पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रांनो ! तसा मी इथे नविनच आलोय! मला तुमच्या सर्वांकडुन मदत हवी आहे!
मला ओव्हन घ्यायचा आहे,पण कोणत्या कंपनीचा व कोनते मोडेल घ्यावे ते कळत नाही तेव्हा तुम्ही सुचवा!
आपल्या सर्व सुचनांचे स्वागत!
दत्तात्रेया

२-४ दिवस टिकतिल आणि राइस कुकर मधे बनतिल असे पदार्थ सुचवता येतिल का?..
(बरोबर ओळखलत...!! सासु सासरे आलेत आणि भ्रमंति चालु आहे)

प्राजक्ता,
१. डाळ, तांदूळ भाजताना थोडे मसालेभातासारखे मसाले (भाज्या न घालता) भाजुन नेता येईल. ऐनवळी पाणी घालून शिजवता येते.
२. MTR चा मसाला इडली किंवा रवा इडलीचा पॅक नेता येतो आणि त्यात ऐनवेळी पाणी घालून उपमा छान होतो.
३. एखाद्या दिवसासाठी दशम्या पिठले करुन न्यायचे. सोबत कोरड्या चटण्या नेल्या की ऐनवेळी दह्याचा डबा असेल तर काम भागते.
४. साधा भात करुन दही मिसळून दहीभात करता येतो. जाताना जमले तर कुटाच्या मिरच्या तळून न्यायच्या.
५. मायक्रोवेव असेल अशी रूम मिळाली तर मग वेजीटेबल ज्युसचे सुप वगैरे करता येते.
६. ब्रेड खात असतील तर २-३ वेगवेगळ्या चटण्या करुन ने. जिथे जाल तिथे काँटीनेंटल ब्रेक्फास्ट मिळत असेल तर बटर मिळेलच.
७. लावलेले पोहे, कालवलेले पोहे असले प्रकार करता येतात. (कालवलेल्या पोह्याची रेसीपी माझ्या ब्लॉगवर आहे)

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

मेथीचे पराठे, तिखटा मिठाच्या पोळ्या किंवा पुर्‍या नेता येतील प्रवासात.कार मधे छोटा कूलर टेवून त्यात ठेवायच्या व मुक्कामाच्या जागी पोचल्यावर फ्रीझ मधे ठेवायच्या.
पुळीयोगरे मसाल्याची पाकीटं मिळतात. ती नेली तर गरम भातात कालवून छान लागतं. कुटाच्या मिरच्या तळून नेल्यास काकडी , गाजर, टोमॅटॉ घेऊन , त्यात दही, मीठ अन कुटाच्या मिर्च्या घालून कोशिंबीर करता येइल. शिवाय आजकाल बर्‍याच टूरिस्ट स्पॉट च्या जव़ळ्पास भारतीय रेस्टॉरंट्स असतात. जास्त काळजी करु नका Happy

पुण्यात अभारतीय (=साउथ अमेरिकी, आफ्रिकी) कॉफी पावडर कुठे मिळते का ? माझ्याकडे gas percolator आहे (इटालिअन पद्धत) आणि मी काळी कॉफी पितो. डेक्कनवर एके ठिकाणी चांगली साउदिंडियन कॉफी पावडर मिळते, पण ती काळी कॉफी म्हणून प्यायला मला आवडली नाही (म्हणजे हिल भाऊंची कॉफी पावडर बरी वाटली त्यापुढे !) दुसरे म्हणजे स्वादासाठी त्यात घालायचे flavours कुठे मिळतील का ? उदा. vanilla, hazelnut, etc.
(या बाफवर ही चौकशी करतोय म्हणून क्षमस्व. हाच त्यातल्या त्यात योग्य वाटला म्हणून इथे केली.)

  ***
  टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

  slarti,
  Doraabjee आणि Ozoneला नक्की मिळेल.

  ओझोन म्हणजे ते औंधातलंच ना ?

   ***
   टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

   हो. आमच्या लॅबमध्ये लागतो म्हणून हिरवा चहा आणतो तिथून आम्ही. अनेक प्रकारची कॉफी मिळते तिथे.

   सही. आभार रे.

    ***
    टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

    मला सत्यनारायणासाठी प्रसाद आणि पंचामॄत करायचं आहे, कोणि रेसिपी सांगेल का?

    मी जुन्या हितगुजवर आत्ताच तांदळाच्या भाकरीची की पोळीची कृती शोधून पाहिली पण मला ती आढळली नाही. बहुतेक तिचा स्वतंत्र असा बीबी त्यावेळी केला नसावा.

    कुणी कृती आणि सोबत आवश्यक टिपा देऊ शकेल का मला?

    आभारी आहे.

    इथे आहे बघ तांदळाच्या भाकरीची रेसिपी. glutinous rice folur असं मिळतं एशियन दुकानात. ते मात्र वापरू नकोस. देशी दुकानातलं तांदळाचं पीठ वापर.

    http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4408.html?1213962213

    इथे अस्सल देशी केरळमधून आलेलं तांदळाच पीठ मिळतं. तू दिलेली कृती छान आहे. आज नाहीतर उद्या करून पाहतो.

    धन्यवाद शोनू.

