गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्भारपणाच्या third month मधे mumbai to nainital हा प्रवास करणे योग्य आहे का? please suggest me.

मला १.५ महिने झाले, आता मला postik अन्न सान्गा.

स्नेहा

svb,
पौष्टीक - paushhTeeka.
अनुस्वारासाठी कॅपीटल M वापरा, सांगा- saaMgaa असे लिहा. Happy

सगळ्या प्रेग्नंट बायकांना दिलेला फुकट सल्ला आपल्यालाही देते. मालती कारवारकरांचं वंशवेल आणा. Happy त्यानुसार शक्य तितके पदार्थ स्वयंपाकात असु द्या.

सगळं व्यवस्थीत असेल तर रोजचं वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबिरी आणि फळं, ह्याखेरीज वेगळं काही खाण्याची गरज असते असं नाही. जेवणात शक्य झाल्यास मोड आणून केलेल्या कडधान्याच्या आमट्या, पालेभाज्या असं सगळं असावं. शक्यतोवर बाहेरचं तेलकट, तुपकट, अती गोड, जास्त मीठ असलेलं टाळावं. मांसाहार करत असाल तर ह्या दिवसांत तो माफक असावा. पचायला हलके पदार्थ खावेत. मसालेदार, तिखट टाळावं. (जळजळ वाढते.)

एकाच वेळी खूप जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळानं बेताचं खावं.

Morning sickness जास्त होत असेल तर :

बहुतेक वेळा द्रव पदार्थ घेतल्याने उलट्या वाढतात, तेव्हा घन पदार्थ खावेत. बळेच दूध/फळान्चे रस पिण्याचा अट्टाहास करु नये.
काही जणीन्ना रात्री झोपण्यापुर्वी दूध पिववते, अशा वेळी चिमुट्भर सुन्ठ पावडर टाकुन, किन्चित कोमट्/गरम दूध प्यावे.
लाह्या (साळीच्या) अशा वेळी खूप उपयोगी पडतात, नुसत्या खाव्यात किन्वा चिवडा करुन ठेवता येतो. उलटी झाल्यानन्तर लगेच येणार्या अशक्तपणासाठी चान्गले.
दिवसभर सारखेच उलटुन पोटात काही राहत नसेल तर सुवर्णसूतशेखर, प्रवाळपन्चाम्रुत, कामदुधा यासारखी औषधे मोरावळ्याबरोबर घेउन उपयोग होतो.
खडीसाखर पाण्यात टाकुन पाणी उकळुन घ्यावे आणि त्यात वेलदोड्याची सालाशिवाय केलेली पुड चिमुट्भर घालुन ठेवावी, हे पाणी दिवसभर चमचा-चमचा प्यावे.
मलावरोध टाळण्यासाठी रात्री झोपताना काळ्या मनुकान्चा काढा/ गरम दूध तूप घालुन प्यावे. बालाजी ताम्बे यान्च्या "गर्भसन्स्कार " पुस्तकात त्रिफळा घेण्यास सुचवले आहे, परन्तु त्रिफळा मध्ये असणारा हिरडा (अतिशय उष्ण असल्याने) गर्भवतीन्ना वर्ज्य समजावा. तेव्हा त्रिफळा कटाक्षाने टाळावा.
जास्त ढेकर येत असतील्/पोट गुडगुड्ल्यासारखे वाटत असेल तर आवळा पावडर्/वेलदोड्याची पूड्/नारळाची शेन्डी यापैकी काहीतरी एक तव्यावर काळे होइपर्यन्त भाजुन खडीसाखरेबरोबर खावे.
सर्वात महत्वाचे, आवश्यक तेवढी विश्रान्ती घ्यावी.

मैत्रीणींनो ... तुमच्या बोलण्याने अन सल्ल्यांनी फार धैर्य आलंय मला . अजून एक गोष्ट शेअर करावीशी वाटतेय ती म्हणजे, मी गेल्या महीण्यात रामदेव बाबांच्या चिकित्सालय मधे गेले होते नवरा व मी दोघेही गेलो होतो . त्यांनी नवर्‍याला फक्त प्राणायाम अन आसने करायला सांगितले अन मला PCOD साठी काही औषधे व प्राणायाम्,आसने सांगितली , मी काटेकोर पणे ते सगळे केले अन काल सोनोग्राफी केली तर सिस्ट नाहीसे झालेत ! आम्हाला खरच खूप आनंद झाला.

