मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

अभि यांच्या सुचनेनुसार पोस्ट संपादित करते आहे.
आता हा प्रश्न सर्वांसाठी आहे... वाटल्यास इथे उत्तर द्यावे, नाहीतर मला विपुत द्यावे अन्यथा स्वत:च्या मनात... Happy

१. तुम्ही पगाराचा किती टक्के भाग ड्रिन्क्सवर खर्च करता?
२. घरच्यांची हरकत असते का यावर? असल्यास घरात तुम्ही कशी भूमिका घेता?
३. रोज ड्रिन्क्स घेता का? उत्तर हो असल्यास घरच्यांसाठी वेळ मिळतो का?

....जमल्यास उत्तरे द्यावीत. Happy

सानीजी,

हा प्रश्न माझ्या मते वैतक्तिक आहे.... विपु मधे विचारला असतात तर बरे झाले असते,

तुमच्या विपु मधे उत्तर देतो आहे

अरे आपल्यातलं युरोपात कोण आहे >> 'सानी' नावाची अत्यंत 'शहानी' आणि सालस आयडी जर्मनीत निवासीत आहे असं जाणुन आहे.

पण हे काम त्या आयडी साठी अवघड असावं असे वाटते. (त्यासाठी फेडेक्स/पार्सल चा ऑप्शन आहे)

पंत,
मी ब्र्रुस्सेल्स मधे राहतो. Next year (2012) मी आणू शकीन......when I visit India. मला नक्की डिटेल्स द्या. आणि बेफी न्ना specially भेटायचं आहे. "बसायचं" आहे. I will contact you before I come.

Winston Churchill is at a party and drinking heavily. A lady walks to him.

The Lady : Winston, you are drunk, drunk and dead drunk!
W.C. : Madam, you are ugly, ugly and dead ugly! Tomorrow I will be sober again.
Rofl

>>दारु कोणती प्यावी ?
मिळेल ती. शक्यतो फुकट असेल तर दोन ग्लास जास्त ढोसावी.

>>किती प्यावी ?
जास्त पिण्याची शुद्ध उरणार नाही तोवर सुरू ठेवावी.

>>कशी प्यावी ?
तोंडाने

>>कोठे प्यावी ?
कुठेही.

>>कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
कॉक म्हणजे काय?

>>सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
शुद्ध हवा, मीठ, पिकलेले केळ, काय वाट्टेल ते.

>>मुजिक कोणते आवडेल ?
२ घोट उतरले की सगळेच मुझिक गंधर्व गायन भासते.

>>मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
शक्यतो गावभरच्या उखाळ्या पाखाळ्या

>>त्या नंतर जेवणाचे काय ?
अरे वा! नंतर कशाला जेवायचे? तेवढ्या जागेत २ पेग जास्त बसतात पोटात

>>उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
पिणे बंद झाले तर उतारा. नाही तर कशाला?

दारूमुक्ती
>>दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू पिऊ नये.

>>दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग
सगळेच इनोदी वाट्टे.

>>दारु कशी सोडावी ?
अर्र.. का सोडावी?
.
.
.
चीअर्स!!

छान

Sad

एक दु:खद बातमी

ब्लॅक लेबल (तसेच ग्रीन, रेड, गोल्ड व सर्वात महागडी ब्ल्यू लेबल) बनवणार्‍या जॉनी वॉकर कंपनीने शेवटची बाटली भरली. यापुढे या ब्रॅन्डचे उत्पादन होणार नाही. या ब्रॅन्डच्या पंख्यांना आता असलेला स्टॉक विकत घेऊन साठवावा लागणार

जॉनीवॉकरच्या सर्व ब्रॅन्ड्सच्या आत्म्यास शांती लाभो Sad

जॉनीवॉकरच्या सर्व ब्रॅन्ड्सच्या आत्म्यास शांती लाभो>>>. अनुमोदन........ Happy

यापुढे या ब्रॅन्डचे उत्पादन होणार नाही.

>>>काय सांगता काय

http://www.financialexpress.com/news/end-of-the-road-for-johnnie-walker/...

>>> :धक्का:

नाही हो ...असं काही म्हणु नका ...हे पहा

http://www.dnaindia.com/money/report_johnnie-walker-to-keep-walking-repo...

मागे ढकलपत्रातून एक "रिस्क" नावाची एक अफलातून कविता आली होती, ती इथे फक्त मनोरंजनासाठी देत आहे.

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!

मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||

मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...

मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!

मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||

टीप - ही अफलातून रचना माझी नाही. मला इमेल द्वारा ही मिळाली. मायबोलीकरांना आस्वाद घेण्याकरता सादर केली आहे

...जाधवांची घोडी उधळते...आगीच्या ज्वाळा नाचत असतात...तीत तिला सावली
दिसत असते...सायरन किंचाळत असतात...फायर ब्रिगेडवाले लोक तोंडावर पाणी
मारत असतात...बायको ठणाणा बोंबलत असते...मी गप पडून राहतो...काळ्या
कपाटातली बाटली गॅसवर उपडी झालेली असते...

-गा.पै.

काल माझ्यातल्या सज्जनाने आत्महत्या केली
फेसाळणाऱ्या बियर मध्ये सारी दू:ख धुवून निघाली ...

काल मी आयुष्यात पहिली चोरी केली
"ती"ही पहात असेल ...काय दशा "ति"च्या नादाने झाली

होतो बेकार बसून घरात ,इंटरव्ह्यू चा कॉल आला
पण अरे यार ...कंपनीत जायला सुद्धा पेट्रोल चा वांदा झाला

गेलो मग रेल्वे स्टेशन ला ...पार्किंग लॉट मध्ये गाड्या आल्या
१० लिटर पेट्रोल काढले आणि मस्त तंबाखू चा बार भरला

गाडीवरून गेलो मग इंटरव्ह्यू ला २ मस्त बियर मारून
साहेब पण बिचारा थकला मला प्रश्न विचारून विचारून

काही नाही साहेब जरा चेतन भगत ची कॉपी केली
सज्जनता खुंटीला टांगून ,नोकरी मात्र मस्त मिळवली ...

संदर्भ- [इतरत्र] FIVE POINT SOMEONE- Chetan Bhagat
बेवड्या ची आत्मकथा

Absinthe कुठे मिळू शकेल का भारतात? कोणाला अनुभव आहे का?
>>>

इथे मुंबैत गॅलेरीया , पवईतले एक हॉटेल अ‍ॅब्सिन्थ स्र्व्ह कर्ते म्हणे ...मलाही फार क्युरीयॉसिटी आहे ...लवकरच जावुन येइन म्हण्तो .
.
.
महेशराव , ती बातमी खोती आहे हो ....जॉनी वॉकर चिरायु होवो ...

Pages