दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

व्यक्ती जाते त्यावेळी ती एकटीच जात नाही.तिच्याबरोबर आपल्या आयुष्याचे काही भाग घेऊन जाते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. Sad
त्यांनी 'पांगिरा', 'जोगवा', 'सावरखेडे एक गाव', 'बहात्तर मैल-एक प्रवास, 'सनई चौघडे', 'वंशवेल' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ...

Sad

आत्ताच दोनतीन चॅनेल्सवर त्यांच्या मुलाखतीच्या काही जुन्या फिती दाखवित आहेत.... किती उत्साहाने बोलताना दिसत होते आपल्या काही भावी योजनांबाबत....

विश्वास बसणार नाही अशीच ही राजीव पाटील यांच्या निधनाची वार्ता. एक होतकरू दिग्दर्शक निघून गेला...श्रद्धांजली.

बापरे! राजीव पाटील Sad धक्कादायक! वाईट बातमी.

गोएंका गुरुजींना श्रद्धांजली.

अतिशय धक्कादायक बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली Sad

राजीव पाटील हे एका नाशिककराचे नाव जोगवाने सर्वतोमुखी(देशभर) केले.

न्यूज कुठेच सापडत नाहीये पण जालावर

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज (सोमवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'जोगवा', 'सावरखेड एक गाव', '72 मैल एक प्रवास', 'पांगिरा', 'सनई चौघडे', 'ब्लांइड गेम', 'ऑक्सिजन' असे अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केले. त्यांचे सर्व चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

राजीव पाटील यांनी नुकताच दिग्दर्शित केलेला 'वंशवेल' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तो सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. 'वंशवेल'च्या माध्यमातून एकाच चित्रपटात सुमारे अठरा कलाकार एकत्र आणण्याचा अनोखा प्रयोग राजीव पाटील यांनी केला आहे.

Pages