दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रसिद्ध आर्किटेक्ट व नगर रचनाकार श्री. अरविंद आडारकर ह्यांचे काल मुंबई येथे निधन झाले. प्रभादेवी येथील अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर येथे शिकत असताना त्यांच्या हाताखाली मी काही धडे गिरवले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

दाभोळकर गेले.
काल रात्री मी त्यांच्याशी बोललो होतो, आज सकाळी अकरा वाजता त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं.
धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच.

केवळ अविश्वसनीय असे हे वृत्त. आज सकाळी ७ वाजता त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे दै. सकाळच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये वाचले. बातमीत असेही वाचले की सरांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे...आणि आता इथे समजले की त्यानी अखेरीस या जगाचा निरोप घेतला.

आयुष्यभर एक ध्यास घेऊन २४x७ कार्यरत राहिलेल्या या असाधारण व्यक्तिमत्वाचा असा शेवट ?

बापरे ..... दाभोळकरांची बातमी चीड आणणारी आहे.
>>> धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच. >>>> चिनूक्स + १

साळगावकर, दाभोळकरांना श्रद्धांजली.

नरेंद्र दाभोळकर आणि जयंत साळगांवकर यांना श्रद्धांजली!

दाभोळकरांवरील हल्ला ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना!

साळगावकर आणि दाभोळकर ह्यांना श्रद्धांजली.

दाभोळकरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध Angry

कसा विश्वास ठेवायचा? अशक्य धक्कादायक बातमी आहे! बेक्कार वाटतंय काहीतरी.

दाभोळकरांना अत्यादरांजली. माझे अनंत प्रणाम.

भेकड मारेक-यांनो काय मिळवलंत हे करून? माणसाला मारून कार्य थांबणार नाही, ते अधिक जोमानं चालूच राहील !!

संतापजनक कृत्य! अतिशय वाईट राखी पौर्णिमा!

दाभोळकरांच्या आत्म्यास शांती लाभो!

अशी माणसे अशी मरणार असतील तर देवाने त्यांना जन्मालाच घालू नये असे वाटले.

बापरे..
दाभोळकरांची बातमी चीड आणणारी आहे.
>>> धर्मामुळे माणसाचा कसा पशू होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपण अतिशय ओंगळ, गलिच्छ, हलकट होत चाललो आहोत, याची जाणीव गेली अनेक वर्षं होती. आज ते पटलंच. >>१

महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर

या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.

ज्या भ्याड पध्दतीने डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध

न राहवून एक तुलना मनात येतेच आहे तरी...साळगांवकर व दाभोळकर दोन विरोधी मते असलेले दोघे....एकाच दिवशी ?

Pages