आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

असो. काल ३ किमी चालणे+धावणे, ३० मि. सायकलिंग आणि वेट ट्रेनिंग केले. आज फक्त एरोबिक्स करणार आणि उद्या लोअर बॉडी. {संदर्भ - Body for Life, PDF version}.

काय मग, आज व्यायाम केला का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मेधा - वाचनिय आहे ... अमेरिकन लोक म्हणे व्यायामशाळेच्या बाहेर escalator लावतात Happy असो. किमान ३० मिनिटांवर आले हे हि नसे थोडके.

मला वाटते २०% अमेरिकन जे व्यायाम करतात, त्यात बरेचसे माबोकरच असावे :).

आर्च- १५ सुर्यनमस्काराने थकत नाही ? मी ४-५ च्या पुढे अजुनही जाउ शकत नाही.

बाय द वे, कोणाकडे जीममधली उपकरणं कशी वापरायची याबद्दल रेखाचित्र आहेत का? कारण इथे बरिचशी उपकरणंची नावे कोरियन भाषेत आहेत Sad

मला वाटते २०% अमेरिकन जे व्यायाम करतात, त्यात बरेचसे माबोकरच असावे स्मित. >>
२०% खुपच कमि आहे असे मला तरि वाटते.त्यांचे प्रमाण भारतियांपेक्शा नक्किच जास्त आहे. मी ५-६ वर्ष मिड्वेस्ट मधे राहिले तेंव्हा स्नो असुनसुद्धा हि लोक पळायला जातात हे पाहिले आहे. मला वाटते कमित कमि ४५% वर तरि हे प्रमाण नक्किच असेल. कॅलिफोर्निया मधे तर दिवसातुन कधिहि लोक बाहेर पळताना दिसतात. अगदि रात्रि सुद्धा.

आजचा व्यायाम राहिला! Sad मुलगा डे केअरमधुन आल्यावर थोडा डाउन वाटला. म्हणुन नाहि जाता आले. कारणच मिळाले वाटते मला न जायचे???

हा धागा फरच उत्तम. आज दुपारच्या फ्लाईटने इंदोरला जातोय पण बॅगेत वॉकिंग शूज टाकलेत.
५ दिवस पूर्ण व्हायलाच हवेत दर आठवड्यात
Happy

आज सर्किट ट्रेनीगं केलय.. उद्या गावी जायचेय म्हणुन जिमला दांडी .. Happy
तेव्हा फक्त योगासने करेन ३ दिवस

केला. जून २५ चा तपशील. सकाळी ३० नमस्कार, ३० मिनीट प्राणायाम. संध्याकाळी ६० मि. पॉवर वॉक. आणि मग अष्टांग योग ६० मि चा क्लास. अंमळ अतिच झाल. रात्री पावणे नौलाच विकेट पडली.
@ लाजो-इंप्रेस्ड ग बाई!

मला सध्या सकाळी जाग येते पण फिरायची इच्छा होत नाही! संध्याकाळी मात्र १ तास भर चांगले फिरणे आणि पळणे होते! Happy

आज सकाळी चालायला गेले तर एक कुत्रा मोठ्या बांबूच्या ढिगाखाली अडकून बसला. त्याला सोडविण्यात इतकी एनर्जी खर्च झाली. पण मग मस्त चाललो. आज पाउस नव्हता व पूर्ण हिरवळ उन्हे आणी वारा. एक ही कुत्र्यांना बघून ईईए करणारी जाडी बाई खाली आली नव्हती. व्हाट फन.ओलं वावर वा अवर्स.

उठायला अंमळ उशीर झाला. २० मिनिटे चाललो. पेडोमीटर अ‍ॅप डाउनलोड केलंय. साधारण किती मिनिटे/अंतर चाललो याचा रेकॉर्ड ठेवणे बरे पडेल.

काल संध्याकाळी ४५ मिन्ट वॉक पाऊस नसल्यामुळे जमले.
माझ्या कामाच्या स्वरुपात फोनवर जास्त बोलणे आहे सप्लायर लोकांशी. कोणाकोणाशी बोलायचं आहे ते लिस्ट आउट करुन दर दीड तासाला १५ मिन्ट वॉक घेतो हापिसात. आधी पुर्ण ८-९ तास बसूनच काम होतं. ह्यानेही बर्‍यापैकी फरक पडेल.

मी असं ऐकलय की ट्रेड मिल १० मिनिट पेक्षा जास्त वेळ करू नये! Uhoh
खर आहे का हे?

मी पण केला १० मिनिट ट्रेडमिल,१० मिनिट सायकलिंग, स्ट्रेचिंग, आणि ८ मजले पायर्‍या चढले
(बर्‍याच दिवसांनंतरच्या पहिल्या दिवशी बास ना इतका?)

अमा, ओकेज! पण मी चहा प्यायले Uhoh
तो नाही का चालणार? हापिसातलं फ्रूट ज्युस आवडेना आणि लिंबु सरबत मिळेना... उद्या पासुन लिंबु घेऊन येते ऑफिसमध्ये Proud Wink

मुक्तेश्वर,

कोणत्याही प्रमुख आहारानंतर कमीतकमी पंधरा मिनिटे शिस्तीत चालणे ( म्हणजे न रेंगाळता, व्यवस्थित चालायचे म्हणून चालणे) असे केल्यास उपयोग होतोच.

धन्यवाद!

धन्यवाद बेफी
रात्री ८.३० जेवणाची वेळ , सध्या ढगाळ वातावरण , पूर्वीही शतपावली करीत होतोच पण प्रमाण कमी होते. आता थोडा जास्तवेळ देतो टीव्ही पाहणे जवळपास कमी केले.

Pages