मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

हा आला तो गेला, तो गेला हा आला,
ही आली ती गेली, ती गेली ही आली,
हे आले गेले जाउदे उड्त
आपण बसु ईकडे डुलत
हे घे...
73.gif

चिअर्सsss

एका दमात गिलास संपवतात तसा हा धागा एका दमात वाचून काढला.
एक आमच्या पण शेराची डरकाळी,
गर दम है इबादत मे
तो मस्जिद हिला के दिखा |
वरना आ बैठ, दो घूंट पी
और हिलती मस्जिद देख |

असो .. बेफिकीर आणि पंत कधी येताय मग माझ्या मैफिलीत ?
गम्मत करत नाही ... खरंच आमंत्रण देतोय !

पंत,
काटा किर्र आणि टांगा पल्टी धागा !
Happy
बेफिकीरजी तुमच्या अनमोल सल्ल्यामुळे आता पिताना थोडा कॉन्फीडन्स आणि मजापण येईल !
Lol

पण पिल्यानंतर (२-३ पेग होडका) उलटी होण्याचे कारण आणी उपाय कृपया कुणी सांगेल का ?
Happy

पण पिल्यानंतर (२-३ पेग होडका) उलटी होण्याचे कारण आणी उपाय कृपया कुणी सांगेल का ?
>>>

आतडं पाहून पेग रिचवावे Proud
सदर इसमाने पुन्हा ३पेग व्होडका एका ग्लासात एकत्र करून ऑन त रॉक्स आत्महत्या करावी त्यातच उडी मारून Proud

Alcohol is not an answer...... but it just makes u to forget the question Happy

वाटे धरु सन्मार्ग आता काळ थोडा राहिला,

वाटे कशाला व्यर्थ आता काळ थोडा राहिला,

आहे जर नक्किच ठरले व्हायचे नापास मी

मिळवुनियाही काय करु हस्ताक्षराचे मार्क मी....

- भाउसाहेब पाटणकर..

लोकेशन : गोव्याचे कमी दर्वळीचे बीच

वेळ : संध्याकाळ ते रात्र कोणतीही.....
कंपनी : असली तर छान नसेल तर उत्तम
म्युजिक : लाटांचे नैसर्गिक म्युझिक
कॉकटेल : बिनधास्त
ब्रॅन्ड : बरेच महागडे पण ट्राय करता येतात कारण स्वस्त मिळतात Happy
सोबतीला: फिश फ्राय, रवा फ्राय
जेवणासाठी : चिकन

मजा येते.............

अभिजित जबरा प्लॅन आहे हा !!

कंपनी : असली तर छान नसेल तर उत्तम>>> आजवर तरी मित्र मैत्रीणिंच्या सोबत पीत आलोय ...एकटं बसुन प्यायची वेळ अजुन तरी आली नाही ...पण असं एकटं बसुन प्यायला मजा येईल ! रोमान्स विथ सेल्फ !! वॉव !! क्या खूब जमेगा रंग जब मिल बैथेंगे तीन यार ...मै मेरी तनहाई और काजुफेनी+कोकोनट वाटर ...वाह वाह

पंत
एकटं प्यायला खुप मजा येते....
वेळ यायची काय गरज आहे....

आवडती पुस्तके, संगीत, रम्य आल्हाददायक वगैरे म्हणतात ते वातावरण, संपूर्ण शांतता, कोणाची वायफळ बडबड नाही, कोणताही व्यत्यय नाही...
आग्रह नाही, मित्र नसल्यमुळे पिण्याची स्पर्धा नाही, आपल्या स्पीड ने घेता येते
फक्त स्वतासोबत enjoy करता यायला पाहिजे

मला तर फार आवडते....

गोव्याचे कमी दर्वळीचे बीच
>>>>

अभि, आता नक्की कुठे बसलायस???? Wink

नाही, वर्दळीच्या जागी "दर्वळीचे" लिहिलेयेस म्हणून विचारले.... Proud

पंत तर नेहमीच नशेत चूर असतात, त्यांना काय?? तू "कर्दळीचे" लिहितास तरी ते "वर्दळीचे" असेच दिसलं असतं..... Rofl

शेवटी भावना महत्वाची....... Wink

भुंगा ...

तुमची पोस्ट वाचुन मग परत माझी पोस्ट वाचली तेव्हा लक्षात आलं.

असो परत edit नाही करत. असु दे तशीच....

आणि btw

बसलो नव्हतो म्हणुन अशी चुक झाली....

वपु म्हणतात त्याप्रमाणे. " पिलेल्या माणसाला न पिलेल्या माणसापेक्षा जागरुक रहावे लागते."

मी जर शुद्धीत नसतो तर तीच पोस्ट डायरेक्ट न टाकता चार पाच वेळा वाचुन मग टाकली असती Happy

अभि Proud

त्रिशतकाकडे वाटचाल करणारा धागा आटला कां ?
पंत , बेफिकीरजींना कमी पडली , त्यांच्या ग्लासात ओता जरा.
आज ईतनी भी मयस्सर नही मयखानेमे
जितनी हम छोडा करते थे पैमानेमे !
चुभुदेघे.

