पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसी दुकानात मिळते की लिंबू का फूल म्हणून. पनीर करायला का ?

बरं मला एक केमिस्ट्री संबंधित प्रश्न आहे. आजकाल बर्‍याच दुकानांमधून रीड डिफ्युजर प्रकारचे एअर फ्रेशनर मिळते. ते आणलं की पंधरा दिवसांच्यावर टिकत नाही. माझ्याकडे कधी तरी घेतलेले लायलॅक ऑइल होते ते मी एका रिकाम्या रीड डिफ्युझर च्या बाटलीत घातले तर ते आपले तीन महिने जसेच्या तसेच आहे पण खोलीत लायलॅक चा वास काही पसरत नाही. कोणी घरी रीड डिफ्युझर केलाय का ? कसा करता येईल? गार्डन बॉटॅनिका किंवा तत्सम दुकानांमधून एकच सुगंध असलेले तेल किंवा तेल/ अल्कॉहॉल मिश्रण आणून काही करुन पहावे असा विचार आहे. पण त्या डिफ्युझर मधे नक्की काय काय असतं ते कळलं तर बरं.

हे जे बाहेरचे diffuser असतात ना त्यात अल्कोहोलचे प्रमाण खूप असते ने तसे ते अपायकारक आहेत. chemistry मध्ये असल्याप्रमाणे ते जे तत्स्म अंश(काय बर मराठीत म्हणतात?) सोडतात ना ते ही वाईटच. म्हणून पर्फूम मध्ये सुद्धा अल्कोहोलचे प्रमाण कमी असलेले घ्यावे. eude toilet ह्यात अल्कोहोल ज्यास्त असतो. मी वापरलेले नी घरी केलेले हे घे,

१ तुझी स्प्रे बॉटल जी मीनीमम ५ ऑन्स पाहीजे, walgreens मध्ये essential oils for diffuser मिळते त्यात जसे लेमोन्,रोजमेरी,नीलगीरे,ऑरेंज.लवेन्डेर वगैरे नी distilled water.
जर तू 3/4 distilled water घेतलेस तर १५ -२० ड्रॉप्स ऑइल असे मिक्स करून बॉटल हलव नी स्प्रे वापर.
हे जर वेग वेगळे fragrances वॉलग्रीन्स मध्ये नाही मिळाले तर सरळ बॉडी वर्क्स मध्ये नाहीतर बाथ नी बॉडी मध्ये मिळेल. जरा खर्चीक आहे पण अपायकारक नाहीये. नाहीतर हेच मिश्रण तू reed diffuser bottle मध्ये घालून बघ. मी स्प्रे केला होता. बहुधा रीड डीफूजर मध्ये सुद्धा हेच असावे.
distilled water तुला कुठेही मिळेल.

नाहीतर कुठल्याही स्पा मध्ये जा,एक मसाज घे, बरेच गप्पा मारून हसत बोलून नी त्यांच्या कडून अरोमाथेरपीची ऑइल विकत घे त्यात distilled water टाक. Happy
मॉड विषयांतर झाले. माफी असा.

दालंमोट जे फरसांण च्या दुकानात मिळत त्याची रेसीपी
कोणाला माहित आहे का??

मीनाताई, कुळथाचे पिठले तुमच्या कृतीने खूप छान झाले. धन्यवाद!

दालमोठ्/दालमूठ खालिल ठिकाणी पहा.

http://www.maayboli.com/node/4247

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

मैत्रिणींनो, प्रश्न- काळे ऑलिव्हज कुठल्या दुकानातुन घ्यावेत ? त्यासाठी कुठले उत्पादन (ब्रँड ?) चांगले आहे ? मला पिझा/पास्तासाठी हवे आहेत.

नॉरवल्क मधल्या stew leonard ला भेट दे, तिथे चिकार प्रकायचे ऑलीव्ह भेटतील. in veg section

http://www.stewleonards.com/html/directions_norwalk.cfm

and once you'll try their milk, you'll always buy that, plus the rotis are amazing over there

कोणी मला मॉकटेल्स च्या रेसीपीज सांगू / लिंक देऊ शकेल का?

