तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्याही टाईम शेअर मध्ये पैसे गुंतवू नका. एकदा पैसे भरले की ते आपले मालक आणि आपण त्यांचे गुलाम!

त्यापेक्षा त्यांची एखादी इस्टेट चांगली वाटत असेल तर आयत्यावेळी तिथे जाऊन बुक करा. आम्ही मुन्नारला महिंद्रा मध्ये राहिलो. आयत्यावेळी जाऊनही आम्हाला एक मस्त स्युईट मिळाला.

मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचेच हॉटेल, रिझॉर्ट बेस्ट असेल असं नाही. उदा. कूर्गला महिंद्रापेक्षाही ऑरेंज काउंटी छान आहे.

नीता ट्रॅव्हल्स .. एक अतिशय भिक्कार टूर कंपनी आहे ..
>> +१००

मुंबई हैद्राबाद हा प्रवास नित्याचा असल्याने आलेले काही अनुभव!

मी हैद्राबाद ते मुंबई हा प्रवास नीता ट्रॅव्हल्सने केला होता. ९ चा पिकअप, बस आली ९.४५ ला. अनेकदा फोन केला तर "बस! ५ मिनीट मे आते है" हेच उत्तर ४५ मिनिटे मिळत होते. Happy

बरे पिकअप झाला, तर कुठेतरी कुरियरच्या ऑफिसजवळ बस थांबवली आणि अर्धा तास बसमध्ये कसले तरी खोके चढवत होते. हेच खोके सकाळी पुणे स्टेशन जवळ अर्धा तास उतरवत होते. १ तास निव्वळ हे खोके चढण्या-उतरवण्यात वाया घालवला. Angry

पुण्याला निम्मी बस रिकामी झाली होती, ती मग आम्हाला पुणे दर्शन घडवत भरवली. म्हटले आता तरी मुंबईला न्या तर नाही लोणावळ्याला त्यांच्या हॉटेलावर चांगली अर्धा-पाऊण तास थांबवली (इतर ठिकाणी टॉयलेट ब्रेकसाठी जेमतेम ५ मिनीटे झाली की यांचे हॉर्न वाजवणे सुरु व्हायचे).

एकदा ओमर ट्रॅव्हल्सने मुंबई ते हैद्राबाद असा प्रवास केला होता तो तर महाभयानक होता. मुंबई ते पुणे तर अगदी गल्लीबोळातून पॅसिंजर शोधत होते. दुपारी २ ला बोरीवलीला बसमध्ये बसलो तो ६.३० ला बस एक्प्रेस वे ला लागली. टॉयलेट ब्रेकसाठी फुड मोललापण नाही थांबली कारण काय तर? उशीर झालाय Angry

शेवटी आरडा-ओरडा केला तेव्हा कुठे रस्त्याच्या कडेला थांबवली.

पुण्याला परत तेच! शिवाय हैद्राबादला ही बस भयंकर उशीरा पोहचली होती.

मुंबई ते हैद्राबाद या रुटवर HKB ट्रॅव्हल्स चांगले आहे. पुण्याला बस रिकामी झाली तरी पॅसिंजर न शोधता सरळ मुंबईला नेतात. नेहमी वेळेवर पिकअप आणि वेळेवर डेस्टिनेशन!
मी तर HKB ट्रॅव्हल्सने प्रवास करणे प्रेफर करतो.

मामी, ऑरेंज काऊंटी महिंद्राच आहे ना? किंवा तिथे त्यांचा शेअर तरी आहे ना? एक मित्र महिंद्राकडूनच ऑरेंज काऊंटीला राहून आला होता. मला वाटलं ते रीझॉर्ट त्यांचंच की काय...

नाही. माझ्या माहितीनुसार क्लब महिंद्रा आणि ऑरेंज काउंटी वेगवेगळे आहेत.

क्लब महिंद्रा : http://www.clubmahindra.com/our-resorts/club-mahindra-madikeri-coorg/

ऑरेंज काउंटी : http://www.orangecounty.in/coorg-resorts/villas/
मी ऑरेंज काउंटीत राहिले आहे.

