दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad Sad मन्ना डे गेले. माझे आवडते गायक होते ते. एकेक गुणी माणसे जग सोडून चालली आहे त. श्रद्धांजली!

मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली Sad

बातमी वाचताच का कोणास ठाऊक पण त्यांनी पं.भीमसेन जोशींबरोबर गायलेलं "केतकी गुलाब जुही.." पटकन आठवलं Sad

मन्ना डे...श्रद्धांजली. आज सकाळीच कोल्हापूर आकाशवाणी केन्द्राने मन्ना डे यांच्यावर खास कार्यक्रम प्रसृत केला...अमीन सायानी यानी मागे केव्हातरी मन्ना डे यांची मुलाखात घेतली होती ती गाण्यांसह ऐकताना सारा इतिहास समोर येत गेला. "केतकी गुलाब जुहा चंपक..." ह्याच गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

मन्ना डे! Sad

त्यांनीच गायलेल्या 'लागा चुनरीमे दाग' मधला संदेश त्यांनी तंतोतंत पाळला. चंदेरी दुनीयेत राहून आपल्या चारीत्र्यावर कसलाच डाग पडू न देणारा, आचारात कसलीच आगळीक न घडू देणारा त्यांच्यासारखे कलाकार विरळाच! आपण बरे आणि आपले संगित बरे या वृत्तीने ते राहिले. माझ्या सारख्या अनेकांच्या मनात त्यांची आठवण कायम श्रद्धेनीच येइल.

त्याना श्रद्धांजली.

Pages