पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ना आज कर, पण पुढच्यावेळी शी.खु. स्पेशल शेवया मिळाल्या तर त्या वापर मुद्दाम. स्वादात, चवीत, पोतात फरक जाणवेल बघ.

पर्शियन भाषेत शीर म्हणजे दूध आणि खुर्मा म्हणजे खजुर असं विकिबाबा सांगतात.

माझी एक मैत्रीण डब्यात कांद्याचं लोणचं आणायची.
लोणचं म्हणजे तशी ती भाजी टाईपच असायची पण पीठ न पेरुन.
मला आता चव आणि कशी दिसायची (भाजी/ लोणचं) ते सोडल्यास काहीच आठवत नाहीये.
काय करु?

(मैत्रीणीचे नाव रुपाली सुरेश शिंदे. तीपण रेसेपीसारखी हरवली आहे. कुठेच सापडत नाहीये Sad )

आमच्या शीरखुम्यात शेवया फार झाल्या. त्यामुळे ती आता शीरखुर्म्याऐवजी बामणी खीर झाली आहे. पण चव छान आहे.

शेवया अल्प घाला.

गुळ घ्यायचा मी आतपाव घेतला,थोडा कुटुन भिजत घालायचा वेळ असेल तर नाहीतर किसुन घ्यायचा.मग गूळाच्या पाण्यात सूट घालायची,गव्हाचे पीट घालुन भज्याच्या पीटासारखे बनवुन छोटे छोटे गोळे टाकायचे तेलात तळायला.हाकानाका...

मैने बनाया मैने खाया और गावभर्को खिलाया Happy शिर्खुर्मा
सढळ हातानी सुकामेवा अन जायफळ घातल . गाईच दुध होत म्हणून खसखस तांदळाची पिठी अन काजूची पूड घालून उकळल. ़ सुकामेवा त्यापेक्षा कमी शेवया , खजूर . सोप्पा आहे प्रकार ( मी जे ़ केल त्याला शिर्खुर्मा म्हटल तर )

गुळाचा पक्का पाक करायचा त्यात चुरमुरे, डाळ (ळ वर अनुस्वार आहे, दिसर नसला तरी) भाजलेले शेगदाणे घालायचे आणि गरम असतानाच हाताला तूप लावून लाडू वळायचे. यात गुळ हा फ़क़्त बाइन्डींग साठी हवाय, प्रमाणासाठी आईला फोन करायचा. गूळ आचरटी घातलात तर लाडवाच्या आधी दाताचे तुकडे पडतील.
त टी : अर्थात आई फोनवर 'तिळाच्या लाडवाला घेतो इतकंच घे' असल्या अगम्य भाषेत प्रमाण सांगण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे फोनचा काहीही उपयोग होत नाही. या प्रतिसादा इतकाच.

Proud

इथे भारी भारी बल्लवाचार्य /अन्नपुर्णा आहेत तर मला एक माहिती द्या पुण्यात कट्टू चे पीठ कुठे मिळेल?

गुलगुले गुळामुळे तळताना वरून पटकन लाल होतात, पण आतून तळले जात नाहीत. कच्चे राहतात.
मी केले होते, मला तो प्रकार आवडला नाही अजिचबात.

व्हॉट इज कट्टू??

गुलगुले गुळामुळे तळताना वरून पटकन लाल होतात, पण आतून तळले जात नाहीत. कच्चे राहतात.
>>>
मंद गॅसवर तळायचे...गरम गरम खायचे.कच्चे नसतात्.जास्त मोटे नाय टाकायचे वड्याएवडे.छोटे छोटे गोटी असते ना तेवडेच टाकायचे ते फुलतात गुलाबजामएवडे.

प्रकाश घाटपांडे---कुट्टू [मखाण्याचे पिठ] तुळशीबाग्/म्युनिसिपल कार-स्कूटर पार्किंग च्या जवळ असलेल्या मारवाड्यांच्या किराणा दुकानात व रविवार पेठ "विजय प्रोव्हीजन स्टोर्स " ला मिळेल.

शीर-खुरम्यात ड्राय फ्रुट्स बरोबर किसलेले खोबरे [ओले किंवा सुके]ही घालतात. भोपाळच्या जुन्या बाजारात शेवया-ड्राय फ्रुट्स आणि मोठ्या भोकाच्या किसणीवर किसलेले खोबरे विकत मिळते..शेवया गोल्डन किंवा जास्त भाजलेल्या अशा वेगवेगळ्या मिळायच्या.मोठ-मोठे थाळ सजवलेले असतात.

केया, चॉकलेट मलई बर्फी करता येईल. सायोच्या धाग्यावर पाकृ मिळेल.
कोको पावडर म्हणजे गोड पदार्थच करावा लागेल, आणि चार वाट्या म्हणजे खूप आहे. ती फ्रिजमध्ये नाही का राहणार?

Pages