निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या महाराजांना ४ व्हिलरमध्ये प्रवास करायचा होता की गाडी गाडी खेळायच होत कोण जाणे ? परवा टायरमध्ये दिसले जांभया देताना मग हळू हळू बाहेर आले. आम्ही सर्पमित्राला बोलावल होत पण त्यांनी बिनविषारी आहे म्हणून सोडून दिल. पाणशिरडा आहे अस म्हणाले.

शोभा Happy

जागू, हक्काची जागा असल्यासारखा बसलाय.
पण ती रचना त्याला बिळासारखीच वाटली असणार !

जागू Lol
त्याला ४ चाकीचा मोह पडला असेल आणि मनात म्हणाला असेल; चला जरा गाडी गाडी खेळून बघूया!

जागू त्या फुलांना काशीद/कसोड असं म्हणतात.रस्त्याच्या कडेने ही झाडं खूप दिसतात नाही? इथे पुण्यात तरी खूपच आहेत.बहावा,तरवड,टाकळा,काशीद हे सर्व एकाच कुटुंबातले आहेत.

मी साधनाला, अंबोलीला भीमाच्या वेलीवरची फुले शोधायला सुचवले होते, ती
साधारण अशी दिसतात. याचे नाव माहित नाही, पण याचीही अजस्त्र वेलच असते.
मोठ्या झाडाच्या आधाराने वाढते. फूल उमलते त्यावेळी ते पांढरे असते मग असे
सोनेरी होत जाते.
फोटोमधून आकाराची कल्पना येणार नाही, पण याचा व्यास साधारण १५ सेमी
असतो आणि देठासकट उंची २० सेमी.
याचे परागीवहन कुणीतरी मोठा किटक किंवा वाघूळ करत असणार.

भीमाच्या वेलीचे शास्त्रीय नाव Beaumontia jerdoniana
हे फूल सहा पाकळ्यांचे असते तर ते पाच पाकळ्यांचे.

भीमाच्या वेलीला नेटवर पाहिले. नेपाळ ट्रंपेट नाव आहे. फुले इथल्या ट्रंपेटसारखीच वाटली. आंबोलीला शोधेन नक्कीच. एक दिवस घाटातच घालवणार आहे Happy

जागु,शांकली
धन्स ! बहावा,तरवड,टाकळा,काशीद यात फरक आहे हे समजलं, पावसाळ्यात बहुतेक ओढ्यावर ही झाडे हमखास बहरलेली दिसतात, तरवड ही गावाकडे आजही पानमळ्याभोवती (कुंपणाचा एक भाग) हमखास लावली जाते, पानमळ्यातली निघणारी केळी पिकवण्यासाठी फक्त याचाच उपयोग (नो केमीकल पावडर) होतो

जागू, तू गळ्यात मंसुमध्ये वाट्यांबरोबर कॅमेराही गाठवून घेतला आहेस काय? Lol

कुठेही काय हे साप येऊन बसतात? आता एखादा न बघता गाडीवर बसला आणि गाडी सुरु झाल्यावर तो साप त्याच्या पायावर हुळहुळला तर काय वाट लागेल.

अश्वे Lol
नवर्‍याला तर हल्ली मी पत्रकार वगैरे असल्यासारख वाटत. श्रावणी पण मी कॅमेरा बाहेर काढला की बोलते झाल हिच सुरु Lol

काल पुण्यात या वर्षातल्या मोठ्या आणि तुफानी पावसाने अनेक झाडे मोडुन पडलेली दिसली, रस्ते तर स्वच्छ धुऊन काढले गेले ...
काल पावसात जाताना या वाक्याची आठवण आली ...
पाऊस सगळ्यांना कधी कधी पुर्ण झुकायला लावतो, न झुकणार्या झाडाच्या फांद्याना मोडुन पडाव लागत

अनिल, झाडे कोसळण्याचे नुसते वारा / पाऊस हे कारण नाही, अनेकवेळेला केलेल्या खोदकामाने त्यांची मूळे आधीच कमकुवत झालेली असतात. नको त्या फांद्या छाटल्याने झाडाचा तोलही ढळलेला असतो.

