Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेबरोबर्नाय्डै!
हेबरोबर्नाय्डै!
विषयाला धरुन बोला.
विषयाला धरुन बोला.
होय साहेब..
होय साहेब..
@दक्षिणा ताई - एक भयानक
@दक्षिणा ताई - एक भयानक कल्पना आहे पण फार अमानवीय आहे. ज्या ठीकाणी कबूतराचं घरटं असेल ते काढुन तुमच्या बाल्कनीत जाळा. मग तुम्हि दाणे टाकले तरी कबूतर येत नाहीत.
१००% खात्रीशीर.
बन्डु घरटं वगैरे काही नाहिये,
बन्डु घरटं वगैरे काही नाहिये, समोरच्य बिल्डिंगितून उडत येतात. खूप आहेत. दिवसभर बाल्कनी बंद असते त्यामुळे त्यांना आयतं आंदण मिळतं रांगोळ्या काढायला.
ताई,... थोडा वॉच ठेवा घरटं
ताई,... थोडा वॉच ठेवा घरटं करतातच आणी अंडे देण्याचा असा सिजन ठरलेला नाही.
गरम पाणी टाकून ही पळवता येतं.
दक्षे, जाळीला पर्याय
दक्षे, जाळीला पर्याय नाही.
आमच्याकडे ड्राय बालकनीत ठेवलेल्या वॉ.म. आणि जमीनीच्या मधल्या पोकळीत घरटं बांधायची तयारी झाली होती. फायनर डिसीजनच्या दिवशी मशीन लावलेले, आणि स्पिन होताना ते मशीन घरघर फिरायला लागल्यावर कबुतरांना धोक्याची जाणिव झाली,मग बहुतेक त्यांनी तो प्लॅन रद्द केला.
जाळीच लावून घेणार आहे, जमलं
जाळीच लावून घेणार आहे, जमलं तर उद्या परवा मध्येच.
साधी वाया गेलेली सी डी वापरून
साधी वाया गेलेली सी डी वापरून कबुतरांना घालवता येते. माझा अनुभव.
http://www.ehow.com/video_4950652_scare-away-birds-old-cds.html
इंद्रधनु व्हिडिओ पाहिला मी,
इंद्रधनु व्हिडिओ पाहिला मी, पण इथे आवाज बन्द आहे, नक्की काय होते यामुळे? रिफ्लेक्शन मुळे येत नाहित का कबुतरं?
इंद्रधनु व्हिडिओ पाहिला मी,
इंद्रधनु व्हिडिओ पाहिला मी, पण इथे आवाज बन्द आहे, नक्की काय होते यामुळे? रिफ्लेक्शन मुळे येत नाहित का कबुतरं?
दक्षिणा , हा बाफ
दक्षिणा ,
हा बाफ स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी आहे. कबुतरांच्या प्रोब्लेम साठी इकडे चर्चा ?
घरी टोमॅटो असताना चुकून
घरी टोमॅटो असताना चुकून पुन्हा आणले आहेत. एकूणात दहा बारा ढब्बे टोमॅटो आहेत घरात.. काय करता येईल त्याचं... सार-सूप नको.
प्युरी करून फ्रोझन क्युब्स
प्युरी करून फ्रोझन क्युब्स करून ठेव.
नारळ घालून केलेल्या टॉमॅटोच्या वड्या लै लै लै भारी लागतात.
चटणी चिवा. फोडणीत जीरे,हिंग,
चटणी चिवा. फोडणीत जीरे,हिंग, हळद, लाल तिखट आणी मेथी दाणे (हवेतच) घाल. बारीक चिरलेले टोमॅटो घाल मीठ आणि व्यवस्थित गूळ घाल. दाण्याचं कूट पण घाल थोडं. नीट शिजव. अफाट लागते आंबट तिखट गोड चव. डिप/स्प्रेड म्हणून पण मस्त लागते. ८-१० दिवस फ्रीजमध्ये मस्त टिकते. रंग पण सुरेख येतो.
