निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरीश,
तुम्ही इतकी झाडे लावुन खुप चांगल काम केल आहे...
इथे रोज शहरात अशी मोकळी जागा बघायला देखील मिळत नाही,तुम्ही नशीबवान आहात..:स्मितः
माझी नविन कंपनी आता बाणेरला थोडी पुढे असल्यामुळे खुप दिवसांतुन हिरवी शेती,मोकळी जागा पहायला मिळाली

जागु,
अप्रतिम फोर्टो !
धन्यवाद ! कारण अगदी नेमका असा विणताना पहायला मिळत नाही म्हणून ...
Happy
Happy

गिरी, आता तू पण जरा फोटो काढायचं मनावर घेच. >>>> हे बघ, शोभा. Happy

From October 8, 2011

माझ्या केबीनच्या दारातल्या झाडावरचे फुल. झाडाची उंची ६ फुटापेक्षा जास्त. आणी शेंड्यावर एकच फुल.
(साधारण दर्जाच्या मोबाईल कॅमेरातुन काढलेले चित्र असल्यामुळे प्रची चा दर्जा चांगला नाहीए. )

अरे वा मस्त मस्त गप्पा चालल्या आहेत Happy आणि फोटो पण झक्कास Happy
गिरी अभिनंदन Happy

मी फिनलंडला असताना माझ्या एका कलीगकडे मुंगुससदृष्य प्राणी पाहिला होता. तीने तो पाळलेला. त्याच्या गळ्यात पट्टा बांधुन फिरवत असे त्याला Happy
घरी गेल्यावर जमल्यास फोटो टाकतो (हो......आज मी शनीवर्कर Sad Sad )

गिरी, हे डेलिया वर्गातले फुल आहे ना? हे रोप ६ फुट वाढले?? मी ३-४ फुटापर्यंतची रोपे पाहिलेली राणी बागेतल्या प्रदर्शनात.

योगेश, मला मुंगूस म्हटल की, ती साप आणि मुंगूसाची गोष्ट आठवते. Happy
(हो......आज मी शनीवर्कर )>>>>अरे व्वा. मला फार फार फार आनंद झालाय. गिरी तुला पण ना? Proud

जिप्सी ते कुत्रेच असेल तुला ओळखता आले नसेल.

आमच्या परिसरात एका बाईकडे एक कुत्रे आहे. साधारण बोक्याच्या उंचीचे नी आकाराचे, अंगावर आताच गटारातुन उठुन आल्यासारख्या रंगाचे केस आणि प्रचंड कडक डायट केल्यासारखे शरीर. ते डायट इतके भारी आहे की कुत्र्याचे शरीर सतत थरथरत असते. आमच्या गावी बायका डोक्यात एक कडकडी नावाचे खोटे फुल घालत. ते फुल स्प्रिंगमुळे थरथरत असायचे. ही फॅशन मी १० वर्षांची होते तेव्हा होती. आता गडपली Happy ह्या कुत्र्याला पाहिल्यावर मला त्या कडकडीचीच आठवण होते. मालकिण भयानक हायफाय आहे त्यावरुन ते कुत्रे गटारात लोळणारे नसणार एवढा बोध मला झाला, पण तरीही असले पाप्याचे पितर ती का घेऊन फिरते ते काही कळत नाही.

अरे व्वा. मला फार फार फार आनंद झालाय. गिरी तुला पण ना?>>>>>भ्याआआआआआआ :भोकाड पसरणारा बाहुला: Sad

आम्ही कायमचे शनीवर्कर..... उगीच शनिवार घरी आळशासारखा लोळत घालवायला आम्हाला आवडत नाही.>>>> साधना, द्राक्ष आंबट का? Proud Light 1 घे.

नाही हा.. आम्हाला खरेच देशाचे नुकसान करायला आवडत नाही. शक्य असते तर कंपनीने रविवारीही बोलावले असते. लोक रविवारी घरी बसतात याचे एचारला इतके वाईट वाटते की उरलेले ६ दिवस ते निषेध म्हणुन चेहरा आंबट ठेऊन फिरतात. Happy

साधना Lol

आम्ही अर्धे शनिवार आळसात घालवतो आणि अर्धे ऑफिसात.

गिरिकंद ही झाडे पुर्वी माझ्याकडे होती. त्याच्या बियांपासुन रोपे होतात. अलिबागमध्ये जास्त असतात ही रोपे.