आमच्याकडे पण अनेकदा वादळे होतात, पण झाडे कधीच पडलेली बघितली नाहीत मी इथे.

काल सकाळी मला ऑफीसच्या कँपसमधे मुंगुस दिसले. मला क्रॉस करून छान पोझ देऊन परत माझ्याकडे पाहात होते. एखादवेळेस पाच पावले मागे येण्याच्या विचारात होते की मी नि.ग.चि वाचक आहे म्हणजे त्याचा मस्त फोटो माबोवर झळकेल ह्या विचारात होते (मुंगुस) कोण जाणे! Happy

आज संध्याकाळी आमच्याकडे भरपुर विजांचा कडकडाट होत होता. पाउसही अजुन चालू आहे.

प्रज्ञा मला ना एकदा ह्या मुंगुसाच कुटुंब दिसल होत. दोन मुंगुस आणि त्यांची २-३ पिल्ल. सगळे रस्त्याच्या कडेला माकडांसारखे पोझ देऊन बसले होते. खुप छान वाटल ते बघताना.

प्रज्ञा तू नि.ग.छायाचित्रकार असा बिल्ला लावून फिरतेस वाटतं? Happy Light 1
मग मोबाईलने तरी काढायचेस ना त्यांचे फोटो. बघायला आवडले असते आम्हाला.

एखादवेळेस पाच पावले मागे येण्याच्या विचारात होते >> त्यांच्यातही 'माणूस आडवा गेला की पाच पावले मागे जावे' असा रास्त-समज आहे वाटते? Happy

काल भांडुपला वीज पडली असे वाचले. पुण्यातही पाऊस झाला... जरा विचित्रच वाटतय हे या दिवसात.
कोजागिरी म्हणजे कापणी झालेल्या पिकाची राखण करण्याचा दिवस, आणि त्या दिवशीच पाऊस !

कोजागिरीला आम्ही गच्चीच्या शेडखाली बसुन दुध आटवले. चंद्राची ओवाळणी करायला आकाशात चंद्रच नव्हता, ढगांनी आक्रमण केलेले बिचा-यावर. त्यामुळे दुधात चंद्र न पाहताच दुध मटकावले आणि झोपलो. कोजागिरीच्या संध्याकाळी गावीही तुफान पाऊस होता, अगदी भर पावसाळ्यात असतो तसा. काय वाईट दिवस आलेत Happy शारद पोर्णिमा आकाश निरभ्र झाल्याच्या आनंदात साजरी करायची असते. इथे धो धो पाऊस पडतोय.

आणि दुष्काळात तेरावा म्हणजे मुंबई सोडुन पुर्ण महाराष्ट्रात विजेचे भारनियमन. सकाळी विज जायच्या आधी कपडे धुवुन व्हावेत यासाठी धावपळ करावी लागते.

मुंबईतली झाडे पावसाने खरेच पडत नाहीत. खोदकाम आणि नंतर डांबरीकरण करताना पुर्ण बुंध्यापर्यंत खडी घालुन झाडांची वाट लावतात.

प्रज्ञा, आम्ही लहान पणी मुंगुस दिसले की "मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत!!" अस म्हणायचो आणि मग ते हमखास आमच्या कडे बघायचे Happy आपल्या सुरक्षे करता सावध रहाण्यासाठी मुंगुस असं करतो हे आता कळते. पण बालपणी मुंगुस आपल्या कडे शप्पत घातली की बघतो यातली मजा काही औरच होती.

पुण्यात आमच्या सोसायटीच्या आवारात मी खुप वेळेला मुंगुस बघीतला आहे. धनकवडीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी मुंगुस नेहमी दिसतो याचे मला खुप आश्चर्य वाटते. Happy

मुंगुसांनी एकदा का त्यांची कॉलनी तयार केली की घुशीच्या वरताण जमीन पोखरुन बिळं करतात - फार वैताग आणतात - बागेची वाट लावतात पार.....सिंमेंट-काँक्रिटच्या घरांनाही (पायापाशी उकरुन) धोका पोहचवू शकतात.

Pages