नीता ट्रॅव्हल्स एका नुकत्याच कैलास्वासी झालेल्या महाराष्ट्राच्या एका प्रभावी नेत्याच्या प्रभावी पुतण्याची आहे बरं का. म्हणूनच त्या बसच्या ड्रायव्हर्/कंडक्टर लोकांना प्र...चं....ड माज आहे. जमत असेल तर या ट्रॅव्हलने प्रवास करणे टाळाच. स्वानुभवाने शहाणा झालोय हो!!!

बसच्या ड्रायव्हर्/कंडक्टर लोकांना प्र...चं....ड माज आहे. जमत असेल तर या ट्रॅव्हलने प्रवास करणे टाळाच. स्वानुभवाने शहाणा झालोय हो!!!>>> +१००

वर हैद्राबाद बस प्रवासाचा अनुभव आहे म्हणून हे टाकत आहे.

मी तर म्हणेन की कोणत्याही खाजगी बसने प्रवास करणे टाळाच! अगदी छोटा असला तरी टाळा!!
हे अतिशय धोक्याचे असते असाच अनुभव आहे.
उद्दामपण, फक्त पैसे पाहण्याची वृत्ती आणि प्रवासी म्हणजे मेंढरे आहेत असा समज अशी अनेक कारणे असतात. चालकाला गाडी चालवण्याचे कोणतेही ट्रेनिंग नसते.

बाहेरून दिसायला छान असणार्‍या बसेस आतून तशा असतातच असे नाही. एसी बसेस ना खिडक्या अगदी छोट्या असतात. एसी बंद पडला तर आत भयंकर परिस्थिती होते. या बसेस बरेचदा खुप मढवलेल्या असतात. आतल्या चालण्याच्या जाग अगदी छोट्या असतात. तुम्ही बसच्या मागील भागात बसला असाल आणि आग लागली तर जळून मरण्याशिवाय अन्य पर्याय फार थोडे असतात!

यांच्या अपघातांचे प्रमाण सर्वात जास्त असते. अपघातात वगैरे तर प्रवासी म्हणून आपले हाल अतिशय वाईट असतात.

हेच राज्य वाहतुक मंडळाची बस असेल तर किमान सुरक्षेची तरी अपेक्षा धरता येते. गाड्यांचा वेग मर्यादेत असतो. चालक वाहकांना किंचितशी जबाबदारीची जाणीव असते.

हेच राज्य वाहतुक मंडळाची बस असेल तर किमान सुरक्षेची तरी अपेक्षा धरता येते. गाड्यांचा वेग मर्यादेत असतो. चालक वाहकांना किंचितशी जबाबदारीची जाणीव असते.

अनुमोदन

जेव्हा सरकारी उपक्रम ठिकाण अ ते ठिकाण ब असे काही रकमेचे तिकिट आकारते, तेव्हा त्यात केवळ प्रवास खर्चच असत नाही तर अपघाती विम्याचा प्रिमियमदेखिल समाविष्ट असतो. खासगी प्रवासी कंपन्यांच्या तिकिटात केवळ प्रवास खर्चच असतो.

(कुठल्याही सरकारी वाहनाला अपघात झाला की सरकार जखमी किंवा मृतांच्या नातेवाईकांना काही रक्कम जाहीर करते ती ह्याच प्रिमियममधून येते)

तेव्हा तिकिट दरांची तुलना करताना हेदेखिल ध्यानात ठेवलेले बरे!

आपल्या राज्याच्या बसेसचा खूप चांगला अनुभव आहे माझा, लहानपणी कोकणात जातांना बऱ्याचदा रात्रीचा प्रवास करायचो, सकाळी घरी सुखरूप जायचो, घाटातून रात्री चालक किती व्यवस्थित बस चालवायचे, खुशाल झोपायचो आम्ही.

नवऱ्याच्या नोकरीनिमित्त पावणेचार वर्षे श्रीरामपूर (नगर जिल्हा) येथे होतो तेव्हा मी नेहेमी एकटी माझ्या छोट्या मुलाला घेऊन डोंबिवलीला येताना श्रीरामपूर-कल्याण बसने यायची, मला कसलाही त्रास झाला नाही, क्वचित प्रसंग सोडल्यास बसेस नेहेमी वेळेवर असायच्या. त्यामुळे आपल्या एस.टी.ला धन्यवाद.

