तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनीमामी, खरच खुप छान आहे ती जागा.... माझाही अनुभव लिहलाय मी वरती मामींनी सुचवलेल्या धाग्यावर.... त्या धाग्यावर कोकण मधली दुसरी पोस्ट Happy

खाजगी बस च्या प्रवासाबद्दल मी मागे लिहिले होते.
तसाच अपघात (परत) झाला आहे अशी मटाला बातमी आहे..
बातमीत म्हंटले आहे,'शिवाय व्होल्वो बस असल्याने गाडीच्या काचाही संपूर्ण बंद होत्या. त्यामुळे बसबाहेर पडण्यासाठी प्रवाशांना वेळच मिळाला नाही. ४३ प्रवाशांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला.
या अपघातात केवळ पाचच जण बचावले आहेत. गाडीची काच फोडून तीन प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे ते बचावले. '

चालक वाहक मात्र बचावले आहेत!
खाजगी बस ने शक्य तो प्रवास टाळा!!

पुढच्याच आठवड्यात खाजगी बसने गोव्याला चाललो आहोत>>>> नताशा,घाबरू नका.
निनाद यांनी एक मत/ बातमी दिली आहे. प्रत्येक खाजगी बसला अपघात होतातच असे नाही. तसेही काय व्हायचे असेल ते घरी बसूनही टळणारे नाही.So enjoy!

घाबरू नका. पण सजग राहिले पाहिजे.

किमान सुरक्षेचे प्रयत्न केलेच पाहिजेत.

  • तुम्ही बस ने जाल तेव्हा सुरुवातीलाच चालकाशी बोलून हळू चालवण्याची समज द्यावी.
  • कसलीही घाई न करण्या विषयी बजावावे.
  • रात्री प्रवास टाळावा(च)!
  • बस मध्ये सुरक्षा दरवाजे कुठे आहेत ते विचारून घ्यावे उघडण्याची रीत समजून घ्यावी.
  • आपातकालीन परिस्थितीत काच फोडण्याची हतोडी बस मध्ये आहे याची खात्रे करून घ्यावी.
  • नसल्यास हाताशी एक बरीशी पण टोकदार हतोडी ठेवावी (कारण आपातकालीन परिस्थितीत काच फोडण्याची हतोडी बस मध्ये असेलच असे नाही.)

आपल्यासारखे लोक सदैव असे विचारत राहिल्याने आपोआपच सुरक्षेचे भान असलेच पाहिजे याची जाणीव वाढीस लागते.

(अशी हतोडी खरे तर ऑटोमॅटिक किंवा इलेक्ट्रिकल विंडोज असलेल्या कारमध्येही ठेवावी!)

अशी हतोडी खरे तर ऑटोमॅटिक किंवा इलेक्ट्रिकल विंडोज असलेल्या कारमध्येही ठेवावी >> चांगली सुचना निनाद, थँक्स.

मी नताशा,
राज्य वाहतुक मंडळाची बस असेल तर त्याने जायला काय हरकत आहे?
किमान सुरक्षेची तरी अपेक्षा धरता येते. गाड्यांचा वेग मर्यादेत असतो. चालक वाहकांना जबाबदारीची जाणीव असते. वेळेचे 'काहीसे' बंधन असते.

विवबरोबर ८ दिवसांची राजस्थान ट्रीप करून आले.Fantastic! आमची २८ जणांचा ग्रूप होता.टूर लीडर्स एकदम झकास!सर्व व्यवस्था उत्तम होती. हॉटेल्स मस्त पण गावाबाहेर लांब होती.पण तेच न्यायचे-आणायचे त्यामुळे फरक पडत नव्हता.आमच्यातील दोघांनी flight booking स्वतः केल्यामुळे त्यांचा खर्च बराच वाचला.

<<प्रत्येक खाजगी बसला अपघात होतातच असे नाही>> अपघात न होता झालेल्या प्रवासांची टक्केवारी ९९.९९९९९९९९९९९९९९९ टक्के आहे. Biggrin

<<<रात्री प्रवास टाळावा(च)!>>>

हे म्हणजे घरात चोर येईल म्हणून घर बांधूच नये असे म्हटल्यासारखे झाले. रात्रीच्या प्रवासाचे अनेक फायदे आहेत हे कुणी नाकारू शकत नाही.

