मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता एक्स्ट्रॉ असेलच तर मापे मोजीन ना! Wink मला कोणत्याही मापाचा चालेल! मिडीयम असेल तर मला, लार्ज असेल तर ताई/भावजयीला, लहान असेल तर भाचीला असा मामला आहे! Happy

इदीच्या आधी तिच्याकडे नेऊन द्या >>> एव्हढे लाड पुरवण शक्य नाही माते ...

>>> विनय, ती ईदीला रत्नागिरीत येइल तेव्हा माझे टीशर्ट तिच्या मातेकडे सुपूर्द करेल. मग मी गणपतीला घरी जाईन तेव्हा माझी माता ते टीशर्ट मला सुपूर्द करेल अशी योजना आहे. तिची आणि माझी माता काय करतील ते त्यांचं त्यांना माहित. Proud

बाबु, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार खुद्द घारूअण्णा मद्रासप्रांती येत असतात म्हणे. त्यामुळे अगदीच अशक्य बाब नाही हां.... Happy

मलाही खरंतर तेच वाटतंय वैभव! बघूयात.....
कसंय ना, ती देणगी योग्य स्थळी पोहोचली पण! आणि इथे आपले गोंधळ चालूच! Happy
ओ संयोजक, पुढच्यावेळी अश्या माझ्यासारख्या चुकलेल्या कोकरांसाठी एक्स्ट्रॉ टी शर्ट्स शिवून ठेवाच!

ओवी, आता मुग्धाकडून २६ नंबर मुलींचा टिशर्ट मिळत असल्याने माझ्याकडे २८ नंबर मुलींचा टिशर्ट एक्स्ट्रा आहे Wink
तुला किंवा बाकी कोणाला हवा असेल तर संपर्कातून मेल टाका.

चेन्नईवारी तर माझीही घडते कधीमधी. सुपुर्त कोणाकडे करणार पण तिथे ? तू खुद्द चेन्नईत रहात नाहीस ना ?

प्राची, Biggrin
अगं, टीशर्टचीच वाट बघतेय. एव्हढे सगळ्यांनी कौतुक केले आहे वर त्यामुळे उत्सुकता लागली आहे. (तसंही माझ्यासाठी तेव्हढीच एक(तरी) गोष्ट भेट म्हणुन येणार आहे याची खात्री आहे Biggrin )

विनय आणि हिम्सकुल, धन्यवाद! निनाद आज/उद्या विदिपांना कॉटॅक्ट करणार होता/झाला असेल.

<< आता मुग्धाकडून २६ नंबर मुलींचा टिशर्ट मिळत असल्याने माझ्याकडे २८ नंबर मुलींचा टिशर्ट एक्स्ट्रा आहे >>

कठीण आहे हल्लीच्या जमान्यात कोणाला एव्हढ्या मुली असणं. Wink Light 1

मंजुडी, मुलींचा २८ म्हणजे भाचीसाठी मोठाय.... लेकासाठी उपयोग नैये...... Sad
पण मुग्धामुळे तुमचं काम झालं ते बरं झालं!

मंजूडी, २८ नंबरचा किती वर्षाच्या मुलीला होऊ शकेल? बहुदा ८ वर्षे वयाला होईल ना? असल्यास मला गार्गीसाठी हवा आहे!!!

कुणाकडे ४ वर्षाच्या मुलीचा टी शर्ट आहे का????

Lol

यातच तर खरी गंमत आहे.
आता पुढच्या वर्षी कोणीतरी सगळ्या प्रकारचे सगळ्या साईजचे जिन्नस घेऊन ठेवा, ते असे वाटपानंतर कामाला येतील Wink

वत्सला, २८ नंबर सात वर्षाच्या कडक्या मुलीला मोठा होतोय, आठ वर्षाच्या मुलीला होणार असेल तर मी कुठे कसा कधी पाठवू ते सांग.

चेन्नईवारी तर माझीही घडते कधीमधी. सुपुर्त कोणाकडे करणार पण तिथे ? तू खुद्द चेन्नईत रहात नाहीस ना ?
<< बाबु, चेन्नैइसे ४० किमी दूर. आलात की फोन करा.

ओ संयोजक, पुढच्यावेळी अश्या माझ्यासारख्या चुकलेल्या कोकरांसाठी एक्स्ट्रॉ टी शर्ट्स शिवून ठेवाच!>>>>>>>>>>> त्या पेक्षा तुम्हीच लक्षात ठेवा ना Proud

२८ नंबर सात वर्षाच्या कडक्या मुलीला मोठा होतोय, आठ वर्षाच्या मुलीला होणार असेल तर मी कुठे कसा कधी पाठवू ते सांग.>>>>>> अरे देवा! आमच्याकडे पण तब्येत एकदम बारीक आहे. तरी मी ठवते तो टीशर्ट. देवाण-घेवाण कशी करायची ते संपर्कातून बोलु.

चार वर्षाच्या मुलीसाठी आहे का कोणाकडे?

ओ संयोजक, पुढच्या वेळी मागणी असेल त्यापेक्षा किमान अर्धा डझन...सर्व आकाराचे टीशर्ट्स जास्त बनवा आणि नंतर त्यासाठी जास्त लोकांची मागणी असेल तर चक्क लिलाव करून मिळणारी रक्कम मदत फंडात जमा करा. Happy

<ओवे मुग्धाच्या मुलाचा टी-शर्ट तुझ्या मुलाला होणार नाही हे नक्की> का वं ढोलकी काका?

लोकहो/संयोजक, मलाही चारकोल रंगाचा राउंड नेक ४२/४४ साईजचा टीशर्ट अस्ल्यास हवा आहे. उपलब्ध असल्यास कृपया इथे/विपूत लिहा. धन्यवाद.

अय्या!!! खरंच हिम्स्कूल?! वॉव! हुर्रे!!!! Happy वविच्या दिवशी नक्की आणा! तो मापाने पण मलाच झाला तर सोन्याहून पिवळं!!! Happy
का वं ढोलकी काका? >>>>> मुग्धा, माझा लेक पहिलीत आहे, आणि दुसरीतला वाटतो! तुझं पिल्लू लहान आहे नां?

Pages