सालसा वगैरे

Submitted by क्ष... on 20 September, 2008 - 13:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रसदार टोमॅटो
लाल कांदा
कोथिंबीर
हिरवी मिरची
मीठ
लिंबु

आवडीनुसार पपई, अननस, आंबा (तोतापुरी प्रकारातला)

क्रमवार पाककृती: 

प्रकार १ -
१ वाटी बारीक चिरलेला कांदा, २ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ लिंबाचा रस, १/२ वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरुन किंवा थोड्या भरड वाटुन. हे सगळे नीट एकत्र करुन आवडी प्रमाणे मीठ घालायचे. हा झाला 'पिको दी गायो' (Pico De Gallo) सालसा. आपल्या टोमॅटोच्या कोशिंबीरीत कूट न घालता केले तर हा प्रकार होतो. मिरच्या चविप्रमाणे कमी जास्त करायच्या.

प्रकार २ -
टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकायचे १ मिनीटात बाहेर काढायचे. आणि थंड पाण्यात टाकायचे. साल काढुन टाकायची. ४ टोमॅटो, १ लहान (खुपच मोठा कांदा असेल तर साधार्ण १/४ कांदा), २ हिरव्या मिरच्या, असे सगळे चॉपर मधुन काढायचे. पुरी इतके बारीक न करता भरड ठेवायचे. आवडीप्रमाणे मीठ व कोथिंबीर घालुन थोडे लिंबु पिळले आणि मिसळले की झाला सालसा तयार.

प्रकार ३ -
पिको दी गायो मधे पपई, आंबा, अननस यापैकी एका फळाचे बारीक तुकडे करुन घालायचे.

वाढणी/प्रमाण: 
किती आवडते त्यावर ठरेल!
माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी, स्वनिर्मिती, वेबसाईट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्या देशाचा प्रकार आहे हा मिनोती आणि एक सांग १/२ लिंबाचा रस ह्या १/२ चमच की १/२ वाटी रस?

बी, हा मेक्सिकन प्रकार आहे .. टॉर्टिया चिप्स् बरोबर खायला खूप मजा येते ..

हिरव्या मिरच्यांपेक्षा शक्य असेल आणि मिळत असतील तर jalepeno peppers वापराव्यात .. त्याचा स्वाद आपल्या नेहमीच्या हिरव्या मिरच्यांपेक्षा वेगळा असतो आणि छान लागतो .. भाजक्या जीर्‍याची पूड सुध्दा छान लागते ..

याच्यातच रोस्टेड लाल फुग्या मिरच्या बारीक चिरून घालता येतात. हिरवे ऑलिव्हस सुद्धा छान लागतात

पण हा किती दिवस टिकतो? किंवा टिकवण्यासाठी करायचा असेल तर काय घालायचं?

हालापिनोचं देसी भावंडं कोण?
पार्ला मार्केटात मिळतं का मेधातै? Happy

नी, ते दिनानाथच्या इथलं ड्रायफ्रुटचं कोणतं दुकान आहे तिथे बघ मिळतायत का हलापिनो पेपर्स.

ओह तिथे असतील? ड्राय की हिरव्या?
आजच बघते. पार्ला मार्केटवर तसंही उपकार करायचेच आहेत आज. Happy

आवडत असेल तर ह्यात १ लसूण पाकळी बारीक चिरून/किसून घाला. टॉर्टिया चिप्स् नाही मिळत भारतात चटकन आणि महाग फार. मी याच्या बरोबर लाम्ब चिरलेले सॅलड देते आणि चक्क लाम्ब केळा वेफर्स Happy
आणखी एक डिप
१/२ वाटी मेयॉनीज, २ मोठे चमचे टोमॅटो केचप, २-३ ड्रॉप चिली सॉस, १/२ छोटा चमचा ओरेगानो
एकत्र करून डिप तयार.

क्रॉफर्ड मार्केटात ऑथेन्टिक चवीचे टॉर्टिया चिप्स मिळाले मधे. महाग तर होतेच पण तरी ब्रॅण्डेडपेक्षा अर्ध्या किमतीत होते कारण इथेच बनलेले होते.
अर्थात ते संपले कधीच Happy