Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीत
माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीत जिथे मी मिक्सर ठेवलाय तिथे जाळीपलिकडे एका कबुतराने दोन अंडी घातलियेत. माझ लक्ष नव्हत या आधी पण दरवेळी मिक्सर सुरु केला की खिडकीतून कबुतरीण फडफड करत उडुन झाडावर बसायची. मला कळत नव्हत काल जेव्हा बघितल तेंव्हा कळल. आता मी मिक्सरची कामे सगळीच छोट्या खलबत्त्यात करतिये. मिक्सर हलवला तर त्यांचा आडोसा जाऊन माणसांच डायरेक्ट दर्शन झाल तरं ती बिचारी बिचकेल ना?
उद्या फोटु डकवते अंड्यांचे. कबुतरीण बाईंना कॅमेर्याच्या फ्लॅशची अॅलर्जी आहे दरवेळी उडुन जातात
शुभे आता महिनाभर तरी तुझा
शुभे आता महिनाभर तरी तुझा खलबत्यावर चांगला व्यायाम होणार.
दिनेशदा लायब्ररीत मिळत का पाहते ते पुस्तक. नाहीतर पुढच्यावेळी दादरला गेले की आणेन.
अजुन एक सांगायचे राहिले. मी काल सकाळी आमच्या ऑफिसपर्यंत मिळालेल्या रानफुलांचे फोटो काढले. काल १० ते १२ तेच करत होते. आहो घरात नव्हते म्हणून नणंदबाईंना घेउन गेले. तिचीही मदत झाली फुल दाखवण्यात. काल अजुन एक सुट्टी सार्थकी लागली ऑफिस एरीयात जाऊन.
शुभांगी, जाळीला काच असेल तर
शुभांगी, जाळीला काच असेल तर पक्ष्यांना काचेपलिकडचे दिसत नाही. आणि तसाही कबुतर हा पक्षी माणसांना बूजत नाही. (साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे तो.)
जागू, मुद्दाम बघच. कारण एकतर ते गोड्या पाण्यातील मासे आहेत आणि दुसरे म्हणजे त्या माश्यांच्या सवयी, पिल्ले याबद्दल खुपच रंजक माहिती आहे.
फुलांच्या फोटोची वाट बघतोय !
दिनेशदा आजच टाकले असते पण
दिनेशदा आजच टाकले असते पण घरचे नेट बंद आहे आणि अजुन माझ्या घराच्या मागिल फुलांचे फोटो काढायचे बाकी आहेत. म्हणुन २ दिवसांत टाकतेच.
मारुती चितमपल्लींची सारीच
मारुती चितमपल्लींची सारीच पुस्तके निसर्गवेड्यांच्या आवडीची. पक्षी जाय दिगंतरा हे अजुन एक नाव आठवतय मला. मी आता सगळी सीरीजच गोळा करणार आहे त्यांची.
साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे
साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे तो
शक्य असते तर मी त्याला हद्दपार केले असते. मी आज सकाळी चिमण्यांना तांदुळ घातलेले, त्या मुर्खांना समोरचे तांदुळ दिसत नव्हते. कबुतरे मात्र मला पाहुन लगेच धावत आली आणि दोन मिनिटात सगळ्या तांदळाचा फन्ना उडवुन गेलीही. मुर्ख चिमण्या नी कावळे चोची चोळत बसते...
शुभांगी एवढी काळजी नको घेऊस त्यांची. त्यांना अंड्यांचे काही पडलेले नसते. घरटे बांधायचा पण कंटाळा...
मुर्ख चिमण्या नी कावळे चोची
मुर्ख चिमण्या नी कावळे चोची चोळत बसते... राग>>>>
हा हा हा हा........पंचेस जमलेत अगदी........
शांकली, थोडं विषयांतर होतंय
शांकली, थोडं विषयांतर होतंय पण अगदिच रहवत नाही म्हणून सांगते . पु.ल.देशपांडे विषयी खूप माहिती असलेली ही साईट सर्वांनी जरूर वाचा.
www.puladeshpande.org
शुभांगी शक्य असल्यास ते घरटे
शुभांगी शक्य असल्यास ते घरटे काढून टाका. कबुतरं आणि त्यांची पिल्ले अतिशय घाण करून ठेवतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तुमच्या किचनजवळ घरटे असणं आरोग्यदॄष्ट्या योग्य वाटत नाही.
