निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीत जिथे मी मिक्सर ठेवलाय तिथे जाळीपलिकडे एका कबुतराने दोन अंडी घातलियेत. माझ लक्ष नव्हत या आधी पण दरवेळी मिक्सर सुरु केला की खिडकीतून कबुतरीण फडफड करत उडुन झाडावर बसायची. मला कळत नव्हत काल जेव्हा बघितल तेंव्हा कळल. आता मी मिक्सरची कामे सगळीच छोट्या खलबत्त्यात करतिये. मिक्सर हलवला तर त्यांचा आडोसा जाऊन माणसांच डायरेक्ट दर्शन झाल तरं ती बिचारी बिचकेल ना?

उद्या फोटु डकवते अंड्यांचे. कबुतरीण बाईंना कॅमेर्‍याच्या फ्लॅशची अ‍ॅलर्जी आहे दरवेळी उडुन जातात Sad

शुभे आता महिनाभर तरी तुझा खलबत्यावर चांगला व्यायाम होणार. Happy

दिनेशदा लायब्ररीत मिळत का पाहते ते पुस्तक. नाहीतर पुढच्यावेळी दादरला गेले की आणेन.

अजुन एक सांगायचे राहिले. मी काल सकाळी आमच्या ऑफिसपर्यंत मिळालेल्या रानफुलांचे फोटो काढले. काल १० ते १२ तेच करत होते. आहो घरात नव्हते म्हणून नणंदबाईंना घेउन गेले. तिचीही मदत झाली फुल दाखवण्यात. काल अजुन एक सुट्टी सार्थकी लागली ऑफिस एरीयात जाऊन.

शुभांगी, जाळीला काच असेल तर पक्ष्यांना काचेपलिकडचे दिसत नाही. आणि तसाही कबुतर हा पक्षी माणसांना बूजत नाही. (साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे तो.)

जागू, मुद्दाम बघच. कारण एकतर ते गोड्या पाण्यातील मासे आहेत आणि दुसरे म्हणजे त्या माश्यांच्या सवयी, पिल्ले याबद्दल खुपच रंजक माहिती आहे.
फुलांच्या फोटोची वाट बघतोय !

दिनेशदा आजच टाकले असते पण घरचे नेट बंद आहे आणि अजुन माझ्या घराच्या मागिल फुलांचे फोटो काढायचे बाकी आहेत. म्हणुन २ दिवसांत टाकतेच.

मारुती चितमपल्लींची सारीच पुस्तके निसर्गवेड्यांच्या आवडीची. पक्षी जाय दिगंतरा हे अजुन एक नाव आठवतय मला. मी आता सगळी सीरीजच गोळा करणार आहे त्यांची.

साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे तो

Happy

शक्य असते तर मी त्याला हद्दपार केले असते. मी आज सकाळी चिमण्यांना तांदुळ घातलेले, त्या मुर्खांना समोरचे तांदुळ दिसत नव्हते. कबुतरे मात्र मला पाहुन लगेच धावत आली आणि दोन मिनिटात सगळ्या तांदळाचा फन्ना उडवुन गेलीही. मुर्ख चिमण्या नी कावळे चोची चोळत बसते... Angry

शुभांगी एवढी काळजी नको घेऊस त्यांची. त्यांना अंड्यांचे काही पडलेले नसते. घरटे बांधायचा पण कंटाळा...

शांकली, थोडं विषयांतर होतंय पण अगदिच रहवत नाही म्हणून सांगते . पु.ल.देशपांडे विषयी खूप माहिती असलेली ही साईट सर्वांनी जरूर वाचा.
www.puladeshpande.org

शुभांगी शक्य असल्यास ते घरटे काढून टाका. कबुतरं आणि त्यांची पिल्ले अतिशय घाण करून ठेवतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तुमच्या किचनजवळ घरटे असणं आरोग्यदॄष्ट्या योग्य वाटत नाही.

माधव Happy

जिप्सी... फोटो सुंदर आहे रे.. पण पक्षी नालायक आहे त्याला काय करणार?? झुंडशाहीसमोर सगळे माघार घेतात हे कबुतरांची झुंडशाही पाहुन पटते.

अग ते जाळीच्या पलिकडे आहे. आणि ती कबुतरीण झाडावर बसुन लक्ष ठेवुन असते त्या अंड्यांकडे.
बाकी ती रात्रभर त्या अंड्यांजवळ असते. अस एकदम नको घरट काढायला. सेफर साईड मी त्या खिडकिला आतुन पुठ्ठा लावलाय त्यामुळे तो त्रास नाही.
एकदा का ती पिल्ले जन्मली की मीच ते घरट काढुन टाकीन.

तूर्कस्तानात कबुतरांच्या शिटेचा एक वेगळा उपयोग शोधून काढलाय. कातडी कमावण्याच्या कामात या शिटेचा खुपच चांगला उपयोग होतो. त्यासाठी मुद्दाम कबुतरे पाळली जातात.
दुबई मधे मात्र त्यांचा त्रासच होतो. त्यांच्या शिटेमूळे इमारती खराब तर होतातच पण लोखंडी वस्तूंना गंज चढतो. तिथे कबुतरांना हुसकावून लावण्यासाठी खास प्रशिक्षित ससाण्यांचा वापर होतो.

