Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोजची पोळ्यांची कणीक खूपच कडक
रोजची पोळ्यांची कणीक खूपच कडक मळली गेली आहे, काय करू? पुर्या करण्याचं सुचतंय.. पण इतर काही करता येईल?
कोरडी कणीक हातावर चोळल्यानेही
कोरडी कणीक हातावर चोळल्यानेही जाते जळजळ. (मिरचीचं काम आधी करून मग लगेच कणीक भिजवायची. - म्हणजे लगे हाथों वेळेचंही व्यवस्थापन!) >>>> हे खूप खरंय... लहानपणी पाट्यावर मसाला वाटला की आई लगेच पोळ्यांची कणीक मळवायला सांगायची, नाही तर बाजरीच्या भाकरी बनवायचा प्रयत्न कर असं म्हणायची...
बाकी ही आई मंडळी नकळत मुलांना सांभाळण्यात हुशार असतात नाही? मला तेव्हा आईला उगाच मध्ये-मध्ये करून जेवणा बनवण्यात मदत केली म्हणजे मीच जेवण बनवले, असा फील द्यायची आई.
थोड तेल पाणी लावुन झाकुन
थोड तेल पाणी लावुन झाकुन ठेव्,मग एकदा मळुन एकसार्खी कर, तरी नाहि झाली तर मायकोर्वेव्ह मधे अगदी ४-५ से.न्कन्द ठेव..होईल मऊ
प्राजक्ता, धन्यवाद.
प्राजक्ता, धन्यवाद.
स्टील च्या भांड्यांवरचे
स्टील च्या भांड्यांवरचे स्टीकर कसे काढायचे ?
रावी, अगदी उकळते पाणी घालुन
रावी,
अगदी उकळते पाणी घालुन ठेव थोडावेळ आणि मग हलकेच स्क्रॅचप्रूफ स्कोअरर ने घसुन काढ किंवा स्टिकर च्या मागिल बाजु विस्तवावर थोडी गरम कर आणि हलकेच स्टिकर सोडवुन घे.
भांडी बनवणारे पण ही स्टिकर्स अगदी पातेल्याच्या/ताटलीच्या मध्यात लावतात... आणि त्याचा ग्लु पण इतका चिक्कट असतो... काढायला अगदी वैताग येतो...
..
धन्स लाजो. ह्या भांडी
धन्स लाजो.
ह्या भांडी बनवणार्यांना पण ही स्टिकर्स अगदी पातेल्याच्या/ताटलीच्या मध्यात लावतात... आणि त्याचा ग्लु पण इतका चिक्कट असतो... काढायला अगदी वैताग येतो...>अगदी अगदी!
रावी स्टिकर काढण्यासाठी ज्या
रावी स्टिकर काढण्यासाठी ज्या बाजुला स्टिकर आहे त्याची उलट बाजु २ मिन. गॅस वर गरम कर..भांडे थोडे गार झाल्यावर स्टिकर हलकेच सुटुन येइल आणी डाग पण रहाणार नाही
रावी स्टिकर काढण्यासाठी ज्या
रावी स्टिकर काढण्यासाठी ज्या बाजुला स्टिकर आहे त्याची उलट बाजु २ मिन. गॅस वर गरम कर..भांडे थोडे गार झाल्यावर स्टिकर हलकेच सुटुन येइल आणी डाग पण रहाणार नाही>>> +१
मृनिश, अविगा...सेम पिंच ..
मृनिश, अविगा...सेम पिंच
.. मी पण तेच सांगितलेय वर 
किचनमधला exhaust fan कसा
किचनमधला exhaust fan कसा स्वच्छ करता येइल? तेल+धुळ यांचा थर बसलाय अगदी.
चिंगी कॉलिनने स्वच्छ होईल
चिंगी
कॉलिनने स्वच्छ होईल ना.. कदाचित पूर्ण बाटली लागेल
चिंगे एखाद्या मगात साबणाचे
चिंगे एखाद्या मगात साबणाचे पाणी घेऊन स्कॉच ब्राईटने घासून काढ. बहुतेक स्वच्छ होईल.
चिंगी, फॅन ची पाती निघतात का?
चिंगी, फॅन ची पाती निघतात का? नसेल तरी आधी पॉवर डिस्कनेक्ट करुन तु पुढिल २ उपाय ट्राय करु शकतेसः
१. कोरड्या पात्यांना कणिक/मैदा हाताने चोळुन त्याच्यावरची धुळ/तेलकट थर घासुन काढायचे आणि मग गरम साबणाच्या पाण्याने पुसुन घ्यायचे.
२. गरम पाणी + लिक्विड सोप + मीठ यांनी पाती साफ करुन घ्यायची आणि मग नुसत्या गरम पाण्याने पुसुन घ्यायचे.
वरची जाळी काढुन ती गरम पाणी + लिक्विड सोप + मीठ यांच्या मिश्रणात भिजवुन ठेवायची आणि जुन्या टुथब्रश ने घासुन मळ काढुन टाकायचा.
कणिक/मैदा वापरुन स्टिलची तेलकट भांडी / तेलाचा कावळा इ इ पटकन स्वच्छ होतात.
लाजो च्या उपायांनी नाहीच
लाजो च्या उपायांनी नाहीच निघाली तर सरळ मोठ्या भांड्यात गरम पाणी + लिक्विड सोप + मीठ घालून त्यात पाती टाकून उकळून घ्यायचे.
