तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.tripadvisor.com/ ही देखिल अशीच एक अत्यंत उपयोगी साईट आहे. मी नेहमी हीच वापरते.

हॉटेल्सकरता http://www.booking.com/ अथवा http://www.hotels.com/ अथवा त्या हॉटेलची वेबसाईट असेल तिथे. यातही त्यांचे रेट्स कंपेअर करून बघावे. शिवाय बुकिंग करण्याआधी (देशात असेल तर / शक्य असेल तर) हॉटेलला फोन करून रेटस निगोशिएट करता येतात. आपल्या गरजा उदा. स्विमिंगपूल जवळची रुम हवी/नको, वरच्या मजल्यावरची हवी/नको, लहान मूल असेल तर त्यांची झोपण्याची सोय, चहा-कॉफी करता रूममध्येच सोय आहे की नाही? असे सगळे प्रश्न विचारून घ्यावेत.

ज्या ठिकाणी जास्त स्थलदर्शन करायचे नसून रिलॅक्स होण्यास वाव आहे तिथे जरा जास्त पैसे देऊन छानशा रिझॉर्टमध्ये बुकिंग करू शकतो. दिवसभर बाहेर भटकंती असेल आणि फक्त झोपण्यापुरतेच हॉटेलवर येणार असू तर आपल्याला कम्फर्टेबल असेल अशा बिझिनेस हॉटेलातही राहू शकतो. छोट्याश्या देशात गेलात तरी एकाच हॉटेलात राहण्याऐवजी दोन्-तीन शहरांतून राहिले तर जास्त लोकल फील मिळतो.

आम्ही भटकंती जास्त असलेल्या ठिकाणी फक्त सकाळच्या ब्रेकफास्टचा पर्याय निवडतो. त्यामुळे बाहेर पडल्यावर पुन्हा हॉटेलात जाण्याची गरज पडत नाही आणि पैसेही वाया जात नाही. लोकल रेस्टॉरंटमध्ये खाता येतं. हॉटेलच्य साईटवर नसेल तरी . त्यांच्याशी बोलून वा इमेल करून हा ऑप्शन हवा असल्याचे सांगता येते. बहुतेकदा ते ही याकरता तयार होतात. अर्थात या करताही रेटस नीट तपासून घ्या.

हे सगळं रामायण 'आपली ट्रीप आपल्या हाती' असा विषय निघाला म्हणून लिहिलं आहे. धाग्याच्या विषयापेक्षा वेगळं वाटत असेल तर काढून टाकेन.

http://www.tripadvisor.com/ ही देखिल अशीच एक अत्यंत उपयोगी साईट आहे >> +१

युरोपातल्या हॉटेल बुकींगसाठी मी www.venere.com ही साइटपण खूपदा वापरली आहे.

चांगली माहिती ललिता!
यशस्विनी मस्त पोस्ट..
मामी उपयोगी टिप्स देताय!

केदार ट्रॅव्हल्स, आशुतोष ट्रॅव्हल्स इत्यादिंनी आपल्या आपण ट्रिपा कश्या आखाव्यात, कश्या पार पाडाव्यात याचे मार्गदर्शन मायबोलीकरांना करावे अशी नम्र विनंती!>>>>>> जोरदार अनुमोदन! Happy

सुजा.. थँक्स परत एकदा.. मला असं वाटलं की या धाग्याच्या सुरुवातीलाच या साईट्सच्या लिंका द्यायच्या का? ते बरं पडेल आणि एका जागी रहातील म्हणून..?

बाकी धन्यवाद मंडळी पुन्हा सर्वांना.. आपल्या धाग्यावर तुम्हां सगळ्यांमुळे चांगली माहिती जमा होतेय. कॉपीपेस्ट करुन मित्रमंडळीत द्यायचा विचार करतेय..ज्यांना आवड असेल त्यांना.. Happy