चिवा, पटकन हे प्रकार सुचले
चिवा, पटकन हे प्रकार सुचले :
१. टोमॅटो चटणी (नीधपची कृती आहे बहुतेक इथं)
२. टोमॅटो भात
३. टोमॅटो-शेव भाजी किंवा टोमॅटो बेस असलेलं सॅलड / कोशिंबीर
४. स्टफ्ड टोमॅटो
५. टोमॅटोची बेसची ग्रेव्ही करून फ्रीज करून ठेवणे.
६. मॉकटेल मध्ये टोमॅटोचा रस काढून वापरणे.
पास्ता आवडत असेल तर पास्ता
पास्ता आवडत असेल तर पास्ता सॉसपण एक ऑप्शन आहे. बरणीभर करून ठेवता येइल.
ोकिती लगेच सांगितलत
ोकिती लगेच सांगितलत मुलींनो.... टांकू...
टोमॅटो , तसेच्या तसे झिपलॉक
टोमॅटो , तसेच्या तसे झिपलॉक मध्ये टाकून फ्रीज करता येतात.
पण वेळ असेल तर ब्लांच करुन पेस्ट करुन ठवता येतील.(जास्त चांगली मेथड)
सीमा, धुवून कोरडे करून
सीमा, धुवून कोरडे करून ठेवायचे का? नुसते झिपलाॅकायचे?
चिवा ही मंजुडीने लिहिलेली
चिवा ही मंजुडीने लिहिलेली भाजी पण छान होते.
http://www.maayboli.com/node/23195
नी ची चटणी आणि टोमॅटो राइस
नी ची चटणी आणि टोमॅटो राइस केला. आता दोन तीनच उरलेत...
दक्षिणा, खूप उशिरा प्रतिसाद
दक्षिणा,
खूप उशिरा प्रतिसाद देतेय, पण बघ उपयोग अहे का!
पुण्यात रविवार पेठेत पण ती फायबरची जाळी मिळते. पिजन नेट नावानेच मिळते. आम्ही पण कबुतरांना कंटाळून ड्राय बाल्कनीला बसवली आहे.
साक्षी.
पुन्हा एकदा कबुतर
पुन्हा एकदा कबुतर विषयांतराबद्दल सॉरी पण..
)
मंजूडी, मला तो पत्ता बर्ड प्रोटेक्शन नेटचा पत्ता पाठव प्लिज. ( मी पण तुला एक चॉकोलेट देईन
आमच्याकडे सगळी नव्याने आलेली रोपे उखडून टाकली आहेत.
बन्डु , कबुतर घरटे कुठे बांधतात?? दोन आडव्या काड्या आणि दोन उभ्या काड्या ठेवल्या की झालं यांच घर तयार.
सिडी लावुन का ही ही उपयोग होत नाही. मी लावली होती. ते त्या सिडीच्या दोरावरही बसत!
आता ओरिजिनल स्वयंपाकघर विषय चालु..
पाठवलं.
पाठवलं.
माझ्याकडे या वीकांताला येणार
माझ्याकडे या वीकांताला येणार आहे पाहणी करायला माणूस.
थँक्यु
थँक्यु
वॉव ! माझ्या आवडत्या टॉपिकवर
वॉव ! माझ्या आवडत्या टॉपिकवर 'कबुतरांचा नायनाट' विषयावर चर्चा चालु आहे. मी कबुतरांची सगळ्यात मोठी शतरु ( हे लिहायला जमत नाहीए आज). माझ्याकडे कबुतरांना बदडुन काढण्याचे १०० दुष्ट उपाय आहेत.
पण त्यांचं माझं शमा-परवान्याचं नातं आहे. विविध प्रकारे मार खायला ते माझ्या टेरेसमधे आणि घरात येतात. सकाळी सगळी दारं खिडक्या उघङुन दुसर्या रुममधे गेलं कि लिविंगमधे सोफ्यावर, फरशीवर एकदा तर चक्क डायनिंग टेबलवर कबुतर आलं होतं. पुर्वी जशा घरभर चिमण्या असायच्या तशी आमच्या घरात कबुतरं असतात. फरक एवढाच कि चिमणीची शीशी एवढुशी असते आणि फेकुन देता यायची. कबुतराची स्टीलवुलने पण निघत नाही. धाणेरडे पक्षी
मनिमाऊ>
मनिमाऊ>:D
मने हात मिलाओ
मने हात मिलाओ
Pages