Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे एवढी गर्दी ?
बापरे एवढी गर्दी ?
(No subject)
जाहिरात झाली कि असेच होणार.
जाहिरात झाली कि असेच होणार. अगदी खरं सांगतो, सातारा हे आमच्या यायच्या जायच्या रस्त्यावरच होते. मुंबई कोल्हापूर एस्टी, सातार्यात जेवणासाठी थांबायची, पण त्या काळात कधिही कासचे नाव ऐकलेसुद्धा नव्हते. (फुले तर त्या काळातही उमलत असणार).
(फुले तर त्या काळातही उमलत
(फुले तर त्या काळातही उमलत असणार).>>>>>>. होती का नक्की तेव्हा ही इतकी फुलं?
शांकली प्रस्तावना छान आहे.
हा पहा फर्नचा पहिला वहिला तुरा - अर्थातच मॅक्रो मोड.
पहिला फोटो - ही फर्नची हँगिंग कुंडी. लोंबणार्या फांदीच्या अगदी शेवटाला अस्पष्ट असा तुरा दिसतोय.
बाकी क्लोजप्स मॅक्रो मोडात!
सुंदरच आहे तुरा. मानूषी
सुंदरच आहे तुरा.
मानूषी नक्कीच असणार.
रोरायमा पर्वताबद्दल मी लिहिले होते का इकडे ? व्हेनेझुएलाच्या सीमेवर हा पर्वत आहे. सर्व बाजूंनी उभे ताशीव कडे, भरपूर पाऊस असे तिथले वातावरण असते.
पावसाच्या जास्त प्रमाणामूळे मातीचा वरचा थर फारसा सुपि़क नाही, जास्त करुन कातळच. तिथेही अशीच एकमेव प्रजाती असणारी अनेक फुलझाडे आहेत. बाजूच्या जगापासून संपर्क तूटल्यामूळे त्यांची उत्क्रांती अगदी वेगळीच झाली. बाकिच्या प्रजातीशी संकर होऊ शकला नाही.
कासला पण तशीच परिस्थिती आहे का ? म्हणजे कातळ, मातीचा थर तितकासा जाड नाही, जमीन सुपिक नाही.. असे असावे का ?
ऐतिहासिक काळाच्या आधीपासून वसलेल्या एका शहराजवळची जमीन, इतकी वर्षे पडीक कशी राहिली. ?ती सुपिक असती तर कधीच लागवडीखाली आली असती.
इथली फुलझाडे कमी आयुष्यमान असलेली असणार. वर्षभर तग धरत नसावीत बहुदा.
पण मग लोकांना माहिती नव्हतं
पण मग लोकांना माहिती नव्हतं का?( सांगलीला आमच्या वर्गात प्रॉपर कासचाच एक मुलगा होता.)
कास पठारावर जांभा दगड आहे.
कास पठारावर जांभा दगड आहे. त्याच्या सच्छिद्रपणामुळे पावसाचं पाणी वाहून जातं. माती लालसर रंगाची आहे. पण ती तितकीशी सुपीक नाही. पाऊस थांबला की तिथे एकदम रखरखाट जाणवतो. त्यामुळे ती इवली इवली, नाजुक आणि पावसाच्या मानावर फुलणं अवलंबून असणारी रानफुलं अल्पजीवी आणि त्या भागापुरतीच मर्यादित रहातात. कारण त्यांची जडण घडणच अशा वातावरणात तग धरून रहाण्यासारखी झालीये.
रानफुलांची प्रस्तावना आवडण्यासारखीच आहे...फुलांची व्यथा नेमक्या शब्दांत मांडली आहे.
मानुषी फुलांचा तुरा काय सुंदर दिसतोय! आलं पाहिजे एकदा बाग बघायला.
मानुषी फुलांचा तुरा काय सुंदर
मानुषी फुलांचा तुरा काय सुंदर दिसतोय!>>>>+१
आलं पाहिजे एकदा बाग बघायला.>>>>मी पण, मी पण
जिप्सी......(हसणारी स्मायली)
जिप्सी......(हसणारी स्मायली) (अरे कोणीतरी मला असं वाक्यं लिहिलं की स्मायलीज कशा टाकायच्या ते शिकवा बरं.....) (नवरा शिकवत नाहीये.....तो कंटाळला शिकवून!)
शांकली, : हे आणि ) एकत्र
शांकली,
: हे आणि ) एकत्र टाईप करा पाहू पटकन (माझ्यासारखे
)
(No subject)
ओह! असं करायचं होय! मग सोप्पं
ओह! असं करायचं होय! मग सोप्पं आहे की! मी उगीचच घाबरत होते. आणि नवरा मुद्दामून मला बावळट बनवत होता! (हे नवर्याला सांगू नका हं कोणी ) तो म्हणेल बावळटाला काय बावळट बनवणार!
१. : हाहा : हे तीनही एकत्र
१. : हाहा : हे तीनही एकत्र करा


