पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे दिवाळी जवळ आली पण दिवाळिच्या फराळाबद्द्ल कोणीच काही रेसिपी टाकत नाहीत. दिवाळिच्या फराळाच्या नवीन नवीन टिप्स द्या.
मला करंजीचे सारण कसे चांगले बनवता येईल ह्याबद्द्ल माहीती हवी आहे.

जगु,

आधी हे पूर्णपणे वाचून काढ..... मग तुझ्या काही शंका राहतील असं मला वाटत नाही.

मंजु अग ते मी नेहमीच चाळत असते. पण त्याच्यात कोरड्या सारणाची एकच रेसिपी आहे. मला अजुन नविन नविन हव्या आहेत. दिनशजींकडे भरपुर साठा आहे टिप्स चा. आणि तुम्हा सगळ्या कडेही असेलच.

मध्येच घूसून सांगते,
कोरडे सारणाच्य बर्‍याच आहेत रेसीपी. जरासा इथे तिथे फेरफार करून सारण बदलते.

१) सुखे खोबरे,साखर
२) पंचसारण (कोकणी)
३) नुस्ता खवा
४)खवा नी रवा
५) सुखे खोबरे,रवा,साखर, खसखस
६) सुका मेवा

छ्या, ह्या दिवाळीला मी कामासाठी बाहेर असणार.. तिथे तर देसी पण कमी आहेत एकलय...... Sad

मला पंच सारणाची आवडली.

माझ्या कडे कोहाळे आहे. त्याचे काय करता येइल ?

कुणाला वॉलनट ब्राउनी येते का?
वॉ. ब्रा. +व्हॅनिला आइसक्रीम हॉट चॉकोलेट सॉस .

वॉलनट ब्राउनी एकदा करण्याचा प्रयत्न केला. पण जर अंडं वापरलं तर ती ब्राउनी आईस क्रीमबरोबर खाल्ली तर त्याला एक पंजंट असा अंड्याचा वास येतो. अंडं घातलेला केक जर दुधात बुडवला तर दुधाला जसा वास लागतो........
तर मला वॉ. ब्रा. +व्हॅनिला आइसक्रीम + हॉट चॉकोलेट सॉस ही रेसीपी कुणी सांगाल का?.

वॉलनट ब्राउनी एकदा करण्याचा प्रयत्न केला. पण जर अंडं वापरलं तर ती ब्राउनी आईस क्रीमबरोबर खाल्ली तर त्याला एक पंजंट असा अंड्याचा वास येतो. अंडं घातलेला केक जर दुधात बुडवला तर दुधाला जसा वास लागतो........
तर मला वॉ. ब्रा. +व्हॅनिला आइसक्रीम + हॉट चॉकोलेट सॉस ही रेसीपी कुणी सांगाल का?.

कोहाळ्याच्या पाककृती-
१---बारीक फोडी (२ से.मी च्या) करून मीठ हळ्द लावून उन्हात वाळवून ठेवणे. या कुटाच्या मिरची प्रमाणे तळून खाता येतात.
२---किसून पिळून घेणे. किसाची कोशींबीर, व रसाचे थोडे लिंबू पिळून सरबत करता येते.
३---किसून पाणी पिळून काढून टाकणे. मग कीस, खवा, साखर व वेलदोडा घालून नारळाच्या वड्यांप्रमाणे वड्या करणे.
४---किसून थोडे पाणी काढणे थोडे ओलसर ठेवणे. त्या किसात साळीच्या लाह्या(नसल्यास चुरमुरे) मिरची, मीठ, जिरेपूड घालायची. याचे जसे मुगवडे घालतात, त्याप्रमाणे प्लॅस्टिकच्या कागदावर सांडगे घालायचे. वाळ्वून मग तळून खाता येतात. वर्षभर टिकतात.
५---मोठ्या फोडी (१ इन्च) करून पेठा करता येतो. याची कृती मोठी आहे.
६--सांबार आमटीत फोडी टाकता येतात.

