निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी फोटो छान आलेत हं!
दिनेशदा,जिप्सी,जागू.........
पुष्प पठार कास यापुस्तकाची सुरुवात तिथल्या रानफुलांच्या मनोगताने आहे.(ते पुस्तक मी आत्ता कपाटातून काढलं रहावलं नाही म्हणून्).त्या फुलांचं मनोगत, श्री. इंगळहाळीकरांच्या शुभेच्छा फार वाचनीय आहेत.
तुमची हरकत नसेल तर आणि मा बो च्या नियमात बसत असेल तर ते फुलांचे मनोगत मी इथे टाईप करून देईन.
अंतर्मुख करायला लावणारं आहे ते म्हणून विचारलं...............
आणि तसं फार मोठं पण नाहीये ते.

शांकली, नेकी और पुछ पुछ Happy

माधव यांनीसुद्धा या पुस्तकाबद्दल सांगितले होते, आयडियलमध्ये गेलो होतो घ्यायला पण दुकान (रविवारी) बंद होते. Sad

मानुषी, निदान बाग बघण्यासाठी तरी नक्कीच यावेसे वाटतेय घरी.
शांकली, आम्हाला नक्कीच वाचायला आवडेल, (नियमाबाबत माहित नाही.)
फूल दिसल्यावर ते तोडायचा मोह का होतो, ते मला कळत नाही.
पुर्वी मी पण तोडायचो, पण गोव्यातील आणि आफ़्रिकेतील लोकांना बघून
मोह आवरला. आणि आता तर कॅमेरा असतोच.

मानुषी छान फोटो आहेत.
तसाच एकझोरा माझ्या आईकडे आहे. मी त्याची छोटीशी फांडी आणून लावली ती जगली. ह्या एक्झोराच्या छोट्या फुलांमध्ये मध असते ओढून खाण्याची. लहानपणी आमचा तो आवडता छंद होता.

ही आईकडे लागलेली काकडी

काकडीचे फुल

भेंडीचे फुल

एकझोरा

दिनेशदा, यू आर वेलकम!
अशी काही बाग वगैरे नाही. असंच काही आपलं छंद म्हणून लावलेलं आहे.
जागू सारखी तर नाहीच नाही. हो जागू तसं गुलमोहोराच्या फुलातली एक पा़कळी पण आम्ही खायचो.

मानुषी अग माझ्याकडे पण रचून केलेली बाग नाही ग. आणल झाड की जागा मिळेल तिथे लावायच अस करून झाडांची लागवड झाली आहे. पण प्रत्येक सिझनला कोणतीना कोणती फुले फुललेली असतात हे मात्र नक्की. सध्या प्राजक्त, तगर, गुलाब, जास्वंदी भरपुर फुलत आहेत. शिवाय कंपाऊंडच्या बाहेर रानफुलही भरपुर आहेत. चिकू, नारळ हे सुद्धा सतत लागलेले असतात.

पण प्रत्येक सिझनला कोणतीना कोणती फुले फुललेली असतात हे मात्र नक्की. सध्या प्राजक्त, तगर, गुलाब, जास्वंदी भरपुर फुलत आहेत. शिवाय कंपाऊंडच्या बाहेर रानफुलही भरपुर आहेत. चिकू, नारळ हे सुद्धा सतत लागलेले असतात.>>> _____^_____!!

जागू, काकडीचे फोटो मस्त!

बरं आता ऐका कास पठारावरच्या रानफुलांचे मनोगत................

प्रिय पुष्प मित्रांनो,

आपले स्वागत असो !

लक्षावधी वर्षे आम्ही फुलतो आहोत.आमच्याकडे कोणीसुद्धा बघत नव्हते.पण मागील वर्षामध्ये आपण येऊ लागलात.......
सुरुवातीला अप्रुप वाटायचे. परंतु गेली काही वर्षे, आपण आलात की पोटात गोळा उठतो !
आपल्या आधी आलेल्या लोकांनी आम्हाला तोडले नाही, म्हणूनच आम्ही तुम्हाला दिसत आहोत.
आपल्या नंतरच्या पिढ्यांना इथली सुंदर निसर्ग शोभा दिसावी असे वाटत असेल तर,......
.........तर आम्हाला तोडू नका. आमचे बीज येथेच पडू द्या. आमचा वंश येथेच वाढू द्या. आमचे हवे तितके फोटो जरूर काढा. पण..........आम्हाला काढू नका !
आम्ही तसे निराश होणारे नाही; आम्ही नक्कीच जगणार आहोत; आम्ही नक्कीच फुलणार आहोत.....दरवर्षी........वर्षानुवर्षे....

कारण, आमचे आशास्थान आहे......'रानवाटा', निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ,सातारा.

आपली आवडती,
रानफुले. मु.पो.पुष्पपठार कास.

चातक Happy

शांकली धन्स.

आज रानफुलांचे फोटो काढायचे हे ठरवल होत. पण सकाळ गडबडीत गेली. संध्याकाळी ४ वाजता गेलो आम्ही फुले बघायला पण बिचारी वाट बघुन मावळली होती. पण हार मानली नाही मी अजुन आता त्यांनी हार मानली नसेल तर पुढच्या रविवार पर्यंत थांबतील.

शांकली छानच लिहिलय लेखकाने.
आज लोकांमधे आवड निर्माण झालीय, हे खुपच चांगले लक्षण आहे.
आपल्याकडे बागांची परंपरा होती, तरी वनस्पति उद्यानाची नव्हती,
ती इंग्रजांनी सुरु केली. त्यांनी देशोदेशीचे वृक्ष आपल्याकडे आणून
रुजवले. आपणही ते जोपासले पाहिजेत.
मला वाटतं कास सारख्या आणखीही जागा असतील. पुरंदरगड,
पांचगणी, महाबळेश्वर ला पण अशी फुले फुलतात.
कोकणात पण अनेक ऑर्किड्स फुलतात. पण एकतर ती फार
उंचावर असतात आणि सहज दिसत नाहीत.
मला एकदा एस्टीमधून सुंदर ऑर्किड दिसले होते. योगायोगाने
बस थांबली होती, आणि सहज लक्ष गेले म्हणून दिसले.

