Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
साबुदाणा वडा

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » साबुदाणा वडा « Previous Next »

Vidya
Friday, July 02, 1999 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sabudana vada pan tasa karayla sopa
sabudana 3 tas bhijavun thevaycha ek vati sabudanyasathi 2 batate boil karayche
skin kadhun batate ani bhijavlela sabudana ekatra smash karaycha.Tyat chilli salt jeera ghalun changle malayche .Ani chote chote vade karun talayche.
curdbarabar khalle kinva chutney barabar khalle tari chan lagtat
Ya mahinyat ekadasi ahe na .try kara

Paus
Wednesday, May 08, 2002 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajun ek tip:
vadyachya peethat kinchit aale kisun ghatle tar jara shi tikhat chav yete.. lil punjant.


Psg
Wednesday, August 02, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहित्य: साबूदाणा २ वाट्या, २ बटाटे- एक उकडून, एक कच्चा, मीठ, तिखट- आवडीनुसार, जीरे २ टीस्पून, बारिक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट- थोडे भरड- अर्धी वाटी, तळायला आणि मोहनाला तेल.

कृति- साबूदाणा खिचडीला भिजवतो तसा भिजवणे. भिजल्यानंतर हातानी मोकळा करून त्यात मीठ, तिखट, कोथिंबीर, जीरे, उकडलेला बटाटा मॅश करून, दाण्याचे कूट घालणे आणि mix करणे. पाव वाटी तेलाचे मोहन घालणे (मोहन चांगले झाले पाहिजे, तेलातून धूर यायला हवा). कच्चा बटाटा किसून घालणे. सर्व एकत्र करून गोळा करणे. शक्य तितकं कमी पाणी घालणे. साबूदाण्याच्या ओलसरपणामुळे आणि तेलामुळे पाणि कमीच लागते. चांगले मळून गोळा करणे. याचे छोटे वडे करणे. वडे चपटे करणे, म्हणजे आतून कच्चे रहात नाही. तेलात दोन्ही बाजू लालसर होईपर्यंत तळून घेणे. बरोबर दाण्याची चटणी- दही देणे, खाणे!! :-)

मोहन आणि कच्चा बटाटा घातल्यामुळे वडे कुरकुरीत होतात. आणि वडा चपटाही हवा. बटाटावड्या सारखा गोलू केला, तर हा वडा आतून कच्चा रहातो.

आणि केल्याबरोबर लगेच खाणे. करुन ठेवून दिले, तर सबूदाणा मऊ पडतोच.

श्रावण चालू आहे, उपासाला करून खा आणि सांगा कसे झाले ते :-)


Bee
Wednesday, August 02, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी एकदा microwave मध्ये साबूदाना वडा भाजून केला होता. तळला नव्हता आणि तो एकदम खुसखुशीत झाला होता. फ़क्त एकच की भिजवलेला साबूदाना आधी तूपात अरतपरत केला होता आणि नंतर सगळे जिन्नस एकजीव केले. सोबतीला रताळ्याची कढी केली होती. एकदम छान झाले होते combination.

रताळ्याची कढी एकदम सोपी आहे. एकच रताळे मऊसर शिजवलेले घ्यायचे आणि त्याला semi-liquid-semi solid दह्यात फ़ेटायचे. बेसनाचे पिठ न वापरता रताळ्याची paste वापरायची. वरतून वाळलेल्या लाल मिरच्यांची कडक आणि दमदार फ़ोडणी द्यायची की झाली कढी.


Savani
Wednesday, August 02, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सा. वड्यांमधे मोहन घालतात हे मला माहितीच नव्हतं पूनम छान टीप आहे ही. करून पाह्यला हवेत.
बी, तुमची रताळ्याची कढी पण नवीनच प्रकार वाटतोय. करून पाहीन.