एक बारकासाच अनुभव. प्रवासात सील्ड पाण्या ची बाटली कायम जवळ राहू द्या. परवा मी दिल्ली हून आले तेव्हा विमानात ज्यूस. पाणी नाहीच. मग उतरल्यावर घरी जायची घाई म्हणून लगेच टॅक्सी. मग एका मोठ्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो. कुठे ही पाणी दिसले देखील नाही गाडी थांबवून घेता आले नाही. तीन तासानी घरी येइपरेन्त पार घसा सुकून गेला अति थकवा आला. प्रवासात जाम डिहाड्रेट व्हायला होते. तेव्हा पासून आपन जसे चार्जर पॅक कर तो तसे एक सील्ड बिस्लेरी स्वतः साठी चार्जर म्हणून भरली पाहिजे हे लक्षात आले.

हैदाबाद प्रवासा साठी एपी टूरिझम च्या बसेस चांगल्या आहेत व वेळेतही नेतात.

दोन वर्षापुर्वी गोव्याहुन पुण्याला येताना पाउलो ट्रॅव्हल्सचा खुप वाईट अनुभव आला.... जाताना नीताने प्रवास अगदी आरामशीर झाला पण येताना आमच्या वेळेत नीताची बस नसल्याने पाउलोचे बुकींग केले.
वाईट कंडीशनमधली बस, अतिशय उर्मट स्टाफ, अस्वच्छ ठिकाणी घेतलेले हॉल्ट, बेळगावसारख्या ठिकाणी अर्धा तास सांगून जवळजवळ दोन्-अडीच तास अकारण घेतलेला हॉल्ट आणि विचारायला गेल्यावर दिलेली उडवाउडवीची उत्तरे.... अतिशय वैतागवाणा अनुभव!

उतरताना ड्रायव्हर आणि हेल्परला व्यवस्थित सुनावले शिवाय पाऊलोच्या साईटवर रीतसर तक्रार पण केली पण काही उत्तर आले नाही.... बहुतेक हे त्यांच्यासाठी नेहमीचेच असावे

इतर मित्रांकडून पण पाउलो ट्रॅव्हल्सबद्दल असेच अनेक वाईट अनुभव ऐकायला मिळाले.

अगदीच निरुपाय झाल्याशिवाय पाउलोचे बुकींग करु नका हा अनुभवाचा सल्ला!

जिथे उपलब्ध असेल तिथे एस टी ची शिवनेरी ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे. खालो खाल प्रसन्न पर्पल च्या सेवा उत्तम आहेत. नीता अत्यन्त भिकार.

शिवनेरी बद्द्ल सहमत. खरे म्हणजे ते ही एसटी चे कंत्राटदार आहेत (बहुधा), पण सरकारी सेवा असल्याने प्रायवेट वाल्यांसारखे त्रासदायक प्रकार नाहीत.

व्यवस्थित जागा असेल, गाडी स्वच्छ असेल व खिडकीतील पिचकार्‍या नसतील तर साधा लाल डब्बा सुद्धा काही वाईट नाही.

शिवनेरी करता अनुमोदनच. वेळेवर सर्वीस. स्वच्छ बसेस. गोंधळ न होणारं ईंटरनेट बुकिंगची सोय. दादर ला तर एसी वेटींग रूम्स आहेत. दर अर्ध्या तासाला बस पुण्याकरता. मग या सगळ्या गोष्टी असतील तर मुं-पु करता ४००/- पर ट्रीप द्यायलाही काही वाटत नाही.
आजकाल लांब पल्ल्याचे लाल डब्बे ही स्वच्छ असतात. खूप जास्त हॉल्ट्स पण नसतात. केवळ त्यांच्या सीट्स फारश्या आरामदायक नसल्याने खूप रिस्पॉन्स नसावा असं मलातरी वाटतं.

