मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

लोकेशन : चार मित्रापैकी एकाचे घर
वेळ : महिन्याचा शेवटचा वीकांत, संध्याकाळी ७ ते पहाटे ४-५
कंपनी : चार मित्र आहेत, फ़क़्त त्यांच्याबरोबर..नाहीतर एकटा जीव सदाशिव
म्युजिक : गरज नसते, महिन्यांनी भेटल्यावर मारण्यासारख्या बर्याच गप्पा असतात
कॉकटेल : घेतली तर बारमध्ये कधीतरी
ब्रॅन्ड : JD विस्की, absolute वोडका, बकार्डी गोल्ड रम
पद्धत : पहिला पेग फौर फिंगर्स + ५-६ आईस क्युब्स, नंतरचे फोर फिंगर्स आणि कोल्ड ड्रिंक्स (संपेपर्यंत)
सोबतीला: चिकन फ्राय, फिश फ्राय किंवा कोलंबी फ्राय
जेवणासाठी : चकनाच फार होतो
उतारा: गरज नाही पडत

कधी एकटा असतो तेव्हा smirnoff apple flavor घेतो. घराच्या खिडकीतून समोरचा समुद्र आणि न्यू योर्क ची स्काय लाईन बघताना पहाट कधी होते ते कळत नाही.अशावेळी एकट बसून मंद खासकरून गझल ऐकायला फार छान वाटत..

पिल्यानंतरचे विनोदी प्रसंग.....

कॉलेज ला असताना आम्ही एका मित्राच्या सुमो मधुन पार्टीला गेलो होतो. येताना गाडी मी चालवत होतो. घरी आल्यावर मी गाडी अगदी नीट व्यवस्थित रिव्हर्स घेउन पार्क केली. उतरुन थोड्या गप्पा वगैरे झाल्या. नंतर म्हणलं गाडी लॉक करुन आपली बाईक घ्यावी आणी घरी जावं

म्हणून दरवाजा लॉक करायला गेलो तर चावीच लागत नव्हती दोन चार वेळा प्रयत्न केल्यावर मित्राला शिव्या घातल्या म्हणलं "अरे काय ड्युपलिकेट चावी आहे का लागत का नाही ?????"

तर सगळे मित्र खो खो हसत म्हणाले "अरे मुर्खा कि होल पुढच्या दरवाजाला असतं मधल्या नाही......."

छ्या, काय दारू पिता पठ्ठेहो लोकेशन-बिकेशन ठरवून.. एकदम स्टँडंर्ड! Proud

ऐका,

१. एक टँगो घ्यायची, ९०-९० चे दोन पेग! तेवढंच पाणी. एका दमात संपवायची! चखना दोन(फक्त) शेंगदाणे!

२. हातभट्टीचा एक फुगा. लोकेशन हवंचेय तर गावाकडची कुठलीही विहीर. सोबत 'काढणं' आणि कळशी!

या वरच्या प्रकारांत चवी-चवीनं दारू पिणं निषेधार्ह! डायरेक्ट टॉप टू बॉटम! Proud

३. एक बीअर(कुठलीही) सोबत सिगारेटची अ‍ॅश! भन्नाट कॉकटेल!

४. कॉन्टेसा रम, ८पीएम, मॅक्डॉल रम!

आणी नेहमीचं आवडतं,
५. मॅक्डॉल क्वार्टर. नो वॉटर नो ग्लास! एकदम कच्ची! चखना म्हणून खाण्यासारखं काहीही! नसलंच तर सिगारेटी!
बाटली फोडायची, धगधगता अंगार घशाखाली उतरवायचा. वाकडं तोंड करत डोळे गच्च मिटायचे.
जास्तीत जास्त ८-९ घोट, बास्स! म्युजीक म्हणून मायकेल हेजेसचे इंस्ट्रुमेंटल किंवा कुमारजींच कोणतही भजन!

वरचे सर्व प्रकार ज्याने त्याने स्वत:च्या जबाबदारीवर करावेत! Proud

असले भन्नाट प्रकार मी तरी कधी करणार नाही.... Happy

ईंजिनीअरींग चा एक मित्र आदिवासी जमाती मधला होता. त्याच्या सोबत मोहाच्या फुलांची दारु ट्राय केली होती.

काय भयानक अनुभव होता. भयानक चढते.... बेक्कार हालत झाली होती माझी.

मोहाच्या फुलांची दारु >>>> ओह्ह हा एक जबरदस्त प्रकार आहे ह्याचे वर्णन संस्कृत साहित्यातही आढळते . मधु म्हणतात याला...माझ्या माहीती प्रमाणे मधुसुक्त पण आहे एक !! ....बंगाल ओरीसात महुवा नावाने सुप्रसिध्द आहे ...आपल्या कडे कल्याण च्या आसपास कोठेतरी आदीवासी आहेत बहुतेक त्यांच्या कडे मिळते अशी ऐकीव माहीती आहे ..... ...अजुन ट्राय करायला मिळाला नाहीये मला Sad

आणि बाय द वे हा बीबी विरंगुळा मधे का ?????