-- हे सगळे ह्यूमन प्लॅनेट मधून कळले !!

घरटे बांधलेय का ते आधी पाहिलेस का? माझा आजवरचा अनुभव असाय की जर खिडकीचा छज्जा वगैरे मिळाला तर कबुतरे अंडी सरळ त्या छज्जावरच घालतात. उगीच त्या काड्या जमवुन आणा, घरटे बांधा वगैरे उद्योग कोण करेल?? Happy

तुझी कबुतरे कामसु दिसताहेत. घरटे बांधलेय, वर कबुतरबाई लक्षही ठेऊन आहेत. माझ्या आईच्या खिडकीत कबुतरांनी अंडी अशीच टाकलेली आणि कबुतरबाई नी बाबा दिवसभर भटकंतीवर जात. आई बाकीचे उद्योग सोडुन कावळ्यांवर लक्ष ठेवत बसे, आपल्या खिडकीच्या आश्रयाला आलेल्या कबुतरांची अंडी कावळ्यांनी खाल्ली तर आपल्याला चैन पडणार नाही असे उगिचच तिच्या मनाला वाटे म्हणुन... Happy

कबुतरांची अंडी कावळ्यांनी खाल्ली तर आपल्याला चैन पडणार नाही असे उगिचच तिच्या मनाला वाटे म्हणुन.. Lol
कबुतरांवरचा राग साधनाच्या प्रत्येक वाक्यात व्यक्त होतोय.

कबुतरं आमच्या कुंडीतली झाडं उपटतात. नवं रोपटं लावलं की तोडून टाकतात. मध्ये गुलाबाच्या रोपट्याला आलेल्या पालव्या तोडून टाकल्या. बिचारं गुलाबाचं रोप वाचेल का याची खात्री नाही Sad

ती झाडं का तोडतात, हे माहित आहे का?

कबुतरं झाडं तोडत नाहीत. पण साधनाने सांगितल्याप्रमाणे ती इतकी आळशी असतात की घरटी सहसा बांधत नाहीत. हल्ली बर्‍याचदा ती कुंड्यांच्या आडोशालाच अंडी घालतात. कुंडीतले झाड डेरेदार असेल तर चक्क त्या खालीच अंडे घालतात. इतर वेळेलाही कुंड्यांच्या आडोशाला येउन बसतात. जाता येता त्यांच्या फडफडीने नाजूक झाडे / कळ्या तुटतात.

कबुतराच्या शी चा उपयोग टक्कलावर केस उगवण्याच्या औषधीत केल्याचे वाचले आहे मी..
>>> Rofl सारीका, हे केसांचे आरोग्य बाफावर नेऊन लिहायची हिम्मत कर पाहू Proud

जागू, फ्लॉवर्स ऑफ संह्याद्री मधे मराठी नावे आहेत. याचे दोन भाग आहेत, जरा महाग आहेत पण संग्रही ठेवण्याजोगे आहेत.

दिनेशदा,साधना
(आता हे एवढं वाचुन खरंच कबुतर (बास) जा..जा..हे गाणं म्हणावस वाटतयं)
Lol
कासबद्दल वाचुन लगेच, कालच्या रविवारी मी दिघीजवळ (पुण्याच्या जवळ असणारा), घराच्या शेजारीच असलेल्या डोंगरावरुन खुप दिवसानंतर फेरफटका मारला,तिथला सुंदर फुलांचा गालीचा जवळुन पाहिला,खाली विस्तीर्ण अशा धरणीमातेच आल्हादायक हिरवं पांघरुन (तेही फुकटात) खुप दिवसांनी पाहुन मनाला खुप बरं वाटल.

अनिल, मी म्हणालो नव्हतो, बहुतेक गावाच्या लगत अशी पडीक जमीन असतेच आणि तिथे रानफुले, रानभाज्या आपसूक उगवतात. कासला जरा पठार विस्तीर्ण असेल.

जागू, ही दोन्ही पुस्तके फिल्ड गाईड म्हणून उपयोगी पडतात.
फुलांचे वर्गीकरण उमलण्याच्या काळावरुन, रंगावरुन, आकारावरुन, वेल, झुडुप, वृक्ष असे चांगले केलेय. आणि शेवटी अकारविल्हे यादी आहे.

कबुतरांना हाकलण्यासाठीचा खात्रीचा उपाय. (खास करून साधनासाठी..........)

कुंड्यांमधे संपलेली रिफील्स उभी खोचून ठेवायची. माझ्या अनेक मैत्रिणींकडून हा प्रयोग यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे 'कबूतरपीडित' मंडळींना जरा दिलासा मिळावा अशी अपेक्षा............

(कृपया हा विनोद समजू नये. प्रत्यक्ष प्रयोग करून बघावा ही नम्र विनंती).

कबुतरे झाडे तोडतात. माझ्या घरातले मिरचीचे रोप आणि गुलाबाचे रोप कबुतरांनी तोडलय. मला आठवूनही भयंकर चिड येतेय. Happy

Pages