साधना +१ सस्तन प्राण्यात
साधना +१
सस्तन प्राण्यात माणूस आणि पक्षात कबुतर नको तितके फोफावले आहेत.
साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे
साधनाचा खास आवडीचा पक्षी आहे तो>>>>>माझ्याकडुन हि भेट
माधव जिप्सी... फोटो सुंदर
माधव
जिप्सी... फोटो सुंदर आहे रे.. पण पक्षी नालायक आहे त्याला काय करणार?? झुंडशाहीसमोर सगळे माघार घेतात हे कबुतरांची झुंडशाही पाहुन पटते.
अग ते जाळीच्या पलिकडे आहे.
अग ते जाळीच्या पलिकडे आहे. आणि ती कबुतरीण झाडावर बसुन लक्ष ठेवुन असते त्या अंड्यांकडे.
बाकी ती रात्रभर त्या अंड्यांजवळ असते. अस एकदम नको घरट काढायला. सेफर साईड मी त्या खिडकिला आतुन पुठ्ठा लावलाय त्यामुळे तो त्रास नाही.
एकदा का ती पिल्ले जन्मली की मीच ते घरट काढुन टाकीन.
तूर्कस्तानात कबुतरांच्या
तूर्कस्तानात कबुतरांच्या शिटेचा एक वेगळा उपयोग शोधून काढलाय. कातडी कमावण्याच्या कामात या शिटेचा खुपच चांगला उपयोग होतो. त्यासाठी मुद्दाम कबुतरे पाळली जातात.
दुबई मधे मात्र त्यांचा त्रासच होतो. त्यांच्या शिटेमूळे इमारती खराब तर होतातच पण लोखंडी वस्तूंना गंज चढतो. तिथे कबुतरांना हुसकावून लावण्यासाठी खास प्रशिक्षित ससाण्यांचा वापर होतो.
-- हे सगळे ह्यूमन प्लॅनेट मधून कळले !!
घरटे बांधलेय का ते आधी
घरटे बांधलेय का ते आधी पाहिलेस का? माझा आजवरचा अनुभव असाय की जर खिडकीचा छज्जा वगैरे मिळाला तर कबुतरे अंडी सरळ त्या छज्जावरच घालतात. उगीच त्या काड्या जमवुन आणा, घरटे बांधा वगैरे उद्योग कोण करेल??
तुझी कबुतरे कामसु दिसताहेत. घरटे बांधलेय, वर कबुतरबाई लक्षही ठेऊन आहेत. माझ्या आईच्या खिडकीत कबुतरांनी अंडी अशीच टाकलेली आणि कबुतरबाई नी बाबा दिवसभर भटकंतीवर जात. आई बाकीचे उद्योग सोडुन कावळ्यांवर लक्ष ठेवत बसे, आपल्या खिडकीच्या आश्रयाला आलेल्या कबुतरांची अंडी कावळ्यांनी खाल्ली तर आपल्याला चैन पडणार नाही असे उगिचच तिच्या मनाला वाटे म्हणुन...
कबुतरांची अंडी कावळ्यांनी
कबुतरांची अंडी कावळ्यांनी खाल्ली तर आपल्याला चैन पडणार नाही असे उगिचच तिच्या मनाला वाटे म्हणुन..
कबुतरांवरचा राग साधनाच्या प्रत्येक वाक्यात व्यक्त होतोय.
कबुतरं आमच्या कुंडीतली झाडं
कबुतरं आमच्या कुंडीतली झाडं उपटतात. नवं रोपटं लावलं की तोडून टाकतात. मध्ये गुलाबाच्या रोपट्याला आलेल्या पालव्या तोडून टाकल्या. बिचारं गुलाबाचं रोप वाचेल का याची खात्री नाही
ती झाडं का तोडतात, हे माहित आहे का?