मध्यंतरी आई, सासूबाई आणि त्यांच्या २ मैत्रीणी अशा ४ जणी केरळ ट्रीपला गेल्या होत्या. कॉक्स & किंग सोबत. चांगला अनुभव होता. टूर गाईड पण खुप चांगला होता. व्यवस्था उत्तम होती.
अवांतर : त्यांच्या ग्रुपमध्ये विविध वयाचे लोकं होते. त्यात एक हनिमुन कपलही होते. ओळख झाल्यावर त्या दोघांनी या चौघींना बॅग उचलणे वगैरे मदत करायला सुरुवात केली. या चौघींनी त्यांना सांगितले की अशी मदत करु नका. (तुमचा अमुल्य वेळ आमच्यासाठी वाया घालवू नका!) ते ऐकायचे नाहीत. यांच्यासोबत खूप गप्पा मारायचे. (सासुबाई मस्त गप्पा मारतात.) शेवटी त्यांना स्पष्ट सांगितले, बाबांनो तुम्ही हनिमुनसाठी आला आहात. आमच्यावर वेळ घालवू नका! ते दोघे म्हणाले, नही आँटीजी ऐसी कोई बात नही! आपसे भी फिर कब मुलाकात होगी! थोडक्यात, हनिमुनसाठी अशा ग्रुपसोबत जाऊ नये. काही गोष्टीवेल्हाळ लोक तुमचा वेळ तुमच्याही नकळत घेऊ शकतात! Biggrin

मी माझी itinerary स्वतः ठरवतो, त्यासाठी ट्रीप अ‍ॅडव्हायझर , http://www.indiamike.com ( भारतातल्या ट्रिप साठी), वेग वेगळी ट्रॅव्हल पोर्टल यांची मदत घेतो. नेहमीचे पटेल स्पॉट्स जमले तर टाळतो, संपुर्ण itinerary मधे येक दिवस तरी buffer ठेवतो ज्यामुळे itinerary थोडी फ्लेक्जिबल राहाते.
त्यानंतर नेट वर हॉटेल्स शोधतो , त्यांचे रिव्हु / लोकेशन यावरुन शॉर्ट लिस्ट करतो. या शॉर्ट लिस्ट मधुन बायको , मुलगा आणि मी मिळुन हॉटेल्स फायनल करतो.
itinerary, हॉटेल्स ( with Continental Plan कारण जेवणात मला लोकल फुड ट्राय करायचे असते) , प्रवास ( विमान + लोकल ट्रॅव्हल) यांवरुन खर्चाचा अंदाज काढतो.

ही itinerary + हॉटेल्स ची लिस्ट माझ्या ओळखितल्या तीन छोट्या पण इस्टॅब्लिश्ड टुर ऑपरेटरना देऊन FIT टुर ची प्रपोझल घेतो , ज्याची कॉस्ट कमित कमी आणि माझ्या अंदाजाच्या आसपास असेल त्याच्या कडून बुक करुन घेतो. यात काही ऑपरेटर itinerary आणि हॉटेल्स मधे काही बदल सुचवतात ते पण कंसिडर करतो.

फॅमीली हॉलिडेज साठी बॅग पॅकिंग शक्य नसल्याने छोट्या ऑपरेटर कडुन घेतलेल्या FIT टुर किफायती आणि सोईस्कर पडतात.

स्वत: टुर ऑर्गनाईज करुन जाण्यात जास्त मजा येते. त्यात फायदे, तोटे आहेत. मनस्तापही आहे. समाधान आहे.

इंटरनेट वर पॅकेज टुर आणि टुर अ‍ॅडवायजर असे चांगले पर्याय आहेत. तसेच ब्लॉग लिहिणारे आहेत. त्या ब्लॉग्स वर हॉटेल्सची डिटेल्स, ट्रॅवल एजंटचे डिटेल्स सविस्तर दिलेले असतात.

साईटसीन साठी शक्यतो मी लोकल बस / रिक्षा / कॅबचा पर्याय स्विकारतो. त्यामुळे त्या ठिकाणाची चांगलीच ओळख होते. हा पण दक्षिणेत मात्र अडचण येते.

अंजली,
ह्या धाग्यावरच्या सर्व साईट्स वर अपडेट करतेस का? त्या साईट्स सुचवणार्‍या आयडीसकट लिस्ट दिलीस तर कुणाला संपर्क करायचा असल्यास बरं पडेल.

थोडक्यात, हनिमुनसाठी अशा ग्रुपसोबत जाऊ नये. काही गोष्टीवेल्हाळ लोक तुमचा वेळ तुमच्याही नकळत घेऊ शकतात!
>>
नवरा बायको एकमेकांबरोबर वेळ मिळणार म्हणुन एक्साय्टेड असतात. पण घाईघाईत ग्रुपसोबत हनीमुनला जातात. शेवटी नवर्याची दुसरीशीच आणि बायकोची तिसर्याशीच मैत्री होते हे विनोदी कथेचे कथाबीज आहे Happy

चिन्नु... हेच मी सुजाला सुचवलेलं पण तिचा रिप्लाय आला नाही. तू म्हणतेस तसे अपडेट करते. थँक्स!