आरोग्यम धनसंपदा, कला, छंद, शिक्षण, संस्कृती, आधार, यामधे पण समाविष्ट होउ शकतो ना.... Happy

1) मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पितांना दिसला
कि आशेनें पाहणारा

२) सगळीच वादळं मी
खिडकीत बसुन सोसली
अन् हि बाट्ली सुध्धा
खिडकीत बसुनच ढोसली

३) घरा भोवति कुंपन नको
म्हणजे नीट आत जाता येते
बायकोनं नाहि उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येते

४) नेहमीच काव्याने नशा करु नये
कधी मद्दालाही वाव द्यावा,
तहानलेल्या रसिकांना
थोडी पाजुन भाव द्यावा

नीधप आणि नितीन,

वातावरणे व वर्णने उत्तमच!

मित्रांनो,

कालची वे. अ‍ॅ. साजरी करायला आज मी बायकोला घेऊन सातार्‍याच्या महाराजा रिजन्सीमध्ये आलो आहे. उद्या किंवा परवापर्यंत येथेच! आराम, टीव्ही, वाचन आणि 'इतर'!

त्यामुळे पंतांना विचारलं, म्हंटलं असलात सातार्‍यात तर या, येतीलही एखादवेळेस पंतिणीला घेऊन!

सहाव्या मजल्यावरील रूमला अ‍ॅटॅच्ड असलेल्या टेरेसवर अ‍ॅन्टिक्विटी, हवी ती ऑर्डर आणि थंड हवा विथ सातारा व्ह्यु!

-'बेफिकीर'!

पंत... मधुसूक्त हे मधाबद्दल आहे (९९% तरी)
चेक करून सांगतो.

बाकी एक इनोद-
संसारा उध्वस्त करी दारू,
म्हणूण संसार नका करू :);)

आम्ही कॉलेज ला असताना....

ठिकाण- फर्गसन महाविद्यालयाची टेकडी. मला खुप आवडते....संध्याकाळी बाराही महिने सुंदर वातावरण असते.

प्यायला:- एक बियर घ्या आणि त्यात एक पिल्लु ( ९० मिली) व्हिस्की ओता.

चकणा- लोणचं,

सोबत एखादा जिवलग मित्र....ज्याला आपले सगळे सिक्रेटस माहित असतात,

विषय- कॉलेज मधलं लेटेस्ट प्रेक्षणीय स्थळ किंवा आपलाच एखादा क्रश....आता क्रश लिहितोय पण त्यावेळेस खरंखुर आयुष्यभर निभाविण्या सारखं प्रेम.....

काय दिवस होते यार.

कॉलेज सपंलं आणि आयुष्यचं संपलं असं वाटतं........

च्यायला , सगळेच एवढे टाईट आहेत काय ?
बेफिकीरने एवढे सांगुनही कुणीही त्याला विश केले नाही
Happy anniversary बेफिकीरजी .

ए, गण पंत चल दारू ला ! Proud

खुशिया सेलिब्रेट करने के लिए तो हजारो पिते है,
कभी कभी गम को भी सेलिब्रेट किया करो..
ना मिले हम ना मिले तुम ना मिले चार यार
तो अकेले अकेलेही नशे मे डुब मरो... Happy

टिप - सेन्सॉरला सिग्रेटीसारखं बोटांच्या कात्रीत धरून "हर फिक्र को धुवे मे उडाता चला" हम दोनो चा देवानंद सारखं करा.

मी आणि माझे सहाशेसत्तावन्न फेक प्रोफाईल्स दारू पीत नाहीत. मार्गदर्शनाची तीव्र गरज आहे.
( हा धागा उघडल्याबरोबर अनोळखी असा तीव्र वास / भपका नाकात शिरला )

============================================
हम अपने आपमे महफिल है
जहा भी जाते है जम जाते है

नीधप ने काय फर्मस रेसीपी लिहिलीय....... एकदम डोळ्यासमोर आली...... मस्तच...!!!!

पंत, आयरिश कॉफी ब्येस्टच असते....... Wink

वाडा, विक्रमगड, जव्हार परिसरात "मोहाच्या फुलांची दारू मिळते.... कधी ट्राय नाही केलिये....
अजूनतरी मोह आवरलाय...!!

