मायबोली टी-शर्ट - वाटप

Submitted by टीशर्ट_समिती on 15 July, 2013 - 06:43

मायबोली टी-शर्टचे वाटप दिनांक २१ जुलै रोजी होणार आहे.

ऑर्डर नोंदवलेल्यांनी न विसरता, न चुकता त्या दिवशी टी-शर्ट घेऊन जावेत.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकरकरांनी विदिपा ह्यांना संपर्क करावा.

ज्यांनी पोस्टाने टी-शर्ट मागवलेले आहेत त्यांना २१जुलै नंतर टी-शर्ट पाठविण्यात येतील.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे - ९८२०२८४९६६ (मुंबई)
२. हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५ (पुणे)
३. विजय दिनकर पाटील - ९८८१४९७१८७ (नाशिक)

काही शंका असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिळाले मिळाले माझे पण टी-शर्ट मिळाले... टी शर्टस, बॅगा सगळं सामान घरपोच मिळालं, सोबत लोणच्याचा मसाला, शायमलीची सिडी, आणि प्रशांत कॉर्नरच्या चकल्या पण. थँक्स आशुतोष. Happy

टी शर्टचा रंग सुरेख आहे, आणि यावेळी साइझचा पण काहीही घोळ नाहीये.

मस्त टीशर्ट झाले आहेत यंदाचे. साईझचा अजिबात घोळ नाही. घातल्यावरही मस्त दिसत आहेत.

बॅगही भारी झाली आहे. फोटोपेक्षा प्रत्यक्षातली बॅग स्मार्ट आहे.

घार्‍या ने करामती करण्या बाबतीत रजनिकांत ला पण मागे टाकलय ... पण काय आहे मराठी माणसाची किंमत कळत नाही लोकांना ...:फिदी:

घार्‍या ने करामती करण्या बाबतीत रजनिकांत ला पण मागे टाकलय >>> घारूअण्णाला वेळ नसतो तेव्हा
रजनीकांत घारूचे प्रतिसाद लिहीत असतो. अशी वदंता आहे. Proud

कुणाला ४० नंबरचा कॉलरवाला टीशर्ट लहान होतो आहे का...मी अंदाजे माप दिलेले ४२...ते चुकल्याचे लक्षात आले आहे...कुणी बदलून देण्यास उत्सुक असल्यास कृपया कळवावे

माझ्याकडे ४२ नंबरचा कॉलरवाला टीशर्ट आहे...जो मला मोठा होतो आहे...तो बदलून ४० नंबरचा हवा आहे...

घारूअण्णाला वेळ नसतो तेव्हा
रजनीकांत घारूचे प्रतिसाद लिहीत असतो. अशी वदंता आहे.>>> Proud शक्य आहे.

एका वविला घारूअण्णा डायरेक्ट जेवणाच्या वेळेला पोचले होते. रजनीकांतला तरी जमेल का हे?

माझ्या नवर्‍याला मी XXL टी शर्ट घेतलायं, तो जरा मोठा होतोयं, कोणाकडे XL असेल तर मला बदलून हवा आहे. संपर्कातून मेल केली तरी चालेल. धन्यवाद.

कसे असे लोक्स... अस कस माप कळत नाही यांना Proud Light 1

थँक्स टू हिम्स नाही तर या बदला बदलीच्या लिस्टीत मी पण असले असते Proud

माझे टीशर्ट्स विवेक देसाई यांनी पिकअप केले अशी त्यांची ईमेल आली आहे. हिमांशु आणि मयुरेश यांनी चोख व्यवस्था ठेवल्यामुळे हे काम अतिशय सोपं झालं असं त्यांनी आवर्जून नोंदवलं आहे. तेव्हा त्यांच्याबरोबरच हिमाजीआप्पा आणि मयुरेशचेही अनेक आभार. Happy

होय सामी मी पण आले होते, एक धावती भेट झाली मुंबैकर माबोकरांशी ,घारुअण्णांना प्रथमच पाहिलं,आनंदमैत्री, इंद्रधनुष्य,योगेश सहपरिवार, मनी,आशुतोष,जिप्सी,प्रमोदजी,वैभव, बागुलबुवा हे सर्वजण होते.जिप्सी स्टार अट्रॅक्शन होता काही सबळ कारणाने Happy .परतताना त्याला अन मला आशुतोषनी लिफ्ट दिली मस्तपैकी.केश्विनी बरं नसल्याने येऊ शकली नाही.

टी शर्टचा रंग सुंदरच दिसतोय, वैभवने सांगितलेला तो लोगो माझ्याही टी शर्ट वर आहेच Happy

सोबत लोणच्याचा मसाला, शायमलीची सिडी, आणि प्रशांत कॉर्नरच्या चकल्या>>>>स्न्माननीय टी शर्ट संयोजक, या सर्व वस्तू टी शर्टबरोबर मिळणार हे सांगितल नाही... त्या कधी पर्यंत मिळतील.....
(कंसातील वाक्यः आमच्या नशीबात नुसत्या उरलेल्या नाड्या आणि फाटकी गोणपाट आलेत घरी .... आणि हो, ते उरलेली लेबलं पण तशीच पड्लीयेत)

Pages