युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेट्यूसची पानं जरा मरगळली/कोमेजली असली तर त्यांना वापरायच्या अगोदर बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ घालून ठेवायचे. कोबीच्या पानांबद्दलही हीच युक्ती वापरता येते. कोबीच्या पानांच्या मस्त वाट्या तयार होतात. त्यातच कापलेले सॅलड घालून सर्व्ह करायचे.

लहान कढई वापरा. म्हणजे कमी फुकट जाईल...पण कृपया ते तेल फेकणेच योग्य...काहीवेळा वापरायचेच असेल तर दिव्यात घालू शकता.

तो सुकत जातो ( कुयरी असेल तर ) त्यापेक्षा तो अख्खाच कूकरमधे उकडून ठेवला तर ४/५ दिवस राहतो. भाजी करायच्या आधी सोलून, कुस्करुन घ्यायचा.
भाजीच्या गर्‍याचा असेल तर गरे काढून फ्रिजरमधे ठेवायचे. ४/५ दिवस राहतात.

कुयरी असेल तर >> ते माहित नाही. मी पहिल्यांदाच आणला आहे. अख्खा उकडुन एका वेळी अर्धा केला आणी उरलेला २ दिवसांनी वापरला तरी चालेल ना? घरात कधी कुणी खाल्लेली नाही भाजी.. तेव्हा आवडली तर रिपीट करता येइल.

वर्षे फणस आणून ४ तुकडे करून ते मोठे तुकडे शिजव आणि मग सोल, चिकटपणाशी जास्त झुंजावं लागणार नाही.
आणि तुझ्या घरी तु केलेली भाजी कुणाला आवडली नाही तर उरलेला शिजलेला फणस मला आणून दे. मी करून घेईन माझी मी भाजी Wink
तु करून आणू नकोस बरे Proud

तु करून आणू नकोस बरे >>> Lol
फणसच घेउण येते.. भाजी करुन दे Wink

दक्षे , दिनेशदा धन्स Happy

कच्च्या फणसाचे चिरून घेतलेले तुकडे बुडतील एवढ्या पाण्यात घालून झाकणाच्या डब्यात ठेवले तर आठ दिवस नक्कीच राहतात.

कुयरी म्हणजे अगदी कोवळा फणस. आतल्या आठळ्यांना साल तयार झालेले नाही असा. तो कापताना चीक लागतोच. त्यापेक्षा तो अख्खाच कूकरमधे उकडायचा. ( प्रेशर आल्यानंतर १५/२० मिनिटे ) मग वरचे साल कापून काढता येते. आतला गर कुस्करुन घ्यायचा. सगळा चीक असतो तो मधल्या दांड्यात असतो ( त्याला पाव म्हणतात ) तो कापायचाच नाही.

इथेच मायबोलीवर फणसाच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक जणांना आवडतेच. पण एकंदर घरात मसाल्याची आवडते का ओल्या मिरचीची ते बघून, त्या तर्‍हेने करायची.

परवा एका मैत्रिणीच्या आईने फ्रायिंग पॅनमध्ये अगदी कमी तेल घेऊन त्यात पुर्‍या केल्या. छान फुलत होत्या. मला आवडली ती आयडिया. एरवी तळायला लागते त्याच्या किती तरी कमी तेलात पुर्‍या झाल्या. वडे, भजी प्रकारांना इतकं कमी तेल चालणार नाही. पण पुर्‍या, पापड कुरडया अशा तळणासाठी चालेल.

असो, तळणीचे उरलेले तेल फेकूनच द्यावे.

मुलिने (डेडीने लक्ष न दिल्याने) ग्रोसरी करताना चॉक लेट सिर्यल म्हणून" स्पेशल के "चॉकलेट डिलाईट आणलय..ते बहुधा वजन कमी करण्यासाठी असावे असा अ.न्दाज आहे..चॉकलेट्च्या मोहात.चुकुन आणलय हे स्प्श्टच आहे
तिला देवु का नको?हे कुणि वापरल अस्ले तर सा.न्गा..

छान टीप्स मिळतात ईथे येऊन .
किचनमधल्या चिमणीची जाळी स्वच्छ करणे फारच किचकट काम आहे. परवापासून माझे तेच काम चालू आहे. मी गॅसवर पाणी मोठ्या बादलीभर पाणी उकळून घेते व ती जाळी उकळत्या पाण्यात बुडवून ठेवते. पाण्यात सर्फ वगैरे टाकते. थोड्या वेळाने ती जाळी दुसर्‍या बाजूने पाण्यात बुडवून ठेवायची. असे बरेच वेळा करावे लागते.पण एकदा तो तेलकटपणा गेला की एकदम चकाचक होते, तेव्हा खूप छान वाटते. Happy

तोफु ला कसे मारीनेट करावे म्हणजे ते पदार्थात घातल्यावर शेवटी चवदार लागेल?
मी वापरते तेव्हा त्याला कधीच चव लागत नाही, बेकार लागते. परवा पालक पनीरात घातले तेव्हा पालक व इतर मसाला चवदार पण तोफु बोगस लागत होते चवीला!!!! काय करु?

