पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लाजो आणि प्राची. मी भातातली वाफ जाउ दिली नाही Sad तेच चुकले असावे. आजच श्रद्धाने सुद्धा फोनवरुन हेच मार्गदर्शन केले Happy

पुढच्या वेळी सांगेन कसा झाला ते Happy

-प्रिन्सेस...

please मला कुनि पनीर च्या (शहि पनीर्,butter paneer,mix veg paneer )hotel style recipe .मि खुप शोधले net वर पन हवि तशि चव नहि येत.

मदत समिती... धन्यवाद Happy

-प्रिन्सेस...

थन्क्स मनुस्विनी पण खुप बेकिंग सोडा न वापरता अहे का रेसेपि?

माझ्या घरी १८_१९ ता. ला गणपती आहेत. ५० माणसांसाठी मेनु सांगा सोबत रेसिपीज अंदाजासहीत सांगा.

एम्बी जपान
पालक बटाटा भाजी मी अशी करते-
पालक प्युरी(उकळत्या पाण्यात २ मि. पालक{न चिरता}टाकून बाहेर काढून लगेच थंड पाण्यात टाका. मग मिक्सरमधून फिरवून घ्या. छान हिरवागार रंग येतो.)
करून घ्या.
बटाटे उकडून घ्या. साले काढून फोडी करा. कढईत तेल टाका. बारीक चिरलेला कांदा +लसूण+टोमॅटो(बारीक चिरलेला) छान परता. त्यातच लाल तिखट परता. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाका. चांगले पर्तून घ्या. त्यावर पालक प्युरी टाकून नीट खालपासून ढवळा. अंदाजे मीठ व चिमूटभर साखर घाला. गॅस मोठाच ठेवून भाजी पटकन नीट ढवळा. साधारण मिळून आली की गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घाला.
खूप वेळ गॅसवर भाजी राहिली तर पालकाचा रंग काळा पडतो.

दिनेश, तुम्ही मागे गाकर् (किंवा तत्सम) कसे करतात ते लिहीले होते. जास्त झालेले केळ, रवा, कोथिंबीर आणि दही असे साहित्य असलेले .. ती रेसेपी आता कुठे सापडत नाही. त्याची लिंक टाकता का प्लीज...

साल्सा कसा बनवतात? (सॉस). आणी मी कालच टोफू आणलय, पनीर ऐवजी कोणत्याही पंजाबी भाजीत चालेल का? त्याला जरा उग्र वास आहे. तो कसा घालवायचा?

गाकर बहुतेक भाकरीच्या बीबी वर सापडेल.
साल्सा साठी टोमॅटो ,कोथिंबीर ,कांदा ,टोमॅटो केचप वगैरे सगळे कच्चेच एकत्र करायचे असते त्यात भोपळी मिरची, अननस पण घालता येतो. याच्या कृति आहेत इथे.
पंजाबी मसाल्यात टोफू बहुतेक नाही चांगला लागणार. स्टर फ्राय प्रकारात तो चालेल.

सुरभी, मी पालक पनीर मधे घालते टोफु पनीरच्या ऐवजी. मी 'फर्म' प्रकारचे पनीर आणते. त्याचे तुकडे करते १" जाडीचे. एका बाउलमधे मीठ, गरम मसाला, किंचित लाल तिखट एकत्र करुन साधारण १/२ तास ठेवते. एका लहान तव्यावर शॅलो फ्राय करते आणि पालक पनीर मधे घालते.

सालसाची माझी कृती टाकली आहे इथे - Salsa Recipes
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

हा प्रश्न कुठे विचारावा ते न कळल्यामुळे इथेच विचारते आहे. लवकर मदत हवी आहे, प्लिज.
जुन्या हितगुजवर रव्याचा केकची जी रेसिपी आहे त्यात बेकिंग सोडा रवा भिजवतांना घालायचा कि ओव्हनमध्ये ठेवायच्याआधी? तिथल्या एका रेसिपीमध्ये भिजवतांना घातला आहे आणि दुसर्‍यात ओव्हनमध्ये ठेवतांना, त्यामुळे कन्फ्युजन झाले आहे.
रव्याचा केक

रव्याच्या मिश्रणात बेकिंग सोडा मिसळून १० मिनीटे न हलवता ठेव आणि मग एकदाच नीट ढवळून ओव्हनमध्ये ठेव.

बेकिंग सोडा आयत्यावेळीच घालायचा, तो घातल्यानंतर मिश्रण भरपूर फेटायचे आणि मग गॅसवर/ ओव्हनमधे ठेवायचे. खरंतर, ४-५ तास भिजवले असेल तर सोडाही लागत नाही, पण घालायचाच असला तर आयत्यावेळी घालायचा.
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

बाजारात जे muffin mix, quick bread mix मिळतात ते एकदा बेक केल्यानंतर किती दिवस टिकतात आणि कसे टिकवायचे? मी कधीचं हे बनवलेले नाहीत. पण लेक(वय २ वर्ष) तेचं तेचं snacks खाउन कंटाळली आहे. Supermarket मध्ये मिळणारे तयार muffins किंवा मग हे अशा mix पासुन बनवलेले muffins द्यायचा विचार आहे. कृपया तुमचा अनुभव सांगा.

