निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कास" हे एक फॅड झालंय. या फॅडपायी तिथला निसर्ग थोडातरी नाश पावणारच तिथे पुर्वीही आणि यापेक्षाही जास्त फुलं फुलत असतील पण सगळ्याचंच व्यावसायिकीकरण झाल्यावर लोकं धो धो पळायला लागली तिथे. महाराष्ट्रातच अजूनही कितीतरी ठिकाणं अशी असतील की तिथे माणसाचा स्पर्श न झाल्याने निसर्ग भरभरुन उधळण करतोय. देव करो आणि मनुष्याची व्यवहारी नजर तिथे न पडो. >>>>>>अश्विनीला अनुमोदन Sad

पद्मजा - गोरखचिंच - पुण्यात - टिळक रोड व बाजीराव रोड जिथे क्रॉस होतात तिथे मेहेंदळे म्युझिक वाले यांचा वाडा आहे तिथे हा भलमोठा वृक्षराज आहे - अगदी रस्त्यावर - त्यावर पाटीदेखील आहे.
झाडांविषयी प्रेम महत्वाचे - नाव माहित असणे / झाड ओळखता येणे फार महत्वाचे नाही - माझे वैयक्तिक मत.

पावसाळा संपता संपता पुण्याच्या आसपास - पुरंदर, कात्रज, पानशेत रस्ता, पौड रस्ता अशा कुठल्याही रस्त्यावर इतकी रानफुले दिसतात की "कास"लाच जायला पाहिजे का असे राहून राहून वाटते - वैयक्तिक मत.

झाडांविषयी प्रेम महत्वाचे - नाव माहित असणे / झाड ओळखता येणे फार महत्वाचे नाही सहमत.

पद्मजा आधीचे निसर्गाच्या गप्पांचे धागे वाचुन काढ गोरखचिंचेचे फोटोही आहेत त्यात. पहिल्या भागात मी पहिल्या पानावर अनुक्रमणीकाही दिलेली होती. इथेही वेळ मिळाल्यास करेन.

आधीचे निसर्गाच्या गप्पांचे धागे वाचुन काढ गोरखचिंचेचे फोटोही आहेत त्यात. >> हो..ते वाचलेलं आठवतयं, बघते परत...

सग्ळ्यांनाच धन्यवाद.. Happy

अरे अश्विनी, सॉरी यार.. तुला फोन करायचा राहुन गेला.

आंबोली खुप वेळा दाखवलंय दुरदर्शनवर. काहीच मिळाले नाही की आंबोलीची कॅसेट लावतात Happy

कासला जी फुले पाहिली इथल्या फोटोंमध्ये त्यापैकी बरीचशी आंबोलीलाही फुलतात. हिरण्यकेशीच्या वर असलेल्या डोंगरावर तर मी पावसाळ्यात सोनकीचे पिवळे धम्मक माळ पाहिलेत, तेरड्याचे लाल्-वायलेट माळ पाहिलेत. सुदैवाने पावसाळ्यात तिकडे जळवांचे राज्य असल्यामुळे सहसा कोणी जात नाहीत. कास हे खरेच फॅड झालेय. आता तिथली सगळी फुले नष्ट झाल्याशिवाय लोक सोडणार नाहीत बिचा-या पठाराला एकटा. Sad

कासला जी फुले पाहिली इथल्या फोटोंमध्ये त्यापैकी बरीचशी आंबोलीलाही फुलतात. >> पुढच्या भाद्रपदात नि.ग. वाल्यांचे गटग करुया का तिकडे?

दिनेश, हो कासच्या पठारावर प्रामुख्याने कातळच आहे. मातीचा थर खूप पातळ आहे आणि पडणार्‍या पावसाने तो धुपून जातो. परत ती माती अतिशय निकस आहे त्यामुळे झाडांना पोषणाकरता किटकांचा आसरा घ्यावा लागतो त्यामुळे तिकडे किटकभक्षी वनस्पती दिसतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर फुले फुलतात कारण त्या झाडांना फक्त २-३ महिनेच मिळातात जगायला आणि त्या दोन महिन्यातच पुढचे अस्तित्व टिकवून ठेवायची सोय करायची असते. तयार होणारे बी कातळावर वार्‍याच्या मार्‍याला पुरून पठारावर उरेल की नाही, उरलेच तर कातळावर रुजेल की नाही अशा अनेक शक्याशक्यता विचारात घेऊन निसर्ग अमाप प्रमाणात बीयांची निर्मीती करतो - सॅमन माशांप्रमाणे. पण ह्या एवढ्या अमाप फुलांनाही पुरून उरेल असा प्राणी त्यानेच निर्माण केला आहे याची त्याला कल्पना नसेल.

