पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुजणे हा प्रकार काय असतो? इथे मला पापलेटाचे भुजणे दिसले. आणखी कशाकशाचे करता येते? याची कॉमन मेथड आहे का?

भुजणे हा एक प्रकार झाला. साधारणपणे पांचाळ लोकात तो करतात. पापलेट सारख्या इतर माश्यांचाही भुजणे करता येते. पद्धत तिच.

ami79 या सर्व भाज्या खुप सोप्या आहेत...

भेंडी , दोडका, फरसबी, गवार, मोड आलेले कडधान्ये या भाज्या मसाला न घालता केल्या तरी छान लागतात....[माझ्या typical डब्याच्या भाज्या आहेत ]

भेंडी, दोडका, फरसबी, गवार, मोड आलेले कडधान्ये +

तेलात हळद, हिंग, जीरे, मोहरी परतुन घ्यावे...त्यात टोमॅटो परतुन घ्या..मग भाजी घालुन झाकुन ठेवा [५min]

भुजणे हा प्रकार काय असतो?

भुजणे हा एक प्रकार झाला.

Lol

मंजु, पहा बरे आम्ही गंभीरपणे किती मोठे विनोद करतो. Happy

दिनेशदा, मला असे विचारायचे होते की, भुजणे फक्त माशांचेच करतात का? आणखी कशाकशाचे बनवतात? शाकाहारी सुद्धा असते का?

अमि Happy

आमची एक शेजारीण माहेरची पाठारे-प्रभू आहे. त्यांच्याकडे हा प्रकार खुप प्रसिद्ध आहे. भुजणं म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं वाटण असतं.. मी बटाट्याचं भुजणं खाल्लंय.... पण कृती मला माहित नाही.

भुजणे ही पाठारेप्रभुची फेव रेसीपी आहे. तुला हवी असेल तर टाकते.

पियापेटी थँक्स ग शेवयांच्या रेसिपीसाठी. करुन बघीन

साधारणपणे बराचसा कांदा चिरुन, त्यात त्यात मीठ व तेल आणि त्यांचा खास मसाला घालुन चुरतात. मग त्यात मासे वगैरे प्रकार घालुन एकत्रच शिजत ठेवतात.
मूळ प्रकार माश्याचा पण मग पर्याय म्हणून बटाट्याचा वगैरेहि करतात.
मला वाटते हिच आहे भूजण्याची कृति. माश्याचा प्रकार म्हणुन मी कधी खाल्ला नाही.
डॉ डहाणूकरांच्या, पांचालीची थाळी, या पुस्तकात किंवा त्यांच्या बोलण्यात याचा उल्लेख आला असावा असे वाटते.

ङूळ ङास बाण्ड झ्ळ्ञावार्‍ ङ्।आळा

नीता.अ, हे तुम्ही वर काय लिहिले आहे?? मला तर ते 'गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा' च्या चालीवरील काहितरी वाटतय Happy

असो.. आपले स्वागत मायबोलीवर...

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा >>> Proud

कुणाला उपासाच्या बिस्किटांची रेसिपी माहित आहे का? मी भारतात खाल्ली होती त्यात राजगिरा पीठ , साखर , डालडा घटक होते.

माझी इथेच कुतेह्तरी नानकटईची रेसीपी आहे त्यात मैदाएवजी राजगीरा वापरून सेम तेच प्रमाण वापरून कर.

माझ्या आईने केली होती उपवासाला राजगीरा नी शिंगाडा पिठे एकत्र करून नानकटाई. जरा ज्यास्त बेकींग सोडा टाकावा लागतो एवढेच.
पण मस्त लागतात. लिंक मलाच मिळत नाहीये.

पातळ पारीचे उकडीचे मोदक करण्यासाठी काय करावे? त्यासाठी पिठी शिजवताना पाण्याचे प्रमाण वगैरे काय असावे?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

आशू, आधी पाहिले नसल्यास इथे पहा-
उकडीचे मोदक
त्या पानावर archives च्या लिन्क्स आहेत वर, त्या सगळ्या पहा.

आंबट द्राक्षांचे काय करता येईल?
दिसायला छान लालसर होती म्हणून हरतालकेला आणली. पण २-३पेक्षा जास्त एका वेळी खाता येत नाहीत. त्याचे काय करावे?

बिया नसतील तर मिक्सरमधुन काढुन रस काढ. त्यात मध किंवा साखर घालुन गोड कर. आईसट्रे मधे घालुन फ्रीझर मधे ठेव. आणि मस्त पैकी आईस्फ्रुट सारखे एक एक तुक्डा खात रहा Happy
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

वा मिनोती मानलं तुला. सही आयडीया दिलिस.

धन्यवाद दिनेशदा.
मनु, तुला माहित असलेली भुजण्याची कृती सुद्धा सांग. मला वाटते, हा झटपट होणारा स्वादिष्ट प्रकार आहे.

माझ्या कडे कोकोनट मिल्क आहे त्याचे काय करु शकतो.

फ्राईड राईस कुठे हरवलाय? देवा, या नव्या मायबोलीत कसे शोधायचे पदार्थ Sad

प्रत्येक वेळी इकडे लिहुन लिंक मागावी लागते, त्याबद्दल सॉरी.

-प्रिन्सेस...

सापडला सापडला फ्राईड राईस... जुन्या मायबोलीचा विजय असो Happy

-प्रिन्सेस...

मिनोती, मस्त आयडीया. Happy
आता करून बघते.

चिऊ, मागे दिनेशदानी, द्राक्षे बटाटा भाजी दिली आहे ती देखील छान लागेल. करुन पहा.

माझा फ्राईड राईस चिकट झाला पांढरी भाज्या घातलेली खिचडी दिसावी तसा दिसत होता. प्रमाण जुन्या मायबोलीवर दिनेशदांनी दिलेलेच वापरले. तरीही असे झाले, काय चुकले असावे ? कधी नव्हे ते नवर्‍याला घरीच चायनीज खाऊ घालण्याचा घाट घातला होता , बेत चांगलाच फसला Sad

चव मात्र फ्राईड राईसची परफेक्ट चव होती. पण सुटसुटीत न झाल्याने मजा आलीच नाही.

दावत बासमती वापरला होता. दुसरा कुठला तांदुळ वापरायला हवा का?
-प्रिन्सेस...

प्रिन्सेस,

फ्राईड राईस करायचा असेल तर मी आधी भात करून घेते आणि ताटात पसरून ठेवते. काट्याने मोकळा करून घेते. जेणे करून वाफ निघून जाऊन भात मोकळा होतो आणि मग फ्राईड राईस करताना चिकट गोळा होत नाही. तसेच शिजवताना भातात थोड तेल/तूप घालून बघ.

अय्या लाजो, मी हेच लिहायला आले होते.:-)

अय्या लाजो, मी हेच लिहायला आले होते.:-)

Pages