खासगी बसेसला होणार्‍या अपघातांबद्दल निनाद यांचेशी सहमत.
हा नुसता पॅरानॉइया नाही.

नुसता अपघातच नव्हे, तर ब्रेकडाऊन इत्यादी झाल्यास प्रचण्ड हाल होतात. पर्यायी वाहनव्यवस्थातर सोडाच, साधी कर्टसीही दाखवली जात नाही.

खासगी बसेसला झालेले अपघात दाबून ठेवले जातात. बस कंपनीचे नांव कधीच पेपरात येत नाही. प्रवाशांजवळची तिकिटे आधी गोळा करून घेतात. त्यानंतरही अनेक दिवस वाचलेल्यांच्या घरी या ट्रॅवलवाल्यांचे एजंट्स येऊन केस करू नका अशी 'समजावणी' करत रहातात.

जुन्यापान्या, मेन्टेनन्स नसलेल्या, फक्त इन्टेरियर बरे केलेल्या गाड्या, थकलेले, योग्य प्रशिक्षण नसलेले, नशापाणी केलेले व बेदरकार ड्रायव्हर, व मोठे राजकारणी वा पोलीस ऑफिसर्स यांची मालकी, अशी खासगी ट्रॅव्हल्सची सोय महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे, व लवकरच एम्पीत कशी सरकारी वाहतूक मोडीतच काढली गेली आहे, तसे करायचा यांचा बेत आहे. मग काय! मज्जाच.

(जळगांव पुणे तिकीट एस्टीचे सुमारे ३६० रुपये असताना, 'सीजन' म्हणून ट्र्यावल्स वाले बाराशे ते पंधराशे रुपये चार्ज करत होते मध्यंतरी.)

गो व्याला नेणार्‍या पावलो ट्रावल्स च्या बस मध्ये बेकायदेशीर रित्या नेले जाणारे पपीज सापडले होते.

शिवाय व्होल्वो बस असल्याने गाडीच्या काचाही संपूर्ण बंद होत्या. त्यामुळे बसबाहेर पडण्यासाठी प्रवाशांना वेळच मिळाला नाही.
>>> या बसेसना इमर्जन्सी एक्झिट्स असतात पण कुणी बघतही नाही आणि ते सांगतही नाहीत. आपण आपलेचन्बघुन ठेवलेले बरे....

हा नुसता पॅरानॉइया नाही. धन्यवाद इब्लिस!

मी स्वतः यातून गेलो आहे. म्हणून जीव तोडून सांगतोय... Sad

प्रसन्नची पर्पल सर्व्हिस चांगली आहे. पुणे-नागपूर मार्गावर अनेकदा या बशीने प्रवास केला आहे. वेळेवर नेतात, गाड्या स्वच्छ असतात.

देवकी, त्यांनी सांगितलेल्या पॅकेज व्यतिरिक्त आणखी काही जास्तीचा खर्च करावा लागला का?
जेवण वगैरे कसं होतं?
काही अडचणी आल्या असतील तर सांग म्हणजे आई-बाबांना पाठवताना मी त्यावर सोल्युशन देऊन पाठवेन

<<<(जळगांव पुणे तिकीट एस्टीचे सुमारे ३६० रुपये असताना, 'सीजन' म्हणून ट्र्यावल्स वाले बाराशे ते पंधराशे रुपये चार्ज करत होते मध्यंतरी.)>>>

फ्रीडम ऑफ चॉईस ऐकलंय ना? पैसे तितकेच मागितले जातात जितके लोक द्यायला तयार होतात.

खाजगी ट्रॅव्हेल्सचा बस प्रवासाचा मुद्दा मान्य, पण राज्य परिवहनाच्या बससेवा खुपच मर्यादित असतात. लगेच बुक होऊन जातात, मग अश्या खाजगी ट्रॅव्हेल्सकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो.

सणावाराला, सुट्ट्यांच्या वेळी जेव्हा रेल्वे, सरकारी बस पूर्ण बुक होतात तेव्हा अव्वाच्या सव्वा दराने खाजगी बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. Sad

आजची लोकसत्ता बातमी :केसरीच्या केरळ सहलीच्या प्रवासी गटाला तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरल्यावर त्यांची बस असतानाही टैक्सीवाल्यांनी राडा करून त्यांच्या टैक्सींतूनच जायला भाग पाडले .

