दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साळगावकरांना आणि दाभोळकरांना एकाच वाक्यात ते समान असल्याप्रमाणे श्रद्धांजली दिली जाते हा पण आपल्या समाजाचाच एक मुखडा आहे. अनेक गोष्टींबद्दल चूप बसायचे, पटत असूनही लोकांना साथ द्यायची नाही, विचार करायचा नाही, कोणी विचार करायला उद्युक्त केले तरी विचार करायचा नाही.

नरेन्द्र दाभोळकरांच्या आत्म्याला शांती लाभो असे म्हणण्यात अर्थ नाही. अशी आशा आहे की तुम्ही आम्ही शांत बसणार नाही. आधी शांत बसलेले आता तरी पुढे यावेत ...

साळगावकरांना आणि दाभोळकरांना एकाच वाक्यात ते समान असल्याप्रमाणे श्रद्धांजली दिली जाते हा पण आपल्या समाजाचाच एक मुखडा आहे. >>> +१

अनेक गोष्टींबद्दल चूप बसायचे, पटत असूनही लोकांना साथ द्यायची नाही, विचार करायचा नाही, कोणी विचार करायला उद्युक्त केले तरी विचार करायचा नाही.

नरेन्द्र दाभोळकरांच्या आत्म्याला शांती लाभो असे म्हणण्यात अर्थ नाही. अशी आशा आहे की तुम्ही आम्ही शांत बसणार नाही. आधी शांत बसलेले आता तरी पुढे यावेत ..>>> अनुमोदन, अस्चिग.

ही सामाजिक निष्क्रीयता, कुठल्याही मुद्यावर 'आम्ही काय, सामान्य माणसं' म्हणून कुठ्लाही ठाम स्टॅण्ड न घेणं हेच आपल्याला भोवतं आहे, भोवणार आहे. हे लोकांना कधी कळणार?

ही सामाजिक निष्क्रीयता, कुठल्याही मुद्यावर 'आम्ही काय, सामान्य माणसं' म्हणून कुठ्लाही ठाम स्टॅण्ड न घेणं हेच आपल्याला भोवतं आहे, भोवणार आहे. हे लोकांना कधी कळणार?
>> वरदा, आस्चिग +१.

योगेश जोशींच्या आईंना श्रद्धांजली !
ज्यो.भा .गुरुवर्य जयंत साळगावकर व सामाजिक कार्यकर्ते अ.नि.सं. चे मुख्य डॉ . नरेन्द्र दाभोळकर यांचे आज निधन.
त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी प्रार्थना !

जयंत साळगावकरांना श्रद्धांजली.

दाभोलकरांची हत्या निषेधार्ह. या हत्येचं कारण यथावकाश कळेलच. ते वेळच्या वेळी नाहीसं व्हायला हवं होतं.

-गा.पै.

आई गं... नरेंद्र दाभोळकर!!!!!!! Sad भयंकर आहे हे!!!! फार फार फार वाईट झालंय.. प्रचंड त्रास होतोय... Sad

<<<धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच. >>> अगदी खरंय..

नरेंद्र दाभोळकर आणि जयंत साळगावकर यांना श्रद्धांजली.

या असल्या सच्च्या कार्यकर्त्याला मारून या मारेकर्‍यांना काय मिळालं? त्यापेक्षा भक्तिची पेव फोडून लोकांची दिशाभूल करणार्‍याना का नाही गोळ्या घालत हे लोक?

चिनूक्स,

>> धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दाभोलकरांची अशी हत्या व्हायला नको होती याबद्दल सहमत. ती अमुक एका विचारसरणीच्या पाईकांनीच केली असं ताबडतोब गृहीत धरू नये. अधिक माहीती बाहेर येईपर्यंत वाट पहावी एव्हढंच सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

भयंकर बातमी. माहिती अधिकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे असो वा बुवाबाजीला विरोध करणारे असो, आपल्या हितसंबंधांच्या आड येणार्‍यांना निर्दयपणे मार्गातून बाजूला करण्याचे प्रकार होतांना दिसतात आणि ज्या समाजासाठी या कार्यकर्त्यांनी हे शत्रुत्व ओढवून घेतलेले असते तो समाज मात्र दोन दिवस अश्रू ढाळून त्यांना विसरून जातो.

शोकसंदेश वगैरे आहेच, पण अंधश्रद्धा निर्मुलनाला बळ देणारी कुठलीही एक कृती ताबडतोब आज करणे हीच दाभोळकरांना श्रद्धांजली ठरेल.

अरेरे, आज सकाळपासून ना न्यूज लावल्या गेल्या ना इथे येता आले. आत्ता कळतेय बातमी !

धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. >>>> + १००.

ह्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध !

डॉ. दाभोळकरांना आदरांजली...

ज्योतिषाचार्य, जयंत साळगावकर यांना श्रद्धांजली! Sad
डॉ. नरेंद्र दाभोलकर याच्यांवरी भ्याड हल्ल्याचा तिव्र निषेध! श्रद्धांजली! Sad

धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे

धर्मामुळे माणसाचा पशू झाला असे का म्हणता? स्वतःच्या श्रद्धांच्या आड येणा-याला गोळ्या घाला असे कुठल्या हिंदु धर्मात लिहिलेय?

ज्यांनी हे केलेय ते कोणत्याही धर्मरक्षणासाठी केले नाहीय, तर त्यांच्या धंद्यांच्या रक्षणासाठी हे केलेय.

घडलेली घटना दुर्दैवी आहेच. पण लोकसत्तेत आणि कालच्या बातम्यांमधे (चेहरा दडवून ) दाभोळकरांना मारलेल्याचा फोटो टाकलेला अतिशय खटकला.औचित्यभंग इ. गोष्टी यांच्या गावीही नसतात का?

ही चीनमधली घटना केवळ दु:खदच नव्हे तर भयानकही आहे (इंग्रजी दुवा). दुवा आपापल्या जबाबदारीवर उघडणे.
http://www.bbc.co.uk/news/world-asia-china-23846633

काय बोध घ्यायचा यातून?

Sad

-गा.पै.

सर्वांचे अनेक आभार! मायबोलीकरांचे प्रेम व आधार असाच सर्वांसाठी कायम रहावा हीच सदिच्छा.

डॉ. सुधाताई काळदात्यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन.
बापुंच्य निधनानंतर सुधाताई बर्‍याच थकल्या होत्या (स्पेशली मानसिकदॄष्ट्या). आता औरंगाबादला एकटं रहायला त्रास होतोय म्हणायच्या. महिनाभरापूर्वी पुण्याला आल्या होत्या. कालपासून ऑर्गन फेल्युअरमूळे दवाखान्यात होत्या.
Sad

(बापु, शैला लोहिया, सुधाताई..........दसर्‍याला ज्यांना भेटल्याशिवाय दसरा पूर्ण झाल्यासारखं वाटायचं नाही अशा व्यक्तींची संख्या कमी होतेय. Sad )

सानेगुरुजी रुग्णालयाला त्यांनी देहदान केल्याचं कळालं.

Pages