निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरी, नेटवरचे फोटो चांगले आहेत. नेटवरची कुत्री गटारात लोळलेली नाहीयेत. मी पाहिलेले कुत्रे भयाण आहे. ते वटारलेले डोळे नेहमी 'मला खायला घाला हो' अशी याचना करतात. आणि ती बारकुंडी शेपुट नुसती भयाने थरथरत असते. असली महागडी पण बिनकामाची कुत्री कशाला घेतात लोक? मी एकतर जर्मन शेपर्ड नाहीतर सरळ लोकल रस्त्यावरचे कुत्रे दत्तक घेणार आहे (याआधी एकदा रस्त्यावरच्या कुत्र्याला पाळायचा उद्योग करुन झालाय. आजही त्याच्या आठवणीने आम्ही गहिवरतो)

पण तू जयुला जागु समजून पण रिप्लाय नाही दिलास की जागुशी बोलायचच नाही अस ठरवलयस ? Lol दिवे घे.

जयु तू जुन्या प्रतिक्रियेवरच टाकलेस म्हणून तसे झाले. छान गोंडस आहेत मुंगुस.

अगं जागु, तुला एकसोएक फोटो मिळतात. तसाच मुंगुसाचा पण फॅमिलीफोटो मिळाला असेल असा विचार करुन गप्प राहिले. आता जे लोक (उदा. तु, जिप्स्या) नेहमीच मस्त फोटो टाकता त्यांना रोज रोज 'मस्त मस्त' काय सांगायचे. ते गृहितच आहे ना????? Happy

दिनेश नेहमीच काहीतरी हटके बातमी/माहिती देतात. त्यांना रोज रोज काय सांगणार मस्त आहे म्हणुन?? त्यांना माहित आहे मस्त अहे ते .. ...

साधना Happy

जयु आता लिहत जा.

गिरीकंद हा ह्या धाग्याचा तिसरा भाग आहे. वर दोन धागे दिलेले आहेत आधीचे. आम्ही रोजच असतो इथे निसर्गात हिंडत.

मुंगुसाचा फोटो मला आधी दिसत नव्हता. छान आलाय.
माझ्या भावाला संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात मुंगुसाबद्दल धडा होता. एका लहान बाळासोबत घरात एक मुंगुस असते. ती बाई बाहेरून येते तर मुंगुसाच्या तोंडाला रक्त लगलेले असते. ती त्याला मारुन टाकते, मग कळते कि त्यानेच एका सापापासून बाळाचे रक्षण केलेले असते.. तात्पर्य नीट चौकशी केल्याशिवाय कुणाला शिक्षा करु नका... (म्हणून कसाब अजून जिवंत आहे.. ए आता मी नाव काढलं म्हणून हा बीबी भरकटू देऊ नका रे.)

साधना, मी पण शोधेन रात्री तो फोटो. हि नेपतीची झाडे मला नगर भागातच दिसली आहेत. नलिनीच्या घराच्या परिसरात होती.

दिनेशदा नेप्तीचं झाड कोणतं?(घोर अज्ञान!)नगरला कल्याण रोडवर नेप्ती नावाचं गाव आहे जिथे आमची पूर्वी शेती होती.
जागू(!).
शशांक माझा मुलगा खरंच खूपच निसर्ग प्रेमी आहे. त्याला कुठे काय दिसेल सांगता येत नाही. मी पण चकित झाले होते ते मुंगुस कुटुंब पाहून!

भाग दोन वाचत होतो, आणी तिथली चर्चा वाचताना असे लक्षात आले की माझ्या कंपनीच्या आवारात एक क्रिसमस ट्री व एक (बहुतेक) निलमोहर आहे.

तीन ऑलीव्हची झाडे पण होती पण मागील वर्षी तोडली.

जयु, छान आलेत ग मुंगूसाचे फोटो. आता माझा दिवस (उरलेला :डोमा:) चांगला जाणार. Proud

<<<माझ्या भावाला संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात मुंगुसाबद्दल धडा होता. एका लहान बाळासोबत घरात एक मुंगुस असते. ती बाई बाहेरून येते तर मुंगुसाच्या तोंडाला रक्त लगलेले असते. ती त्याला मारुन टाकते, मग कळते कि त्यानेच एका सापापासून बाळाचे रक्षण केलेले असते.. तात्पर्य नीट चौकशी केल्याशिवाय कुणाला शिक्षा करु नका...>>>दिनेशदा, मागच्या पानावर मी हीच गोष्ट योगेशला म्हणाले होते.

जागू, मस्त झालेय वेणी.
गेल्या आठवड्यातच मला, बूचाची फुले पाहून, आपल्या पूर्वी झालेल्या चर्चेची आठवण झाली. Happy

मुंगुसाचा फोटो मला आधी दिसत नव्हता. >>>>मला पण दिसत नव्हता Happy छान आलाय Happy

जागू, वेणी आणि फोटो झक्कास Happy

एक (बहुतेक) निलमोहर आहे.>>>>गिरी जमल्यास फोटो टाकशील का Happy

मानुषी, माझ्याकडे आहे बहुतेक फोटो.
वर्षभर हे झाड नुसते केरसुणी सारखे दिसते. हिरवट लांब काड्याच असतात नुसत्या. मग या दिवसात सगळे झाड केशरी फुलांनी भरुन जाते. हे झाड तिकडे कुणी मुद्दाम लावत नाहीत, पण रस्त्याच्या कडेला, शेताच्या कडेला असतेच. याचेच एक नाव करीर असे पण आहे.