Mrinmayee
Wednesday, August 02, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साबुदाणा वड्यासाठी आणखी काही टिप्स: (या मिळाल्या आहेत एका बाईंकडून ज्या पार्टी ऑर्डर्स घेतात असे सगळे पदार्थ करण्याच्या.)
* बटाटा, सगळे मसाले (वाटलेलं जीरं, आलं, हिरवी मिरची, तिखट, मीठ घालून खूप मळायचा, साजुक तुपाचा हात लावून.
* साबुदाणा भिजवताना आधी पाण्यात भिजवून ३-४ तासांनी (फुगून आल्यावर) थोडं आंबट दही घालायचं.
* बटाट्याच्या मिश्रणात भिजवलेला साबुदाणा एकत्र करून अगदी अलगद हातानी मळायचा. (साबुदाणा जास्त मळल्या जायला नको). पाणी अजीबात न लावता साजुक तुपाचा हात लावून फार न दाबता वडे करायचे.
साबुदाणा लगदा न झाल्यामुळे चांगला फुलून येतो आणि वडा कुरकुरित होतो.


Prady
Wednesday, August 02, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्या वड्याच्या पिठात थोडी उपासाची भाजणी पण घालते.

Sampada_oke
Wednesday, August 02, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई वरीचे तांदूळ शिजवून घालते, त्याने वडे छान कुरकुरीत होतात.

Mepunekar
Wednesday, August 02, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Are wa, chan tips ahet saglya..Psg , thanx g, agdi vyavstit praman lihiles, ata me karun baghte nakki..Kaccha batata ani mohan ghalne he mala mahit navte..
Karun baghte ya somvari ani lagech sangte :-)

Mepunekar
Saturday, August 12, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे टिप्स वाचुन मी साबुदाणा वडे केले आणी मस्त कुरकुरित झाले.पूनम, म्रु.. धन्यवाद..मी साबुदाणा भिजवुन नन्तर तासभर आधी १ स्पून दहि घातले, मस्त चव अली..

Moodi
Monday, August 14, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg तू दिलेल्या कृतीप्रमाणे शनीवारी वडे केले होते, चवीलाही छान अन एकदम कुरकुरीत झाले होते. फक्त एकच बदल, तो म्हणजे लाल तिखटा ऐवजी हिरवी मिर्ची मिश्रणात वाटुन घातली आणि नारळाची चटणी होतीच जोडीला. खूपच धन्यवाद गं.

Psg
Monday, August 14, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. मूडी आणि पुणेकर.. आवडले ना? झालं तर! :-)

Prady
Monday, August 14, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं काय चुकलं माहित नाही. तळायला कढईत सोडले तर विरघळायलाच लागले वडे. शेवटी घातली थोडी भाजणी आणी पाण्याचा हात लाऊन थापले.

Asira
Monday, August 14, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady, kadachit batata kami padalaa asel. Maze pan asech zale hote, mag ajun thoda ukadalela batata ghatala, mag neet zale.

Dineshvs
Tuesday, August 15, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्गा भागवतांच्या कृतिप्रमाणे काकडी किसुन घट्ट पिळुन तो किस वड्याच्या पिठात मिसळायचा, त्याने वडे छान कुरकुरीत होतात, तसेच पिळुन घेतलेल्या काकडीच्या पाण्यात चटणी वाटायची, म्हणजे तिलाहि छान चव येते.

Prady
Thursday, May 03, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSG तुझ्या कृतीने काल साबुदाणे वडे केले. एकदम जम्या. Thanks

Akhi
Thursday, May 15, 2008 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साबुदाणा गरम पाण्यमधे भिजवुन घ्यावा. त्यात उकडलेले बटाटा किंचीत लाल तिखट आणे मीठ, जीरे पावडर टाकणे. वडे हलक्या हाताने थापुन तळावे. आणी गरम गरम वडे मिरची च्या चटनी सोबत खाणे.
मला दाण्याचा कुट टाकुन केलेले वडे मनापसुन आवडत नाही. म्हनुन ही क्रुती.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators