विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsss अरे माझ्या लंकेच्या पोरानो, विकेट घालविली का रे.....

चला मी आलो. आता तुम्ही खेळा. माझा आशिर्वाद आहे. विजय लंकेचाच होईल. ( हा वरदान मी शंकराकडुन धोक्याने मिळविला आहे.)

भ्येंडी!! काय फिल्डींग करुन राहिलाय रैना!!! लाईव वायर एकदम!!! जबरी!!
सेहवाग मस्त लोंबकळला त्या कॅच ला!! झिंङ्गाअट!!!

दीपांजली, जहिरला परतवुन लावण्याची ताकद बाळगणारे आमचे लंकावीर मागे हटणार नाही. तुम्ही लोकं आमच्या लंकावीरांचं कितीही खच्चीकरण केलात तरी आम्ही मागे हटणार नाही. आठवा ती ईडन गार्डनची मॅच. आजही आम्ही तसेच खेळणार.

लंकेश्वर ....अरे खेचरा, जरा गप रहा .. तुझ्या लन्केच दहन आज नक्कि..थाब थोडा..याला कोपर्‍यात घ्यायचा का रे ??

जाऊ द्या रे, ते बोललं म्हणून आपण बोललच पाहिजे का?

झहीर पाहिला का? कसा रणगाड्यासारखा पळतो? बिचारा पार लोळला आडवताना! Proud

गप रे मराठी रावणा, तू कसल लंकेश्वर..रावण पीठलं खाऊन सुस्तं झाल्याने कोणाला रावणाचं बळ चढत नाही , झोप मुकाट Proud

आज काही झाले तरी विजयश्री हि माझ्या लंकेचीच होईल. आम्ही परत एकदा भारताला विजयाच्या उंबरठ्यावरुन बाद करु.

माझ्या लंकन वीरानो, परिस्थीती जरी गंभीर असली तरी काळजी करु नका. आमची नुसती परिस्थीतीच गंभीर आहे पण खरा गंभीर तर भारताकडे आहे. म्हणुन काळजी करायचं काम त्यांचच. तुम्ही चिकाटीनं खेळा म्हणजे झालं.
तोवर मी शंकराकडे एक चक्कर टाकुन येतो. जमल्यास एखादा वरदान घेऊन येतो.

जब्बरदस्त डाइव युवी!!! खत्रा फिल्डींग!
ऑडियन्स मध्ये पाहिले का? पबलीक मारुतीची तोंडं लावून आलीयेत.

मला ही भारत वि भारत मॅच वाट्टेय बघताना, स्टेडियम मधली लंकन क्राउड देशीच वाट्टीय..पाकी तरी कळतात वेगळे Proud
त्यांचे प्रेसिडन्ट तर धोतर मधे आहेत.

Pages