    Ranch dressing कोणी घरी कसे तयार करावे सांगेल का? नेटवर आहेत कृत्या पण कोणी अजून काही प्रकार माहीत असेल तर सांगावा.

    Mashed potatoes ची पाककृती कोण सांगणार ?

    mashed potatoes साठी either you buy idaho old potatoes that are very tasty,crunchy and still creamy when mashed. (when you eat this you will know what I mean).

    नाहीतर छोटे लाल लाल जुने (russet potatoes बहुधा, नाव नक्की आठवत नाही) पण ते लहान लाल असतात ते धूवून पाण्यात seasalt(ह्या मिठाची चव छान लागते) घालून आक्खे उकळवून सालीसकट घे.
    मग त्या टोपातच mash करून घे.

    मग त्यात 2% milk, butter (based on quantity of potatoes), थोडेसे चीज्(हवे असेल तरच kraft's chedder चीज), काळंमीरी टाकून ढवळायचे.

    दुसरी पद्धत म्हणजे त्यात हिरव्या पातीचा कांदा पातळ कापून, नाहीतर celery बारीक टाकली तरी छान चव येते. पण हा प्रकार authentic नाहीये.
    हेच जर इदाहो बटाते वापरून केलेस तर साली काढून फोडी करून मिठाबरोबर उकळवून वरील प्रमाणे करावे.

    धन्यवाद !!!
    .
    मी आख्खे दुध वापरेन. फक्त बटाट्यांसाठी कुठे २% आणु Uhoh लाल बटाटे पण आहेत घरात. आजच करुन बघते.

    आंध्रा पद्धतीच्या भाज्या आणि सांबार कसे करायचे हे मी इथे तिसर्‍यांदा विचारतोय, कुणी सांगेल का?
    दुसरे म्हणजे चैत्र गौरीच्या वेळी असते तशी वाटलेल्या डाळीची चटणीची रेसीपी कुणाकडे आहे का?

    जुन्या मायबोलीची लिन्क इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59847.html?1122683353
    माझी कैरीची डाळ इथे आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_353.html

    ----------------------------------------------------------------
    ~मिनोती.

    हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

    मला खाकरा ची रेसिपी हवी आहे.

    जागु, खाकरा कणकेचा किंवा मैदा, मटकीचे पिठ वगैरे पिठांचा करता येतो/ यासाठी चपातीपेक्षा जरा घट्ट पिठ भिजवायचे. त्यात हव अतो मसाला घालायचा.
    मग त्याची अगदी पातळ चपाती लाटुन, ती जरा वार्‍यावर वाळू द्यायची मग सपाट तव्यावर मंद आचेवर दाब देऊन भाजायची,
    यासाठी एका वाडग्याला रुमाल गुंडाळून त्याने दाब द्यायचा. असा दाब देण्यासाठी एक लाकडी उपकरण बाजारात मिळते.
    खाकरा भाजून झाल्यावर देखील थोडा वेळ वार्‍यावर ठेवायचा. मग त्यावर हवे तर थोडा मिठ्मसाला पसरायचा.

    धन्यवाद दिनेश.
    खाकरा करायला किती वेळ लागेल ?
    चपाती वार्‍यावर किती वेळ वाळ्वायची?
    लाकडी उपकरण मागण्यासाठी दुकानात काय सांगायचे ?

    लाकडी उपकरणाला मुठ म्हणतात.

    पारंपारिक खाकरे हे कोळस्याच्या शेगडी वर करतात. आधी हवे असलेलं पीठ भिजवून घेणे. मग त्याचे फुलके करावे. सगळे फुलके झाले की, शेगडी वर सपाट तवा ठेववा. मग फुलक्याची चळत तव्यावर ठेवायची. वरून सुती कापडाच्या बोळ्याने जोर द्यायचा. शेवटचा फुलका का कडक झाला की तो बाजुला काढायचा. की खाकरा तयार. शेगडी वरचे खाकरे हे अप्रतीम लागतात. त्यावर दाण्याचे कोरडी चटणी आणी तेल घेउन खातात.

    अखि चांगली माहीती दिलिस.
    मला अजुन डाएट रेसिपी हव्या आहेत.

    दिपाली बरोबर, अस्सल खाकर्‍याची कृती मी अशीच ऐकली होती. त्या फुलक्यांवर जिराळू नावाचा मसाला लावतात ना?
    बरं मला एक सांग, मेथी खाकर्‍यांसाठी आपण मेथी पराठ्यांसाठी भिजवतो तसंच पीठ भिजवायचं का? आणि मग त्या पीठाचे फुलके करून ते असे मसाला लावून दाब देऊन भाजायचे का?

    मी हे आईला विचारून सांगते. माझी आत्या गुजू आहे त्यामुळे बऱ्याच कृती माहीती आहेत आईला ती पुर्वी घरी अश्या प्रकारचे खाकरे करायची. फार वेळखाउ काम आहे

    थाई पध्दतीने भाज्या कशा करायच्या हे कोणाला माहित आहे का?

    आणखी एक - खाकर्‍यांसाठीचे फुलके सकाळी खाकरे करायचे असतील तर रात्री करून ठेवावेत. अन तूप किंवा तेल लावून ठेवावे.

    Pages