मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

सर्वप्रथम या धाग्याबद्दल आपले अभिनंदन!

या धाग्यावरः

१. दारूमुक्ती

२. दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय

३. दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

४. समजा दारू प्यायची सवय असलीच तर आजूबाजूचे वातावरण कसे असावे याबाबतची मते

हे घटक असावेत असे वाटते.

हे सदर दारूचे उदात्तीकरण करण्यासाठी नसून दारूवर व्यवस्थित माहिती असावी यासाठी असावे असेही वाटते व त्याचवेळेस गंमतशीर प्रसंग लिहिण्यासही मज्जाव नसावा.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(लिंक देता यावी म्हणून हा प्रतिसाद नुसताच संपादन खिडकीत जाऊन पुन्हा अपडेट केला)

पंत Lol

बरोबर आहे बेफीकीरजी... हा धागा खेळकरपणे घ्यावा...

मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसन, अनुभव, व्यसनमुक्ती व मनःशांती असा असायला हवा हा धागा... म्हणजे तो परिपूर्ण होईल. Happy

-------------------------------------------------------------------------------

संसारा उध्वस्त करी दारु...
बाटलीस स्पर्श नका करु
(दूरदर्शनवरच्या जनकल्याण जाहिरातीचे कॅप्शन)

"बिस्किटे अशी खावीत " ह्या धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.

हेच चुकते आहे
कोणी केले म्हणुन आपण करावे त्यापेक्षा वेगळ काही अपेक्षीत आहे

हॅन्ग ओव्हर -

हा दारूचा सर्वाधिक होणारा त्रास!

अल्कोहोलमुळे शरीरातील पाणि इतके शोषले जाते की मेंदूसभोवताली असलेल्या आवरणातूनही मेंदू पाणी शोषून घेतो. याचा परिणाम / याचे परिणामः

१. डोकेदुखी

२. अस्वस्थता व कशातही लक्ष न लागू शकणे

३. आवाजामुळे त्रास

४. उन्हात त्रास व डोकेदुखी

५. भूक न लागणे वगैरे

हे टाळण्यासाठी:

१. ड्रिन्क्स घेताना किमान चार ग्लास पाणी प्यावे.

२. काहीतरी खाऊन मग ड्रिन्क्स घ्यावीत.

३. ड्रिन्क्स घेतल्यावर शक्य असेल तितके खावे

४. आईसक्रीम मिळत असल्यास खावे

५. झोपायच्या आधी किमान सव्वा लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

६. सराव नसल्यास कॉकटेल्स करू नयेत, एकच ब्रॅन्ड घ्यावा.

७. तीन पेग घ्यायचे असल्यास (सराव कमी असल्यास) ते घेण्यासाठी किमान दोन तास खर्च करावेत.

अजून उपाय सुचवले जावेत.

सामान्य ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने हा धागा उपयुक्त आहे पंत. तो काढल्याबद्दल आपले आभार.

मला अनुभव नसल्याने मधून मधून मी मला पडत असलेले प्रश्न विचारीत जाईन. सर्व अनुभवी लोकांनी मार्गदर्शन करावेत ही नम्र विनंती.

एखादा प्रश्न फारच बाळबोध वाटल्यास मोठ्या मनाने अपराध पोटात घालावा...दारू पोटात घातल्यासारखा!!!

धन्यवाद!!!

Proud
Biggrin

एखादा प्रश्न फारच बाळबोध वाटल्यास मोठ्या मनाने अपराध पोटात घालावा...दारू पोटात घातल्यासारखा!!!>>>

Lol

मी : तु ही चल, फार मजा येतं.>>>

म्हमईकर साहेब,

न पिताह 'मजा' या शब्दाचं लिंग बदललंत की काय? 'मजा येतं'!

Lol

दारूचे वाईट परिणाम दर्शविणारी एक काल्पनीक काव्यरचना!!!

तुझ्या रोजच्या ग्लासात आपल्या संसाराची राख असते
निश्चिंतपणे वाट पहाणार्‍या काळपुरूषाची हाक असते

भयानक घोट हे गरळाचे तू कशासाठी रिचवतोस?
पार तळतळाट झाला तरी कसे बरे पचवतोस?

लोक म्हणतात, माझं कुंकू रोज गटारीत लोळतं
त्यांना काय कल्पना ते माझं काळीजही जाळतं

एक एक पेग संपवून जेव्हा तू छद्मी हसतो
पोटच्या पोरांचा त्यात मला हंबरडा दिसतो

जसा बाप तशी पोरं, असे कधी न होऊ दे
तुझ्यासंगं तुझ्या दारूचंही, वाट्टोळं होऊ दे

२२.०८.१९९६

लोकेशन : मॅन्गी रेटोबार , पवई लेक समोर
वेळ : साधारण सुर्यास्ताची...६..६:३०
कंपनी : मित्र मैत्रीणी ( स्पाउस शक्यतो टाळा ...नाहीतर "बरेच काही" मिस कराल )
म्युजिक : रॉक
कॉकटेल : मडी मोजितो
कॉककृती : ६० म्ल व्होडका + पुदीन्याची पाने बारीक कापुन ( अगदी पेस्ट नाही ) + लिंबाच्या २-३ स्लाईस +क्रश्ड बर्फ + नॉर्मल सोडा ...स्टर करुन ... सर्व्ह्ड इन एकदम त्रिकोनी ग्लास विथ एक लिंबुस्लाइस तिरकी लावलेली
जेवणासाठी : थिन क्र्स्ट पिझ्झा ..एनी

चीअर्स !!

Pages