पण ह्या एवढ्या अमाप फुलांनाही पुरून उरेल असा प्राणी त्यानेच निर्माण केला आहे याची त्याला कल्पना नसेल.

मागचे वाचले नाही काय?? त्याला आता ह्या रांगोळीचा कंटाळा आलाय, म्हणुन हा स्पेशल प्राणी निर्माण केलाय सगळी रांगोळी पुसायला. एकदा ह्या प्राण्याचे काम आटोपले की निसर्ग परत नवनिर्माणाच्या कामाला लागेल Proud

आंबोलीला एनी टाईम इज विझीट टाईम. Happy एकदा फुललेली फुले बघायला, नंतर फुले नसताना पठार कसे दिसतात ते बघायला Happy

माधव रोरायमा पर्वतावर पण असेच आहे. त्याच्या उभ्या कड्यांमुळे त्यावर चढाई जवळपास अशक्य आहे. फारच थोड्या लोकांनी प्रयत्न केले.
त्यावर फिल्म बनवण्यासाठी अभिनेत्री जेन फोंडा ने अर्थसहाय्य केले होते.

सारिका, छान फुले.

शशांक, हो नाव महत्वाचे नाहिच.

साधना रांगोळी पुसण्याची कल्पना छानच. रांगोळी आपण फडक्याने पुसतो आणि मग ते फडकेच फेकून देतो नाही का ?

पण ह्या एवढ्या अमाप फुलांनाही पुरून उरेल असा प्राणी त्यानेच निर्माण केला आहे याची त्याला कल्पना नसेल.>>>>>अगदी अगदी Sad

आंबोलीला एनी टाईम इज विझीट टाईम.>>>>चलो आंबोली Happy Happy

आणि मानुषीची बाग पहायला चलो नगरला Happy

सारीका फुले सुंदर आहेत ग.

कोण चाललय आंबोलीला ? मी दिवाळी नंतर सावंतवाडी, तारकली ला जाणार आहे. कोकणवासियांनी कृपया अजुन चांगली ठिकाणे सांगावित ४ दिवसांच्या पिकनिकसाठी.

Pradnya1.JPG
मी सुद्धा रविवारी जाऊन आले कासला. पण एकही फूल तोडले नाही हो! Happy
शोभा, खरंच लहानपणचे सगळे जसेच्या तसे आठवते ग!

जागू, ४ दिवसात कुठे कुठे फिरणार, कुठल्याही एका ठिकाणी ४ दिवस थांबा, मजेत जातील दिवस.

स_सा च्या दुसर्‍या फोटोत तर चक्क पिकनिकच दिसतेय. (डबा उघडून खाऊ पण खात असतील का ?)

हाय, मी या धाग्याची नियमीत वाचक आहे, पण अजुन पर्यंत एकदाही लिहिलं नव्हतं. आता कासचा दु:खी विषय दुर करण्यासाठी मला काही गोडु फोटो अपलोड करायचे होते, पण .jpg format मधल्या फोटोजचा साइझ इथे चालत नाहीए. लहान कसा करु?

आणि कास हा विषय दुखरा आहे म्हणुन टाळायचा प्रयत्न. बाकी विषय बदलण्याचं कारण काहीच नाही, सो चालु देत.

मनिमाऊ, तोच फोटो पेंटब्रश मधे उघडून कंट्रोल डब्ल्यू केल्यावर किती टक्क्यानी कमी करायचे त्याची खिडकी उघडते. दोन्ही कडे ९०/९० असे लिहायचे. साईझ कमी होईपर्यंत असे करायचे.

