मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसे भरल्याची काय पोच/पावती असेल? मी ऑनलाइन पैसे भरले आहेत. फक्त 'Payment Received.' असा इमेल आलेला आहे.

मला काही ओळखपत्र दाखवावे लगेल का?

पैसे भरल्याची काय पोच/पावती असेल? मी ऑनलाइन पैसे भरले आहेत. फक्त 'Payment Received.' असा इमेल आलेला आहे.

मला काही ओळखपत्र दाखवावे लगेल का? >> +१

शिवाजी पार्कात भेटू...
ठाणेकर्स या की पार्कात. आता परत एवढ्यात भेट नाही होणार रे.

ही खो द्यायची आयडीया मस्त आहे ....

विवेक देसाई बिचारा मुंबई पुणे दोन्ही ठिकाणाहुन एकाच वेळी टी शर्ट कसे घेणार बिचारा ? Proud

आयडु चे टी शर्ट त्याच्या वतीने अश्विनी आणि अश्विनी च्या वतिने अमित देसाई कलेक्ट करणार .... अस अविश्वसनिय सुत्रांकडुन कळलय .... त्यात केया ची ऑर्डर आयडु घेणार ... कमाल आहे....
Proud

मस्करी करतोय ,
लोक्स चिंता नसावी , सगळ्यांचे टी शर्ट व्यवस्थित पोहोचतील ... Happy

आयडु चे टी शर्ट त्याच्या वतीने अश्विनी आणि अश्विनी च्या वतिने अमित देसाई कलेक्ट करणार .... अस अविश्वसनिय सुत्रांकडुन कळलय .... त्यात केया ची ऑर्डर आयडु घेणार ... कमाल आहे....>>>> ए मला नाही सांगितलंय आयडुने टी शर्ट्स घ्यायला! मी फक्त त्याचे पैसे अम्याकडे भरलेत त्याला जायला जमत नव्हतं म्हणून. आयडूने मी त्याचे टी शर्ट कलेक्ट करणार अशी इमेल दिली आहे का? Lol माझे टी-शर्ट्स आणि धोपटी अम्या घेणार आहे हे बरोबर आहे.

नीरजा, त्या दिवशी सकाळ/दुपारपासून संध्याकाळ/रात्रीपर्यंत आदिवासी भागात वाटपाच्या सर्वेसाठी जायचं आहे. काही कारणाने ते कॅन्सल झालं तर नक्की येईन Happy माझं असं दोन्हीकडे मन ओढत रहातं Uhoh

वेस्टर्न साइडला राहाणार्‍यांना बोरीवलीतुन टी शर्ट कलेक्ट करायची सोय उपलब्ध आहे.
त्याकरता मला संपर्क करावा

जाई तुझ्याकडे माझा फोन नं आहे ना ?
नसेल तर ९८२०२८४९६६ वर फोन कर, मी तुला म्हणलेल की शिवाजी पार्क ला याबाबत ...

पुढच्या वेळेला या काही लोकांनी घरपोच सर्व्हिसचे कमिशन घ्यायला हरकत नाही.
>>>>

माझं कमिशन आहे चॉकलेटांनी भरलेली पिशवी. संबंधितांनी नोंद घेणेचे करावे.

अनिल भाईंचे टी-शर्ट अंधेरीत कोणाकडे ठेवणे शक्य आहे का? ते अंधेरीतून कलेक्ट करणार असे म्हणाले आहेत.>>>>>>>>> हिम्या माझे ऑफिस अंधेरीत आहे, अनिलभाईंना विचारा चालेल का,

एक कळकळीची सूचना करावीशी वाटते : टी शर्ट पोचते करणे ही मायबोलीची मोफत सेवा नाही. एका मायबोलीकराची दुसर्‍या मायबोलीकराला टीशर्ट मिळावा ही सदभावना आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नये, ज्यांना खरच काही प्रॉब्लेम आहे त्यांचं ठिक आहे, पण
१) घरी मिळतील तर मग कशाला जायचं?
२) कोण जाईल त्या पावसातुन / चिखलातुन
३) कंटाळा आलाय
४) मी अमुक मी तमुक अशा प्रकारचा काही अहंकार
अशी काही कारणं असु नयेत याची दक्षता घ्यावी ही नम्र विनंती Happy

Pages