कबुतरं झाडं तोडत नाहीत. पण
कबुतरं झाडं तोडत नाहीत. पण साधनाने सांगितल्याप्रमाणे ती इतकी आळशी असतात की घरटी सहसा बांधत नाहीत. हल्ली बर्याचदा ती कुंड्यांच्या आडोशालाच अंडी घालतात. कुंडीतले झाड डेरेदार असेल तर चक्क त्या खालीच अंडे घालतात. इतर वेळेलाही कुंड्यांच्या आडोशाला येउन बसतात. जाता येता त्यांच्या फडफडीने नाजूक झाडे / कळ्या तुटतात.
कबुतराच्या शी चा उपयोग
कबुतराच्या शी चा उपयोग टक्कलावर केस उगवण्याच्या औषधीत केल्याचे वाचले आहे मी..
कबुतराच्या शी चा उपयोग
कबुतराच्या शी चा उपयोग टक्कलावर केस उगवण्याच्या औषधीत केल्याचे वाचले आहे मी..
>>> सारीका, हे केसांचे आरोग्य बाफावर नेऊन लिहायची हिम्मत कर पाहू
अश्विनी नक्की उपाय टाकेन..
अश्विनी नक्की उपाय टाकेन..
अश्विनी रानफुलांची मराठीत
अश्विनी
रानफुलांची मराठीत नावे असलेली कोणते संकेतस्थळ आहे का?
तर ती (साधना) कुठलं गाणं
तर ती (साधना) कुठलं गाणं म्हणेल ?
कबुतर जा जा जा, कबुतर जा जा जा !!!!
जागू, फ्लॉवर्स ऑफ संह्याद्री
जागू, फ्लॉवर्स ऑफ संह्याद्री मधे मराठी नावे आहेत. याचे दोन भाग आहेत, जरा महाग आहेत पण संग्रही ठेवण्याजोगे आहेत.
सचिन ची रानफुले साईट आहे तिथे
सचिन ची रानफुले साईट आहे तिथे बघ ना..
बर बघते मिळत का ते फ्लॉवर्स
बर बघते मिळत का ते फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री आणि सचिनची वेबसाईट.
दिनेशदा,साधना (आता हे एवढं
दिनेशदा,साधना
(आता हे एवढं वाचुन खरंच कबुतर (बास) जा..जा..हे गाणं म्हणावस वाटतयं)
कासबद्दल वाचुन लगेच, कालच्या रविवारी मी दिघीजवळ (पुण्याच्या जवळ असणारा), घराच्या शेजारीच असलेल्या डोंगरावरुन खुप दिवसानंतर फेरफटका मारला,तिथला सुंदर फुलांचा गालीचा जवळुन पाहिला,खाली विस्तीर्ण अशा धरणीमातेच आल्हादायक हिरवं पांघरुन (तेही फुकटात) खुप दिवसांनी पाहुन मनाला खुप बरं वाटल.
अनिल, मी म्हणालो नव्हतो,
अनिल, मी म्हणालो नव्हतो, बहुतेक गावाच्या लगत अशी पडीक जमीन असतेच आणि तिथे रानफुले, रानभाज्या आपसूक उगवतात. कासला जरा पठार विस्तीर्ण असेल.
जागू, ही दोन्ही पुस्तके फिल्ड गाईड म्हणून उपयोगी पडतात.
फुलांचे वर्गीकरण उमलण्याच्या काळावरुन, रंगावरुन, आकारावरुन, वेल, झुडुप, वृक्ष असे चांगले केलेय. आणि शेवटी अकारविल्हे यादी आहे.
कबुतरांना हाकलण्यासाठीचा
कबुतरांना हाकलण्यासाठीचा खात्रीचा उपाय. (खास करून साधनासाठी..........)
कुंड्यांमधे संपलेली रिफील्स उभी खोचून ठेवायची. माझ्या अनेक मैत्रिणींकडून हा प्रयोग यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे 'कबूतरपीडित' मंडळींना जरा दिलासा मिळावा अशी अपेक्षा............
(कृपया हा विनोद समजू नये. प्रत्यक्ष प्रयोग करून बघावा ही नम्र विनंती).
कबुतरे झाडे तोडतात. माझ्या
कबुतरे झाडे तोडतात. माझ्या घरातले मिरचीचे रोप आणि गुलाबाचे रोप कबुतरांनी तोडलय. मला आठवूनही भयंकर चिड येतेय.
Pages