निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
या दिवसात असा पाऊस अचानक कोसळुन काहीं पिकांना चांगला असतो, तर नुकसान करुन कित्येक शेतकर्‍यांच्या काळजाचे ठोकेही चुकवतो, द्राक्षेवाले तर अगदी चिंतेत पडलेत, काही हाताला आलेली पिके डोळ्यासमोर पाण्यात जातात, फक्त शेतकर्याला आपल्या उत्पनाचा भरवसा नाही, ते घरात सहीसलामत आल्याशिवाय ठरवु शकत नाही

मोसमी पावसावर अवलंबून असणार्‍या बहुतेक देशात हिच परिस्थिती आहे.
इजिप्त सारखे काही देश, जे पावसावर अवलंबून न राहता नदीच्या पाण्यावर शेती करतात, तिथेच परिस्थिती बरी असेल.

मुंगुसाची एवढी प्रजा वाढतेय त्या अर्थी त्यांना खाद्य पण मिळतेय. शिवाय त्यांना तसा शत्रु नाहीच.

<<<<प्रज्ञा तू नि.ग.छायाचित्रकार असा बिल्ला लावून फिरतेस वाटतं?>>>>> Proud

इथे नेरुळ बेलापुरलाही मुंगुस बघितलेत मी.

मागे एकदा असे ऐकलेले की भारतीय मॉन्सुनचा उगम पेरु या देशात होतो. तिथले पर्यावरण चांगले असेल तर त्याचा परिणाम आपल्याकडे आवश्यक तेवढा पाउस होण्यावर होतो आणि तिथले जर बिघडत असले मग आपल्याकडचा मॉन्सुनही बिघडत जाणार.
हे कितपत रे आहे का?

प्रज्ञा, तू खरच कॅमेरा गळ्यात अडकवूनच फिरत जा. Wink (जागूचा आदर्श डोळ्यासमोर ठेव.:फिदी:)
शांकली, परवा एस्.एन डी. टी. जवळून येताना, तुझी फार आठवण झाली. तू फुलांचे फोटो काढले होते ना त्यांची. इथे बसस्टॉपजवळ निळी व पिवळी फुले इतकी छान फुलली होती. पण माझ्याकडे कॅमेरा असूनही, बस सुरू झाल्यामुळे मला फोटो नाही काढता आला. Sad
आता जमल तर तूच काढ फोटो. Happy

अरे वा! माझी आठवण आली! थांकू थांकू..........मी जरूर फोटो काढीन त्या फुलांचा.
पण तुला माझ्यातर्फे एक छोटीशी भेट......... आमच्या बागेतलं हे ऑक्झलीस....(आंबुशीचं फूल)

Picture 082.jpg

दिनेशदा,शोभा१२३
मुंगुस बरेचदा पावसाळ्यात रस्ता ओलांडताना (गावाकडे) पहायला मिळतो, हा प्राणी अगदी आपल्याच नादात/कामात्/धावपळीत असतो असं मला त्याला बघुन नेहमी वाटतं

शांकली,
या पानावर, थोड्या गैपनंतर हा छान फोटो पहायला मिळाला..

Happy

शांकली, हि फूले नेहमीच्या बघण्यातली, पण त्यांचा असा छान फोटो दुर्मिळ.

अनिल मुंगुसाबद्दल गावगप्पा काय विचारू नकोस.
मुंगुस सापाचे तूकडे करतो, आतले काहितरी खातो आणि ते तुकडे परत जोडतो,
हे सगळे मी स्वतः बांधावरुन बघितले, असे सांगणारी माणसे आहेत माझ्या आजोळी !

मुंगुसासारखाच इथे एक वेगळा प्राणी असतो, त्याला मागच्या दोन पायावर उभे रहायची सवय असते. तो साप, विंचु, मुंग्या, वाळवी, कंदमुळे असे सगळे काही खातो. दात खुप तीक्ष्ण असतात त्याचे.

सर्वांना खूप धन्यवाद.
मुंगसावरून आठवलं.... श्री.मारुती चितमपल्लींच्या 'रानवाटा' ह्या पुस्तकात 'अरणी नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मुंगसाचा खूप छान प्रसंग लिहिला आहे. साप आणि मुंगसाची मारामारी झाल्यावर मुंगूस त्याला असलेल्या उपजत माहितीने एक कंद उकरून खातं, आणि मग वूड्ससाहेब तो कंद श्री.गॅम्बल या वनस्पती शास्त्रज्ञाकडे संशोधनासाठी पाठवून देतो. त्या संशोधनात असं लक्षात येतं की तो कंद सापाच्या विषावर अगदी रामबाण औषध आहे................... त्याचं नाव सर्पगंधा....
हे रानवाटा पुस्तक फार छान आहे. ज्यांना मिळेल त्यांनी जरूर वाचावे. निसर्गातील अनेक अद्भूत गोष्टी अतिशय रंजक भाषेत लिहिल्या आहेत.

मला मात्र कुसुमाग्रजांची "अहि-नकुल" ही कविताच सर्वप्रथम आठवली. काय सुरेख वर्णन आहे.

सर्पगंधा म्हणजे मागे इथे शांकलीने टाकलेल रोपट्च ना जे नंतर मी गो ग्रिन नर्सरीच्या फोटोत टाकल होत.

