मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

योगयोगाने मी टाकलेल्या पोस्टने ३०० प्रतिसाद पूर्ण झाले सो अ‍ॅन अनादर रीझन टू से.... चीअर्स.

वोह केहते है हम जन्नत निकलते है,
४८ घंटो बाद फिर निकलते है,
'ए बेफिकीर' जरा सबर.....
साथ तेरे हम भी चलते है... Happy

चिअर्सsssss डॉक..

मयस्सर नाही हो, मय!

हा हा हा हा!
बेफिकीर , मयस्सर हा शब्द बरोबर असावा.
कारण मी तो शेर एका उर्दु जाणकाराकडुनच ऐकला होता.
हा अजुन एक मयस्सर शब्द असलेला शेर आहे.
Bas ke dushwaar hai har kaam ka aasaan hona
Admi ko bhi mayassar nahin insaan hona

- 'Ghalib'

बरोबरच आहे नां.
आज ईतनी भी मयस्सर नही मयखानेमे
(म्हणजे शिल्लक नाही किंवा मिळण्याची शक्यता नाही)(मय , मदीरा हा शब्दच न वापरता)

महाविद्यालयात असताना मद्यपान वारंवार व्हायचे. फक्त कारणाची खोटी असायची. . . . आता १५ वर्षे मध्ये गेली, जागा बदलली, आजूबाजूची माणसे बदलली, रिती बदलल्या आणी सवयीही बदलल्या. .... दारू पूर्णपणे सुटली.

पण आता नवा अनुभव,

काही दिवसापूर्वी खोकला झाला, काहिकेल्या कमी होत नव्हता. घरी ब्रांडी आणली होती, छोट्या पिल्लाला छातीवर थंडीत (खूप असते रात्री, अगदी शून्याखाली) चोळायला. बायको म्हणाली थोडी घेउन पहा (मला नव्हती ही अक्कल सुचली). तेव्हा रात्री घेतली चांगली, लगेच झोपून गेलो.

सकाळी दारूने जादू केली होती.

परवाचा किस्सा लिहायचाच राहिला ....सातार्‍यात मस्त १.५ बीयर पिवुन जेवायला गेलो होतो ....नीतिराज ठाबा ...ओह्ह्ह फन्टॅस्टिक मालवणी चिकन / मटन ...अहाहा ....

आणि येताना नको तेच झाले ...

पोलिसांनी पकडले .
.
.
मग भुंग्याचा " जादुगाराचा " लेख आठवला
.
.
कॉन्फिडन्टली बोललो ....डाउट आला नाय जादुगाराला ...सुटलो ....भुंग्याचा माबो वरील तो लेख वाचल्याचा फायदा झाला .
.
" मायबोलीचे उपकार "........... दुसरं काय ?..........:हहगलो:

Glenfiddich याचा नक्की उच्चार काय आहे ???????? कोणाला माहित आहे का ?

मी काल ऑर्डर करताना ग्लेनफिडिच असं म्हणालो तर वेटर परत प्रश्नार्थक चेहर्‍याने ग्लेनफिड असं म्हणाला.

नक्कि काय आहे उच्चार ??????

सिंगल मॉल्ट जर ऑन द रॉक्स नसेल चालत तर सोबत काय घ्यावे ?

सिन्गल माल्ट - मी तरी कशीही घेतो बुवा!

बर्फ घालून / न घालून

सोडा घालून / न घालून

पाणी घालून / न घालून

सिन्गल माल्ट घालून / न..... अरे?? काय बोलतोय मी????

काय पुसताय की "कशी प्यावी?"
माणसाने हवी तशी प्यावी

-'बेफिकीर'!

तिची एक सख्खी धाकटी बहीण पण आहे.

ग्लेनलेव्हिट!

ती मात्र चारचौघात बघून हासत नाही.

(म्हणजे : एकट्यानेच प्यावी अशी आहे.)

होतं असं कधी कधी असो. Happy

तुम्हाला अजुन एक विचारायचं होतं. तुम्ही मागं एका कथे मधे हायलन्ड पार्क चं नाव टाकलं होतं मला परवा ट्राय करायाची होती तर त्याने teachers highland म्हणुन काहितरी मिळते ती आणून दिली.....

