टुर केली. अंत्यत उत्तम सेवा, उत्तम हॉटेल्स, जेवणाखाण्याचे चांगले पर्याय वेज-नॉनवेज-जैन, प्रवासाची उत्तम आखणी, जेवढी ठिकाणे दाखविण्याचे कबुल केले होते तेवढी सर्व दाखविली तसेच थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर व सर्वांनी परवानगी दिल्यावर पॅकेज व्यतिरिक्त देखील काही ठिकाणे दाखविली. टुर कॉस्ट बघता आम्हाला तरी ती इतकी महाग वाटली नाही कारण इतर काही पर्याय आम्ही चेक केले उदा. SOTC,कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज, राज वगैरे तर अल्मोस्ट थोडेफार इकडे-तिकडे होते पण केसरी तर्फे नाश्टा, दोन्ही वेळचे जेवण, तसेच मध्ये मध्ये खाण्यासाठीचा खाउ, आईसक्रिम दिले जाणार होते जे इतर कंपन्यांच्या पॅकेज मध्ये नव्हते. काहीजण फक्त नाश्टा किंवा एकवेळचे जेवण असे देणार होते. आमच्या ग्रुपमध्ये अगदी कॉलेजचे यंगस्टर, नविन लग्न झालेले कपल्स, लहान मुलांना घेउन आलेले कपल्स ते अगदी ज्येष्ठ नागरिक असे सर्व थरातील लोक होते. सर्वांनी खुप धमाल केली. सर्वजण जणु एक कुटुंब बनले होते. टुर मॅनेजर सर्वांशी मिळुनमिसळुन वागत होता व नविन नविन कल्पना सादर करुन सर्वांना फ्रेश ठेवत होता. त्यामुळे केसरी रॉक्स...

आम्ही भारतातील टुर मात्र ग्रुपने न जाता स्वत: सर्व पर्याय निवडुन करतो. त्यामुळे फ्लाईट बुकिंग पासुन ते एअरपोर्टला रिसिव्ह / ड्रॉप करायला येणारी गाडी, हॉटेल्स, साईट्स यामध्ये आपल्याला भरपुर चॉईस मिळतो व महत्वाचे म्हणजे निवांत वेळ व आपल्याला हव्या त्या ठिकाणी हवे तितक्या वेळ फिरता येते. कोणाशी बांधील रहावे लागत नाही. त्यामुळे आमची हनिमुन टुर देखील आम्हाला हवी तशी स्पेशल झाली.

भारतातील प्रवासात जर तुमच्याकडे वेळ असेल व टुर कॉस्ट जास्त वाढवायची नसेल तर भारतीय रेल्वेचे देखील खुप चांगले, बजेट मध्ये बसणारे टुर्स असतात. हा पर्यायदेखील चांगला आहे. अधिक माहीती इथे मिळेल.आम्ही अजुन हा पर्याय निवडला नाही आहे त्यामुळे चांगल्या वाईटाची कल्पना नाही परंतु भविष्यात नक्कीच हा पर्यायदेखील निवडु.
http://www.railtourismindia.com/

तसेच या इतर काही वेबसाईट्स जिथे तुम्हाला अनेक टुर कंपन्यांचे, विमान कंपन्यांचे, हॉटेल्स बद्द्ल अनेक लोकांचे रिव्ह्युज मिळतात. ज्याचा उपयोग आपण कोणती सेवा कोणाकडुन विकत घ्यायची यासाठी होतो. आम्ही केसरी तसे इतर हॉटेलबुकिंग करताना या रिव्ह्युजचा आम्हाला फायदा झाला.

http://www.mouthshut.com/
http://www.reviewstream.com/

हे रिव्ह्युज जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला असे जाणवेल कि प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. काहींना ज्या प्रवासकंपन्या आवडल्या आहेत त्या इतर काही जणांच्या अगदी नावडत्या आहेत. त्यामुळे सर्वांनी विचारपुर्वक निर्णय घ्या व आपल्या मेहनतीच्या पैशाचा योग्य मोबदला मिळवा Happy

मंजूनं केदार ट्रॅव्हल्स, आशुतोष ट्रॅव्हल्स यांना विनंती केली आहे. ते संबंधित पोस्टी टाकतीलच. तोपर्यंत माझी ही पोस्ट -

- जायचं ठिकाण ठरलं, की विविध प्रसिध्द कंपन्यांच्या ऑफिसमधे फोन करायचे आणि त्यांची माहितीपत्रकं मिळवायची (आपण मागवली नाही, तरी ते आपणहून लगेच पाठवतातच. आपल्याला आपला पत्ता कळवण्यापलिकडे फार काही करावं लागत नाही.)
आजकाल ही माहिती त्या-त्या वेबसाईटसवरूनही मिळवता येते. पण कुणा एकाचीच वेबसाईट पाहून काहीही नक्की करायचं नाही. किमान ७-८ तरी हव्यातच.

- सगळी माहितीपत्रकं स्कॅन करून त्या ठिकाणची ट्रिप साधारण कशी असेल, स्पॉटस कुठले याची कल्पना मनातल्या मनात तयार करायची. प्रवासासाठी लागणारा वेळ, प्रवासासाठीचे पर्याय, प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी किती दिवस पुरेसे आहेत - हे सगळं व्यवस्थित लक्षात येतं.