तीने तो पाळलेला. त्याच्या गळ्यात पट्टा बांधुन फिरवत असे त्याला

मुंगुस दिसला की दिवस चांगला जातो की लाभ होतो म्हणतात म्हणून तिने कायमचाच पाळला असेल Lol

आम्हाला खरेच देशाचे नुकसान करायला आवडत नाही.>>>>बर्रझालआम्चीकंप्नीअमेरीकेचीहायती Proud

लोक रविवारी घरी बसतात याचे एचारला इतके वाईट वाटते की उरलेले ६ दिवस ते निषेध म्हणुन चेहरा आंबट ठेऊन फिरतात.>>>>>:फिदी: घरोघरी मातीच्या चुली Happy

जागू अशी सुगरण इन अ‍ॅक्शन पाहिली नव्हती गं!
मुंगुसावरून आठवलं. मागे कधी तरी इथे लिहिलंही होतं परत लिहिते.
माझा मुलगा पुण्यात आठव्या मजल्यावर रहातो. पण त्याला ती व्हिजन आ हे. तो बरोबर असला की प्रवासात वगैरे काहीही दिसू शकतं! कोणताही प्राणी वगैरे. अगदी आमच्या नगरात सुद्धा जंगली ससा, कधी कोल्हा(अर्थातच थोडं गावाबाहेरच!) असं दिसतं.
तर पुण्याला त्याने मला एकदा ५ मुंगुसं मस्त अशी सिक्रोनाइज्ड अशी चाललेली दाखवली. ८व्या मजल्यावरून त्यांचा अगदी एरियल व्ह्यू वाटत होता. नक्कीच ते आई बाबा आणि तीन पिल्लं असणार. सकाळच्या कोवळ्या उन्हात अगदी मस्त चमकत होती सगळी.
इतक्या वरून हे सगळे त्याला बरोब्बर दिसले.

ह्या कुत्र्याला पाहिल्यावर मला त्या कडकडीचीच आठवण होते. >> या कुत्र्याचा फोटो टाक ना साधना...प्लीज.

मानुषीच्या मुलाची नजर ससाण्याची आहे का गरुडाची...... ८व्या मजल्यावरुन ती मुंगसे ओळखतो म्हणजे सॉलिडच......

. मालकिण भयानक हायफाय आहे त्यावरुन ते कुत्रे गटारात लोळणारे नसणार एवढा बोध मला झाला, पण तरीही असले पाप्याचे पितर ती का घेऊन फिरते ते काही कळत नाही.>>>>>साधना, Biggrin

या कुत्र्याचा फोटो टाक ना साधना...प्लीज

ती बाई बहुतेक संध्याकाळची बाहेर पडते कुत्र्याला घेऊन. परत दिसल्यावर काढेन फोटो. ते कुत्रे बहुतेक चिव्हाव्हा जातीचे आहे.

ते कुत्रे बहुतेक चिव्हाव्हा जातीचे आहे. >>> गुगलुन बघितले, या जातीच्या कुत्र्यांचे फोटो. दिसायला गोंडस वाटतायत. पण कुत्रे म्हणायला जीभ धजावत नाहीए.

पण कुत्रे म्हणायला जीभ धजावत नाहीए.

माझ्या लेकीच्या शब्दात - कुत्ते के नाम पे बडा धब्बा Happy

अजुन एक जात असते, खुपच बुटके पाय, अर्ध्या फुटांचे नी दोन फुट आडवे अंग. लेकीच्या प्रिंसिपॉलबाईंची डायना होती या जातीची. मुली तिचे मागचे पाय ओढुन (डायनाचे, प्रिंसिबाईंचे नाही Happy ) तिला पाडायच्या, तेवढा प्रिंसिबाईंचा सुड उगवल्याचा आनंद.

गिरिकंद, आनंद झाला.
माझी नजर झाडांच्या बाबतीत तयार आहे पण पक्ष्यांच्या बाबतीत नाही. आमच्या कडे छोटे छोटे अनेक सुंदर पक्षी दिसतात, पण मला ते भुर्रकन उडतानाच दिसतात !

अनेक कुत्र्यांच्या जाती, मूळ जातींवर संकर करुन केलेल्या असतात. पुर्वी तो एक लांबलचक पण आखूड पायांचा कुत्रा दिसायचा. त्याचे ते लांब शरीर त्याच्या आखुड पायांवर तोलणे, कठिण जात असणार त्याला.

मानुषी इथे आहे तेव्हा एक रिक्वेस्ट.. तूमच्याकडे या दिवसात नेपतीची झुडुपे नारिंगी फुलांनी बहरलेली असतील ना ? एरवी या झाडावर नुसत्याच काड्या असतात पण दिवाळीच्या सुमारास बहरते. फोटो मिळेल का ?

तूमच्याकडे या दिवसात नेपतीची झुडुपे नारिंगी फुलांनी बहरलेली असतील

माझ्याकडे एक फोटो आहे. संध्याकाळी टाकते. नेपती की काय ते मात्र माहित नाही. तुम्ही सांगा.

Pages