सुप्रिया, फ्रीझर बॅगेत घालून फ्रीझर मधे ठेवलं तर २-३ महीने सहज टिकतो केक, ब्रेड किंवा मफिन्स. (काही लोक वेडींग केकचा वरचा भाग असा टिकवतात. लग्न टिकलं नाही तरी केक टिकतो!)
पण पिल्लाला शक्यतो बेटी क्रॉकर वगैरेसारखे रेडी मिक्स वापरून नको देऊस खायला. (सोडिअम ऍल्युमिनम सल्फेट सारखे भयानक प्रकार घालतात गं!) त्यापेक्षा ऑरगॅनिक सेल्फ रायझिंग पीठ आणुन त्याचं तू हवं ते करु शकतेस. ओटमील्-रेसिन कुकीज तर अप्रतीम होतात. रेसिपीज हव्या असतील तर आहेत माझ्याकडे.
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

मृ, मला पण देशील का त्या रेसिपीज (ओटमील्-रेसिन कुकीज ) ?

शतशः धन्यवाद मृ!! गोंधळले होते मी.
सोडिअम ऍल्युमिनम सल्फेट सारखे भयानक प्रकार घालतात गं!>>> बापरे!! बरं झालं ईथे प्रश्न टाकला मी.
ऑरगॅनिक सेल्फ रायझिंग पीठ कधी पाहिलंही नाही. कृपया रेसिपीज सांग.तुझ्या मी २ रेसिपीज(मसाला भेंडी आणि फिश) ट्राय केलेल्या आहेत. हीट होत्या.खरचं सांग.

आज दुपारपर्यंत बनाना मफिन आणि कुकीज च्या रेसिपिज टाकते. (आज ओटमील रेझिन कुकिज करणार आहे. तेव्हा जमल्यास फोटो पण टाकेन.)
सुप्रिया, ऑरगॅनिक नाही मिळालं तर पिल्स्बरीचं रेग्युलर सेल्फ रायझिंग पीठ चालेल. त्यात थोडी कणिक घालून व्यवस्थीत होतात पदार्थ. बटर (किंवा हेल्दी चॉइस), अंडी, ओटमील, मनुका, व्हॅनिला इसेन्स आणि जाड ब्राऊन सुगर घरात असली की बरेच पदार्थ होतात.
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

म्रु. सांग बर का लवकर, मी पण करुन पाहीन म्हणते. सुगरण आहेस गं..

थँक्स मंजु आणि पूनम.
मी केला होता रव्याचा केक आणि छान झाला.

काल खाऊ म्हणून पाहुण्यांनी कालाजामुन दीलेत (विकतचे). ते इतके गोड मिट्ट आहेत की एक तुकडा खल्ला तर ओठ आणि जीभ चिकटून बसले. आता डझन भर जामुन टाकायला पण जीवावर आलय. प्लीज सांगा ना काय करता येईल यांच???

ऑफीस मध्ये घेवून जावे. गोर्‍यांना ते गोड मीट्ट चीज बॉल्स म्हणून खावू घालावे. तेव्ढेच पुण्य. Happy

लाजो,
थोड बेसन भाजून घे. जामुन मॅश करून त्यात मिसळ. चव जास्त गोडच असू दे.
मग कणीक व थोडा मैदा गरम तेल मोहन घालून पोळीच्या पिठापेक्षा जरा घट्ट भिजव.
पुरणपोळीप्रमाणे लाटून तूप सोडून भाज. खव्याच्या पोळ्यासारख्या होतील.

काला जामुन चे प्रत्येकि चार तुकडे करुन त्यावर भरपुर सुकामेवा घातलेलि अगोड रबडि ओतुन एक नविन प्रकारचि स्वीट डिश पण करता येइल. कॅलरिज च्या दृष्टिने हेवि पण अतिशय चवदार लागते हि डिश.

धन्स मीना आणि मराठमोळी... तुमच्या दोघींच्या अयडीयाज सही आहेत. डझन भर जामुन आहेत. दोन्ही प्रकार वीकेंडला करून टाकते.

कणिक कोरडीच खमंग भाजून त्यात काला जामुन मिसळून थोडा वेळ परत. आवश्यक असेल तर वळता येऊ शकतील इतपतच तूप घाल. कणकेचे खवा घातलेले लाडू होऊ शकतील.

बाहेर जो पिझा मिळतो ( पिझा हट etc ) त्याचा बेस इतका कडक कसा काय असतो? पिझा घरी केला तर( बेस विकतचा.... ) बेस इतका कडक का होत नाही ?

हाय, सगळ्यांच्या आयडियाज साठी धन्यवाद...
पण वीकएंडला वेळच नाही मिळाला काही करून बघायला म्हणून मी शेवटी काल जामुन मिल्कशेक केला... जामुन आणि दूध ब्लेन्डर मधुन काढले आणि वरून वेलची पावडर -केशर चुरा करून घातले - जरा दाटसरच केला. चांगला लागला.

ह्या मिल्कशेक वरुन सुचल हेच मिश्रण जर कुल्फि मोल्ड्स मध्ये घालुन फ्रीझर मध्ये ठेवल तर मावा कुल्फि च्या जवळपास जाणारि चव येइल का? कि काला जामुन तळलेले असल्यामुळे चव विचित्र येइल? जाणकार मंडळिंच काय मत आहे?

Pages