जागू, आपल्याकडची मधुमालती कायम खाली बघून आम्मी नाई ज्जा, असे म्हणत असते. देठही लवचिक असतात. त्यामूळे गुच्छातली सगळीच फूले खालच्या बाजूने वळलेली. पण नायजेरियातली हि फुले कणखर देठाची असतात. त्यामुळे गुच्छ चारीबाजूने फुललेला दिसतो. पावसाच्या मार्‍यात पण ती तशीच ताठ असतात. फोटो नाही माझ्याकडे !!

दिनेशदा दिसली परत की फोटो काढा. आणि ते नेपतीच्या झाडाचा फोटो लवकर टाका. उत्सुकता लागली आहे.

अवनी, शोभा माझ्या लहानपणी आमच्या आवारात बुचाचे झाड होते. मी सकाळी पाच ला जाऊन फुले गोळा करुन आणायचे. खास फुलांसाठी लवकर उठायचे. कारण उजेड पडला की गावातल्या मुली यायच्या गोळा करायला. आता ते झाड गेले. पण त्यांची पिल्लावळ आहे. अजुन त्यांना फुले नाही येत. आता त्यातल एक आणून मी माझ्याकडे लावणार आहे.

जिप्सी धन्स.

नि.ग. च्या ३र्‍या भागातील ही माझी ९५१ वी पोस्ट! खूप छान वाटतंय नि.ग. वाचाताना. जयू फोटो मस्त!
साधना Rofl

जयू, मुंगसाचा फोटो छान आलाय. ती अशीच सारखी सारखी मागे वळून बघत असतात.
साधना, तू केलेलं कुत्र्याचं वर्णन वाचून हसून हसून मुरकुंडी वळली..........
जागू खरंच गं असा घरटं विणताना फोटो मिळणं खूप अवघड असतं; पण तुझं नशीब जोरावर आहे.....
मस्त रंगल्याहेत गप्पा! मला पण शनिवारी अर्धा दिवस ऑफिसात घालवावा लागतो Sad
आणि इतर दिवशीही घरी आल्याशिवाय नि ग वर येता येत नाही. मग खूप सार्‍या ऑनलाईन गप्पा माझ्या चुकतात. उशीरा वाचायला मिळतात... Sad
जागू, मधुमालतीच्या फुलांचा गजरा अप्रतिम हं!!!! असाच गुलबक्षीच्या फुलांचा पण करतात.

मी फिनलंडला असताना माझ्या एका कलीगकडे मुंगुससदृष्य प्राणी पाहिला होता. तीने तो पाळलेला. त्याच्या गळ्यात पट्टा बांधुन फिरवत असे त्याला. घरी गेल्यावर जमल्यास फोटो टाकतो>>>>>
हे घ्या फोटो Happy

जयु मुंगुस ची फॅमिलि चांगलि आहे ग. जागु वेणी मस्त.
गिरिकंद ने टाकलेल्या फुलासारखि फुले आताच आबुला भरपुर दिसली. वाहनचालकसाहेब म्हणाले ती रानटी आहेत. माझ्याकडे बहुतेक फोटी असेल (नवर्याने काढला असेल तर). टाकते १-२ दिवसात.

फिनलंडचे फोटो चाळताना आठवणी चाळवल्या Happy
हे काही फोटो. त्यावेळेस चांगला कॅमेरा नसल्याचे अजुनही खुप दु:ख होते. Sad

त्यांचा उन्हाळा संपल्यावर हिवाळा सुरू होण्याच्या आधीचा काळ. याला फिनिश भाषेत "रूस्का" असे म्हणतात. नेमका याच वेळी माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता. Sad
(हा फोटो काचेच्या खिडकीआतुन घेतलाय, त्यामुळे तितकासा क्लियर नाही.)

हि माझी अत्यंत आवडती जागा Happy इथे एकटं निसर्गाच्या सान्निध्यात बसुन रहायला खुप आवडायच. एकटंपणही खुप आवडायचं Happy
(हा फोटो एका फिनिश मित्राने काढलाय, कारण फोटोत टोकाला मीच उभा आहे. :फिदी:)

मस्त जागा आहे ही. आणि आपण एकटे कुठेच नसतो रे, आजूबाजूचा निसर्ग नेहमीच
सखासोबती असतो, उलट शहरातल्या गर्दीतच एकटेपणा जाणवतो.

हा मिळाला नेपतीच्या फुलांचा फोटो, पण त्यावेळी झाड पूर्ण बहरात नव्हते.

धन्स मोनाली Happy

आपण एकटे कुठेच नसतो रे, आजूबाजूचा निसर्ग नेहमीच
सखासोबती असतो, उलट शहरातल्या गर्दीतच एकटेपणा जाणवतो.>>>>अगदी अगदी

हे नेपती नाव पहिल्यांदाच ऐकलं Sad आणि पहिल्यांदाच पाहिलं Happy

जिप्सी, फोटो मस्तच.
मला वाटतेय की माझ्या एका मुंगसावरील पोस्ट्मुळे नि.ग.चे वातावरण मुंगुसमय झालेले दिसतेय. Wink

जिप्सी;होय रे अगदी मुंगसासारखा दिसतोय! (कदाचित फिनलंडमधलं असल्याने जरा वेगळा लुक असेल त्याचा) Happy
आणि तो फॉलचा फोटो केवळ अप्रतिम!!

<आपण एकटे कुठेच नसतो रे, आजूबाजूचा निसर्ग नेहमीच सखासोबती असतो, उलट शहरातल्या गर्दीतच एकटेपणा जाणवतो.......>>>>>> पूर्ण अनुमोदन!!!!

खरंच प्रज्ञा तुझ्या एका पोस्टचा परिणाम! Happy

Pages