बेडेकर मला सांड्ग्यांची कृती नीट सांगा.

कोहाळा किसून मग हलकासा पिळून घ्यायचा. म्हणजे ओलसरच ठेवायचा.
हिरव्या मिरच्या, मीठ आणि जिरे बारीक वाटून, ते वाटण त्यात घालायचे.
त्यात साळीच्या लाह्या, आणि मिळत नसतील तर चुरमुरे घालून एकत्र मळायचे.
कोहाळ्याचा ओलसरपणा लाह्या किंवा चुरमुर्‍यांनी शोषला जाइल. व ते मिश्रण थोडे कोरडे होइल.
प्लॅस्टिकच्या कागदावर याचे मोठ्या लिंबाएवढे गोळे घालून उन्हात वाळवायचे.
हे वाळून आकाराने लहान होतात म्हणून आधी थोडे मोठे ठेवायचे.
कडकडीत वाळवून हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. मग पाहिजे तेंव्हा तळता येतात.

बारक्या फोडी करून मीठ हळद लावून वाळवतात त्याला ही सांडगेच म्हणतात.
तळल्यावर हे अगदी हलके खुसखुशीत होतात.

मीनाताई,
ती सांडग्यांची कृती आठवणीने पाककृती विभागात टाकाल ना म्हणजे ती इथे पोस्ट मध्ये हरवुन जाणार नाही.

माझ्या कडे कोहाळे आहे. त्याचे काय करता येइल ?>>सोपा आणि छान पदार्थ म्हणजे खिर....कोहाळे कुकरमधे पाणी टाकुन शिजवुन घेणे...मग बारीक पेस्ट करुन साखर घालुन शिजवुन घेणे..शिजल्यावर गरम दुध घालुन उकळवणे...शेवटी गॅस बंद केल्यावर,ड्राय फ्रुटस आणि थोडे मिठ टाकणे...बासुंदी सारखीच दिसते आणि लागते.
भाजी...
खसखस, खोबरे भाजुन पेस्ट करुन घेणे. फोडणीत कडीपत्ता, लसुण जिरे पेस्ट कोहळ्याच्या फोडी टाकुन अर्धे शिजवुन घेणे..मग चिंचेचा कोळ, खसखस, खोबरे पेस्ट, तिखट, मीठ, हळद टाकुन पुर्ण शिजवुन घेणे.

कोहळ किसुन त्यात गुळ आणि चिमुट्भर मीठ घालुन त्यात मावेल एवढि कणिक घालायचि आणि साधारण पोळिचि कणिक भिजवतो तेवढि सैल भिजवायचि. ह्याच्या तळहाताएवढ्या जाडसर पोळ्या/पुर्‍या लाटुन तव्यावर किंचित तुप सोडुन खरपुस भाजुन घ्यायचे. ह्या पदार्थाचे नाव आठवत नाहि पण बहुतेक ह्याला घारगे म्हणतात.

कोहळा म्हणजे काय ? आवळा देऊन कोहळा काढणे अशी एक म्हण आहे तेवढेच ऐकुन आहे.

कोहळा म्हणजे काय ?>>लाल भोपळ्याला विदर्भात कोहळा म्हणतात अगं...

कोहळ किसुन त्यात गुळ आणि चिमुट्भर मीठ घालुन त्यात मावेल एवढि कणिक घालायचि >>मी कोहळं आणि गुळ वरतीच शिजवुन घेते आणि मग मावेल तेवढी कणिक त्यात घालते.

कोहळा आणि लाल अथवा दुधी भोपळा ह्या स्वतंत्र फळभाज्या आहेत. भोपळ्याचे घारगे खाल्ले आहेत पण कोहळ्याचे नाही खाल्ले कधी. कोहळा घराबाहेर टांगुन ठेवतात बर्‍याच लोकांकडे. कोहळा किसून, त्यात दही घालून कोशिंबीर चांगली होते.

