बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी १० च्या वर माणसे असतील तर फक्त आउटसोर्सच करू शकते. साती, ३ जणांचे करताना कंटाळा येतो.बाकीचे काय करणार! ३ जणांचे प्रमाण इतके तर ४५ जणांचे किती? अशा हिशोबाने दिलेले उत्तर आहे.हाच
बेस मी बर्‍याच वर्षांपूर्वी सासरी एकदाच लावला होता.

सिरीयसली, मी चहापण मोजूनच करते.>>> मीही! माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली माझी पोळयांची वनिता न मोजता चहा ठेवते.पण मी अजिबात नाही.

उत्तर द्यायला उशिर झालाय खरेतर.

शिरा फक्त जेवणात गोड पदार्थ म्हणुन करायचा असेल तर १ किलो ४० माणसांना पुरतो. त्याला ३ लि. दुध आणि १ किलोच्या वर साखर लागेल. फक्त तुपात रवा चांगला परतायचा म्हणजे फुलतो.

मी दोन तीन वेळेस या प्रमाणात केला आहे. व्यवस्थित पुरला.

माझ्याकडे १४ मोठी माणसे, ३ मोठी मुले (१०-१२ वयोगट) आणि १-२ छोटी मुले (खाणे नगण्य) अशी लंचला येणार आहेत. अ‍ॅलर्जी/उपास/डायबेटीस इ. इ. खूप वेगवेगळ्या अटी पाळायच्या आहेत त्यामुळे मेनु ठरवताना विचार करावा लागणार आहे.

१४ पैकी ३ चतुर्थीवाले आहेत त्यामुळे उपवासाचे पदार्थ हवेच.
३ डायबेटीक आहेत त्यामुळे पोळी-उसळ हवीच. फुल्ल उपास मेनु नाही चालणार.
मुलांमधे २ जणांना मटार आणि बदामांची अ‍ॅलर्जी आहे.

तेव्हा मेनु सुचवा.
माझा विचार असा आहे - दोन्ही कडे चालतील असे २-३ पदार्थ काकडीची कोशिंबीर कूट घालून, फ्रुट सॅलेड (थोडं वेगळं काढून त्यात स्प्लेंडा घालता येईल, अजून थोडं वेगळं काढून उरलेल्या मधे सुकामेवा घालता येईल), साबुदाण्याच्या पापड्या तळून.
चतुर्थीवाले - साखि, रताळ्याचे/बटाट्याचे काप/कीस, दही
साधे जेवणारे - पोळ्या, मटकीची उसळ, मिरचीचे पंचामृत, अजून एक भाजी सुचवा आणि भातासाठी काय करू मसालेभात/पुलाव/दाल-फ्राय+जिरा राईस काय बरे वाटेल? पातळ - आमटी/सार तत्सम काहीची गरज पडेल का?

दुसर्‍या भाजीसाठी भरीत ऑप्शन कसा वाटतो किवा सुलेखा ताईची एक बटाटा भाजी आहे कांदा भाजून ती पण छान होते. मसालेभात. आमटी, सार या येवजी कढी चालत असेल तर कढी.

डायबेटीसवाल्यांना सुरण चालते का? चालत असेल तर उपास-नॉन उपास दोन्हीसाठी कॉमन फराळी मिसळीची भाजी करता येईल. उपासवाल्यांना देताना त्या भाजीत उकडलेले शेंगदाणे, बटाट्याचा चिवडा. बारीक चिरलेली काकडी घालून द्यायची. जेवणार्‍यांना सुरणाचे रस्सेदार भाजी वाढायची.

दुधीची मूगडाळ भिजवून घालून करतो तशी साधी भाजी / तांबड्या भोपळ्याची भाजी / दही-भेंडी / वांग्याचे भरीत / फ्लॉवर-बटाटा-कांदा-टोमॅटो परतून भाजी / तयार चिरलेल्या भाज्या मिळाल्यास मिक्स व्हेजि स्टर फ्राय / भरली वांगी.