२. : हहगलो : तीनही एकत्र करा
३. : फिदी : तीनही एकत्र करा
जिप्सी............(वाSSSSSS)
जिप्सी............(वाSSSSSS)
शांकली, : फिदी : यामध्ये
शांकली,
: फिदी : यामध्ये स्पेस ठेवू नका (: आणि फिदी मध्ये).
हं ते केलं दुरुस्त. पण
हं ते केलं दुरुस्त. पण स्मायलीज टाकायला शिकवल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद.
सगळ्या स्मायल्या एकत्र
सगळ्या स्मायल्या एकत्र

शांकली, जिप्सी, सर्वांना माझी
शांकली, जिप्सी, सर्वांना माझी बाग म्हणजे फार मोठं "प्रकर्ण" वाटतंय , याचा अर्थ माझे फोटो बरे येताहेत असा घेऊ का?
:).....जिप्सी तू सांगितल्याप्रमाणे केलं तर हे ): असं येतंय!
शांकली, जिप्सी या की आमच्या नगरला!
अरे हे स्मायली प्रकरण मलाही जमलं नाही. अजूनही!
अरे वर आपोआप कशी आली
अरे वर आपोआप कशी आली स्मायली?
:::) ): आता का नाही येत?
हे काय थोड्या वेळाने का
हे काय थोड्या वेळाने का येतेय?
):
अर्थात मानुषी, फोटो मस्त आलेत
अर्थात मानुषी, फोटो मस्त आलेत सगळे.
अगं तुला जो प्रॉब्लेम आलाय तोच मला पण आलाय. पण जमेल बहुधा........
मानुषी, शांकली हि लिंक चेक
मानुषी, शांकली हि लिंक चेक करा:
स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत
http://www.maayboli.com/node/1818?page=5
आजच्या सकाळ मधे बातमी
आजच्या सकाळ मधे बातमी होती
रविवारी कास ला भेट देणार्यांचा अधिकृत आकडा ७५००० तर एकूण ११००० वहाने तेथे आली होती.
सचिन
सचिन

स_सा, तेवढी फुले तरी असतील का
स_सा,
तेवढी फुले तरी असतील का तिथे ?
मानुषी - वर जे हँगिंग मधील
मानुषी - वर जे हँगिंग मधील फुलांचे फोटो टाकलेत ते अॅस्पॅरॅगस फर्नचे आहेत ना ?
ते वाढलेही सुंदर व फोटोही छानच.
कालपासुन मॉर्निंग वॉक चालू
कालपासुन मॉर्निंग वॉक चालू केलय. सकाळी रोज मस्त रानफुले फुललेली दिसतात. बर्याच जणांच्या घरासमोर, रस्त्यावर प्राजक्ताचे सडे पडलेले असतात. खुप छान वाटत.
"कास" हे एक फॅड झालंय. या
"कास" हे एक फॅड झालंय. या फॅडपायी तिथला निसर्ग थोडातरी नाश पावणारच
तिथे पुर्वीही आणि यापेक्षाही जास्त फुलं फुलत असतील पण सगळ्याचंच व्यावसायिकीकरण झाल्यावर लोकं धो धो पळायला लागली तिथे. महाराष्ट्रातच अजूनही कितीतरी ठिकाणं अशी असतील की तिथे माणसाचा स्पर्श न झाल्याने निसर्ग भरभरुन उधळण करतोय. देव करो आणि मनुष्याची व्यवहारी नजर तिथे न पडो. कोणे एके काळी किहिमचा किनाराही निर्मनुष्य असायचा पण ती शांतता देवाच्या निसर्गाच्या रुपाजवळ नेणारी ठरायची. आता कसं आहे कुणास ठाऊक.
परवा टिव्हीवर आंबोली दाखवत होते. असंच अफाट निसर्ग सौंदर्य. मी साधनाला लगेच फोन केला होता पण तिने उचललाच नाही. तेवढ्यात तो प्रोग्रॅमच संपला.
मॉर्निंग वॉक...मी पण रोज
मॉर्निंग वॉक...मी पण रोज ठरवून मोजून ३ वेळा गेले होते...इकडे मधे कोणीतरी म्हटलं होतं, पुण्यात सारसबागेच्या आलीकडे सणस प्लाझापाशी गोरखचिंचेचं झाड आहे...मला ते नीट ओळखता आलं नाही...काही विशेष खूण आहे का ते झाड ओळ्खायला... (फारचं अज्ञानी प्रश्न आहे... :(... )
कासं बद्दल आज आलय सकाळ मध्ये...
प्लाझापाशी गोरखचिंचेचं झाड
प्लाझापाशी गोरखचिंचेचं झाड आहे..<< बरोब्बर
त्या चौकातच टिळकरोड वर स्वारगेट कडे रस्ता जातो त्या दिशेला आहे
गोरख चिंचेचा नेट वर मिळालेला फोटो

Pages