कोहळा ( पेठा करतात तो ) पांढरा अस्तो ना?

माझ्या मते पण कोहळा पांढराच असतो. सांबार, अवियल अश्या भाज्यांमधे टाकतात. आणि हो पेठा कोहोळ्याचाच करतात.

माझ्या लग्नानंतरच मला कोहळा शब्द माहित झाला आणि त्यानुसार लाल भोपळ्याला विदर्भात कोहळं म्हणतात आणि पांढर्‍या भोपळ्याला लवकी म्हणतात.

कोहळा हा पांढराच असतो. लाल भोपळा घारगे करतो तो.मुंबईत सांबार 'बाजी' देना असे त्या मद्रासी 'बाजीवाल्यांना' सांगीतले की कापून देतात एकेक तुकडा. काही ठिकाणी कोहळा हा तसा 'नजर' वगैरे लागू नये म्हणून टांगून ठेवतात. त्याचा पेठा मात्र झकास बनतो. तो पाक एकदम त्या फोडीवर टाकून बनवतात,एकदम जिकरीचे काम आहे ते. Happy
वरती म्हटल्याप्रमाणे, खीरी, पराठा, कोशींबीर, सांडगे,आजारी माणसाला नाचणी नी कोहळा घालून खिचडी(त्यात फक्त एक लवंग्,वेलची, जीरे नी जरासे शुद्ध तूप).
तसा बर्‍यापैकी उष्ण आहे.

हुश्श..! आणखी काही माहीती नाही 'कोहळ्यावर'. Happy

करंजी किंवा कानवल्याच्या सारणासाठी:

१. खव्यात गुलकंद घालायचा.
२. ओल्या खोबर्‍यात आमरस घालायचा.
३. खव्याच सारण काजू कतलीच्या चवीप्रमाणे करून घ्यायच.
४. खव्यात, केशर, बदाम, पिस्ते वाटून घालायचे. थोडस पेढ्यासारख लागत.

हिंदी भाषीक दुधीला लौकि म्हणतात.

मी ज्या रेसिपीज टाकल्या आहेत त्या लाल भोपळ्या पासुन करायच्या आहेत....

हा कोहळा आहे का ?

29293-004-054CE8DA.jpg

नाहि हा नाहि कोहळा प्रिति म्हणालि तस विदर्भात लाल भोपळ्याला कोहळ म्हणतात त्याचि साल गडद हिरवि आणि त्यावर केशरि/पिवळे ठिपके असतात.

@प्रिति,

हो ग तुझ बरोबर आहे, कोहळ किसुन गुळ आणि किंचित मीठ घालुन शिजवुन घ्यायचा तो किस आणि मग त्यात कणिक भिजवायचि मी इथे कॅन मध्ये मिळणार पमकिन पाय च शिजवलेल कोहळ वापरते नेहमि त्यामुळे ते शिजवायच हे सांगायच राहुनच गेल.

अतिशय न्युट्रिशिअस असत हे कोहळ/लाल भोपळा आठवड्यातुन एकदा तरि ह्याचा आहारात समावेश नक्कि करावा अस मालति कारवारकरांच्या वंशवेल पुस्तकात वाचल.

प्रीती,
वर तु एक कोहळ्याची रेसिपी दिलिस ना,बासुंदी सारखी लागते असं म्हणालीस. ती जरा डिटेल मध्ये सांग ना. प्रमाण किती सगळ्याचं? interesting वाटत आहे रेसिपी पण कधी खाल्ली पाहिली नाहिये, त्यामुळे प्रमाण लागेल आणि प्लिज पाककृती मध्ये टाक म्हणजे सहज मिळेल.

हा कोहळा आहे. याचे सांडगे मस्त होतात. आमटीत अगदी यम :). कीसताना जपून, चुकून केसांना हात लागला तर केस पांढरे होतात..

Pages