पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावी, चेरी टॉमेटोज सॅलड्स मधे, पिझ्झा टॉपिंग म्हणुन, ओपन सँडविचेसवर असे खाता येतिल. नाहीतर नेहमीच्या टॉमेटोसारखेच वापरायचे. आमटीत, भाजीत अर्धे, किंवा क्वार्टर करुन घालायचे.

धन्स लाजो. पहिल्यांदाच आणले आहेत. नुस्त्या या टॉमेटो ची भाजी होउ शकेल का? म्हण्जे चांगली लागेल का? (जरा जास्तच आण्लेत आणि सगळे पिकलेले आहेत. )

रावी, भाजी करता येइल, पण त्यापेक्षा लोणचे कर.. टॉमेटो अख्केच ठेव फक्त एक बारीक फुल्ली सारखी चिर दे आनी मग मसाला, तेल, फोडणी वगैरे...पन टॉमेटो पिकलेले असैल तर लगेच संपवायला लागेल लोणचे. किंवा चटणी करु शकतेस.

अर्धे अर्धे कापून पिझावर ठेवायचे. मस्त दिसतात आणि लागतातही. खरे तर ते इतके छोटे असतात, कि आणखी काही करण्यापेक्षा अख्खेच सलादमधे टाकले तर छान.

तिखट , ओल्या, लाल मिरच्या मिळाल्यात. पाउंडभर किंवा जास्तच असतील. एकदम जहाल तिखट आहेत. त्याचं काय करता येईल ?

रंजका करता येईल. पण त्यासाठी मिरच्या धुवुन कोरड्या पेपरने पुसायच्या. शक्य असेल तर एखादा दिवस नीट पसरवून ठेवायच्या. मग त्याचे देठ काढुन रंजका करायचा. फ्रीजमधे ठेवल्यास वर्षभर टिकतो.

मेधाताई, लाल मिरच्या व लसूण एकत्र ठेचून त्यात लागेल तसा चिंचेचा घट्ट कोळ घाला. चवीपुरते मीठ आणि जिर्‍याची फोडणी. जर हा प्रकार टिकवायचा असेल तर कोळ उकळून घालणे. तूप घालून वाफाळत्या भाताबरोबर छान लागतो हा प्रकार.
disclaimer: हा प्रकार मी करून पाहिलेला नाही. प्रमाण हवे असेल तर विचारून सांगते.

हा धागा तांत्रिक कारणासाठी बंद करतोय. एकाच धाग्यावर खूप प्रतिक्रिया असतील असे धागे हळूहळू बंद करावे लागतील (सर्वरचा ताण कमी करायला). हवे असल्यास पाककृती माहिती आहे का-२ असा धागा सुरु करा.

Pages