मी अजुनही राजस्थान च्या सहलीसाठी पॅकेज शोधतेय. मेकमायट्रिपवरचे पॅकेजेस नाही आवडले. त्यात बर्‍याचशा गोश्टी कव्हर पण नाही होत. त्यांना क्वेरी टाकली तर ते उत्तर पण नाही देत. मेकमायट्रिपसारखेच पॅकेजेस बनवुन देणारे आहेत का पुण्यात कोणी? मला शक्यतो ग्रुप टुर्स नको आहेत.
केसरीची एक टुर आहे त्यात ते अगदी सगळच्म दाखवतायेत, रणथंबोर वगैरे. पण तीही ग्रुप टुर आहे आणि किंमतही खुप जास्त, ४०,००० प्रत्येकी.

मला नोव्हेंबर साठी राजस्थान ट्रीप बुक करायची आहे. कुणी मदत करेल का? साइट्स, लिंका इइ. कुणी जाउन आला असाल तर बजेट, टुर कं., सर्विस, साइट सीइंग इइ. बद्दल.

पेरु ...अग केसरीचा असा अनुभव आहे की-----overseas tour inquiries असतिल तर जरा जास्त रु सागतात ... आणी तिच टुर भारतातुन विचारली तर बरेच रु कमी असतात ....... अत्ताच १५ -२० दिवसापुर्वी एक फॅमीली काश्मिर ट्रिप करुन आली त्यान्चा हा ताजा ताजा अनुभव .....:)

पेरू, सस्मित,
तुम्ही राहत असलेल्या शहराच्या किंवा जिथून टूर सुरू करणार त्या शहराच्या नावासहित 'टूर ऑपरेटर' अश्या स्ट्रिंगनं गूगल सर्च करा. (उदा - Pune tour operator / Thane Tour Operator)
त्या-त्या शहरातले भरपूर टूर-ऑपरेटर्स दिसतील.
(जस्टडायल, आस्क-लैला अशा प्रकारच्या साईटसवर त्यांची एकत्रित माहिती मिळते.)

मला माझ्या आई बाबांन सर्प्राईज गिफ्ट म्हणून ही(राज्स्थान) टूर द्यायची आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनी सोबत पाठवणं मला योग्य वाटतय
कारण नवख्या राज्यात ते गडबडुन गेले तर काहीच पहाणं होणार नाही. त्यात ते दोघंच जाणार म्हणजे आपल्या मुली नाही आल्या याच दु:खात बाबा आईला कुठे फिरवणार पण नाहीत आय नो!
त्यामुळे एखाद्या ट्रॅव्हल्ससोबत पाठवलं तर बाकीच्यांच्या नादाने फिरतील तरी असा विचार मी करतेय.

केसरी सोबत पाठवायचं नाही असं मी ठरवलय.
वीणाज वर्ड वाले मुंबईपासुन २७००० पर हेड म्हणतायेत. त्यात सगळंच येतं म्हणे (खाणं , रहाणं, फिरणं वगैरे...पुणे टू मुंबई खर्च आपला... फ्लाईट ने नेणार!
पण खर तर माझं बजेट ६०००० होतं.. आता दोघांचे ५४००० यातच गेले तर मला बाकीचे प्लॅन गुंडाळून ठेवावे लागतील Sad

प्लिज या सगळ्याचा विचार करुन मला योग्य सल्ला द्या Sad
मी खुप गोंधळलेय.
काहीच नाही सापडलं तर वीणाज वर्डच फायनल करावं लागेल...

मदत करा मदत Sad

<<<<वीणाज वर्डच फायनल करावं लागेल.>>>>>> बेस्ट आहे रिया......... काळजी नसते ग्रुप बरोबर गेले की ...नक्की पाठव ...शुभेच्छा

पेरु, सस्मित, रिया.. जर थेट राजनस्थान मधिल टुर ऑपरेटर गाठला तर चांगली पॅकेज टुर मिळेल...

मुंबई/पुणे वरुन थेट उदयपुर गाठायचे... उदयपुर १-२ दिवस साईटसीन करुन राणकपुर गाठायचे... पुढे चित्तोरगढ वरुन पुष्कर आणि पुष्कर वरुन जयपुर १-२ दिवस असा ७-८ दिवसाचा प्लॅन करता येतो.