आपलं नेहेमीचं ...
सिंगल माल्ट, बर्फ आणि कोक .. (कोकाकोला .. हो .. नाहीतर भलताच भ्रम व्हायचा !)
सोबत एखादे पुस्तक / मूवी / गाणी / फ्रेंड्स किंवा कोणतेही सिटकॉम / आय.आर.सी. चॅट्स (मूड नुसार)
आणि पंत ... एकटे पिण्याची वेळ यावी लागत नाही... एकटे पिण्याचं नशीब लागतं ! Happy

मी अनुभवातून शिकलेल्या काही गोष्टी :
१) पिताना कोणालाही स्वतःहून फोन करू नये.
२) नो हॅकिंग वेन ड्रंक

बेगम बाजार तो हो आया मै
लेकिन अनाज नहीं
हा कुछ शीशे का सामान जरुर लाया हु .
(खुदा ने कहा है बंदे तेरे खाने का जिम्मा मेरे सर पर
लेकिन पिने के बारे मै उसने कुछ नही कहा
सो पिने की जिम्मेदारी मैंने ही लेली…)

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल
दुनियेसाठी टाकाऊ अन नको-नकोसे गटार हे
माझ्यासाठी निर्झर होऊन खळखळणारे अल्कोहोल

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल…
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल

साथ कुणी इतकी ना देते
हाक कुणाची ना मिळते
रक्तासोबत इमान होउनी विरघळणारे अल्कोहोल

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल…
जगासवाटे अनैतिक जे निषेध करते जग ज्याचा
आशा होउनी दुखःवरती हळहळणारे अल्कोहोल

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल…
(सन्मानाचे दिवस झेलतो जरी कौतुके जग अवघे
तिच्या कटाक्षावाचून रात्री तळमळणारे अल्कोहोल …)

फणा काढल्या मृत्युवरती मोहून गेला मंडूक मी
मंडूक म्हणजे?…बेडूक रे बेडूक दादा…
जातीवंतसे जहर होउनी सळसळणारे अल्कोहोल …

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल…
(रसायनांची किमया नामी , यमदुतांचे कष्ट कमी
हे मृत्युचे भाग्य होउनी फळफळणारे अल्कोहोल)
मी तय पितो ,ते मज पिते
दोघांमध्ये खेच सुरु
पुरून उरुनी खळग्यापाशी भळभळणारे अल्कोहोल…

- संदिप खरे, सांग सख्या रे ..

एकटे पिण्याची वेळ यावी लागत नाही... एकटे पिण्याचं नशीब लागतं ! >> हे मात्र पटल..
पिताना कोणालाही स्वतःहून फोन करू नये. >> अगदी अगदी मनातल बोलला बघा राव...

मी वपुंच पार्टनर आणि सुशिंच दुनियादारी एका रात्री आधी न पिता आणि नंतर पिऊन पूर्ण वाचलं आहे ..
दोन्ही सुंदर अनुभव होते ..

सध्या जॉन ग्रिशमच " द रनअवे ज्युरी " वाचतोय ... हे मात्र न पिताच बरे आहे !

अभिजित लेका लकी आहेस ...
कॉलेजच्या काळात हे सर्व करता आले ते .. मजा आहे बुवा .. Happy
मी ठरवले होते ..... आप कमाईनेच प्यायची म्हणून ... तेच करतोय !

असो ... वेल ... पितानाची तुमची आवडती गाणी कोणती तेही जरा सांगा पाहू ... नावासकट .. फक्त गायकांची नावे (किशोर / रफी) वैगेरे सांगू नका ..

आणि नीधप ... रेसेपी करता धन्यवाद ... जमेल तेंव्हा नक्की करून पाहीन.

निळूभाऊ,

मी वयाच्या १७ व्या वर्षा (१२ वी झाल्या नंतर) पासुन काही ना काही काम धंदा, नोकरी, करुन कमावुन शिक्षण पुर्ण केले.
घरची परिस्थिती चा यात काही संबंध नाही, मलाच किडा होता. खुप सारी लहान सहान कामे करयचो. शिक्षण खर्च भागवुन जे काही शिल्लक रहायचे त्यातुन हे सारे उद्योग ..... Happy

ते दिवस वेगळेच होते असो. स्पष्टिकरण देत नाही पण मी पण बापकमाईची कधी पिलो नाही. ऐश करायची तर स्वताच्या पैशाने हे माझंही तत्वं होतं आणि आहे....... Happy

>>बेफिकीरने एवढे सांगुनही कुणीही त्याला विश केले नाही
इकडे सद्ध्या अमृताबद्दल चर्चा चालू असल्याने कोणाला विश सुचले नाही हो Wink

आज रात्री मी चक्क ४८ तासांच्या गॅपनंतर पिणार आहे याबद्दल कुणीतरी माझे अभिनंदन कराल का??

Pages