निलीमा.. कथाबीज Happy येऊदेत तुझी कथा! वाचायला आवडेल!

बाकी सारे...धन्यवाद इतक्या छान लिंक्सबद्दल Happy

प्रत्त्येक राज्याची टुरिझम वेबसाईट असते. आम्ही फक्त ५०,००० रु. मध्ये केरळ ट्रिप केली होति. अर्थात राजधानी वगैरे सारख्या रेल्वे वापरून केरळपर्यंत पोहोच्लो. तिथे आम्हाला एक गाडी अन सोबत ड्रायव्हर दिला होता. प्रत्येक ठिकाणी ५ स्टार हॉटेल मध्ये राहणे अन शोफर असल्याने हवं इथे हवं तेव्हा जाऊ शक्तो… थांबू शकतो.

परदेशात जायचा असेल अन डोक्याला ताप नको असेल तर टुरिझम कंपनीच बरी.

सॉरी अंजली बरेच दिवसात या धाग्यावर आलेच नाही . तू म्हणतेस तस या धाग्याच्या सुरवातीलाच या साईट्स च्या लिंका जरूर दे . बिनधास्त Happy रिव्हू माझे किती इंग्लिश वर्डस Happy

पेरू मेक माय ट्रीप च्या ग्रुप टूर्स पण आहेत आणि प्याकेज पण आहेत. त्यांच्या टुर कोस्ट पण खूप रास्त किमतीच्या वाटतात . टूर्स पण खूप आहेत . विविध दिवसांच्या /कोस्ट च्या/ अदलाबदल करून चिक्कार ओप्शन्स आहेत.:) मी आधी लिहिल्या प्रमाणे या वर्षी युरोप ट्रीप ला जाणार होतो. ग्रुप टुर ने .बर्याच कंपन्यांची नेट वरून माहिती काढली. काम्पेरीझान केली . त्यातून शोर्ट लिस्ट करून मेक माय ट्रीप ला निवडल. कारण अतिशय रास्त दर. दाखवणार सगळच. काहीच वगळणार नाहीत. बोलायला सुद्धा व्यवस्थित. त्या मुलीने आमच्या इमेल वर तुम्हाला अस जमल नाही तर अशी टुर नाहीतर तशी टुर इतके ओप्शन्स दिले ना. आम्ही एकदम खुश झालो:)

सुजा, मी पण त्यांच्या कस्टमर केअरशी चॅट करुन पाहिले पण तो कस्टमाइज पॅकेज देतो म्हणाला आणी परत काही कॉन्टॅक्टच नाही त्याचा.

माझ्या आई जाऊन आली केसरी बरोबर नुकतीच बॅंकॉक-पटायाला. एकूण अनुभव ठीक होता.
इथून निघताना विमान सुटायच्या वेळेस लीडर आधीच जाऊन बसला विमानात त्याचा बोर्डिंग पास्स- तिकिट वगैरे घेऊन. आप्ल्या ग्रुप्मधले सगळे आलेत का नाहीत हे न पाहताच. काही ज्ये.ना खालीच राहीले होते.
तिथे गेल्यावर मात्र चांगली काळ्जी घेतली त्याने सर्वांची आणि एकून ट्रीप चांगली व्हावी म्हणून.
निघताना परत रीपीट टेलीकास्ट. एकाच तिकीट सापडत नसताना, ह्याला घाई आधी विमानात जाऊन बसायची.

पेरू खर तर अस होता कामा नये. कारण आपण एकदा का इंटरेस्ट दाखवला कि ते खुपदा फोन करतात. आम्हाला तर बरेचदा फोन आला. शेवटी काही काही वेळा नकोस पण होत . पण त्याचं ते कामच असत Happy

आई वडील ह्या महीन्यात ब॓न्कोक,थायलन्ड ला चाललेत..कम्पनी येणे जाणे आणी रहाणे ,खाणे ह्याचा खर्च देणारेत..त्यान्ना अजुन काही खर्च लागेल काय..म्हणजे तितके पैसे सोबत नेत येतील...

पेरु... 'मेमाट्री'चा मलाही असाच अनुभव आला. ते लोक स्वत:चच पॅकेज आपल्या माथी थोपतात.. आम्ही लडाख टुर कस्टमाईज करायला सांगितली तर त्यांनी साफ नकार दिला.

मग Holiday IQ कडे धाव घेतली.. त्यांनी श्रीनगर मधिल Visiting Ladakhशी संपर्क करवुन दिला. त्यांनी उत्तर टुर ऑपरेट केली.