मला रवा लाडू करायचे आहेत आम्ब्याचा पल्प टाकून. कुणि केले आहेत का असे?

बर्‍याच दिवसांनी आले इथे आज. खूपच बदल दिसत आहेत. सराव व्हायला वेळ लागेल.

व्हिनिगर कांदा आणि बटाटेवड्याबरोबर देतात तसल्या मिरच्या यांची रेसिपी मिळेल का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी

अनानी, धन्यवाद. तो पेपर आहे माझ्याकडे. मला पिना कोलाडा, फ्रुट पंच ह्यांच्या हव्या आहेत.

व्हिनीगरमधल्या कांद्यासाठी, छोटे कांदे सोलून घ्यायचे. (मद्रासी कांदे नाहीत ) एक कप व्हीनीगरमधे तितकेच पाणी, दोन टिस्पून मीठ आणि एक टिस्पून साखर घालुन कोमट करावे. ( कांदे बुडतील एवढ्या प्रमाणात हा द्राव करावा ) मग त्यात कांदे बुडवून किमान चोवीस तास ठेवावेत. मग निथळून घ्यावेत. व्हीनीगरमधेच ठेवले तरी चालतील. हवे तसे वापरावेत.

फरसाणा बरोबर ज्या मिरच्या देतात त्यासाठी. उकळिच्या पाण्यात मिरच्या मिनिटभर ठेवून निथळून घ्याव्यात. जर तिखट कमी हव्या असतील तर मिरचीला पाण्यात घालण्यापुर्वी एक चीर द्यावी. मग तेलात हिंग व हळद घालुन परतुन घ्याव्यात. हवे तर याबरोबर थोडे तीळ व कोथिंबीर परतावी. मग लिंबाचा रस पिळावा. यापेक्षा खमंग हव्या असतील तर मिरचीला चिर देऊन त्यात आमचूर, हिंग व थोडी साखर घालुन मग परताव्यात.

धन्यवाद दिनेशदा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी

माझ्याकडे १ किलो जाड पोहे आहेत. ते मला संपवायचे आहेत. त्यांचं काही करता येइल का? (फोडणी चे पोहे सोडुन).

ते तळून त्याचे लाडु करता येतील. टिकतील ही. तळून त्यावर पिठीसाखर, वेलची वगैरे घालुन एक वेगळा मधल्या वेळेचा प्रकार होईल.
हौस असेल तर त्याचे पापड किंवा मिरगुंड करता येतील.

पोहे भिजवुन स्मॅश करायचे(हवा तर थोडा बटाटा कुस्करुन)..... आणी आले-लसुण पेस्ट व तिखट मीठ टाकुन कट्लेट पण छान होतात.

२ वाटी पोह्यांना एक चमचा तेल चोळून लावायचे. मग ते कढईत मंद व खरपूस गुलाबी भाजायचे. थोडे कोमट झाल्यावर
त्याला अर्धा चमचा साजुक तूप व मीठ लावून नुसते एकत्र करायचे. गार झाल्यावर एअरटाइट डब्यात भरून ठेवायचे.
लेखन, वाचन, टी.व्ही बघणे इत्यादी वेळी वाटीत किंवा बशीत घेऊन चमचा चमचा तोंडात टाकावेत.

२ वाटी पोह्यांना एक चमचा तेल चोळून लावायचे. मग ते कढईत मंद व खरपूस गुलाबी भाजायचे. थोडे कोमट झाल्यावर
त्याला अर्धा चमचा साजुक तूप व मीठ लावून नुसते एकत्र करायचे. गार झाल्यावर एअरटाइट डब्यात भरून ठेवायचे.
लेखन, वाचन, टी.व्ही बघणे इत्यादी वेळी वाटीत किंवा बशीत घेऊन चमचा चमचा तोंडात टाकावेत.

मी दिवाळीत शंकरपाळी बेक करायचा प्रयत्न केला. अवन ३५० ला तापवुन घेतला आणि १० मिन. प्रत्येक बाजूने भाजले. लहान पूर्‍या करुन भाजल्या. तळलेल्या शंकरपाळ्यांसारख्या लेयर्स आणि चव आहे पण जरासे कडक झालेत आणि एक-सारखा रंग नाही आलाय. मध्यभागी पांढरट आणि कडा गुलाबी असे झाले आहे. काय चूकले ?