मी कालच पुण्यातील मिर्च मसाल येथे अ‍ॅन्टिक्विटीचे सहा पेग्ज लावलेले आहेत. त्यामुळे अजून डोके बधीरच आहे. त्यात आज माझी चक्क १८ वी अ‍ॅनिव्हर्सरी असल्यामुळे मीया विषयावर जरा कमी लिहितोय. कारण एक दिवस तरी पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागावे! Lol

आज उतनीभी मय बाकी नही मैखानेमे
जितनी हम छोडदिया करते थे पैमाने मे - असा 'बहुतेक' असावा तो शेर! नक्की आठवत नाही. क्षमस्व!

लोकेशन : घरी....... टेरेसवर्.......बाल्कनीत्.......हॉलमधे (आपलंच घर आहे ):) .........आणि बायको घरी नसावी Happy

वेळ : संध्याकाळ ७.३० ते रात्री ११.००...
कंपनी : नसेल तर उत्तम..... अगदीच खास असेल तर एकच मित्र...... मैत्रिण नकोच Happy
म्युजिक : मुकेश...... रफी........ किशोर....... पण थोडी दर्दभरी गाणी........ नसेल तर सरळ टीव्हीवर झी क्लासिकवर जुना चित्रपट (राजेंद्रकुमारचा नको)........किंवा ई क्लासिक वगैरे.....
कॉकटेल : बिनधास्त
ब्रॅन्ड : आपला नेहेमीचा.......
सोबतीला: चणे, फुटाणे, शेंगदाणे........ घरी काही शिल्लक असेल तर.... हो हो अगदी भाकरी सुद्धा Happy
जेवणासाठी : शक्यतो बाहेर जात नाही........ आधीच पार्सल आणलेले असते.

घरीच असल्याने कितीही प्या...... उलट्या करा........ काहीही करा....... सकाळी १०-११ वाजता उठा आणि पुर्ण दिवस दुखणारे डोके धरुन घालवा Happy

घरी पिण्याची मजा काहि वेगळीच आहे आणि त्यात जर मुसळधार पाउस किंवा भरपुर थंडी असेल तर अजुनच....>>> हो...खरं आहे अभिजित! मलाही अशा वातावरणात प्यायला खुप आवडतो.... भरपूर आलं घातलेला चहा आणि गरमागरम भजी.... चकना म्हणून Proud

मला वाटतय...सानी ह्या व्यक्तीवर लवकरच पंतविरोधी संघटनांचा मोर्चा जाणार ....:फिदी: ती एकटीच ह्या विशयाला समजुन चेष्टेवारी नेत आहे Happy

असो ...चहावरुन २ कॉकटेल आठवली ...

लॉन्ग आयलॅन्ड आईस टी = ३० म्ल व्हाईट विस्की + ३० व्हाईट रम +३० व्हाईट व्होडका +३० जीन+३० व्हाईट (अजुन कुठलं तरी एक स्पीरीट ..नाव मक्की आठवत नाही...) + आईस्ड टी _लिंबु !!! सह्ही ...एनी टाईम बेस्ट ह्याला मी कॉकटेल मधील राजा म्हणेन ...

आयरीश कॉफी = ह्या विषयी ऐकुन आहे नक्की माहीत नाही = सिंगल माल्ट स्कॉच + ब्लॅक कॉफी !! ट्राय करायला हवे Happy

लॉन्ग आयलॅन्ड आईस टी = ३० म्ल व्हाईट विस्की + ३० व्हाईट रम +३० व्हाईट व्होडका +३० जीन+३० व्हाईट (अजुन कुठलं तरी एक स्पीरीट ..नाव मक्की आठवत नाही...) + आईस्ड टी _लिंबु !!! सह्ही ...एनी टाईम बेस्ट ह्याला मी कॉकटेल मधील राजा म्हणेन ...<<<
चुकीची रेसिपी....

व्हाइट व्हिस्की???? नाही नाही.

मी अनेकदा बनवते लॉन्ग आयलंड आईस टी.

५ व्हाइट अल्कोहोल्स..
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. व्हर्माउथ/ व्हर्मॊथ ( vermouth)

प्रमाण सगळे १:१:१:१:१ - झेपेल तेवढाच १. प्रत्येकी २० एम एल इतकीच सुरूवातीला घ्यावी. टॉलरन्स खूप असला तरी ५ गोष्टी एकत्र आल्यावर टॉलरन्स गडबडतो.
टॉल ग्लास हवा.
त्यात बर्फ २/३ पातळीपर्यंत भरून ठेवायचा. काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे त्यात. मग कोक सोडायचा. काही थेंब लिंबु, एकदोन पुदिना पाने गार्निश ला. ग्लासला लिंबाची चकती.

Pages