- त्यावरून आपल्याला हवा तसा प्रवासाचा प्लॅन आखायचा. बजेट ठरवायचं.

- त्यानंतर तुमच्या राहत्या गावातल्या एखाद्या खाजगी टुरिझमवाल्यांचं बर्‍यापैकी ऑफिस गाठायचं. यांच्या पॅकेज टूर्स वगैरे नसतात, पण पर्यटनाच्या प्रत्येक ठिकाणी सर्व प्रकारचे कॉण्टॅक्टस असतात. त्यांना आपला प्लॅन, बजेट सांगून त्यानुसार हॉटेल्स, तिथला स्थानिक प्रवास, त्यासाठी लागणारी खाजगी वाहनं या सगळ्याचं बुकिंग करायला सांगायचं. (हे टूरिझमवाले गरज पडल्यास चांगले सल्लेही देतात. कुठलं ठिकाण हवंच, कुठलं टाळायचं, वेळ वाचेल, पैसे वाचतील, दगदग नको असेल, इ. - आपल्या प्राधान्यक्रमानुसार)

- रेल्वे, विमानं यांचं बुकिंग आपलं आपण नेटवरून करायचं.

अशा प्रकारे आजवर आम्ही देशांतर्गत जवळजवळ ५-६ मोठ्या टूर्स केलेल्या आहेत.

याचे फायदे -

- डोक्याला अजिबात ताप नाही. निघण्यापूर्वी सगळी बुकिंग्ज, तिथले फोन नंबर्स - सगळं आपल्या हातात असतं.

- पैश्यांची प्रचंड म्हणजे प्रचंड बचत

- आपल्या मर्जीनुसार हवं तिथे हवं तेवढं राहता येतं.
(उदा : उत्तरांचल टूरच्या वेळी टुरिझमवाल्यांनी सांगितलं, की कौसानीसाठी एक दिवस तरी ठेवाच. - कसौनी नव्हे, कौसानी - तिथून दिसणारा हिमालयातला अप्रतिम सूर्योदय चुकवू नये असा असतो. तोपर्यंत आम्ही मागवलेल्या माहितीपत्रकांपैकी एकाही पत्रकात कसौनी-स्टे नव्हता. आम्ही कसौनीत एक दिवस राहिलो. पुरेपूर पैसा वस्सूल अनुभव होता तो.)

- आम्हाला आजवर बहुतेक हॉटेल्स ४-स्टार मिळालेली आहेत. (डायनिंग रूम्स असलेली हॉटेल्स मागून घ्यायची. म्हणजे एखादे वेळी परतायला उशीर झाला, तर हॉटेलच्या रूमवर जेवण मागवता येतं.)

- साईटसिइंगचा कार्यक्रम आपल्या मनासारखा होतो. अजिबात घिसाडघाईचा होत नाही.

- स्थानिक ट्रान्सपोर्टसाठी हवं तसं खाजगी वाहन मिळतं. अगदी तवेरा हवी, की महिंद्रा, की सुमो, की अजून काही, हे सुध्दा बुकिंग करण्यापूर्वी आपण सांगू शकतो. मी तर नेहमी वाहनचालक पान, गुटखा खाऊन पचापचा थुंकणारा नको, गाडी चालवताना सिगरेट वगैरे ओढणारा नको - या अटीही घालते आणि त्या दरवेळी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत.

- जेवणात सुंदर स्थानिक हॉटेल्समधले उत्कृष्ट पदार्थ चाखायला मिळतात. जेवणाच्या खर्चातही भरपूर बचत होते.

छान माहिती लले. Happy

अगदी खरं सांगायचं तर पैश्याच्या बचतीपेक्षा आम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रॅव्हलबरोबर ट्रिप करणे जास्त सुखाचे वाटते. न जाणो, ट्रिपमधे काही अडचण आली तर अनोळखी ठिकाणी आपण कसं काय निभावून नेणार असं वाटतं. अर्थात्, हा प्रत्येकाचा कम्फर्ट पॉईन्ट आहे.

देशांतर्गत ट्रीप्स स्वत: प्लान केलेल्या बर्‍या पडतात ..

सिमला ला जाताना टॉय ट्रेन ने गेलो होतो ..नितांत सुंदर अनुभव होता ..
रिव्हर राफ्तिंग , व्हॅली क्रोऑसिंग आणि इतर बरेच ठिकाणे पाहिली ..आणि मुख्य म्हणजे हनिमून कपल ला तर ग्रूप पॅकेज म्हणजे घाइ घाइ ..
सो कस्टम टूर चांगली .
अजून एक टीप जिथे जाणार आहात तिथला १ -२ दिवसाचा बुंकींग करा ..
तिथे थांबून स्थानिक टूर ऑपरेटरशी डिस्कस केलात तर बरेच स्वस्त पडता ..

मी शकयतो हॉटेल ची नावे / फोन रीव्हू वचून सोबत नेतो ..
आणि स्थानिक टूर ऑपरेटर ला त्याच्या पॅकेज मधे त्या हॉतेल चा आग्रह धरतो ..

परदेशी मात्र या कंपन्या परवडतात.. मेडिकल इमर्जन्सी , विसा . तिकीट ..बोर्डिंग पासेस .. ह्या कटकटी वाचतात..
शिवाय त्यांना ग्रुप बूंकींग चे डिस्काउंट मिळतात

Pages