मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

डाक्टर,
माझा पत्ता इमेल करतो आहे. बाटली तुम्ही ठेवून घेतली तरी चालेल, आतला जॉनी वॉकर पाठवा.
नेक्ट टाईम शक्यतो तो पेशंटच माझ्याकडे रेफर करा.
धन्यवाद.

Chateau Indage दुर्दैवाने बन्द पडली. त्यान्च्या wines फार छान असायच्या. पुण्या मध्ये (camp) Diamond cafe आहहे. typical इराण्याच हॉटेल. तिथे बीअर आणि ब्रीझर मीळते. एकुणात वातावरण, तिथली ड्राफ्ट बीअर फार छान आहे. खाण्यासाठी खूप पर्याय नाही आहेत पण माझ्या मित्रान्च्या म्हणण्या नुसार तिथला फ्रेन्च टोस्ट चान्गला असतो.

दारुचे दुष्परिणाम वाचल्यावर......

त्याने वाचणे सोडुन दिले.

------ फेसबुकावरुन आलेला सोबत केष्टो मुखर्जीचा फोटो...

ब्लॅक लेबल जॉनी वॉकर ची अक्खी बाटली<<<< Sad
मी परवा आलोच होतो तेव्हा का बेरे नाही सांगीतलेत डॉ . साहेब ???

गट्टी फूsssssssss तुमच्याशी .!!!!! Sad
_________________________
Lol

अच्छी पियो चाहे बुरी पियो..
जब पियो. तो शराब पियो....
-----------------------------------------
जालावरुन साभार

अच्छी पियो चाहे खराब पियो..
जबभी पियो. तो शराब पियो....

टीपः हा "पर्यायी" शेर नाही आहे कारण पर्याय द्यायला मी काही देवपूकर सर नाही

दारु पिण्याचा अजून एक फायदा आहे "You will be excellent on Bed for the night, त्या रात्री बायको खूष होऊन जाते"
पण हे कोणीच का लिहलं नाही? की नुसतं मलाच तसा अनूभव येतो? सांगा रे बाबानो...!

त्यात प्रकार असावेत लालशाह. काहीच न झाल्यामुळे खुष होणारी असू शकते आणि बरेच काही झाल्याने! त्यामुळे तुमच्या प्रश्नावर कोणी काही बोलत नसेल, कारण कोणत्या प्रकारात तुम्ही मोडता हे कोणाला माहीत?

Light 1

Chateau Indage दुर्दैवाने बन्द पडली
झोटिंग , नाही हो, चालू आहे.
दोन आठवड्यांपूर्वीच नारायणगावला जाणं झालं आहे.
सारं काही आलबेल दिसलं. अर्थात रेस्तराँमधे.

दारु पिण्याचा अजून एक फायदा आहे "You will be excellent on Bed for the night, त्या रात्री बायको खूष होऊन जाते"
लालशाह,
अदमासे पंचवीस वर्षांपूर्वी वाचलेल्या सातोस्कर भांडारकर या फार्माकॉलॉजीच्या पुस्तकातल्या
it provoketh and unprovoketh it provoketh the desire but it taketh away the performance
या अल्कोहोलबद्दलच्या अवतरणाची आठवण झाली.
अर्थात ते अवतरण बार्ड ऑफ अव्हॉनच्या 'मॅकबेथ'मधील आहे.
अधिक काय लिहिणें.

@pracharak2002
>>>झोटिंग , नाही हो, चालू आहे. दोन आठवड्यांपूर्वीच नारायणगावला जाणं झालं आहे

हो? Happy अरे वा... चान्गली बातमी. मी इथे पुण्यात अनेक वेळा विचारल पण सगळ्या दुकानदारानी मला chatu बन्द झाली म्हणून सान्गीतल. तुम्ही त्या wineray मध्ये पण गेला होता का? ती चालू असेल तर एकदा तिथे चक्कर मारून stock up कराव म्हणतो.

काहीच न झाल्यामुळे खुष होणारी असू शकते आणि बरेच काही झाल्याने!>> मी सध्या बरेच काहीच्या गटात आहे. पण काहीच न होण्याचा टप्पा पण येतो की काय? अरे बापरे! तो टप्पा गाठण्याआधीच दारु सोडावी की कसे?
आता मात्र खरच घाबरलो...
बेफी... घाबरवलात बघा!

पण काहीच न होण्याचा टप्पा पण येतो की काय? अरे बापरे! तो टप्पा गाठण्याआधीच दारु सोडावी की कसे?
आता मात्र खरच घाबरलो...
बेफी... घाबरवलात बघा!<<<

घाबरण्यासारखे फारसे काही नाही , अनेकदा काहीच न होण्यामुळे बायको अधिकच खुष झाल्याचे काही दाखले मिळालेले आहेत वर्तुळांमधून!

अनेकदा काहीच न होण्यामुळे बायको अधिकच खुष झाल्याचे काही दाखले मिळालेले आहेत वर्तुळांमधून! <<<< अरा रा रा रा …
नारायणा आणि काय काय दाखवशील रे Proud

Sanjeev.B | 8 February, 2011 - 20:52

सौ : घरी यायला उशीर का झाले ?
मी : दारु च्या धाग्यावर होतो फिदीफिदी
सौ : ????
>>>>>>>>>>

म्हणजे आज इतकी चढली तर Lol

कधी, कुठे, कोणती, किती, आणि कशी प्यावी ही अक्कल असेल तर दारूचा खरा आस्वाद घेता येतो!

गेल्या शुक्रवारीच एक नवीन काॅकटेल घरी ट्राय केलं. माझा नवरा पीत नाही पण आणून द्यायचं काम करतो..त्यामुळे काॅकटेल बनवून पिणारी मीच .. मला आवडली ही रेसिपि पण सगळ्यांनाच आवडेल हे सांगता येणे कठीण -
१ हिरवी मिरची, पुदिना , १ अख्ख लिंबू मिक्सर मधे बारीक वाटून घ्यायचं. त्यात स्प्राईट आणि झेपेल तितकी टकिला (मी पाव कप टाकली) टाकावी. मस्त ग्लासच्या कडा मीठात घोळवून काॅकटेल मधे बर्फ टाकून मजा लूटा.

Pages