सुनिधी,

टोफु मधे मॉईश्चर खुप असते त्यामुळे मॅरिनेड त्यला चिकटत नाही. त्यासाठी फर्म टोफु घेऊन त्यातले सगळे पाणी काढुन टाकायचे. ही लिंक बघ...

http://www.wikihow.com/Marinate-Tofu

दुसरी पद्धत म्हणजे टोफु आधी ड्राय रोस्ट करुन पाणी एव्हॅपोरेट करुन घेणे आणि मग मॅरिनेट करणे.

नुसता टोफु खायचा असेल (सॅलड्स मधे वगैरे) तर मी लिंक प्रमाणे मॅरिनेट करते.

भाजीत वगैरे घालायचा असेल तर रोस्टिंग पद्धत.

तोफु बोगसच लागतो/लागतं सुनिधी. माझ्यामते पनीरला रिप्लेस करुन तोफु वापरु नये. अगदीच जर तब्येतीचं कारण असेल तर मग नाईलाज आहे.

सुनिधी! सायोशी सहमत! त्याला स्वतःची चव नाहीच शिवाय आपण ढिग्भर मॅरिनेट लावले तरी तो बेचव राह्तो त्यातल्या त्यात मला तो ईटालियन ड्रेसि.न्ग + लसुण पेस्ट मधे मॅरिनेट करायचा मग ओव्हनला ग्रिल करायचा वरुन तीळ लावायचे असा बरा लागतो अस वाटत..

बाजारात चिकन ६५ चे गाडे असतात.. चिकन ६५ म्हणजे काय? की मटण ६५? डिशमध्ये काय असते खायला? कसे लागते?

निबंधलेखन : माझा चिकन ६५ चा पहिला दिवस.

उत्सुकता शिगेला पोचल्याने अखेर तरातरा चालत गाडा गाठला. चिकन ६५ च्या गाड्यावर ब्रह्मवृंद आले, म्हटल्यावर गाडावालाही चमकला.

तीस रु १०० ग्रॅम रेट होता.

१०० ग्रॅम मागितले. तळलेले लाल गोळे, कांदा, कोबी पात आणि लाल सॉस मिळाला.

एक पीस खाल्ला ...... तोंडाचा स्वर्ग झाला आणि रेडिओवर गाणे लागले --- रम्य ही स्वर्गाहून लंका...

छानच वाटले.

गाडावाल्याला विचारले ६५ आणि मांचिरुयन यात काय फरक ? तो म्हणला माहीत नाही. ६५ करायला कॉर्न फ्लोअर वापरतो.

मी म्ह्टलं चवीत काय फरक?

तो म्हणाला --- मी आयुष्यात चिकन कधीही खाल्ले नाही. मला माहीत नाही. ६५ विकतो ते व्यवसाय म्हणून... पण मी खात नाही. Proud

सिंडी Lol

पिठीसाखरेत खडे होतायत म्हणजे त्यात मॉइश्चर आहे किंवा डब्ब्याचे झाकण घट्ट नसल्यामुळे त्यात मॉइश्चर जातय....

कोरडा घट्ट झाकणाचा डब्बा वापरा, घरी पिठीसाखर बनवत असाल तर मिक्सर मधुन काढल्या लाढल्या डब्यात/ बरणीत भरुन झाकण लावु नका.. थोडावेळ उघड्यावर राहु द्या.

अत्ता जर खडे असतिल तर साखर किचन पेपर वर पसरून शक्य असेल तर उन्हात ठेवा थोडावेळ आणि/ किंवा डब्ब्याचे झाकण उघडे ठेऊन थोडे ऊन द्या....

मी काही दिवसांपासून ऑलिव्ह ऑईल वापरते आहे थोड्या प्रमाणात. बाजारात एक्स्ट्रा व्ह. आणि कुकींगसाठी ऑलिव्ह पॉमेस ऑईल मिळ्तेय. हे "पॉमेस" काय असतं. कुंकींग ला हे वापरलं तर चालतं ना? की नुसतं कुंकींग ऑलिव्ह ऑईल पण मिळतं?

http://en.wikipedia.org/wiki/Olive_pomace_oil

ईथे बरीच माहिती मिळाली.

मटण /चिकन मधे घालायचा कादां आधिच भाजुन ठेवला अन वेळेवर फोडणीत टाकला तर चव बदलते का?

Pages