या दोन्ही सेम का?

अजुन एक....

सिंगल मॉल्ट मधे आणि स्कॉच मधे काय फरक. गुगलुन पाहिलं पण काहि कळाले नाही.

ग्लेन्फिडिच ची पुर्ण बाटली कितीला आहे हो ?????????

मी काल गेलो तिथे स्मॉल २३९ ला होता.

या दोन्ही सेम का?>>>

नसाव्यात!

एक कोकणस्थ अन दुसरी कर्‍हाडे!

यात देशस्थ कुणी नाही.

टीचर्स चढण्यात कंजुष, हायलॅन्ड पार्क उतरण्यात!

ग्लेनफिडिश असावी पाच एक हजाराची!

ग्लेनलेव्हिट साधारण साडे चार हजाराची असावी!

नक्की माहीत नाही.

उतरेचना एकतर कालची आणि इच्छा पुन्हा प्यायची
गुरुवार केला तरी व्यर्थ जातो नि शनिवार केला तरी >>>>>>>>>>>>>>>

आमचा नाही. कारण पण म्हणजे पण. काहीही झालं तरी जे ठरविले ते मोडायचं नाही. ही खात्रि नसेल तर काही ठरवायचच नाही..... Happy

तुम्ही मागं एका कथे मधे हायलन्ड पार्क चं नाव टाकलं होतं>>>

तुम्ही थोडीफार वाचली होती ती कथा?

तुमच्या नक्शे-कदममध्ये तर तसं वाटत नाही.

असो!

कारण पण म्हणजे पण. काहीही झालं तरी जे ठरविले ते मोडायचं नाही. ही खात्रि नसेल तर काही ठरवायचच नाही.>>>

मला अशी भूमिका फार आवडते. तुमच्याबद्दल मला प्रामाणिकपणे आदर वाटत आहे. याला उपहास समजू नयेत असे मुद्दाम लिहावे लागत आहे.

माझ्याकडे एक लिटरच्या दोन गोष्टी कायम असतात.

ग्लेनफिडिश आणि चितळे म्हशीचे दूध!

सध्या मी त्यातले पहिले पेय पितो, दुसरे पिण्याइतकी नैतिक घसरण होणार नाही अशी प्रार्थना आहे.

माहोल बराच शायराना झाला आहे वाटते.... पाउलखुणा ला नक्शे कदम का ???????

माझे प्रतिसाद खुप कमी सापडतील.... याला दोन कारणे आहेत

१. मी शक्यतो जास्तीत जास्त वाचनावर भर देतो.

२. मी माबो वर रेगुलर नसतो कारण जॉब मुळे खुप फिरणं होते. एकदा दोनदा दिसलो कि चार पाच दिवस गायब असतो

पण म्हणजे पण. काहीही झालं तरी जे ठरविले ते मोडायचं नाही. ही खात्रि नसेल तर काही ठरवायचच नाही>>>

अभिजीत पंचवीस,

मीही अगदी याच क्याटेगरीतला आहे.

शक्य असेल तितकी आणि तितक्या वेळा प्यायचीच! जमले तर रोज!

मोडत नाही मी कधी हा नियम!

एकदा दोनदा दिसलो कि चार पाच दिवस गायब असतो>>>

मी एकदा जरी दिसलो तरी लोक मला चार पाच दिवस गायब करतात.

Rofl

Rofl

चला, तुम्हाला शुभरात्री, पल्याडचे असलात तर सुप्रभात!

मला जरा झोप आलीय, कारण अ‍ॅन्टिक्विटी संपली राव!

मजा आली तुमच्याशी बोलून!

एकदा भेटूच!

-'बेफिकीर'!

आपली कधीही ना नाही. कधीही, कुठे ही कोणत्याही वेळी ( २४ तासामधली कोणतीही वेळ).....

फक्त शनिवार सोडुन....

पंत पण म्हणाले होते एकदा बसु.....

सगळे नुस्ताच म्हणताय नक्कि ठरवा कि एकदा कधी तरी...

बाय द वे

शुभरात्री....

मी पुण्य नगरी मधे आहे रहायला....

Pages