मुंगुसासारखाच इथे एक वेगळा प्राणी असतो, त्याला मागच्या दोन पायावर उभे रहायची सवय असते. >>>>Meercat का दिनेशदा?

हो गिरिकंद, तोच तो मीरकॅट, अगदी क्यूट दिसतो.

दिलीपकुमार आणि मीनाकुमारीच्या कोहीनूर चित्रपटात साप मुंगुसाची मारामारी दाखवल्याचे आठवतेय. बहुतेक मधुबन मे राधिका नाचे रे, या गाण्यानंतरच आहे.

सांगायला आनंद होत आहे की दिड महिन्यापुर्वी मी काम करतो त्या कंपनीच्या आवारात जवळपास ७०-८० वेगवेगळी रोपे लावली आणी सगळीच्या सगळी जगली. Happy
आशा आहे, पुढच्या पावसाळ्यापर्यंत अजुन मोठी होऊन सर्व आवार हिरवेगार दिसेल.

वा वा वा गिरीकंद - क्या बात है.....खूपच उत्तम गोष्ट, हार्दिक अभिनंदन.......
कोण-कोणत्या प्रकारची झाडे आहेत ही ?

गिरिकंद खरच आनंदाची गोष्ट आहे. पण ती रोपे टिकवून ठेवण्यासाठी त्यांची निगा राखायला हवी, त्यांना पुरेसे पाणीही मिळायला हवे.

शशांक, मी त्या बद्द्ल फारशी माहीती घेतली नाही. Sad

जागु, सुदैवाने भरपुर पाऊस झाल्यामुळे आणी कंपनीत पाण्याचे ३ स्रोत असल्यामुळे फारशी काळजी करावी लागणार नाही असे वाटते. Happy

आणी हो, मी स्वतः लावलेल्या झाडाकडे मी जातीने लक्ष पुरवत आहे. माळ्याने मला त्या रोपाचे नाव सांगितले होते पण मी विसरलो.

श्री गिरीश यांना आमच्यातर्फे (मी व अंजू) हे गुलाबाचे फुल - प्रेमपूर्वक -

r5.jpg

जागूतै म्हणताहेत ते खरेच, पण तुम्ही / कंपनीने तशी तयारी ठेवली असणारच बहुतेक....

श्री गिरीश यांना आमच्यातर्फे (मी व अंजू) हे गुलाबाचे फुल - प्रेमपूर्वक - >>>शशांक, मंडळ आपले आभारी आहे. Proud

तसे पण मला फुले, पक्षी यातले फार काही फारसे कळत नाही, पण तुमची येथली चर्चा भावली मनाला, म्हणुन डोकावलो. मी काम करतो ती कंपनी शहरापासुन बरीच दुर आणी आजुबाजुला बरीच शेती असल्यामुळे बरेच पक्षी, फुले दिसतात, पण कामाच्या धबडग्यात दुर्लक्ष करावे लागते. Sad

गिरीकंद म्हणजेच तुम्ही आता निसर्गप्रेमी झाला आहात. तुमचे स्वागत आहे ह्या धाग्यावर.

सर्व निसर्गप्रेमिंसाठी हे निसर्गचित्र भेट. ही सुगरण तिच्या घरटे विणण्याच्या कामात किती व्यस्त आहे बघा.

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा

इलुशेच पंख त्याचे
इलुशीच चोच
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

जागु ने इथे जो सुगरणीचा घरटं बांधतानाचा फोटो टाकलाय तो पाहुन मला बहिणाबाई चौधरी आठवल्या. आजचा दिवस छान आहे.

श्रीकांत खुप छान वाटल वाचून.

अजुन एक
अरे खोप्या मंदी खोपा
सुगरणीचा चांगला
तिचा झाडामंदी जीव
जीव झाडाले टांगला.

असाच जीव आम्हा बायकांच्या आमच्या लेकरांसाठी बाहेर गेल्यावर टांगलेला असतो.

नमस्ते, मी नियमित वाचक आहे ह्या बाफ्ची पण लिहायला जमत नाहि.
माझ्या माहेरि घरामागे मुंगुसाचे कुटुंब राह्ते. त्याचा फोटो आहे. जमल्यास लोड करेन.

जयु जमल्यास नको नक्की कर.

नितीन मी आत्ता लिहीले होते. पण मलाच ते वाचताना जड वाटले. सोप्या भाषेत तुम्हाला जिप्सी किंवा दिनेशदा सांगतील.

शांकली, खूप खूप धन्यवाद. मस्त आहे ग फूल. Happy
शशांक मस्त फुल आहे.
जागू, मस्त फोटो आणि फोटोग्राफि Wink
श्रीकांत, छानच आहे ही कविता.
जागू, मलाही हीच कविता आठवते, सुगरणीचे घरटे पाहिल्यावर. (तेव्हढीच तर माहीत आहे :फिदी:)
गिरी, या धाग्यावर तुझ मनापासून स्वागत Happy
हे तुझ्यासाठी
DSCN0041.jpg

गिरी, आता तू पण जरा फोटो काढायचं मनावर घेच. Lol (आमच्यासाठी :डोमा:)

Pages