शनिवारी रात्री महामंडळाच्या एशियाडने पुणे-नाशिक प्रवास केला... आत्ता पर्यंतचा सगळ्यात कमी वेळात पूर्ण केलेला प्रवास होता.. त्या ड्रायव्हरला नक्की कसली घाई होती ते कळालेच नाही.. १२:१५ ला निघून पहाटे ४ वाजता गाडी नाशिक मध्ये पोहोचली होती.. थोडेसे उशिरा निघून रात्री गाडीत थोडीतरी झोप मिळेल अशी अपेक्षा फोल ठरली.. कारण रस्त्यावर थोडेफार का होईना ट्रॅफिक होतेच... पण ड्रायव्हरला इतकी घाई होती की फक्त कचा कचा ब्रेकच मार गाडी चालवत होता.. आणि घाटात सुद्धा गाडीचा स्पीड कमी करत नव्हता.. स्वतःच्या गाडीने गेल्यावर सुद्धा एवढ्या कमी वेळात पोहोचणे होत नाही..

कोल्हापुर ट्रिप मारली.
चारचाकी घेवुन गेलो होतो.
एसटीने जाताना न जाणवणार्‍या बर्‍याच गोष्टी स्वतः ड्राइव्ह करताना लक्षात आल्या.
त्यातील एक
एका पैशाला एक खड्डा इतक्या स्वस्तात खड्डे विकतेय आयआरबी / रस्ते महामन्डळ / सरकार..

गोव्याला जाताना कोंडुस्करने गेलो. प्रवास सुखाचा झाला.

काल येताना रेलवेने यायचा प्लॅन होता पण तत्काल मधे तिकीटे मिळाली नाहीत. बसप्रवासाचा (खासकरून बसून प्रवास केला तर) त्रास होतो म्हणून ac or non ac काहीही चालेल पण स्लीपर बस ही मुख्य अट होती. ऐनवेळी फक्त पावलोची तिकीटे मिळाली.

बसमधे बसताना सांगीतले की ती बस आमच्यासाठी नव्हतीच. ही बस खरतर म्हणे लखनौला जाणारी होती पण आमच्यावर उपकार म्हणून आम्हाला निम्मे अंतर घेऊन जाणार होती आणि अर्ध्या रात्री आम्ही ह्या बशीतून दुसर्या बशीत बसायचे होते. आणि उपकार असे की ही बस ac होई आणि आमची तिकीटे non ac बसची होती.

अर्ध्या रात्री एका अडनिड्या जागी बस साधारपणे २५-३० मिनिटे थांबवली. थांबण्याचे कारण आमची बस आम्हाला न्यायला येत होती आणि ती येईपर्यंत आम्ही तिथे तीची वाट पहात थांबलो होतो. आम्ही थांबलो कारण आमच्या बशीतले डिझेल वाचवायचे होते. लोकांनी आरडाओरडा कर्ल्यावर बस सुरु झाली आणि थोड्या वेळाने आमच्या खर्या बसमधे बसलो. आणि सकाळी ७ वाजता सुखरूप पुण्यात पोचलो.

हिम्सकूल + १. मी मघाशी पोस्ट लिहिली होती पण इंटरनेट गेले.

पुणे-मुंबई रुटवर गेल्या चार-पाच वेळी 'शिवनेरी' च्या बसेस तुफान स्पीडने आणि अतिशय अयोग्य पद्धतीने चालवताना पाहिल्या. विशेषतः एक्स्प्रेस वे वर. पर्पल आणि नीता कंपनीच्या बसेस मात्र समज दिली गेली असल्याप्रमाणे ठीकठाक स्पीडने ( ९०-९५ च्या आसपास ) जाताना पाहिल्या तसेच पनवेल क्रॉस केल्यावर पूर्वी पुढच्या गाड्यांना भितीदायक खेटून चालवण्याचे जे प्रकार व्हॉल्वोत दिसतात तेही दिसले नाहीत. हा योगायोग होता की काय ते मात्र माहीत नाही !

पर्पल म्हणजेच आधीची मेट्रो लिंक.

Pages