माधवी, नही ये कॉलिनके बस की
माधवी, नही ये कॉलिनके बस की बात नही!
मी फॅनवरची जाळी स्क्रॉचबाइटने खसाखसा घासायचा ट्राय केला तर एकतर घासणीतच इतका मळ अडकला की त्याचा रंग बदलुन गेला आणि साफ तर नाहीच झालं. मैदा/कणकेची आयडीया चांगली आहे. पहिल्या राउंडमध्ये कोरडंच स्वच्छ करुन नंतर पाण्यात भिजवुन परत साफ करुन बघते.
धन्यवाद मुलींनो!
जाड बुडाच्या पातेल्यात मोकळा
जाड बुडाच्या पातेल्यात मोकळा शिजवलेला पेजकाढू भात मंद आंच ठेवूनही रोज तळाला थोडासा करपतोय. तो करपू नये म्हणून काही युक्ती आहे का?
Fruit salad साठी आधी फळ चिरुन
Fruit salad साठी आधी फळ चिरुन ठेवता येतील का? केळाचा अपवाद सोडून इतर फळ काळी न पडावी या साठी काही युक्ती आहे का?
चारुता, एक सफरचंदच काळं
चारुता, एक सफरचंदच काळं पडायची भिती आहे. तर सफरचंद चिरुन त्यावर मीठ शिंपडून धुवून टाक आणि मग बारीक फोडी कर. केळं आयत्यावेळी अॅड करता येईल फ्रूट सॅलडमध्ये.
thanks सायो. पेयर अननस या
thanks सायो. पेयर अननस या साठी काय? बाकी डाळीब , starwberries, Grapes साठी tension नाहीय. सफरचंद साठी मीठाचा प्रयोग करुन पाहते.
अकु, पाणी काढल्यावर्ही आचेवर
अकु, पाणी काढल्यावर्ही आचेवर ठेवायचे कारण वाफ जिरून मोकळा व्हावा हे आहे का ? तसे असेल तर भाताच्या
भांड्यावर जाड नॅपकीन ठेवायचा. भात लवकर मोकळा होईल.
तसे नको असेल तर भांडे थेट आचेवर न ठेवता तव्यावर किंवा इतर पदार्थांच्या गरम भांड्यांवर ठेवायचे. वाढेपर्यंत गरम राहतो.
हो, दिनेशदा, तो पर्यायही
हो, दिनेशदा, तो पर्यायही वापरून बघणार आहे. किंवा मग डबल बॉयलर पद्धतीने. ह्या वेळी आणलेला तांदूळ खाली पातेल्याला चिकटतोय त्यामुळे हा प्रॉब्लेम आलाय, एरवी भात करपत नाही.
चिंगी, फॅन रॉकेलने पुसा आधी.
चिंगी, फॅन रॉकेलने पुसा आधी. त्याने सगळा चिकट राप निघून येईल. मग कुठल्याही क्लीनर किंवा साबणाच्या पाण्याने फायनल पुसून घ्या.
चारुता, सफरचंद आणि पेअरच्या फोडींना लिंबू चोळून ठेवायचा उपाय ऐकला आहे. करून पाहिलेला नाही.
अकु, तांदुळात स्टार्च जास्त
अकु, तांदुळात स्टार्च जास्त असावा. पाणी पूर्ण क्लिअर दिसेपर्यंत तांदूळ (न चोळता) धुवून मग शिजवून बघ.
स्वाती, हो, लिंबूही चोळलेलं
स्वाती, हो, लिंबूही चोळलेलं चालतं पण चोळून फोडी धुतल्या नाहीत तर दुधात नासतील ना.
ओह दुधात करणार का फ्रूट
ओह दुधात करणार का फ्रूट सॅलड?
खरंतर करू नये. ते विरुद्ध अन्न समजतात. त्यापेक्षा अधमुर्या दह्यात केलेलं बरं.
पण करायचंच तर मग दुधात घालण्याआधी धुवून घ्याव्या लागतील फोडी. किंवा चिरल्यावर पाण्यात बुडवून ठेवता येतील. (खरंतर गरम दूध फाटतं, गार दुधाला थोड्याश्या चोळलेल्या लिंबाने प्रॉब्लेम येऊ नये.)
custard मधे करणार आहे. ते पण
custard मधे करणार आहे. ते पण फाटत का?
फळं आणि कस्टर्ड (वेगवेगळे)
फळं आणि कस्टर्ड (वेगवेगळे) फ्रीजमधे ठेवा. आयत्या वेळी बाहेर काढून मिक्स करा. नाही फाटणार.
चिंगी, फॅन रॉकेलने पुसा
चिंगी, फॅन रॉकेलने पुसा आधी.
>>
रॉकेल कुठे मिळते??
चारुता, मी नेहमी कस्टर्ड
चारुता, मी नेहमी कस्टर्ड दुधात मिसळून फ्रूटसॅलड करते. सुरुवातीला दोन्ही वेगवेगळं ठेवून गार करते. मग आयत्या वेळी मिक्स करते. नंतर जे उरलेलं असतं ते दूध आणि फळं एकत्रच असतं पण नासण्याचा अनुभव आला नाही कधी.
Pages