दोन दिवस थांबा... चौकशी करुन टुर ऑपरेटरचे डिटेल देतो.

आई बाबांन सर्प्राईज गिफ्ट >> रिया., त्या दोघांना सरप्राईज गिफ्ट म्हणून राजस्थानलाच पाठवायचे आहे का? इतर कुठली ठिकाणे चालणार नाहीत का?
ग्रूपबरोबर का पाठवावे याची कारणे अगदी पटणारी आहेत.
अनुभव हॉलिडेचाही विचार करून बघ. त्यांची कोस्टल कर्नाटकाची ट्रिप खूप प्रसिद्ध आहे. आणि डिस्कव्हर कर्नाटक ट्रिप आम्ही स्वतः जाऊन आलोय. चांगली व्यवस्था असते. त्यांचं शिरसीचं ग्रीन वर्ल्ड रीसॉर्ट फार भारी आहे. खाण्यापिण्याची चंगळ असते.

अवांतर : आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये कॉसमॉस बँकेची सचिन ट्रॅव्हल्सने त्यांच्याकडे गहाण ठेवलेल्या प्रॉपर्टीच्या ऑक्शनची जाहिरात आली आहे.

मंजु, राजस्थानच का कारण आईच्या बोलण्यात अनेकदा आलय की तिला राजस्थानलाच जायचय. आणि केरळ अनुभवानंतर आम्ही साऊथ इंडीयाला थोडेसे घाबरुन आहोत Proud तेंव्हा तिथल्या त्या ट्रिप्स सगळे सोबत असतील तेंव्हाच कराव्यात असं मला वाटतय Happy

पुन्हा खरी गोष्ट ही आहे की मी ही ट्रिप बरेच दिवस आधी करायची ठरवली होती त्यामुळे माझ्याकडे पैसे साठले.
पुन्हा माझ्याकडे पैसे साठतील आणि राजस्थान अवाक्यात येईल असं होणं कठिण वाटतय मला..म्हणून आत्ताच राजस्थानच उरकावं असं डोक्यात आहे. कोस्टल कर्नाटकचा विचार करायला हरकत नाही पण मग त्यांचं राजस्थान नको राहिला...

आई खुप दिवसांपासुन म्हणतेय तिला राजस्थान बघायचय म्हणून...

काय करावं कळेना....

इंद्रा,वेटींग फॉर युअर अपडेट्स!

रिया, तुझ्या बजेटपेक्षा किती पैसे जास्त लागतील याचा अंदाज घे. तेव्हढे तू मॅनेज करु शकते का ते बघ.
अशा पॅकेज टूर्सना खरेदी केली नाही तर इतर खर्च फारसा येत नाही.

अनुतै, मॅनेज करु शकेन बहुदा... पण खरच का एकही रुपया वरचा लागत नाही?
जेवण वेळच्या वेळेला मिळत का?

_________________
रच्याकने राजगुरू ट्रॅव्हल्सचा अनुभव आहे का कोणाला?
http://www.rajgurutours.com/tours-in-india.html
इथे पाहिलं तर राजस्थानसाठीचे रेट्स ठिक वाटतायेत. पण मी फोन केला पुण्याच्या नंबरवर तर ती बाई म्हणाली की सध्या पुण्याचं ऑफिस बंद आहे. त्यामुळे मला मुंबईतल्या ऑफिसमध्ये फोन करुन सगळं ठरवावं लागेल.... म्हणजे प्रत्यक्ष गाठभेट नाहीच. मी ही कंपनी आधीही कधी ऐकली नाहीये. इथेच पहिल्यांदा वाचली.
म्हणून इथेच विचारतेय की हिचा कोणाला काही अनुभव आहे का?

रच्याकने हे अवांतर होईल इथे पण कुठे विचारू ते न कळल्याने इथेच विचारते, राजस्थान मारवाड आणि राजस्थान मेवाड मध्ये काय फरक आहे?
कोणतं छान आहे?

Pages