निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन तिसर्‍या भागासाठी हे माझ्या बागेतलं "या वेलीवर पहिले वहिले" फूल!
प्रकाशचित्रातही टाकलं आहे. या फुलाचं नाव काय? आणि ही वेल आहे की झाड? कुंडीत सरळ उभं आलं आहे...पण सुतळीचा आधार द्यायला लागला. आता सध्या तर वेलच वाटतेय.

DSCN0479_0.JPGDSCN0483.JPGDSCN0485_0.JPGDSCN0488_0.JPGDSCN0490_0.JPG

Happy

अरे व्वाह!! तिसरा भाग आला Happy सर्वांचे अभिनंदन Happy

जिप्सी करमळाचे फोटो सुंदर आलेत. वेगळ्या धाग्यात पण टाक.>>>>>>नक्कीच Happy

तिसर्‍या भागात सगळ्यां निसर्गप्रेमींच (एका वाचकाकडुन) अभिनंदन आणि आभार !
काही लोकांची छान साथ लाभल्यामुळेच,देत असलेल्या माहितीमुळे,फोटोमुळेच हे पान भरुन वाहत आहे !

जागु,
कृष्णकमळाचे फुल खासच आहे, तेही शंभर पाकळी असलेलं !
मानुषी,
हे फुल कशाच आहे, ते समजलं नाही,पण छान आहे.
सुशोलभा,
फोटो छान आलाय ! हा फोटो कुठे काढला आहे ?
Happy

तिसरा धागा. मस्तच. ही वरची वेल, फुलं छानच आहेत. माझ्या घरी कृष्णकमळ अन ही पिवळ्या फुलांची वेल, दोन्हीही आहे.

वा तिसर्‍या भागाबद्द्ल धन्यवाद. फार वर्षानी क्रुष्ण्कमळ पाहिले.
दिनेशदा, पुण्यात येताय? कधी?

ह्या कृष्णकमळाला आम्ही लहानपणी महाभारताचे फुल म्हणायचो. कारण ह्याच्या १०० पाकळ्या म्हणजे कौरव, मध्ये परागकणाच्या बाजुला असलेले ५ भाग म्हणजे पा.न्डव आणि मधला परागकण म्हणजे कृष्ण.

३ र्‍या पानाबद्दल-मुळात ज्यांनी हे सुरू केलं त्या जागू आणि साधना या दोघींचे अभिनंदन!

जिप्सी, कदंबाच्या फुलांचा फोटो सुंदर आलाय हं.

जागू कृष्णकमळाचा फोटो खूप आवडला.

हो हो हे अलामांडाच आहे. आमच्या कंपाउंड्मध्येच आहेत ह्याची दोन दोन झाड.
जिप्सी मस्त फोटो.

शांकली, यो, धन्स.

साधना तुझ्यासाठी मी तोंडलीचा वेल, रामफळाची रोपे ठेवली आहेत. अजुन काय हव होत तुला ?

आज सकाळी घरातून निघाल्यावर कदंबाखाली येऊन छत्री बाजूला करुन वरती लगडलेल्या चेंडूंकडे अर्धं मिनिट पहात बसले. Happy

अश्विनी तु आता आमच्यातली म्हणजे आमच्यासारखी व्हायला लागली आहेस. माझे लक्षही रस्त्यावरुन जाताना कधीच समोर नसत. गाडी चालवतानाही मी कडेची झाडच न्याहाळत जाते.

Pages