जागू, काकडी वेगळीच आहे, आणि मागचा करांदा पण दिसतोय.
बागांमधे शिस्तीत लावलेली आणि हवी तशी लावलेली, दोन्ही
प्रकार मन प्रसन्न करतात. काही धटींगण झाडे, इतर झाडांना
वाढू देत नाहीत, त्यांची काळजी घेतली कि झाले.

पुरंदरवर फ्रेरिया नावाची दुर्मिळ वनस्पती फुलते. इतर ठिकाणी ती फुलत नाही. पण वज्रगडावर फारशी वर्दळ नसल्याने ती बर्‍यापैकी शाबूत आहे.

नैरोबीचे हवामान आणि माती गुलाबाला किती पोषक आहे ते बघा.
हि तिन्ही फुले एकाच झाडाला आलेली आहेत.

आणि हे कुठल्याही बागेतले वगैरे झाड नाही, हे झाड भर रस्त्याच्या कडेला, इमारतीच्या बाहेर आहे.

इथे कुणीही फुले तोडत नाहीत.

वाह....काय सुंदर गुलाब आहेत....दिवसाची सुरवात छान झाली.... Happy

इथे कुणीही फुले तोडत नाहीत.>>> हे विशेष आहे...

जागू...काकडी आणि भेंडीचं फूलपण छान आहे...

शांकली, खुप खुप धन्यवाद. प्रस्तावना इथे शेअर केल्याबद्दल.

मस्तच
दिनेशदा पहिला फोटो खुप आवडला. Happy

जिप्स्या. इथले असेच आजूबाजूच्या गुलाबांचे फोटो काढण्यात तूझा पूर्ण दिवस जाईल.

नैरोबीचे हवामान आणि माती गुलाबाला किती पोषक आहे ते बघा.>> हो न, पानांचा चमकदार हिरवा गडद रंग आणि फुलांच्या तजेलदार पाकळ्या साक्ष देत आहेत.

पहीला फोटो छानच आला आहे.

पद्मजा, दिनेशदा धन्स.

आज येताना पण मनाची घालमेल होत होती. असंख्य रंगिबिरंगी फुले रस्त्याला फुललेली आहेत पण मला फोटो काढायला थांबता येत नाही. त्यात जरा पुढे आले तर धुर्त गार्डन मेन्टेनन्स वाल्यांनी रस्त्याच्या कडेची रानफुलांची झाडेच तोडून टाकली आहेत. मला लवकरात लवकर फोटो काढायला हवेत. काल २-३ फुलांचे काढले उमललेली होते त्यांचे.

एक्झोराच्या फुलातला मध मीही लहानपणी देठातून खाल्ला आहे. ती फुलं आम्ही कानात स्टड्ससारखी घालत असू.

दिनेशदा,
टोमॅटो उलटा टांगला. वाढला कि कुठे ठेवायचा असा प्रश्न सध्या आहे. सुचेल काहितरी. ह्यावेळी टोमॅटोच फळ मोठं व्हावं म्हणुन प्रयत्न करणार आहे. मागील दोन वेळी अगदि चेरी टोमॅटो आले.

मुंबईत, वरळीला आता जिथे नेहरु सेंटर आहे, त्याच्या समोर एक छान गुलाबांची बाग होती. आताही तिथे वेगळी बाग आहे.
अंधेरीला भवन्स कॉलेजच्या आवारात पण गुलाबांची बाग होती. या दोन्ही बागा बहरलेल्या मी बघितल्या आहेत. सांगायचा मुद्दा हा कि काळजी घेतली, तर मुंबईतही गुलाबाच्या उत्तम बागा वाढू शकतात.

जागू, काकडी दाखवून मला जळवू नकोस. Happy
अग लहानपणी ना आम्ही बोटा एवढ्या लहान, फुलातल्या काकाड्या काढून खायचो. आणि संध्याकाळी वडीलांची भरपूर बोलणी पण खायाचो. (आमच्या पेक्षा वडीलांना तीच त्यांची मुले जास्त प्रिय होती.)

शांकली धन्यवाद. छानच आहे प्रस्तावना.

आम्ही एक्झोराच्या पाकाळ्यांकडचा भाग साबणाच्या पाण्यात बुडवून, देठाकडच्या बाजूने फुंकर मारून फुगे उडवायचो. (प्रज्ञा, आठवतय का ग?)

दिनेशदा, गुलाब मस्तच.

नमस्कार

काल कास पठाराला भेट दिली. पण जे पाहिलं ते तितकसं चांगलं नव्हत आणि असेच चालू राहीचे तर लवकरच तेथील निसर्गसंपदा संपुष्टात येईल.

सविस्तर नंतर लिहितो

तिथे आता बंधने आहेत.<< काल कशालाही बंधने नव्हती, किती फुले तोडली गेली किती तुडवली गेली, ५००० ते ६००० हजार पब्लीक होते तिथे. Sad

पण जे पाहिलं ते तितकसं चांगलं नव्हत आणि असेच चालू राहीचे तर लवकरच तेथील निसर्गसंपदा संपुष्टात येईल.

किती फुले तोडली गेली किती तुडवली गेली, ५००० ते ६००० हजार पब्लीक होते तिथे>>>>>अरेरे Sad
मी पण ऐकलं कि काल खूप गर्दी होती. Sad

Pages