तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहितीप्रमाणे मेवाड म्हणजे उदयपूर माऊंटअबू इकडला भाग( गुजरात बॉर्डरला लागून असलेला )आहे आणि मारवाड म्हणजे बिकानेर जैसलमेर इकडचा भाग आहे रिया. पण राजस्थान मला स्वतःला खूप आवडलेलं Happy
आईबाबांना पाठवतेयस तर ग्रुपतर्फे पाठवलेलं बर असं माझं मत. कधी प्लॅन करतेय?

रिया २७००० फ्लाइटने राजस्थानचे म्हणतायेत? लिंक देतेस का टुरची? किती दिवसांची आहे? मी केसरी वाल्यांची बघितली. ते ४०००० म्हणतायेत वेबसाइटवर. लिंक देते थांब

रिया, विहार ट्रॅव्हल्सना विचार. आमचे ज्ये.ना. गेल्याच वर्षी त्यांच्यासोबत राजस्थान-मारवाड करून आले. करकरीत वाळवंटात तंबूत राहून आले. ज्ये.नां.ची अजिबात आबाळ होणार नाही अशी सोय होती तंबूंमधेही. बाकी ट्रीपही मस्त झाली त्यांची.
खर्च किती झाला याचा मात्र मला अंदाज नाही. (पण केसरी-वीणा वगैरेंपेक्षा नक्कीच कमी होता.)

रिया मारवाड म्हणजे -बीकानेर /जैसलमेर/जोधपुर आणि मेवाड म्हणजे जयपूर/उदयपुर/अजमेर/पुष्कर/राणकपूर /माउंट अबू . दोन्ही एकत्रित केलीत तर पंधरा दिवस लागतातच लागतात. कदाचित खूप दमवणार सुद्धा होऊ शकत . वेग वेगळ ही करू शकता पण मग जास्त पैसे पडतात. सिद्धार्थ ट्राव्हल / अनंत ट्राव्हल/ विहार ट्राव्हल यांचा ही विचार करू शकतेस. फक्त त्यांच्या टुर्स मुंबईवरून असतात अस वाटत. सकाळ पेपर मध्ये खूप टुर्स च्या जाहिराती येत असतीलच ना Happy

अग लिंक कुठुन देऊ? Uhoh
मी प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करुन आलेय

ललिता, धन्स! विहार ट्रॅव्हल्स कुठे आहे पुण्यात?

पेरू आता ट्रिप ची किंमत वाढलीये
अत्ताच वीणावाल्यांना कॉल केलेला... बूकिंग फुल होतय म्हणून त्यांनी ६००० डिस्काऊंट होता तो आता ३००० केलाय
त्यामुळे आधी जी ट्रिप मला २७००० ला पडत होती ती आता ३०९०० ला पडणारेय.
यामध्ये -
७ दिवस राजस्थान मेवाड
मुंबई टू मुंबई फ्लाईट
३ स्टार अकोमोडेशन
ऑल मील
इंटरनल ट्रॅव्हलिंग
साईट सीईंग
एंट्रान्स फीज
टूर मॅनेजर , टूर गाईड

या फॅसेलिटीज आहेत.विहार वाल्यांना फोन केलेला पण त्यांनी सांगितल की वरचं सगळं (प्रवास सोडून) २६०००ला .... आणि फ्लाईट टिकिट्स ते बूक करणार त्याचे जे पैसे होतील ते आणखी एडिशन
मी पुढच्या आठवड्यात वीणाज वर्ड मध्ये बूकिंग करुन येते य Sad

आधीच करायला हवं होतं Sad

रिया २७००० होते तेव्हा बुक करायला हवे होते, त्यांनी ती कंपनी नवीन म्हणून दिलेली ऑफर होती असे जाहिरातीत वाचले होते.

इंद्रा ह्यापेक्षा वीणाज बरंय असं मला वाटतंय. वर रीयाने दिलंय त्यात काय काय इन्क्लुड आहे ते.
ह्या दोन लिंकात एअर टिकीट नाहीये तसेच जेवण ही नाहीये.

मी पुढच्या आठवड्यात वीणाज वर्ड मध्ये बूकिंग करुन येते. रीये ३०,९०० पर पर्सन.
केलीस का बुक? कारण मला वीणाज वर्डची मेल आली त्यात म्हटलयं की *Rates are not applicable from December 15, 2013 till January 15, 2014 मला डिस्काउंट (२०००) देऊन २९३८०
सांगितले. सिनियरना २४०० + फॉऊंडर ४००वजा करून २८९६८/- सांगितले.१/११/२०१३ ची फ्लाइट आहे.

येळेकर, मी अजुन बूकिंग नाही केलय.

ते २९३८० + सर्व्हिस टॅक्स असं असेल ना?
मी सगळं धरुन सांगितलं.
आणि मी २० डिसेंबर साठी बूकिंग करतेय.
आणि आमचे जेष्ठ नागरिक नाहीये अजुन तरी Proud

अंजू हो ना Sad

इंद्रा, वरती लिहिलय बघ मी
ते सगळं आहे पॅकेज मध्ये...

आता मी वीणाजला च फायनल करते.... म्हणजे ते नीट जातील, नीट येतील
मला टेन्शन नको Happy

वीणाचा अनुभव जरुर लिहा.

उदयपुर मधिल पॅकेज टुर ऑपरेटचा संपर्क खाली देत आहे. बुकिंग करण्याआधी टुर ऑपरेटर कडे चौकशी करा.

Fortune Tours & Travels
email ID : fortunetourstravels@gmail.com

Tel : +91-294-2442246
Mob: +91 98291 20375

ते २९३८० + सर्व्हिस टॅक्स असं असेल ना? नाही रिया! सर्व्हिस टॅक्स include आहेत. पण तू २० डिसेंबर साठी बुकिंग करतेय त्यामुळे असेलही.कारण मी ही ४ दिवस लेट केला तर १२०० चा फटका(P.P.) पडला.

देवकी, मी ऑगस्ट मध्ये विचारलेलं तर मला सहा हजार डिस्काऊंट देत होते ते Happy
आता तीन हजारच देतायेत Sad
आत्ता करुन आलेय बूकिंग Happy

आणि माझी टूर कॉस्ट २९३८०+ सर्व्हिस टॅक्स अशी आहे Happy

म्हणजे मी अजुनच टेन्शन फ्री होईन >>>> टेन्शन नको घेऊस.याबाबतीत विवबद्दल बर्‍याच जणांचे चांगले अनुभव आहेत.
तुमच्या पोस्ट्स वाचतानाच माझी ट्रिप त्यामुळे ठरली.वर दिलेल्या अनेक लिन्कस चांगल्या आहेत.पण माझे अगदी आयत्यावेळी ठरले.त्यामुळे विव पसंत केले. तेव्हा तुम्हाला धन्यवाद!

अमा, इथे वाच. मस्त आहे. जा आणि एंजॉय कर. Happy माझी पोस्ट त्या धाग्यावर ७व्या पानावर सगळ्यात शेवटी आहे.

पिकनिकबद्दलची माहिती त्याच धाग्यावर विचार ना. इथे प्रवासी कंपन्यांचा अनुभव शेअर करायचा आहे.

Pages