आम्ही सगळे पिकासा वेब अल्बम हि सुविधा वापरतो. तिथून इथे लिंक दिली कि झाले. तिथे मोठ्या साईझचे फोटो अपलोड करता येतात. इथे मदतपुस्तिकेत माहिती आहेच. आणि काही प्रॉब्लेम आला तर आम्ही सगळे आहोतच.

सारिका, ३६ फुलं? मी एकदम J. माझ्याकडे फक्त ५ कळ्या आल्या, त्यातल्या तीन तर आधीच गळुन पडल्या. एक केव्हा उमलली कळलंच नाही, सकाळी दिसली परत बंद झालेली. Sad एक मात्र लक्ष ठेवुन पाहिली.
कुंडी अगदी छोटी आहे. अगदीच छोटी. ती लगेच बदलायला लागेल.

मी २२ तारखेची तिकिटे काढलीत. जिप्सी तुझे लक्षात होते पण दिवाळी आहे म्हणुन तुला विचारले नाही.

जागु, कोकणासाठी नीधपला विचार गं. तिला अतिशय सुंदर ठिकाणे माहित आहेत. तिला न विचारता अजिबात जाऊ नकोस. आणि तारकर्लीला गेल्यावर तिथल्या mtdc मध्ये नक्की जेव. for a change तिथले जेवण मस्त आहे. आणि तिथुन जवळच स्कुबा डायविंगची सोय आहे. ४५ मिनिट्स ला ६०० रु. हा भाव होता दोन वर्षांपुर्वी. सोबत गाईड आणि सामानही.

मी २२ तारखेची तिकिटे काढलीत. जिप्सी तुझे लक्षात होते पण दिवाळी आहे म्हणुन तुला विचारले नाही.

जागु, कोकणासाठी नीधपला विचार गं. तिला अतिशय सुंदर ठिकाणे माहित आहेत. तिला न विचारता अजिबात जाऊ नकोस. आणि तारकर्लीला गेल्यावर तिथल्या mtdc मध्ये नक्की जेव. for a change तिथले जेवण मस्त आहे. आणि तिथुन जवळच स्कुबा डायविंगची सोय आहे. ४५ मिनिट्स ला ६०० रु. हा भाव होता दोन वर्षांपुर्वी. सोबत गाईड आणि सामानही.

जागू, तारकर्ली ला गेल्यावर एमटीडीसी च्या हॉटेल मधे, सकाळी घावन आणि नारळाचे दुध मिळते ते आवर्जुन खा..
मालवणचे रॉक गार्डन संध्याकाळीच पहा, जवळच सुंदर आचर्‍याचा बीच आणि मंदीर आहे..शक्य असेल तर १२ किमी धामापूरचे देवीचे मंदीर प्रसिद्ध आहे, ते पहा.. सावंतवाडीत पॅलेस आणि तलाव सोडला तर पहाण्यासारखे तसे काही नाही.. लाकडी खेळणी शोभेच्या छान वस्तू आहेत, पण त्या थोड्या महाग आहेत.. जर तुला अस्पर्श असे काही पहायचे असेल तर वेंगुर्ल्याजवळ निवती नावाचा छोटासा किल्ला आहे सुंदर बीच अप्रतिम ठिकाण..

हाय लोक्स.
माझ्या वाढदिवसासाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ( मला हे काल विपुत कळलं.)
धागा अफाट वाहतोय.
श्रीलंकेच्या ट्रिपमध्ये कँडीला पेरदेनिया नॅशनल गार्डन बघितलं. भरपूर मोठ्ठं आहे आणि मस्त झाडं-फुलं आहेत. तुम्हा लोकांची आठवण येत होती. फोटो टाकते लवकरच. Happy

वेंगुर्ल्याजवळ निवती नावाचा छोटासा किल्ला आहे सुंदर बीच अप्रतिम ठिकाण..<< निवतीचा किल्ला आणि त्याजवळचा भोगवे चा समुद्रकिनारा एकदम मस्तच

जागू, कोकणात गेल्यावर माझी आठवण काढ गं. Happy
आम्ही लहानपणी ह्याला हरणाची फुले म्हणायचो.>>>प्रज्ञा, ही फुले पाहिल्यापासून मला तेच आठवत होते. मी लिहिणारच होते. पण म्हटले तुला संधी द्यावी. Wink

Pages