जिरा राईस + तडका दाल.

मंजुडी, उपासाच्या मिसळीची आयडिया आवडली. पण सुरण डायवेटीसवाल्यांना चालेल की नाही माहीत नाही. पण उपासवाल्यांमधे डायबेटिक नाहीत. त्यामुळे चालेल.
नॉन्-उपास वाल्यांसाठी भरली वांगी जमतील. पण उसळ, पंचामॄत आणि भरली वांगी हे तिन्ही रंग-चवीवरून साधारण जवळचे आहेत. त्यामुळे मसाला भेंडी किंवा फ्लॉवर्-बटाटा बरी वाटेल.
जिरा राईस आणि तडका दाल - करायला सोपे आणि लहान मुलांची सोय. Happy
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद मंडळी.

ह्या आठवड्यात मी संजीव कपूरच्या साईटवरच्या २ पाकृ ट्राय केल्या. छान झाल्या म्हणून इथे लिंक देत आहे.

मेथीवाली अर्‍हर दाल - फक्त मेथी पिळून घ्या नाहीतर आमटी कडवट होईल.

ठिकरी की दाल - मातीच्या भांड्यात केली नाही किंवा कोळसा वगैरे वापरला नाही तरी छान झाली.

तांदळाची भाकरी + खान्देशी रस्सा भाजी + मूग भजी + कुरडाया - पापड + दलिया खिचडी + झणझणीत खोबर्याची चटणी + सॅलेड (शेवटी आईसक्रीम) असा बेत कसा वाटतो?
खास मेहूण येणार आहे. तिखट बेतास बात खातात. काही बदल करावे का? (तांदळाची भाकरी हाच एकमेव रिक्वेस्टेड आयटेम होता. बाकी पुढची यादी मी बनवलीये.)

धारा, खान्देशी रस्सा भाजी कितपत तिखट असते? (माहीत नाही म्हणून विचारतेय.) जर बर्‍यापैकी तिखट भाजी असेल आणि मंडळी बेतास बात तिखट खाणारी असतील तर दुसरा एखादा सौम्यसर चवीच्या भाजीचा पर्याय ठेवलेला बरा! सोलकढी, कुळथाचं पिठलं, परतलेली पालेभाजी, वांग्याची भाजी, वाटाण्याची उसळ / बिरडे हे प्रकारही तांदळाच्या भाकरीबरोबर छान वाटतात.

धन्यवाद अकु.
खान्देशी रस्सा भाजी तिखट असते, पण मी ती सौम्यच बनवीन. पिठलं-पालेभाजी-उसळ एकेकाची नावडती - त्यामुळे बाद आहे. सोलकढीऐवजी साधी कढी चालेल का? (सोलकढी बनवली की बाकीचा स्वयंपाक मलाच खावा लागेल, अशी अवस्था असेल Wink ) की साधी एखादी बटाटे-टोमॅटो -इतर काही भाज्या टाकून मिक्स वेजसारखी पण मराठी चवीची चालेल?

खिचडी आहे न. मग नेहमीची कढी कर. कढी- खिचडी, खोबर्‍याची चटणी हे सही काँबिनेशन आहे. कढी नको असेल तर नुसतं मसाला किंवा गोड ताक ठेव बरोबर. बाकी बेत एकदम तोंपासु आहे. Happy

कांदा + बटाटा + टोमॅटो + फ्लॉवर रस्सा देखील सूट होईल ह्या मेन्यूत!

भरली वांगी मस्त लागतात तांदळाच्या भाकरी बरोबर. पण मेहूण म्हणजे कांदा लसूण नसेल ना वापरायचं?

असं असतं का? मला हे काही माहीत नाही, त्यामुळे तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागतील असे पदार्थ सुचविले गं धारा!