अवनचे तपमान जास्त झाले. त्यामूळे हवा गरम झाली व कडा जास्त भाजल्या गेल्या. अवन बंद केल्यावरही अवनच्या आणि पदार्थाच्या आतील उष्णतेमूळे पदार्थच शिजतच असतो. म्हणून असे कोरडे पदार्थ अवनमधून लगेच बाहेर काढायला हवेत.

माझ्याकडे घरचे silverbeet (chinese spinach) खूप आले आहे. लोका.न्ना वाटून झाले, ricotta घालून pasta shells झाल्या, पनीर - पालक, आलू - पालक, पालक पराठे सगळ करून झाल. आता काय अजुन करता येइल???

पाटी लावा न काय...रुप्याला जुडी Wink

डाळ-पालक
पालक कबाब
पालक पुरी
पालक भजी
spinach quiche
पालकाची दह्यातली कोशिंबीर.

पालक तेलात परतून, थंड करून फ्रिझरमधे ठेवावा. छोट्या डब्यात विभागून ठेवला तर हवा तेव्हा वापरता येतो.

..............
लाडु हाणावे, चकल्या हाणाव्या, कानोला उदरी भरावा I
ओला टॉवेल गावला नाही तर तिलापिया तळून खावा II Proud

लाजो पालक पुलाव, पालक वड्या, पालक शेव करता येइल.

वर कोहळ्याबद्दल पोष्ट वाचून लिहितो:
१) पिवळ्या रंगाचा ज्याल इंग्रजीत पम्पकीन म्हणतात तो भोपळा. हो त्याला कोहळा पण म्हणतात. माही आई काशीकवळं म्हणते. मी देखील कधीकधी काशीकवळं म्हणतो. कोहळ्याचे बोलीभाषेत कवळं झालं असावं.

२) दुधीभोपळ्याला हेच नाव ऐकल आहे. काहीकण नुस्ते दुधी म्हणतात. लवकी म्हणजे दुधी पण हिन्दीमधे.

३) भारतातले भोपळे भरपूर मोठे असतात आकारानी. शिवाय त्यांचे आकार देखील लांबूळके असतात.

लाल भोपळ्याचे पराठे छान होतात. लहान मुलांन्ना भाज्या आवडत नसतील तर भोपळा शिजवून तो कणकेत एकजीव करावा व त्याचे पराठे करावेत. सुंदर केशरी रंग येतो नि खावेशे वाटतात.

जपान पम्पकीन हिरवा असतो. त्याचे पराठी हिरवे होतात मग. छान हलकासा हिरवा रंग येतो.

शिजवलेला लाल भोपळा, ताक, गव्हाचे पीठ, बेसन -- एकत्र करून छान घारगे होतात. टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.

अश्विनी, कुळीथ करताना, फक्त त्याचे पीट एक किंवा दोनच चमचे घ्यायचे असते. शिवाय कुळीथाचे पिठले हे एकदम पातळसर असते फोडणीच्या वरणासारखे. कुळीथाच्या पिठळ्यात कोकम पण घालतात आणि किंचीत नारळाचा चव.

बी, भोपळा आणि कोहळा ह्या दोन स्वतंत्र भाज्या आहेत. ह्याबद्दल वर चर्चा झालेली आहेच.
>>>>
भारतातले भोपळे भरपूर मोठे असतात आकारानी. शिवाय त्यांचे आकार देखील लांबूळके असतात.
>>>
हे तु दुधी भोपळ्याबद्दल बोलतो आहेस की साध्या भोपळ्याबद्दल? कारण साधा (लाल-पिवळा) भोपळा हा चांगला गरगरीत गोल असतो. मुळीच लांबूडका नसतो. आणि आकाराबद्दल बोलत असशील तर माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेतील संकरीत बीयाणाचे भोपळे हे केवळ मोठे नाही, प्रचंड असतात आकाराने. काही काही ठिकाणी भोपळ्याच्या आकाराची स्पर्धा देखील असते

Pages