दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुश्मिता बॅनर्जी यांची मूलतत्ववादी तालिबान्यांनी केलेली निर्घृण हत्या हा माणुसकीवरील डाग आहे आणि त्यातही दुर्दैवी प्रकार म्हणजे काबुल येथील स्त्रियांच्या भलेपणासाठी त्या विविध माध्यमातून काम करीत असताना तो प्रकार न स्वीकारणार्‍या पुरुषी वर्चस्वाने त्याना संपविले.

त्यांच्या जीवनावरील एका चित्रपटात मनिषा कोईरालाने 'सुश्मिता बॅनर्जी' हे पात्र रंगविले होते.

श्रद्धांजली.

त्यांच्या जीवनावरील एका चित्रपटात मनिषा कोईरालाने 'सुश्मिता बॅनर्जी' हे पात्र रंगविले होते.

।।। >> अ‍ॅन एस्केप फ्रॉम तालिबान.

सुश्मिता बॅनर्जी यांना श्रद्धांजली. Sad

अ‍ॅन एस्केप फ्रॉम तालिबान.>>>> ते त्यांच्या स्वत: बरोबर घडलं होत?????

सुश्मिता यांना श्रद्धांजली.

दाद यांच्या पोस्टमुळे माझा गोंधळ झाला आहे. कोणी स्पष्ट करेल का प्लीज? ( सेन्/बॅनर्जी )

अरे देवा... सुश्मिता सेन ह्यांना श्रद्धांजली.
<<< दाद, सुश्मिता सेन ठिक ठाक आहे.

सुश्मिता बॅनर्जी या मूळच्या भारतीय पण अफगाणी पुरूषाबरोबर लग्न करून अफगाणिस्तानात गेलेल्या आणि तिथल्या स्त्रिया व मुलांच्या प्रश्नांवर काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्तीचा गोळ्या घालून तालिबानने खून केलेला आहे. या स्त्रीच्या जीवनावर आधारित "अ‍ॅन एस्केप फ्रॉम तालिबान" हा सिनेमा २००३ साली काढण्यात आला होता, त्यात प्रमुख भूमिका मनिषा कोईराला हिने केली होती.

सुश्मिता बॅनर्जी यांच्या अमानुष हत्येचा तीव्र निषेध. तालिबानी कुणाला भितात ते दिसून येतं. Angry

श्रद्धांजली! Sad

-गा.पै.

माझे अत्यंत आवडते लेखक. उगाच शब्दबंबाळ न लिहिता मनाला भिडणारं लिखाण केलं त्यांनी.
भावपूर्ण श्रद्धांजली Sad

विनम्र श्रद्धांजली.

आमच्या डोंबिवलीत रहायचे ते. डोंबिवली पश्चिमेला स्टेशनजवळच त्यांचा सुंदर बंगला होता. येता जाता कधीतरी दिसायचे ते. त्यावेळी आम्ही लहान होतो पण आईवडिल सांगत असत इथे शं ना नवरे राहतात. त्यामुळे त्या बंगल्याभोवती एक वलय होतं.

नंतर शाळेत असताना एका बालवाचनालयाच्या हस्तलिखिताची संपादक म्हणून काम करताना त्यांची मुलाखत जाऊन घेतली होती. खूप छान गप्पा मारल्या होत्या त्यांनी. त्यांनी एक प्रश्न विचारला होता तो अजून आठवतो "चार्ली चाप्लीनचा सिनेमा तुला रंगित बघायला आवडेल का?" म्हणून आणि पुढे का नाही आवडणार यावर त्यांनी काहीतरी छान सांगितलं होतं.

शं.ना.नवरे.....
"गुंतता हृदय हे..." आणि "सुरुंग" ही दोन नाटके विशेष लक्षात राहिली आहेत. तसेच रोजनिशी स्वरुपात लिहिलेली "दिवसेदिवस" ही कादंबरीदेखील शं.ना. यांच्या विशेष प्रतिभेची साक्ष देतात.

श्रद्धांजली.

अर्रे.. शंना?
च्च...
श्रद्धांजली.

मामी....

"...."चार्ली चाप्लीनचा सिनेमा तुला रंगित बघायला आवडेल का?" .... ही खूप छान आठवण आहे. प्रश्नाचे स्वरूपच सांगते की शंना कलेच्या दृष्टीने कृष्णधवल चित्रपटांकडे किती आत्मियतेने पाहात असत. "दिवसेदिवस" तुम्ही आणि इथल्या सदस्यांनी वाचली असेल असे गृहित धरतो, नसेल तर जरूर मिळवा.....त्या कादंबरीवर त्याच नावाने नाटक आले होते ज्याचा रविंद्रला फक्त एकच प्रयोग झाला होता.....आशा काळे यानी प्रमुख भूमिका केली होती.

श्रद्धांजली !

तू तिथे मी (सुहास जोशी आणि मोहन जोशी यांचा मराठी सिनेमा) ची मूळ कथा पण त्यांचीच आहे ना?

Pages