दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शं ना , राजीव पाटिल यांना श्रद्धांजली. Sad

७२ मैल एक प्रवास ह्या चित्रपटाच्या प्रमोशन साठीची अनौपचारीक मुलाखत टिव्ही वर पाहिली होती.
एक हुशार दिग्दर्शक गमवाला. Sad

जोगवा चित्रपट पाहिला होता. ४० म्हणजे ऐन उमेदीतच राजीव पाटील गेले. वाईट झालं. श्रद्धांजली.

बापरे... जोगवा, सावरखेड...
बहात्तर मैल.. नुक्ता बघितला.

अरेरे... उमदा कलाकार गमावला.
श्रद्धांजली.

मोहन धारीया यांचे निधन.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक, समाजसेवक आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच अलीकडच्या काळातील अत्यंत महत्वाची ओळख म्हणजे 'वनराई'चे संस्थापक मोहन धारिया यांचे सोमवार सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. Sad ते ८८ वर्षांचे होते.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली..

"उध्वस्त धर्मशाळा" मुळे सार्‍यांच्या मनी स्थान मिळविलेले गो.पु.देशपांडे सर्वार्थाने नाट्यक्षेत्र आणि त्या संदर्भातील लेखनाचे गुरूच होते. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

Pages