वृषाली कंपनी येण- जाण /राहाण आणि खाण देणार ना . पण बाकी फिरायला बर्याच ठिकाणी एनट्री फी असतेच की. अल्काझार शो /नोंग्नुच व्हिलेज /सफारी वर्ल्ड / पट्टायाला प्यारासेलिंग / स्पीड बोट राईड/ थाय मसाज चा अनुभव घ्यायचा असेल तर सगळीकडे पैसे मोजावे लागतील Happy

त्यातून शोर्ट लिस्ट करून मेक माय ट्रीप ला निवडल. कारण अतिशय रास्त दर.

>> आम्हाला पण यांचा फार चांगला अनुभव आहे. आम्ही जेंव्हा भारतात येतो तेंव्हा तिकिटाबरोबरच ४/५ दिवसांसाठी मेक माय ट्रीपची एखादी साइड ट्रीप बुक करतोच. त्यांच्या ट्रीप खुप कस्टमायझेबल नसतात हे बरोबर आहे पण त्यांचा मुख्य क्लायंट बेस फॉरेनर्स असल्यामुळे (ज्यांना भारतातील प्रवासाचा अनुभव नसतो म्हणुन) ट्रीप मध्ये गड्बड होणार नाही याची जास्त काळजी घेतली जाते, जे मला लहान्ग्यांना सांभाळुन प्रवास करताना महत्वाचे वाटते.

नीता ट्रॅव्हल्स .. एक अतिशय भिक्कार टूर कंपनी आहे ..

इतका वाइट अनुभव आजवर कोणत्याही कंपनीचा आला नव्हता.

साधा पुणे मुंबई प्रवास ..सकाळी ८ चा पिक अप कोथरूड ला..तिकिटावर तशी नोंद ..
मि ७:४५ ला स्टोप वर .. ८:१५ झाले तरी बस चा पत्ता नाही तेव्हा कॉल केला तर तो ड्रायव्हर / अटेंडंट सांगतोय ...अमची बस तिकडून आली तुम्ही नव्हताच ! असाच अनुभव बाणेर च्या प्रवाशांना आला ..
सर्वांना रिक्षा करून हिंजवडीला यावा लागला ..२०० रू चा खड्डा !!

आणि या बद्दल विचारले असता अरेरावीची भाषा ..अतिशय घाणेरडी भाशा ..

आता आयुष्यात पुन्हा नीता ट्रॅव्हल्स कधीही नाही

महिंद्रा हॉलीडेजच प्रमोशनल पॅकेज मिळाल असेल तर नक्कीच चांगल आहे. त्यांची कुर्गची इस्टेट एकदम भारी आहे. गोवा आणि केरळची इस्टेटही चांगली आहे अस ऐकून आहे. पण त्यांची मेंबरशीप घेऊ नका... कारण आपल्या इच्छेनुसार बुकिंग (स्थळ आणि तारिख) मिळेलच ह्याची खात्री नसते.

प्रमोशन पॅकेज व्यतिरिक्त जायचे झाले तर एका रुमचे दिवसाला १०,०००/- पर्यंत भाडे आकारतात... तशी सेवाही देतात म्हणा.

जेवण चांगल असल तरी खूप महाग आहे. ट्रॅव्हल डेस्कवाले साईटसीनची सोय करुन देतात.

प्रमोशनल पॅकेज म्हणजे काय?
आम्हाला एक हॉलिडे व्हाऊचर मिळालं आहे. त्याबदल्यात आम्हाला सुमारे दोन तास त्यांची बडबड ऐकून घ्यावी लागली. आणि आम्हाला त्यांची मेंबरशीप नको आहे/ का नको आहे हे पटवण्यात शक्ती खर्च करावी लागली. ते हॉलिडे व्हाऊचर ऑफ सीझनमधेच वापरता येऊ शकेल. म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग जवळजवळ नाहीच. दुसरं म्हणजे २ रात्र ३ दिवसांकरता ते व्हाऊचर आहे आणि काही ठराविक ठिकाणीच वापरता येऊ शकेल, त्यातलं सगळ्यात जवळचं ठिकाण म्हणजे गोवा! आणि त्यात हॉटेलमधे 'फक्त राहणं' अंतर्भुत आहे, जेवण+प्रवासखर्च आपला.

जेवण चांगल असल तरी खूप महाग आहे. >> Wink मला मिळालं उत्तर.

Pages