शोनू ,अश्वीनी,दिपाली तुमचे खरच खूप आभार . दिपाली तुमच्या मेलला मी उत्तर दिले होते. Happy
-------------------------------------------------
देव करो अन सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ... माझ्याही Happy

मधुरानी
तुम्हाला त्यांनी कुठली औषधे दिली होती सांगाल का ?

रामदेव बाबांची औषधे एखाद्या वैद्यकीय (आयुर्वेद) तज्ञाला दाखवुन घ्यावी (असे माझे मत आहे). काही लोकांना विशेषतः लहान मुलांना त्यांची औषधे घेउन कायमचा काहीतरी probelm झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते.

सिन्ड्रेला, बरोबर मलाही असेच वाटते. म्हणजे प्राणायाम्,आसने कुणालाही, कधीही उपयोगीच आहेत (नीट शिकुन योग्य पद्धतीने केली तर) पण औषधे घेताना जरा जास्त काळजी, तज्ञान्ची मते घ्यावीत.

शोनू ,

दशमुल क्वाथ - २००ग्राम व सर्वकल्प क्वाथ १०० ग्राम ह्याचे मिश्रण करुन ४०० ग्राम पाण्यात एक चमचा टाकून ते १०० ग्राम होइपर्यंत उकळून त्याचा काढा तयार करायचा व सकाळ ,संध्याकाळ जेवणापूर्वी अर्धा तास घ्यायचा .

वंग भस्म १० ग्राम
कहरवा पिष्टी १० ग्राम
वृध्दीवाटीका चुर्ण २० ग्राम
अमृतासव १० ग्राम
स्वर्णभस्म ५ ग्राम
प्रवाळ पंचामृत ५ ग्राम
रससिंदूर २ ग्राम
हे सगळे मिश्रण करुन रोज दोन वेळा एक एक चमचा मधासोबत घ्यायचे.

स्त्री रसायन वटी , अन मेदोहर वटी -ह्या दोन दोन गोळ्या दोन वेळा (सकाळ-संध्याकाळ) जेवणापूर्वी .
रज प्रवर्तीनी आणि चंद्रप्रभा वटी - ह्या दोन दोन गोळ्या दोन वेळा (सकाळ-संध्याकाळ) जेवणानंतर .

ह्या सोबत प्रणायाम भस्त्रीका - १० मिनिट , कपालभाती २० मिनिट आणि अनुलोम विलोम १५ मिनिट . मी त्यांची सीडी आणली आहे ती बघूनच हे प्राणायाम व आसने करते .
तसं बघता हे काटेकोर पाळणे फार अवघड आहे पण ते मी नियमीत केल्यानेच माझे रिझल्ट चांगले आले असे मला वाटते.

मला वाटले माझ्यासारख्या एखादीला हे उपयोगी पडेल म्हणून हे सगळं इथ सांगितलं पण हे डॉक्टरी सल्ल्याने केलेलेच चांगले Happy

-----------------------------------------
देवा, सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कर ..... माझ्याही Happy

मनु२००६ तुम्ही माझ्या विचारपूस मधे तुम्हाला रामदेव बाबांच्या क्लीनीक चा पत्ता हवा आहे असं लिहिलय पण तुम्हाला उत्तर देताना 'हे पान हरवलेले आहे' अस येतय . म्हणून इथेच सांगते . रामदेव बाबांचे चिकित्सालय पुण्यात भरपूर ठीकाणी आहेत . तुम्ही कोठे राहता ? कँपात एक चिकिस्तालय आहे.

माझ्या एका मैत्रीणीला एक्टोपिक प्रेग्नंसी राहीली २-३ आठवड्यातच लक्षात आली म्हणून तो गर्भ काढून टाकण्यात आला. मी इथे नेटवर वाचले की पून्हा प्रेग्नंसी राहण्यासाठी अवघड अस्ते म्हणून.. कोणाला माहीती आहे का ? आणि राहीली तर ती व्यवस्थित राहते का ? तिचं पहिल्यांदा अ‍ॅबॉर्शन झाले होते अन हे दुसरे ...

क्रुपया मला मदत करा.
काही दिवसान्पूर्वी इथे 'भारतातून कोणी बाळ्न्तप्णा साठी येत असल्यास त्याना काय आणायला सान्गावे' हे वाचले होते. प्ण आत काही केल्या तो थ्रेड मिळत नाही आहे. क्रुपया मला कोणी त्या थ्रेड ची लीन्क द्याल का?