प्रॅडी, हे काही मला माहित नव्हतं बरं का. आम्हाला कुणालाच नव्हतं, त्यामुळे चालून गेलं. Wink
अकु, 'तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागतील असे पदार्थ 'च हवे होते, तेव्हा तुझे, बिल्वा आणि प्रॅडीचेही आभार.
मी शेवटी 'तांदळाची भाकरी + खान्देशी रस्सा भाजी (सोयबीन चंक्स टाकून) + सालाच्या मूगाची भजी + कुरडाया - पापड + दलिया खिचडी + भरली मिरची + सॅलेड + रसगुल्ले + मसाला ताक' केले. आईसक्रीम मिळालं नाही, आणि सोलकढीसाठी नारळही. पण आज सगळे तुडुंब जेवलोय.::)

१५ माणसांसाठी व्हेज बिर्याणी आणि सुरळीच्या वडया करायच्या आहेत. भाज्या, तांदूळ आणि बेसन किती लागेल? प्लीज अंदाज सांगा.

मुग्धा, १ मेजरींग कप बेसनाच्या प्रमाणात साधारण ४० ते ५० सुरळीच्या वड्या होतात. आणि 'फक्त बिर्याणी' असेल तर चार मेजरींग कप तांदूळ + चार मेजरींग कप चिरलेल्या भाज्या या प्रमाणाची बिर्याणी व्यवस्थित होईल. हे माझ्या अंदाजाप्रमाणे.

मला प्रमाणाचं तर नाही माहीत, पण जनरली बासमती तांदूळ फार जास्त फुलत नाही. त्यामुळे तसा अंदाज घ्यावा... Happy बाकी निष्णात लोक सांगतीलच...

धन्यवाद मंजूताई, मेजरिंग कप म्हणजे साध्या चहाच्या कपापेक्षा मोठा असेल ना? साधारण पाव किलो पेक्षा थोडं जास्त बेसन घेउ का? १किलो दिल्ली राइस आणि १ किलो मिक्स भाज्या एवढे पुरेल का? गोड ओल्या नारळ्याच्या करंज्या आहेतच. दिराचं केळवण आहे. अजून काय करता येइल?

पाव किलोपेक्षा जास्त बेसन म्हणजे पधरा माणसांना प्रत्येकी चार ते पाच सु.व.... तेवढ्या पुरतील का हा विचार करून करा.

एक मेजरींग कप २०० मि.लि. चा असतो आणि साधारण २२५ ग्रॅम.
एक किलो तांदूळ पुरून उरतील, हात न राखता वाढता येईल.

बिर्याणीला सोबत दहीबुंदी किंवा दहीवडे.

बिर्याणीला सोबत दहीबुंदी किंवा दहीवडे. >> मस्त कॉम्बो!

किंवा दह्यातले काकडी+टोमॅटो+कांदा रायते.

भाजणी वडे/थालीपीट पुरी + फ्रायम्/पापड
जीरा राईस
वान्गी भरली/मटार बटाटा(पनीर) भाजी मसाला
मटकी उसळ्/ पालक गरगट / ताक पालक्/भेन्डी ओल खोबर
रोटी/नान्/चपाती/पुरी
गुलाब जामुन्/जीलेबी/शेवई इन रब्डी/सीताफल रबडी
वरण ट्माटा व लाल मिरची चे
दही बुती(ओप्शनल)
ग्रीन चटणी लिम्बु, पातकान्दा , काकडी,...

मैत्रीणीचे डोहाळेजेवण करायचे आहे. ७ मित्र आणि ७ मैत्रीणी.. त्यामुळे पारंपारिक वै. काही नकोय.
पोटभरीला म्हणुन आलू पराठे, टॉमॅटो चिज राईस आणि बुंदिचं रायतं आणि नंतर आईसक्रीम हा मेनु कसा वाटतोय? अजुन काही सुचवु शकाल का?

गोड म्हणुन पाव किलो बर्फी आणि पाव किलो पेढा आणि आईसक्रीम एवढंच आहे.

Pages