पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, त्या टिनचा आणि आतल्या फणसाचा एखादा फोटो दिला तर नीट सांगता येईल.
माझ्या अंदाजाप्रमाणे टिन मधे भरण्यापूर्वी तो निश्चित उकडत असावेत. आणि नीट उकडलेल्या कच्च्या फणसाचा चिकट गोळा होत नाही.
एरवीही ताजा फणस मिळाला तर तो तसाच न सोलता, न कापता देठासकट अख्खा कूकरमधे २० मिनिटे (प्रेशर आल्यानंतर ) उकडून घ्यायचा, मग पुरता थंड करायचा.
या प्रक्रियेत आतला दांडा व वरची काटेरी साल सुटी होते आणि मग तो सहज सोलता येतो. हाताला तेल लावायची देखील गरज रहात नाही.

वा खुप छान माहीती सांगितली दीनेश तुम्ही

कॅन मधल्या फणसाची भाजी छान होते- अजिबात चिकट गोळा वगैरे होत नाही. मी खोबर्‍याचं वाटण घालून करते किंवा लसूण फोडणीला घालून सुकी भाजी करते, दोन्ही मस्त होतात.

फ्रोझन फणस कधी वापरला नाही. देशि दुकानात मिळाला का फ्रोझन फणस तुला?

अगदी सहमत शोनू. मी पण ओलं खोबरं आणि वरुन लाल सुक्या मिरच्यांची फोडणी घालून करते कॅन्ड फणसाची भाजी.

कॅन्ड फणस? कधी ट्राय नाही केलं बुवा. कुठे आणि काय नावाने मिळतो?

देशि दुकानात मिळाला का फ्रोझन फणस तुला?>>Yeap

Chaokoh ह्या ब्रॅन्डचा इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळणारा हिरवा कॅन. हिरवा आणि पिवळा असे दोन कॅन असतात. हिरव्यात मीठ आणि पिवळ्यात साखर असते.

इथे कुणाला भेंडीचं पंचामृतची पाककृती सांगता येइल का ?

ही घे सिंड्रेला भेंडीच्या पंचामृताची पाककृती ---
फोडणीत जीरे, मोहरी, कडिपत्ता, लसुण्-जीरे कुटुन टाकावे मग त्यात गोल पातळ चिरलेली भेंडी परतुन घे.
भेंडी थोडी शिजल्यावर, चिंचेचा कोळ, गुळ, मीठ टाकुन उकळी आली की मग दाण्याचे कुट्/तीळाचे कुट टाकुन छान शिजउन घे.
कच्या चिंचेचा वास जाईपर्यंत शिजविणे.

ईथे रेसिपी दिलि तर नंतर शोधायला अवघड जाईल. बहुधा वाहुनही जातील.

सुप्रिया, टाकली पाककृती Happy

इकडे चांदीचा वर्ख कुठे मिळेल? मिठाईच्या दुकानात मिळू शकेल कदाचित. इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्येही मिळतो कां?

आता निव्वळ चांदीचा वर्ख दूकानात मिळतो का, याची मला शंका आहे. हलवाई बहुतेक दुसरेच काहितरी वापरतात.
हे माहित असताना आणि चांदीचा वर्ख कसा तयार करतात हेहि माहित असल्यावर, तो मी शक्यतो टाळतोच.
भारतात तो साधारण मोठ्या ग्रोसरी दुकानात मिळतो.

मला झटपट नाश्ता करायच्या पा़क़कुति पाहिजेत

निलेश म्ह्स्के

सायो, किती हवाय? आहे माझ्याकडे पाठवण्या येव्हडा. ६-७ शीट्स निघतील.

अग मृ परवा संजीव कपूरने जो पुलाव दाखवला त्यात त्याने पनीरचे बॉल्स चांदीच्या वर्खात रॅप करुन भातात घातले होते. एकदम शाही लुक आला होता त्याने. करुन बघावं असा विचार आहे. तुला कुठे मिळाला वर्ख? मी आधी विचारते इथे मिठाईच्या दुकानात आणि कळवते तुला. पण थॅन्क्स...

मी भारतातून घेऊन आले. एका पाकिटात भरपूर पट्ट्या असतात. मी फारतर मिठाई किंवा बिरयानी वर चढवते वर्ख. बघ मिठाईच्या दुकानात. नाही मिळाला तर कळव.

भारतात तयार होणारा हा वर्ख aluminiumचा असतो. आरोग्यास अतिशय घातक. हे aluminium अशुद्ध असतं. शिवाय शुद्ध असलं तरी अपायकारकच. तेव्हा याचा वापर जपूनच करायला हवा.

शेपू ची भाजी आणि भजी व्यतिरिक्त काय करता येईल ?

पराठे / थालिपीठ.. (उरलेल्या भाजीचे) झकास लागतं अन शेपू न आवड्णार्‍याला पण आवडतं. Happy

शेपू घालुन डोसा पण करता येतो.

भारतात तयार होणारा हा वर्ख aluminiumचा असतो.<<< त्याची परिक्षा करणं कठीण नाही. सोडियम हायड्रॉक्साईड्च्या पेलेट्स वाटीभर पाण्यात (वाटी काचेची) १ पेलेट मिसळून त्यात एक तुकडा फॉइल टाकली आणि ती विरघळून दिसेनाशी झाली तर ती चांदी नाही. नक्कीच ऍल्युमिनम आहे. (माझ्याकडे शुध्द चांदी आहे की नाही ह्याची लवकरच खात्री करते.) Happy

मृण्मयीने वर लिहिलेलं सोप्या शब्दांत सांगतो..:-)
अगदी उकळतं पाणी किंवा चुन्याच्या पाण्यात या वर्खाचा तुकडा टाकायचा.
जर वर्खाचा रंग बदलला (बहुतेक वेळा गरम पाण्यात टाकल्यावर त्यावर एक पांढरट थर बसतो. ) तर तो वर्ख वापरण्यास अयोग्य.

काल बटाट्याचे पराठे करायला घेतले पण बटाटे खुप जास्त शिजले आणि सार्‍रण सैल झाले आहे. काय करता येईल? पराठे तर नक्किच होणार नाहित. मी रवा घालुन पाहिले. आता कोंणाला आणखिन युक्त्या माहित असतिल तर सान्गाव्या.

त्याच बटाट्यात कणीक मिसळूनही पराठे करता येतील. फक्त पाणी घालून भिजवताना जरा जपून.

त्यात ब्रेड कुस्करून घाल. (गोळा लागलीच घट्ट होईल.) हिरवी मिरची-आलं-लसुण ह्याची गोळी, धने-जीरे पावडर, कोथिंबीर, आमचूरपावडर घालून आलु टिक्क्या करता येतील. किंवा आणखी भाज्या घालून पॅटिज. मग मस्त रगडा पॅटिज करून खाता येतील.

मृण्मयी, सायो, धन्यवाद ! दोन्हि प्रकार करता येतील एवढा बटाटा आहे. त्यामुळे लवकरच करते.

मी कुठेतरी लिहिले होते शेपूचे थालिपिठ का पराठा. नक्के आठवत नाही.

ईडिअन स्टोर मधुन तान्दूळ शेवई आणली आहे. त्याचा काय करता येते ?

त्याच्या थाई शेवया (रेडीमेड मसाले घालून) छान होतात.
ह्या शेवया शिजवून पुळिओग्रे मसाल्याबरोबर मिसळून मस्त लागतात.
उपमा पण छान होतो. सगळी फोडणी करून फक्त शिजलेल्या शेवयांत मिसळायची.

Pages