- मनप

<<<आणि कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण मी खूप केसेस अश्या पाहिल्या आहेत की पाण्यासारखा पैसा खर्च केला, आयुष्यातली बहुमोल वर्षे वाट्टेल ते उपाय करण्यात घालवली आणि मग अडॉप्ट करायचे वयही निघून गेले.
>>> अश्विनी, 'अडॉप्ट करायचे वय' ह्याबद्दल जरा माहिती देणार का प्लिज...

-- अश्विनी

बाळाची नाळ खुप खाली आहे. अश्या परिस्थितीत काय काय काळजी घ्यावी.
प्लीज माहीती द्या.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

नमस्कार, माझी वहिनी बाळान्त होउन आथव्डा झाला. तिच्या सठी काय आहार असावा?

मनु २००९, बाळाची नाळ खुप खाली आहे. >>>>>>>> नाळ की वार (प्लॅसेंटा)?

कारण प्लॅसेंटा -3rd degree असेल तर कंप्लीट बेडरेस्ट आवश्यक आहे. 2nd degree असेल तर ७ व्या महिन्या पर्यंत बेडरेस्ट घ्यायला सांगतात.

-प्रिन्सेस...

शतावरी कल्प नक्की कधी पासुन घेतल तर चान्गल आणि त्याचा फायदा काय? आता मला ८ वा चालु आहे तर मी आतापासुन घेउ शकते का?

आता मला ८ वा चालु आहे तर मी आतापासुन घेउ शकते का?>> हो.
शतावरी कल्प दुधासाठी चांगले आहे .

शिल्पा,
शतावरी कल्प साधारणतः पाचव्या महिन्यापासून घ्यायला सुरूवात करतात. आणि बाळ स्तनपान करेपर्यंत (कधीपर्यंत ते तू ठरव) पण आयडिअली बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत चालू ठेव.

धन्यवाद Ashwini & Aas,
मी आता एवड्या late चालु करतेय तर काही नुकसान नाहि ना होणार?
मला बाळ्याच्या movements बेन्बीच्या खालिच जाणवतात, is that ok? Dr. ne sangitla ki Placentra khali aahe manun asa asel ka?

नुकसान नाहीच होणार. कधीही सुरूवात केली तरी फायदाच होईल.
जोपर्यंत बाळाच्या हालचाली नियमीत होत आहेत तोपर्यंत काळजीचे कारण नाही. स्पॉटींग इ. झाले तर मात्र लगेच तपासून घे. आणि प्लसेंटा खाली असेल तर ultrasound मध्ये कळेलच.

BP जास्त असेल तर normal delievery होऊ शकेल का?

BP जास्त असेल तर normal delievery होऊ शकेल का?

शिल्पा कितवा महिना चालु आहे? आणि bp किती high आहे?
details सांगु शकशिल का? तसा bp high असणे आणि normal delivery याचा सबंध आहे पण आणि नाहि पण.

मला आता ९वा चालु आहे, BP ७व्या महिन्यापासुनच थोडा high आहे, सध्या १५०/१०० आहे. overweight पण आहे मी. तर माझी normal delivery होऊ शकेल का?
आणि एक 'वेदनारहीत प्रसुति' कोणी अनुभवली आहे का? ती किती फायदेशीर आणि आरोग्याला उपयोगी आहे? Risk Level किति आहे कोणि सांगु शकाल का?

शिल्पा, माझंही बीपी ७ व्या महिन्यापासून हाय होतं आणि मी रोज ते कंट्रोल होण्याकरता गोळ्या घेत होते. (मला वाटतं अल्फाडोपा. खात्री करुन घ्यावी डॉक्टरांकडून). नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते पण खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवलेलं चांगलं तसंच रोज जवळपास फिरायला तरी जावंचं. तुमचे डॉक्टर योग्य तो सल्ला देतीलच..

अनेक कहाण्या ऐकुन मला आता असं वाटायला लागलय की जिची नॉर्मल व्हायची ती होतेच. मी स्वतः एक दिवस व्यायाम केला नाही, माझं बीपी सातव्या महिन्यापासून हाय होतं पण तसूभर त्रास झाला नाही आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली.

माझ bp पन थोड high होत पण साधरण ३५ week पासुन पण जास्त high नव्हत. माझी normal delivery झाली. painless delivery झाली. तु कुठे असतेस? US मधे असशिल तर खूप common आहे painless delivery.

Pages